मेकअप - माझा.... तुमचा..... सगळ्यांचा.....

Submitted by वेल on 5 February, 2020 - 04:47

मेकअप...
ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण सगळे नेहमीच करत असतो, कळून सवरून किंवा नकळतपणे. तुमच्या लक्षात आलं असेलच की मी फक्त चेहऱ्यावर करण्याच्या मेकअप बद्दल बोलत नाहीये. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या स्वतःलाच मेकअप करत असतो. एखादं लहान मूल शाळेत जाताना अगदी शहाणं गोंडस सगळं ऐकणार आणि तेच लहान मूल घरात अगदी मस्तीखोर असतं अजिबात कोणाचं न ऐकणार. ह्या लहान मुलांनीही शाळेत जाताना स्वतःचा मेकअप केलेला असतो. आपण शाळेत असताना एखाद्या मित्रमैत्रिणीशी भांडून कट्टी घेतलेली असते अगदी कायमची. पण खूप खूप वर्षांनी शाळेच्या एखाद्या गेट-टुगेदरला आपण पुन्हा भेटतो तेव्हा त्या मित्राला / मैत्रिणीला कडकडून मिठी मारतो आणि आपल्या नात्याचा मेकअप करतो. ओव्हर ऑल बरेचदा असं दिसतं की आयुष्यात नव्याने आलेली व्यक्तीमुले आपण आपल्या अग्रेसिव्ह किंवा इमपेशंट स्वभावाला मुरड घालतो थोडक्यात ती व्यक्ती आपला मेकओवर करते.

असाच काहीसा मेकओवर केलाय आमच्या मेकअप स्पेशलिस्ट पूर्वीने, शिस्तप्रिय आणि नो-नॉनसेन्स स्वभावाच्या डॉक्टर नीलचा, आमच्या मेकअप चित्रपटात. मी सहलेखन केलेला हा चित्रपट अगदी परवा 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे टीजर, प्रोमो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतीलच. चित्रपटाची गाणी आणि डायलॉग्ज टीजर सुद्धा मी सोशल मिडियाद्वारे शेअर केले होते. आज ते सगळे मी इथे पुन्हा टाकते आहे म्हणजे कोणी मिस केले असल्यास तुम्हाला ते बघता येतील.

हा माझा पहिला चित्रपट असल्याने मी खूप excited आहे आणि माझी लेखनाची इनिंग इथे मायबोलीच्या साक्षीने सुरू झाली असल्याने ह्या excitement मध्ये मला तुम्हालाही सामील करून घ्यायचं आहे. आपण चित्रपट बघतो ते एंटरटेनमेंट साठी, मज्जेसाठी, हीच मज्जा आपण एकमेकांबरोबर शेअर करूया.

तुम्ही हा चित्रपट बघायला जाल तेव्हा मेकअपच्या पोस्टर बरोबर तुमचा फोटो काढा आणि इथे कमेंट मध्ये टाका. तुम्हाला पूर्वीने केलेला हा मेकअप कसा वाटला हे वाचायलाही मला आणि इथल्या सगळ्यानाही खूप आवडेल. आपले काही मित्रमैत्रिणी खूप छान गातात, त्यांनी मेकअप मधली गाणी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून इथे टाकली तर अजून मज्जा येईल. आणि ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या मेकअप रिलेटेड काही गमतीशीर घटना शेअर करू शकलात तर अहाहा, बहार येईल ह्या सगळ्या मज्जेला. Happy

लागेना
जुळली गाठ गं
धतिंग धिंगाणा
पूर्वी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांना वैयक्तिक उत्तर द्यायचे होते पण इथे मला मोठ्या कमेंट्स टाकता येत नाहीयेत. आणि एक मोठी कमेंट टाकायच्या प्रयत्नात दोन दिवस इथे काही लिहिता आले नाही. काय करायला हवे ते आता समजले, मोठी कमेंट छोट्या छोट्या भागात तोडून टाकेन.

*मेकअप* हा माझा पहिलाच सिनेमा. *मेकअप* ची को-रायटर म्हणून मला माझ्या ह्या क्षेत्रातील अनुभवाबद्दल थोडसं शेअर करावसं वाटलं...

2014 मध्ये आयटी फील्ड सोडल्यावर स्वकमाईचा नवा मार्ग मी शोधतच होते. तो ही असा जिथे कमीतकमी वेळ प्रवास करावा लागेल. मधल्या काळात मी छोट्या छोट्या कथा लिहायला पुन्हा सुरुवात केली होती. 2015 च्या एप्रिल महिन्यात लेखनातून काही अर्थप्राप्ती होते का हे बघावे असा विचार करून मी कौतुक शिरोडकरकडे सल्ला मागितला त्याची आणि माझी सुद्धा काही घनिष्ठ दोस्ती किंवा खूप चांगली मैत्री वगैरे नव्हती. पण त्याने अगदी मोकळेपणाने मला त्याच काळात स्थापन होऊ घातलेल्या लेखकांच्या नवीन संघटनेबद्दल सांगितले

आणि मानाचि (मालिका नाटक चित्रपट) ह्या लेखकांच्या संघटनेच्या पहिल्याच मोठ्या मिटींगला मी हजर होते. तिथे ममता सरदेसाई आणि निनाद शेट्ये या दोघांबरोबर ओळख झाली. खरे तर पहिल्याच भेटीत खूप चांगली मैत्री झाली म्हणा ना. त्या दोघांनीही मला मानाचि नक्की जॉईन कर तुला कधीतरी नक्कीच फायदा होईल हे समजावून सांगितले, खरे तर इंसीस्ट केले. मी तिथे कोणालाच ओळखत नव्हते. पण ममता आणि निनाद मुळे मी मानाचि जॉईन केली.

त्या वर्षात मानाचिचे बरेच कार्यक्रम झाले ज्यांत मी स्वयंसेवक म्हणूनही काम केले. त्यामुळे मानाचित ऍक्टिव्ह असणाऱ्या दिग्गज लेखकांबरोबर माझी ओळख झाली. 2015 च्या नोव्हेंबरमध्ये मानाचिच्या ग्रुपवर वैभव चिंचाळकरने (कट्यार... सिनेमाचा असि डा.) चित्रकथी मालिकेबद्दल कळवले. त्या मालिकेत 2 एपिसोड लिहून माझ्या मालिका लेखनाची सुरुवात झाली. माझं नाव पहिल्यांदा स्क्रीनवर झळकल आणि माझ्या लेखनाचा पहिला चेक मला मिळाला.

अभिनंदन आणी शुभेच्छा!
नक्की बघण्याचा प्रयत्न करणार .. (परदेशी स्थाईक असल्याने कधी अन असे हे प्रश्न आहेतच )

जानेवारीमध्ये मराठी नाट्य निर्माता संघाने आयोजित केलेल्या दिर्घांक स्पर्धेमध्ये मध्ये मानाचिच्या टीमने भाग घ्यावा अशी टूम निघाली आणि तेव्हा माझी सुप्रसिद्ध लेखक आणि अनेक नाटकांचे दिग्दर्शक गणेश पंडित यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर गणेशदादा पटकथा लिहीत असलेल्या मालिकेचे संवाद लिहायची संधी मला मिळाली. पहिल्या (full fledged) मालिकेपासूनच माझ्या लेखनाच श्रेय मलाच मिळालं.

आज त्याच्याबरोबर पहिला चित्रपटाचं सहलेखन केलं तेव्हा सुद्धा त्याने मी डिझर्व करत असलेलं क्रेडीट मला दिलं, सहलेखिका म्हणून स्वतःच्या नावाची वेगळी स्लेट. काही भावना शब्दात नाही मांडता येत, त्याला इमोटीकॉन्सच लागतात.

गेले काही दिवस मेकअपच्या जाहिराती तुम्ही पेपर मध्ये बघितल्या असतील, सगळ्या जाहिरातींमध्ये सिनेमाच्या सगळ्या डिपार्टमेंटहेड्स ची नावे त्याच फॉन्टमध्ये आणि त्याच फॉन्टसाईज मध्ये आहेत ज्या फॉन्ट मध्ये आणि फॉन्ट साईज मध्ये त्याचे स्वतःचे नाव. स्वतः दिग्दर्शक म्हणून स्वतःला खास ठळक प्रेझेंटेशन त्याने दिलेले नाही. जे इतर प्रत्येक सिनेमाच्या पोस्टर वर दिसते. आणि ही गोष्ट मला खुप महत्त्वाची वाटली आणि कॅप्टन ऑफ द शिप म्हणून केलेल्या मला त्याच्या ह्या कृतीचे खूप जास्त कौतुक आहे

15 वर्षे कॉर्पोरेट मध्ये काम करुन तऱ्हेतर्हेच्या चांगल्या वाईट लोकांना भेटले होते, पण ह्या फिल्डमध्ये फार कमी लोक प्रामाणिक आणि मोठ्या मनाचे असतात जे वेळेवर पैसे आणी योग्य क्रेडिट देतात, तेव्हा मला खूप टेन्शन आले होते की मी इथे टिकू शकेन का. आता अशा एका अत्यंत प्रामाणिक आणि मोठ्या मनाच्या माणसाबरोबर मी काम करताना मी क्षणाक्षणाला देवाचे आणि मला आशीर्वाद देणार्यांचे आभार मानते. हे सगळे मला मानाचिमुळे लाभले आणि मानाचि माझ्या आयुष्यात आली कौतुक निनाद आणि ममता मुळे. म्हणून कौतुक, निनाद ममता आणि मानाचि च्या टीमचे शतशः आभार

अनिवासी भारतीयांसाठी काही कळणार ही फिल्म डिजिटल प्लॅटफॉर्मवरही येईल.

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद

Pages