टॉन्सिल्स काढून टाकल्यावर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात का?

Submitted by शैलपुत्री on 2 February, 2020 - 02:55

मला साधारण तीन महिन्यांपासून सर्दी होती. सर्दी वाहत नव्हती तर फक्त नाकपुड्या बंद असायच्या. मी बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेतली पण काही फरक पडला नाही. मी राहते तेथे अक्षरशः बोचरी थंडी असते. त्याचाही परिणाम होतो. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की माझी रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. गेली आठ दिवस झाले माझे टॉन्सिल्स सुजले आहेत. त्यामध्ये पस झाले आहे. सध्या फक्त द्रव अन्नपदार्थ सुरू आहेत. मला बोलताना ही अतिशय त्रास होतो. जरासुद्धा तोंड उघडे राहिले की त्यात हवा जाऊन कोरडेपणा येऊन प्रचंड वेदना होतात. हेवी एंटीबायोटिक्सचा डोस सुरू आहे परंतु काहीच उपयोग होत नाहीये. दिवसेंदिवस वाईट अवस्था होत चालली आहे. डॉक्टर म्हणाले की काहीच फरक पडत नसेल तर सर्जरी करून टॉन्सिल्स काढून टाकू. तोच एक शेवटचा पर्याय आहे.

मी असं ऐकलं आहे की टॉन्सिल्स काढून टाकणं चांगलं नसतं हे खर आहे का? कृपया प्रकाश टाकावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्दीचा प्रमाणाबाहेर त्रास होत असेल टॉन्सिल्स काढुन टाकलेलेच योग्य..

मलाही टॉन्सिल्समुळे सर्दीचा प्रचंड त्रास होतो. नीट श्वास घेता येत नाही घसा आणि कान दुखतात. पण मला डॉ.नी सांगितल्यानुसार वर्षातुन 2ते 3 वेळा होत असेल तर टॉन्सिल काढयची गरज नाही हा त्रास वाढला सर्दी वारंवार होत असेल तर टॉन्सिल काढुन टाकवे लागतील..

हो का?
माझे टॉन्सिल्स मी ९-१० वर्षांची असताना काढले आहेत. >> तुम्हाला नंतर त्याचे काही दुष्परिणाम जाणवले का?

काही होत नाही. मला पण सेम त्रास होऊन टॉन्सिलचे लहानपणीच ऑपरेशन झाले. आता काही त्रास नाही. पस झालाय तर काढणे योग्य. नाहीतर गोळ्या देऊन बरे करतात.

"टॉन्सिल्स काढल्यावर जेंव्हा पहिल्यांदा भूल उतरते तेव्हा मरणप्राय वेदना होतात. अक्षरशः गळा कापुन बाजुला ठेवावासा वाटतो. त्या मरणयातना सहन केल्यावर पेशंट जेव्हा बरा होऊन घरी येतो तेव्हा त्याचा आवाज भसाडा होतो आणि चाळिशीनंतर ऐकु न येण्याचे प्रमाण वाढत जाउन साठीपर्यंत ठार बहिरेपणा येतो असं माझ्या पहाण्यातले ८ - १० जण तरी आहेत" - असं मी खुप जणांकडुन ऐकलंय.
मला विचाराल तर एवढा त्रास होत असल्यास ऑपरेशन करुन घेणेच श्रेयस्कर..! आवाज भसाडा झाला आणि ठार बहिरेपणा आला तरी चलेल पण जीव वाचणे महत्त्वाचे. सर सलामत तो पगडी पचास.. काय..?

माझे टॉन्सिल्स मी ९-१० वर्षांची असताना काढले आहेत. >> तुम्हाला नंतर त्याचे काही दुष्परिणाम जाणवले का?
नवीन Submitted by नौटंकी on 3 February, 2020 - 12:59

कमी वयात टॉन्सिल्स काढले तर फायदाच (उंची सणसणीत वाढते) होतो असे ऐकले आहे. सस्मित, झंपी, रश्मी तुमचा काय अनुभव आहे?

कमी वयात टॉन्सिल्स काढले तर फायदाच (उंची सणसणीत वाढते) होतो असे ऐकले आहे. सस्मित, झंपी, रश्मी तुमचा काय अनुभव आहे?>>>>>> सणसणीत तर नाही वाढली. पण बरोबर आहे उंची. कमी नाही.

कमी वयात टॉन्सिल्स काढले तर फायदाच (उंची सणसणीत वाढते) होतो असे ऐकले आहे>>माझा अनुभव लिही ते.

माझे टॉन्सिल काढायचे ऑपरेशन बॅक इन द सेवंटीज झाले १९७३-७४ असेल बहुधा. दुस्री किंवा तिसरीत. वय माझे सात आठ असावे. त्या आधी तब्येत बारकु ळी होती.पण ऑपरेशन नंतर सुधारली. पुण्यातील इ एन टी तज्ञ डॉ. अत्रे ह्यांच्या इस्पितळात झाले ऑपरेशन. पूर्ण भूल दिलेली. ह्यांचा नातू माझा क्लासमेट व फर्स्ट क्रश होता म्हणून मी उड्या मारत ऑपरेशन्ला गेले. पण तो काही नंतर फुले घेउन आला नाही. दिसला पण नाही घरात. खाली हॉस्पिटल व तिसर्‍या मजल्यावर त्यांचे घर होते.

नंतर दोन तीन दिवस तिथेच राहिलो. ऑपरेशन नंतर आठवडा बोलता येत नाही. मग अगदी हळू पिच मध्ये बोलायला सुरू करावे. व मग हळू हळू मोठ्याने बोलता येते. पहिले दोन तीन दिवस फक्त व्हॅ निला आइस क्रीम खावे लागते. ते मला आवडले . उत्साहात मी ते बेड वर सांडले पण
व सर्वत्र लाल मुंग्या झाल्या पण माझेच ऑपरेशन असल्याने कोणी रागवले नाही. लगेच बेड बद्लऊन नीट करून दिला. त्यांना अश्या पोरांचा अनुभव असावा.

मग रिकव्हरी म्हनून शाळेतून रीतसर सुट्टी मिळाली. अजूनच मजा. ह्या काळात घरी राहुन गोष्टीची पुस्तके वाचली. घरासमोर लकडी पूल रुंदी वाढवायचे काम चालू होते. नदीतून पुला च्या साइडला लोखंडी गर्डर लावून मग दोनी साइडला फुट पाथ बनवले. ते काम तासंतास लक्षपूर्वक बघितले. गर्ड र हा इंग्रजी शब्द नवीन शिकले.

आई तेव्हा तिच्या बरोबर जेवायला बसवून एक दम मौ असा कण्यांचा भात थोडा थंड करून, ( तिला अगदी पहिल्या वाफेचा लागे) व त्यात आमटी घालून कुस्करून देइ. हे जेवण दहा दिवस. प्लस आइसक्रीम

आवाज व तब्येत नंतर सुधारले. सारखे सर्दी खोकला व्हायचा, घसा दुखायचा ते बंद झाले. आता वय छप्पन पण अजून हिअरिंग वर काही परिणाम झालेला नाही.

डॉक ने सांगि तले असेल तर करून घ्या. आता तर तंत्र सुधारले असेल अजूनही.

सस्मित अंजली धन्यवाद. अमा फारच सविस्तर अनुभव लिहिलात पण उंचीबद्दल काहीच नाही. आठव्या वर्षी पहिला क्रश म्हणजे जरा धक्कादायकच आहे.

उंचीबद्दल काहीच नाही>> उंची वर काही परि णाम नाही. अ‍ॅव्हरेज जेनेटिकली जितकी वाढायची तितकीच वाढली.

वय्याच्या १३ वर्षी झाले. एक महिना खुप लाड झाले. महिनाभर लागला मुळ आवाज परत यायला, भरमसाठ आईसक्रीम खाल्ली तेव्हा, की आता विषेश आवडतच नाही. गळ्यात घंटी घेवून फिरायचे बोलता येत नसल्याने. जरा घंटी वाजली की, घरातले हजर व्हायचे मग मुद्दाम त्रास द्यायची.
उंची ५‘८“ अनुवांशिक कारणाने वाढायची ती वाढली.
सर्दी कधीच थांबली नाही, पण कमी झाली. अजुन तरी कशावर परीणाम नाही ४० उलटली आहे.

——-
हे कोणी सांगितले की, उंची वाढते वगैरे? कोण पसरवतं हे गौरसमज?

तीस चाळीस वर्षांपूर्वी टॉन्सिल्स काढून घ्यायचे फॅड आले होते का? कि मलाच तसे वाटते? कारण माझ्या माहितीच्या बऱ्याच मुलांचे (म्हणजे तेंव्हा पंधरा-सोळा वय असलेल्या) तेंव्हा हे ऑपरेशन केले होते. हा धागा वाचल्यावर ते आठवले. का करत होते नक्की आठवत नाही. "काढलेली बरी असतात" अशा सबबीखाली ऑपरेशन करून घेतली जात. आईस्क्रीम खायला मिळते असे सांगून मुलांना हे ऑपरेशन करायला नेत. उंची हा एक घटक असावा. त्याकाळात तो (गैर)समज पसर(व)ला असण्याची शक्यता आहे. नंतरच्या काळात हे ऑपरेशन काहीही ठोस कारण नसताना करणे बंद झाले (काहीही कारण नसताना करू नये हि जागृतता पसरल्याचे पण आठवते).

>> डॉक्टर म्हणाले की काहीच फरक पडत नसेल तर सर्जरी करून टॉन्सिल्स काढून टाकू

नेटवर शोध घेतल्यास अनेक ठिकाणी तक्रार असेल व काढणे जरुरी असेल तरच टॉन्सिल्स काढावीत असे लिहिलेले आढळते. तसेच टॉन्सिल्स काढल्याचे कोणतेही दुष्परिणाम कुणी नोंदवलेले दिसत नाहीत. (WebMD वगैरे ठिकाणी). मात्र, कोणतेही ऑपरेशन करताना जी रिस्क असते ती इथेही असते असे मात्र लिहिलेले आहे (अर्थात ऑपरेशन म्हटल्यावर ते असणारच). तेंव्हा, त्रास होत असेल तर डॉक्टर सांगतात ते योग्य आहे असे मला वाटते. फार फार तर अजून एकदोन (चांगल्या) डॉक्टरांची सेकंड थर्ड ओपिनियन घेऊन निर्णय घ्या.

तीस चाळीस वर्षांपूर्वी टॉन्सिल्स काढून घ्यायचे फॅड आले होते का

तीस चाळीस वर्षांपूर्वी आजच्या इतकी प्रतिजैविके आणि औषधे चांगली उपलब्ध नव्हती यामुळे टॉन्सिल्स वाढत असत.

मुळात टॉन्सिल्स या ग्रंथी शरीरात शिरणाऱ्या जीवाणूंना अटकाव करण्याचे म्हणजे पहारेकऱ्याचे काम करतात.
परंतु जेंव्हा जंतुसंसर्ग जास्त असतो किंवा आपली प्रतिकार शक्ती कमी पडते तेंव्हा जंतू टॉन्सिल मध्ये आपले घर करतात आणि तेथे पू होतो. पूमध्ये रक्तपुरवठा नसल्याने तेथे प्रतिजैविके पोहोचत नाहीत अशा वेळेस तेथे जंतू राहू देणे धोक्याचे असते. म्हणून टॉन्सिलची शल्यक्रिया केली जाते.

पूर्वी च्या मानाने आता औषधे जास्त [अरिणामकारक असल्यामुळे जंतू सहजासहजी तेथे टिकाव धरू शकत नाही म्हणून आता टॉन्सिल वाढल्याचे प्रमाण कमी दिसते.

हा आजार वाढत्या वयाच्या मुलांमध्ये जास्त होतो.

टॉन्सिलला सूज आल्यामुळे/ वाढल्यामुले शरीराची वाढ खुंटलेली असते ती टॉन्सिल काढल्यावर झपाट्याने होऊ लागते. कारण ते वाढीचे वय असते.

टॉन्सिल काढल्यामुळे वाढ /उंची वाढते हे सत्य नसून टॉन्सिल वाढल्यामुळे खुंटलेली शरीराची वाढ झपाट्याने होऊ लागते हे सत्य आहे.

>> Submitted by सुबोध खरे on 4 February, 2020 - 18:42

अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद Happy

>> तीस चाळीस वर्षांपूर्वी आजच्या इतकी प्रतिजैविके आणि औषधे चांगली उपलब्ध नव्हती यामुळे टॉन्सिल्स वाढत असत.

बरोबर आहे. पण हे केवळ त्याकाळापुरते सत्य असू शकत नाही. त्याही आधीच्या काळात (पिढ्यांत) टॉन्सिल्स सुजण्याच्या तक्रारी असायला हव्यात. पण बहुधा दुर्लक्षित केल्या जात असाव्यात. किंवा त्या पिढीत नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली असावी.

>> मुळात टॉन्सिल्स या ग्रंथी शरीरात शिरणाऱ्या जीवाणूंना अटकाव करण्याचे म्हणजे पहारेकऱ्याचे काम करतात.

हो. हा मुद्दा माझ्या प्रतिसादात लिहायचा राहून गेला कि शरीरातील कोणत्याही इंद्रियाचे विनाकारण अस्तित्व असत नाही.

>>शरीरातील कोणत्याही इंद्रियाचे विनाकारण अस्तित्व असत नाही.<<
पण इथे टाँसिल्स्च्या बाबतीत ते काढुन टाकल्यानंतर सर्दि, घसा दुखणे इ. कायमचं गेलं असा अनुभव काहिंनी लिहिला आहे. म्हणजे हे पहारेकरी त्यांचं काम चोख बजावत असताना त्रासदायक असतात पण त्यांना काढुन टाकलं कि त्रास बंद. हे काय गौडबंगाल आहे. खरेसाहेब किंवा इतर डॉक्टर मंडळी सांगतील का?..

टॉन्सिल-- ही पण एक रसग्रंथीच(lymph node) आहे. यामध्ये पू झाला तर त्यात जिवाणू सुखाने कायमचे वास्तव्याला येतात. असे झाल्यास त्या जिवाणूंचे उच्चाटन करण्यासाठी टॉन्सिल काढून टाकावे लागतात. असे केल्यावर येणारे जीवाणू टॉन्सिलच्या पुढे असलेल्या रसग्रंथीत अडवले जातात. त्यामुळे शरीरात जंतुसंसर्ग होत नाही.