मायबोली असो वा जगातले कुठलेही संकेतस्थळ साधारण महिन्याभराने तिथे "मुलासाठी / मुलीसाठी नाव सुचवा" असा एखादा धागा निघतोच. विशेष म्हणजे अश्या धाग्यांवर कोणीही टिंगलटवाळी करत नाही. कारण सर्वांना माहीत असते की हा धागाकर्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांना ते माहीत असते कारण तो त्यांच्याही जिव्हाळ्याचा विषय असतो. आपण सर्वांनीच पोरांची नावे ठेवताना फार विचार केला असेल. जसे घर घेणे हे वन टाईम ईन्वेस्टमेंट असते तसे पोरांची नावे हे देखील एक वनटाईम डिसीजन असते. निदान मुलींना लग्नानंतर नाव बदलायचा एक चान्स तरी मिळतो, बिचारया मुलांच्या जातीला तो ही नाही. त्यामुळे उद्या आपल्या पोरांनी असे कसे रे माझे नाव ठेवले बाबा बोलू नये म्हणून आपण छान सुंदर नाव हुडकून काढतो. किमान अर्धा मराठी शब्दकोष पिंजून काढतो. पण पोरांना एक मस्त अर्थपुर्ण नाव देतो. बस्स तेच नाव तुम्ही कसे शोधले याचे अनुभव ईथे शेअर करूया.
थोडक्यात अन पाल्हाळ न लावता मीच सुरुवात करतो.
१) पहिलीच पोरगी झाली. तिच्या जन्माची कहाणी ईथे शेअर केलेली. आज नावाची करतो. तशी काही विशेष नाहीये. पण मुलगीच पाहिजे आहे आणि मुलगीच होणार याची निन्याण्णवे टक्के खात्री असूनही मुलगी होऊनही बारश्याच्या मुहुर्तापर्यंत तिचे नाव काय ठेवावे हे ठरत नव्हते. म्हणजे सुचत होते पण माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते.
अखेर बारश्याच्या दिवशी पाळण्यात ठेवलेल्या पोरीच्या कानात नाव सांगायची वेळ झाली आणि तिच्या कानात नुसतीच फुंकर मारायची वेळ येतेय का असे वाटले. ईतक्यात अचानक माझे वडील म्हणाले परी नाव ठेवा. पोरगी परीसारखीच आहे दिसायला. सगळे हो हो म्हणाले. मी सुद्धा म्हणालो हो, पोरगी परीसारखीच आहे दिसायला. बस्स यालाच माझा होकार समजून घरच्या लोकांनी हेच नाव फायनल केले आणि दोन महिन्याच्या मासूम चेहरयामागे लपलेल्या एका शैतान मुलीचे नाव परी ठेवले गेले
पुढे मात्र परी हे घरचे नाव म्हणून ठिक आहे पण कागदोपत्री नाव दुसरे ठेऊया असा किडा घरच्यांच्या डोक्यात वळवळला होता. पण तोपर्यंत मी तिचे परी हे नाव स्विकारले होते. ज्या नावाने तिला हाक मारायला आवडते ते सोडून उगाच कश्याला गहन अर्थाचे नाव निव्वळ आपले भाषाज्ञान सिद्ध करायला ठेवा असे घरच्यांना सुनावून मी त्यांच्या डोक्यातला किडा ठेचून मारला.
आजच्या तारखेला मी तिला परी, परया, परू किंवा नुसतेच पss अशी हाक मारून तिच्या साध्यासोप्या सुटसुटीत नावाचा निखळ निर्मळ आनंद ऊचलतो
२) दुसरा पोरगा ऋन्मेष ... नाम तो सुना ही होगा
मला या नावाचा अर्थ माहीत नाही. कदाचित या नावाला अर्थ नसेलही. कदाचित असा शब्दच अस्तित्वात नसेल. मला फक्त मायबोलीवर डुआयडी काढायला एखादे कॅची नाव हवे होते. आणि तो शब्द मराठी शब्दकोषातला हवा असा हट्टही नव्हता. त्यामुळे जे सुचले ते ठेवले.
मुलाचा जन्म झाला, नावाची शोधाशोध सुरू झाली. हे नावही आलेले माझ्या डोक्यात. पण ज्या नावाचा अर्थही माहीत नाही ते बायकोला कसे सुचवायचे असा बाळबोध विचार करून मनातच ठेवले.
पण एकदा बायकोच सहज म्हणाली, मला तर ते ऋन्मेष नावही खूप आवडते... खर्रंच, मी सुद्धा ते ऐकून उत्साहीत झालो. आणि जराही वेळ न दडवता तिच्याकडून या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले.
दुसरया दिवशी बायकोने आपल्या बहिणींना हे नाव सांगितले. तसे त्यांनी नाके मुरडत भुवया तिरप्या केल्या. हे कसले नाव? म्हणत स्वत: शोधून आणलेली नावे पुढे दामटली. बायकोच ती, माहेरचा आहेर पहिला स्विकारणार. त्यात तिच्या आईनेही नावाला अर्थ हवाच ! असं ठासून म्हटले. मग तर मी नाक घासूनही ती माझे ऐकणार नव्हती.
पण तरीही मी ठाम राहिलो. प्रकल्प मी तडीस नेणार आणि उद्घाटन सोहळा दुसरयांच्या हस्ते. असे कसे चालणार. अखेर सासुरवाडी नमली आणि ऋन्मेषच नाव फायनल झाले. सध्या रुनू, रुंट्या, रुंटूपुंटू अश्या नावांचा ते लोकं मनसोक्त आनंद घेतात. पण ऋन्मेष नावाला मात्र Runमेष म्हणजे मेंढ्या हाकणारा मेंढपाळ असे चिडवतात.....
आता आपलेही किस्से येऊ द्या
एका कुटुंबात मुलगी जन्माला
एका कुटुंबात मुलगी जन्माला आली तीच नाव ठेवलं वीणा.
आता मुलगा जन्माला आलाय, त्याचं नाव काय ठेवायचं?
>>
रुद्र ठेवायचं
एका कुटुंबात मुलीचं नाव 'सनई'
एका कुटुंबात मुलीचं नाव 'सनई' असं ठेवलं होतं. आता मुलगा झाला की चौघडा नाव ठेवा, असा कोणीतरी विनोद केल्याचं आठवतय.
माझ्या ओळखीत एकाने आपल्या
माझ्या ओळखीत एकाने आपल्या मुलीचे नाव चतुर्थी ठेवलं आहे.
स्वस्ति, ती चतुर्थी त्यांची
स्वस्ति, ती चतुर्थी त्यांची पहिली मुलगी आहे?
ह्या गणितानुसार दुसरी मुलगी
ह्या गणितानुसार दुसरी मुलगी झाली तर तिचं नाव अष्टमी होईल. नाहीतर संकष्टी नाव ठेवा, आणि आडनाव पावावे!
विचित्रवीणा, समुद्रवीणा
विचित्रवीणा, समुद्रवीणा यांवरून समुद्र, विचित्र. स्वरसाम्यासाठी वेणुपाणी किंवा नुसतेच वेणु. (पुंलिंगी)
एरवी पाणिनी, श्रवण श्रावण वगैरे
चतुर्थीवरून आठवलं. माझ्या
चतुर्थीवरून आठवलं. माझ्या मोठ्या बहिणीच्या वर्गात चतुर्थी नावाची मुलगी होती. तिची धाकटी बहीण पंचमी माझ्याहून दोन तीन वर्षांनी मोठी असेल. आधी प्रतिपदा द्वितीया वगैरे होत्या की नाही हे मात्र माहिती नाही.
आमच्या कॉलेजमध्ये एका मुलाचं
आमच्या कॉलेजमध्ये एका मुलाचं नाव जयमहाराष्ट्र होतं.
स्वस्ति, ती चतुर्थी त्यांची
स्वस्ति, ती चतुर्थी त्यांची पहिली मुलगी आहे? >>> हो एकुलती एक .
माझ्या वडिलांची गारमेंट होती
माझ्या वडिलांची गारमेंट होती ओमकार गारमेंट नावाची त्यांच्यासाठी ते नाव शुभ होते त्यांची इच्छा होती कि माझ्या मोठया भावाच्या मुलाचे नाव ओमकार ठेवावे पण वाहिनीने ते नाही ठेवले , दुसऱ्या भावाला पहिली मुलगी झाली आणि दुसरा मुलगा त्याचे नाव हि गावीच त्यांच्या मेव्हणीने ठेवले त्यामुळे वडील खूप दुखावले होते ,त्याच वर्षी ते वारले ,माझ्या मुलाचा जन्म हि त्याच महिन्यातला मी तेच नाव माझ्या मुलाला ठेवले आणि खरंच ते नाव त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी हि खूपच शुभं ठरले.
चिन्मय नावाच्या माझ्या
चिन्मय नावाच्या माझ्या मित्राला त्याच्या मुलासाठी "य" ने संपणारं नाव हवं होतं.
आम्ही तन्मय, प्रणय, आशय, अन्वय, तनय, विनय वगैरे नावं सुचवली. शेवटी त्याने मुलाचं नाव अर्जुन ठेवलं
त्याच्या मुलासाठी "य" ने
त्याच्या मुलासाठी "य" ने संपणारं नाव हवं होतं. आम्ही तन्मय, प्रणय, आशय, अन्वय, तनय, विनय वगैरे नावं सुचवली. शेवटी त्याने मुलाचं नाव अर्जुन ठेवलं >>>
व्यत्यय नाही सुचवलंत म्हणून ?
(No subject)
प्रणय
प्रणय
अजय, विजय, सुजय, संजय अशी
अजय, विजय, सुजय, संजय अशी भरपूर नावं आहेत. प्रणय नाव सुध्दा पाहण्यात आहे.
प्रणय नाव सुध्दा पाहण्यात आहे
प्रणय नाव सुध्दा पाहण्यात आहे. >> हो. असतं हे नाव.
ऋन्मेष नाव सुचायच्या आधी आमचे
ऋन्मेष नाव सुचायच्या आधी आमचे दोघांचेही अर्जुन या नावावर एकमत झाले होते. जर ऋन्मेष माझा आयडी नसता तर माझ्या मुलाचे नाव अर्जुन असते.
मुलीचे नाव परी ठेवल्यावर मी मुलासाठी शैतान हे नाव सुचवले होते. पण भावनिक गोष्टीत विनोद करू नये या सदराखाली घरच्यांनी धरून हाणला होता मला.
माझ्या एका नातेवाईकाने
माझ्या एका नातेवाईकाने,त्याच्या मुलीच्या बारशाआधी माझ्या वर्गातल्या सर्व मुलींची नावे लिहून मागितली.(हुश्श!) नंतर
त्यात नसलेलेच एक घिसेपिटे नाव वंदना ठेवले.तिसरी की दुसरीत होते मी! तरीही मला बोअर झालेले आठवतेय!
हो आणि त्यात वर्षा की वंदना या दोन नावांच्या चिठ्या टाकूनही झाल्या.कोणती चिठी उचलली ते आठवत नाही.लोक आपल्या मुलांची नावे ठेवताना दुसर्याचा का जीव घेतात कळत नाही.
जीव घेणारे दुसऱ्याचाच घेतात.
जीव घेणारे दुसऱ्याचाच घेतात.
जीव देणारे आत्महत्या करतात.
जीव देणारे आत्महत्या करतात.

सचिन तेंडुलकरने मुलाचं नाव
सचिन तेंडुलकरने मुलाचं नाव अर्जुन ठेवल्यावर अर्जुन नाव जास्त लोकप्रिय झालं.
सचिन तेंडुलकरने मुलाचं नाव
सचिन तेंडुलकरने मुलाचं नाव अर्जुन ठेवल्यावर अर्जुन नाव जास्त लोकप्रिय झालं
>>>>
त्याआधी भाग अर्जुन भाग हे प्रसिद्ध झालेले...
अर्जुन नाव मस्त आहे.
अर्जुन नाव मस्त आहे.
विषय ‘ तुम्ही तुमच्या मुलांची नावे कशी ठेवली?’ वरून दुसर्यांनी त्यांच्या मुलांची नावे काय ठेवली यावर आलाय
मला माझ्या मुलासाठी गणपतीचे
मला माझ्या मुलासाठी गणपतीचे पण प्रचलित नसलेले नांव हवे होते. खूप पोथ्या वाचून 'अमेय' नांव नक्की केले.
पण सासरच्यांनी 'विनायक, विनय..." अशी मला न पटणारी नाव सुचवायला सुरु केले. त्यातलेच एक ठेवायचे असा त्यांचा दुराग्रहच सुरु झाला. मी सुचवलेले नांव त्यांना नकोच होते. बारशाच्या वेळी मी नणंदेला हळूच सुचवले की 'अमेय' ठेवा म्हणून...ती समजूतदार असल्याने तिने ते नांव जाहीर केले. तरीही सासरचे मुलाला 'विनायक' वगैरे नांवानीच हाक मारायचे...मी ठेवलेल्या नावाला बरीच नावे ठेवून!
पण मुलाने पण 'अमेय' नांव सांगायला सुरुवात केल्यावर गप्प बसले.
मला फार लहानपणापासून वाटायचं
मला फार लहानपणापासून वाटायचं की मला मुलगीच होणार आणि मी तिचं नाव काव्या ठेवणार.... त्यामुळे मी इतर कुठल्याही नावाचा किंवा ऑपशन चा विचारही केला नव्हता (म्हणजे मुलगा झाला तर काय वगैरे) . जेंव्हा जेंडर कळालं तेंव्हा पहिला एक महिना तर मी वैतागले होते. मग नावं शोधायला सुरुवात केली.
10 नावांची लिस्ट काढली त्यातलं प्रत्येक नाव घरातल्या एका ना एका मेम्बरला आवडत नव्हतं.
फायनली बराच काथ्याकूट केल्यावर आम्ही अन्वीत नाव फायनालाईज केलं.
मग डिलिव्हरी डेटच्या इज आठवडा आधी walk वर गेलेलो तेंव्हा सहज नावांची चर्चा करत असताना अचानक वाटलं रिदीत नाव ठेवावं
त्याचा बाबा रेडी नव्हता, त्याला नाव नव्हतं आवडलं. त्याला खूप खूप खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकेचना. मग मी वैतागले आणि त्याला म्हणलं मी हेच नाव ठेवणारे. तुला हवं ते कर.
मग आम्ही त्यावर पुष्कळ भांडलो. फायनली आई म्हणाली रिदीत आणि अन्वीत नावाच्या चिठ्ठ्या टाका. जे नाव येईल तर ठेवा
मग बाळ झालं तेंव्हा नर्सला दिल्या चिठ्ठ्या उचलायला आणि त्यातून रिदीत नाव मिळालं.
आता त्याच्या बाबाला पण आवडतं ते नाव.
दोन्ही चिठ्ठ्यांवर रिदीत नाव
दोन्ही चिठ्ठ्यांवर रिदीत नाव लिहिलं नाहीये ना, हे बघितलं होतं का बाबाने आधी?
हो तर!
हो तर!
बाबा काय एवढा साधा भोळा वाटला का काय
रिदीत चा अर्थ?
रिदीत चा अर्थ?
रिदीत = जगप्रसिद्ध
रिदीत = जगप्रसिद्ध
रीदीत चा अर्थ माहीत नव्हता.
रीदीत चा अर्थ माहीत नव्हता. मस्त आहे.
Pages