मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- चित्रनाट्यधारा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2020 - 23:45

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.

या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.

पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!

मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.

XXसXX

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नटसम्राट
त्यांचेच अजून एक नाटक ज्यात जुलेखा या नावाचे एक पात्र आहे.

बरोबर
स्वरुप, द्या पुढचा प्रश्न

पुढचा प्रश्न, उत्तर बरोबर असल्याचे कळवल्या नंतर देणे अपेक्षित आहे का? >>

असं काही नाही. उत्तर बरोबर असल्याची खात्री असेल तर लगेच पुढचा प्रश्न दिला तरी चालेल. खात्री नसल्यास थांबा.

चांगला आहे हा खेळ>> धन्यवाद

कोणालाच उत्तर येत नाहीये का ?..
संयोजक पुढचं कोडं देता का ? त्यांना पुन्हा वेळ मिळाला कि पुढचा क्लू देतील ते ..
कोडं देणाऱ्याला नंतर वेळ नसेल होणार .. तर कोड्याचं उत्तर संयोजकांना देऊन ठेवायचं असं काहीतरी ठरवूया का ?

>>पण ते योगेश सोमणांच आहे का ते नाही माहिती Sad

मलाही नव्हते माहित.... आता हिंट द्यायची म्हणून शोधाशोध केल्यावर कळले!

माझे बरोबर असल्यास पुढचे कोडे

पाच अक्षरी चित्रपट

दिग्दर्शक एक विक्रमवीर व सुंदर चित्रपट देणारा .
यात एक हिंदीतील गाजलेला कलाकार पण आहे.

नाही , हे विक्रमवीर अगदी नामवंत शहरी मराठी कलाकारांना घेतात, प्रकाशचित्रण सुंदर असते
नटसम्राट चूकच

नाही !
तो जो हिंदीतला कलाकार आहे ना, त्याची एक हिंदी दूरदर्शन मालिका ९०च्या दशकात खूप गाजली होती.

Pages