Submitted by Dr Raju Kasambe on 8 February, 2020 - 00:56
स्वच्छ भारत अभियान
ओला कचरा सुका कचरा
सर्वांना समजावु या
तनामनाने राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
प्लॅस्टिक थर्माकोलचा
वापर आपण थांबवू या
घराघरात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
स्वच्छतेचे महत्त्व किती
सर्वांना शिकवू या
शाळेशाळेत राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
डेंग्यु मलेरिया रोगराई
पळवून लावू या
गावागावात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
आरोग्यदायी भारत
प्रत्यक्षात साकारू या
देशभरात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
डॉ. राजू कसंबे
दि. ०२ ऑक्टोबर २०१९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कविता आवडली.
कविता आवडली.
छान
छान
छानच!
छानच!