माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. आणि त्याचं आवाज करुन हसणं तर भयंकर आहे.
राधाक्काचा चेहरा दुसर्‍या लग्नानंतर अजुनच निब्बर दिसु लागलाय.

तो गुजराती जो शनायाच्या आईशी लग्न करणार होता त्याला मी बघितलं कुठल्यातरी मालिकेत बहुतेक सोनी मराठीवर. शनायाने बारीक झालं पाहिजे, त्या छोट्या चड्ड्या शोभत नाहीत तिला. राधिका अमेरिकेला जाणार होती ना, का नाही गेली. तिथले लोक कसे सुधारणार मग. एका साईप्रकाशने आईवडिलांची जबाबदारी घेतली, बाकीचे मुकले या परिवर्तनाला. बनहट्टी सगळे तिच्यासाठी मातृभूमीत स्थायिक झाले एवढा तिचा महिमा आहे.

अथर्व कुठे आहे ??? .सुबोध आणि रेवती , समिधा आणि पंकज , बकुळामवशी , तिची ती पोलिस मुलगी , त्या चाळीतल्या मसाला कुटणार्या बायका ---- सगळे आहेत कुठे ?
आई बाबांच नागपूरचं सगळ आता कोण सांभाळत ?

तो साईप्रसाद झालेला विकास पाटील आहे ना?

गुरव काल मायाला लालगुलाब, चॉकोलेट्स देत होता तर ती म्हणे...ओल्ड स्कूल! >>>>>>> बोलणारच. जग पुढे गेलय हा मात्र लालगुलाब आणि चॉकोलेट्स वर अडकून राहिलाय. नेट बिट सर्च करत नाही का माणूस?

मग जेनी म्हणनर की अहो
जरा डेलिगेट करा मॅम >>>>>>> जेनी रिसेप्शननिस्ट होती ना गुरुच्या कम्पनीत असल्यापासून?

मार अ लागो सौ मित्र बन रे हत्ती >>>>>>>> Rofl

राधिकाच्या आभार प्रदर्शन भाषणाच्या टेपनन्तर आता सौमित्रच प्रेमाआलाप दर एपिसोडगणिक ऐकावा लागतोय. ' राधिका तु अशी आहे , म्हणून तु मला आवडतेस. तु अमुक ढमुक वागतेस म्हणून तु मला आवडतेस. "

जेनी रिसेप्शननिस्ट होती ना गुरुच्या कम्पनीत असल्यापासून? >>> ती फार वर्शापूर्वीची गोष्ट झाली .
नंतर राधिका मसालेच्या सुरुवातीच्या काळात , राधिकाला तिच्यातला स्पार्क दिसला .

ती फार वर्शापूर्वीची गोष्ट झाली .
नंतर राधिका मसालेच्या सुरुवातीच्या काळात , राधिकाला तिच्यातला स्पार्क दिसला . >>>>>>> अच्छा अस होत तर.

कालचा एपिसोड बघितला. अर्थवला सुट्टी असते, सौमित्र तर काय रिकामटेकडाच असतो. राधिकाला ऑफिसला जायच असत तरीही हे दोघे तिला फिरायला जाण्यासाठी जबरदस्ती करतात. राधिका त्यान्ना नाही म्हणते. सौमित्र तिच्या परमिशनशिवाय ऑफिसला कळवून टाकतो की हि आज येणार नाही. सौमित्रची आई सुद्दा त्यान्चीच बाजू घेते. शेवटी राधिकाचा नाईलाज होतो, गेले तिघ फिरायला. हे पटल नाही.

खर तर सर्वात आधी अर्थव हट्ट करतो फिरायला जाण्याचा. एरवी सौमित्र समजूतदार असण मिरवतो, काल मात्र लहान मुलासारखा वागत होता. अरे चाललय काय!

त्यांना माहिती आहे ही ऑफिसला जाउन लुटुपुटु मिटिंगी घेणार त्यात घरगुती गप्पा मारणार, बळंच्या देलिगेशन्स करणार त्यापेक्षा फिरायला जाउया.
मग अथर्वचा हट्ट पुर्ण केल्याचा सैमित्र्याचा चांगुलपणा अधोरेखित करणारे ड्वायलॉग असणारा एपि हवा की नको हा??

त्यांना माहिती आहे ही ऑफिसला जाउन लुटुपुटु मिटिंगी घेणार त्यात घरगुती गप्पा मारणार, बळंच्या देलिगेशन्स करणार त्यापेक्षा फिरायला जाउया.
मग अथर्वचा हट्ट पुर्ण केल्याचा सैमित्र्याचा चांगुलपणा अधोरेखित करणारे ड्वायलॉग असणारा एपि हवा की नको हा?? >>>>>>>>> +++++++११११११११११११ Lol

आज अर्थवच्या वाढदिवशी तमाशा होणार आहे गुलमोहोरमध्ये.

पण आता राधिकाला माझ्या नवऱ्याची बायको असं म्हणता येणार नाही तिसरीला, तिचा नवरा कुठे आता गुरु.

राधिका आणि गुरूचा घटस्फोट दाखवलाच नाही. गुरुचं आणि शनायाचं लग्नही लुटूपुटूच होतं बहुतेक. राधिका गुरूला अजूनही अहो म्हणते, किती तो आदर. जळी स्थळी सौमित्र आणि राधिकाने एकमेकांवर स्तुती सुमनं उधळून झाली की बहुतेक त्यांचा मधुचंद्र होईल आणि अथर्व बढाई हो म्हणेल.

राधिका आणि गुरूचा घटस्फोट दाखवलाच नाही. >>> अरे बापरे, ह्या सिरीयलमधे सगळंच बेकायदेशीर सुरु आहे का.

ही मालिका आजुन चालु आहे? अडिच वर्षापुर्वी टिव्ही चे व्यसन सोडले तेव्हा ही मालिका चालु होती.

मायबोलीच्या धाग्याचे नाव मालिकेने सार्थ केले. तिसरी बायको येणार वाटत.

पण आता राधिकाला माझ्या नवऱ्याची बायको असं म्हणता येणार नाही तिसरीला, >>>>>>>> राधिका नाही पण शनाया म्हणेल.

जळी स्थळी सौमित्र आणि राधिकाने एकमेकांवर स्तुती सुमनं उधळून झाली की बहुतेक त्यांचा मधुचंद्र होईल आणि अथर्व बढाई हो म्हणेल. >>>>>>> मधुचंद्राचीच तर बोम्ब आहे. सौमित्रची आई सुद्दा काल म्हणाली तिला की आता तुम्ही सहजीवन सुरु करायला हरकत नाही. तरीही हिचा नर्व्हसनेसपणा जात नाही. अजूनही ही गुरुला विसरली नाही अस कालच्या प्रिकॅपवरुन वाटल.

माया मला शनायापेक्षा बरी वाटली. सेल्फ सफिशियण्ट, हुशार आणी हेडस्ट्रॉन्ग आहे. तिने गुरुच्या गोड गोड बोलण्याला फसू नये म्हणजे झाल.

शनायाच्या कपडयान्ना विरोध करणार्या गुरुच्या बाबान्ना माया वन पीसमधे अर्थवच्या बर्थडे पार्टीत आली ते बर चालल. Uhoh

अरे? मला वाटलं closing ceremony चालू असेल इथे, नवीन सिरीयल येतेय ना? इतका आनंद झाला मानबा बंद होणार असं वाटून. पण इथे वाचून असं काही दिसत नाही, बंद होण्याची लक्षणं नाहीत

हो. आताच बघितला प्रोमो.
तिघी एकत्र येणार! आणि थोडक्यात 'ओत पाणी कर कालच्यावानी' प्रकार सुरु आहे.

आता माया कोण आणखी?

कंपनीच्या हॉलवे येता जाता मधे मोठ मोठे निर्णय ("टाउन ब्रॅन्च तोट्यात आहे? असं करा. ती ब्रॅन्च बंद करा.") घेउन कंटाळले का हे लोक?

चित्रपट वगैरे मधे आता आयफोन दिसणार नाहीत असे अ‍ॅपल चे काहीतरी कॉण्ट्रॅक्ट झाले आहे. त्या एका सीन मधे बॉस चा फोन गुरूच्या हातात पडतो, त्यावर आलेला अमेरिकन कॉल परस्पर घेउन तो तिथला "प्रॉब्लेम"ही सोडवतो, हे सगळे त्या कंपनीत कामाला नसताना. ते पाहून आपल्या ब्रॅण्ड व्हॅल्यूला झालेला धोका लक्षात घेउन अ‍ॅपलने हा निर्णय घेतलेला दिसतो Happy

फारेंड.. Lol
माया ही सौमित्र ची जुनी मैत्रिण आणि त्यांच्या कंपनीतली एक वरिष्ठ आहे. ती सी ई ओ पदाच्या शर्यतीत होती पण सिनियर बनहट्टींनी राधिकालाच ते देउन टाकले.. त्यामुळे ती आता गुरु व राधिका च्या विरुद्ध आहेत.
आधी बहुतेक लेखकाला माया सौमित्र च्या प्रेमात आहे असे दाखवायचे होते..पण नंतर त्याला गुरवाला मधे आणण्याची आयड्या सुचली!
आणि शनाया हे पात्र आता बोअर झाल्याने दुसरी एखादी अल्पवस्त्रांकिता, टंच पोरगी सिरीयल मधे मसाला महणून हवी होवी, ती कमी हिने भरुन काढली!

गुरु उगाच नसत्या काड्या करतो आहे. राधिका ला कसे काय एकदम सी ई ओ केले? ती कुठे पूर्ण वेळ पहाते आहे एस बी कंपनीचा कारभार?

आज एका नातेवाईकांच पुण्यात दहावं होतं. तिथे "माझ्या नवऱ्याची बायको" या सिरियलची आख्खी टीम कोणाचं तरी क्रियाकर्म होत म्हणून आलेली होती म्हणे!
कोणी कलाकार गेला की इतर कोणी हे समजलं नाही. ही माहिती मावशीने फोनवर मला दिली आणि मी ते मिस्टरांना ला सांगत होते. तर आमच्या लेकी म्हणत होत्या की नक्की कोण गेलं असेल? त्या माणसाला रिप्लेस करतील का? की स्टोरीच बदलतील? काही च्या काही गप्पा सुरू होत्या. मोठी मुलगी म्हणत होती की कलाकार कंटाळून मरून जातात पण तरी मराठी सिरियल संपत नाहीत Lol

आमच्या नात्यातील एका स्त्रीने त्या टीमबरोबर फोटोही काढले म्हणे Lol

आमच्या ज्या नातेवाईक आजी वारल्या त्या सगळ्या सिरॅली मनोभावे बघणाऱ्यातल्या होत्या! त्यामुळेच ही टीम त्या आजींना दर्शन द्यायला तिथे हजर असावी Lol

Pages