ॲमी आणि पुस्तकं २०२०

Submitted by ॲमी on 25 January, 2020 - 21:40

===

हा धागा वाचन २०२० प्रयोगांतर्गत वैयक्तिक ट्रॅकर धागा म्हणून काढण्यात आलेला आहे. धागाकर्त्याखेरीज इतरांना आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहायचे असेल तर त्यांनी कृपया मी वाचलेले पुस्तक - २ हा धागा वापरावा.
===


===

येत्या वर्षभरात मी जी पुस्तकं, पुस्तकांबद्दलाचे लेख वाचेन त्यावर इथे लिहीत जाईन. बहुतांश पुस्तकं इंग्रजी, काल्पनिक, लोकप्रिय गटात येतील अशी असतील.
काही उपयुक्त लिंक-

The Greatest Books
1. All Time
2. Since 2010
3. Since 2000
4. Since 1980
5. Since 1950
6. Pulitzer Prize for Fiction
===

1. Buzzfeed - 42 Amazing Books Written By Black Authors
2. EarlyBird - 26 Must-Read Books by Black Authors
3. Oprah - 30 of the Best Books by Black Authors You Should Read in Your Lifetime
4. Oprah - 14 Books by Irish Authors You Should Be Reading
5. Oprah - The Complete List of All 83 Books in Oprah's Book Club
===

1. Goodreads - The Most Read Books of the Reading Challenge 2019 (By Genre)
2. Goodreads - Choiceawards 2019 Best Mystery Thriller
3. Goodreads - Choiceawards 2019 Best Historical Fiction
4. Buzzfeed - 13 Thrillers We Couldn't Stop Thinking About In 2019
===

Best Books of 2019
1. Amazon
2. Publishers Weekly
3. New York Times
4. Newyorker
5. Washington Post
6. Vulture
7. New York Public Library
8. Buzzfeed
===

Anticipated of 2020
1. Goodreads - 33 Highly Anticipated Books of 2020
2. Goodreads - 28 Most Anticipated Mysteries & Thrillers of 2020
3. Goodreads - 28 of the Hottest Romances of 2020
4. Goodreads - 38 Most Anticipated YA Novels of 2020
5. Vulture - 32 Books We Can’t Wait to Read in 2020
===

Year-Participants-AvgBooksPledged-MyGoal-Achieved-Pages

2011 -0,149,298 -65 -00 -84 -18,911
2012 -0,294,199 -58 -60 -75 -23,558
2013 -0,426,639 -56 -52 -41 -11,050
2014 -0,662,956 -51 -30 -29 -09,860
2015 -1,696,782 -54 -36 -38 -16,541
2016 -3,015,477 -46 -36 -39 -15,629
2017 -3,135,237 -45 -40 -30 -09,626
2018 -4,218,352 -61 -24 -24 -07,630
2019 -4,442,372 -64 -30 -31 -09,979
2020 -2,370,889 -45 -30 -?? -?????

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुस्तकाचे नाव: Olive Again (2019)
लेखक: Elizabeth Strout
रेटिंग: ४/५

डोमेस्टिक फिक्शन हा प्रकार मला शक्यतो आवडत नाही. पण Olive Again सारखं काहीतरी लिहलं असेल तर ते मी आनंदाने वाचू शकते Wink
सगळ्या म्हातार्याकोताऱ्यांच्या गोष्टी आहेत. अगदी सर्वसामान्य, कोणाच्याही आयुष्यात घडू शकतील अशा घटना. पण सगळ्यामध्ये एक वेगळाच अंडरकरंट आहे. जो वाचकांपर्यंत अगदी व्यवस्थीत पोचतो. खरं सांगायच तर मला Olive Kitteridge फारसं आवडलं नव्हतं. पण हे दुसरं पुस्तक चांगलं आहे. यातदेखील तेरा लघुकथा आहेत.
• पहिल्या पुस्तकात भेटलेले Louise Larkin चे कुटुंब परत इथेदेखील भेटते, Helped या गोष्टीमधून. आणि अरे माझ्या देवा! वेगळं पुस्तक यायला हवं यांच्यावर. सांगण्यासारखी गोष्ट असलेलं कुटुंब आहे हे.
• The Poet कथेत भेटणाऱ्या Andrea L'Rieux वरतीदेखील वेगळे पुस्तक लिहता येईल.
• Cleaning ही रोचक् गोष्ट आहे. हिचा नक्की काय अर्थ लावायचा हे मला समजेनासे झाले...
• Motherless Child
• Exiles
या दोन्ही रोचक गोष्टी आहेत. Exilesमधे The Burgess Boys भेटले, ज्यांच्यावर आधीच वेगळे पुस्तक आलेले आहे.
• Friend कथेतल्या Isabelle चीदेखील वेगळी सांगण्यासारखी कथा आहे. ती बहुतेक Amy and Isabelle मधे सांगीतली असेल.
• The End of the Civil War Days वाचताना तर मी खुदुखुदू हसत होते Lol Lol
चांगले डोमेस्टिक फिक्शन वाचायचे असेल तर ही दोन्ही पुस्तकं नक्की वाचा असे सांगेन.

पुस्तकाचे नाव: No Orchid for Miss Blandish (1961)
लेखक: James Hadley Chase
रेटिंग: ५/५

जेम्स हॅडली चेस हे नाव जॉनी गद्दार सिनेमातून मला पहिल्यांदाच माहीत झालं.

नंतर २०११ मधे कधीतरी गटेनबर्गवर त्याची काही पुस्तकं मिळाली. Get a Load of This वाचून जी लेखकाची फॅन झाले Lol बाकीची सगळी १०-१२ पुस्तकं झपाटल्यासारखी एकापाठोपाठएक वाचून काढली. पठ्ठ्याने एकूण ९० पुस्तकं लिहिली आहेत म्हणे. यावर्षी एक इतर कोणतेतरी पुस्तक वाचायचे आणि एक जेहॅचे चे पुस्तक वाचायचे असा प्लॅन आहे. सुरवात १९३९ साली प्रकाशित झालेल्या, अमेरिकेचे नकाशे आणि स्लॅन्ग डिक्शनरी वापरून, ६ विकांत/१२ दिवसात लिहलेल्या या त्याच्या पहिल्या पुस्तकापासून केली. हार्डबॉईल, पल्प, न्वार पुस्तकासाठी लागणारा सगळा मालमसाला यात खच्चून भरलेला आहे. भरपूर हिंसा, सेक्स, एक्सप्लीसीट भाषा असल्याने प्रकाशनानंतर या पुस्तकावर इतकी टीका झाली (जॉर्ज ओरवेलने Raffles and Miss Blandish असा निबंध लिहला) होती की लेखकाने लगेच रिविजन्स लिहायला चालू केल्या. सध्या सरक्युलेशनमधे असलेली कॉपी १९६१ची आहे. यात हिंसा, सेक्सच्या फक्त ओझरत्या हिंट दिल्या आहेत. पण त्यादेखील अंगावर काटा आणतात. कदाचित पार्श्वभूमीवर असल्यानेच अजून जास्त परिणामकारक ठरतात. आता मी ओरिजनल कॉपी शोधतेय चौथ्यांदा वाचण्यासाठी Proud
The quickest way to be certain that you have the 1939 text is to check the second paragraph and confirm that “Old Sam [is] asleep in the Packard.” (In 1962, the car becomes a Lincoln.)

ही एक मस्त ब्लॉगपोस्टTipping My Fedora सापडली.
I submit this review for Katie’s 2014 Book to Movie Challenge at Doing Dewey; Bev’s 2014 Golden Age Vintage Mystery Challenge ; and Todd Mason’s Tuesday’s Overlooked Film meme at Sweet Freedom.
म्हणे Lol कायकाय करत असतात हौशी लोकं!

मस्त धागा!
२०२० मध्ये इंग्रजी पुस्तके वाचायचे ठरवले आहे. या धाग्याचा मला नक्कीच खुप उपयोग होईल.

वाचण्याचा वेग आणि इथे लिहिण्याचा उत्साह, दोन्हीसाठी __/\__

Olive Kitteridge - किंडलच्या डील्स लिस्टमध्ये अनेकदा दिसतं. पण घ्यावं की नाही ठरत नाही. ऑलिव्ह अगेन वाचण्यासाठी आधी ते वाचायला हवं का? (डोमेस्टिक फिक्शन मलाही शक्यतो आवडत नाहीच.)

पुस्तकाचे नाव: Life After Life (2013)
लेखक: Kate Atkinson
रेटिंग: ५/५

११ फेब्रुवारी १९१० रात्र-इंग्लंड
एका बँकरच्या बायकोला प्रीमॅच्युअर कळा चालू होतात. बर्फ पडत असल्याने डॉक्टर येऊ शकत नाही, नवरा बाहेरगावी गेलाय, मदतीला केवळ १४ वर्षांची आयरिश मेड आहे.
मुलगी जन्मते. पण नाळेचा फास बसल्याने पहिला श्वास घेण्याआधीच मरते.

११ फेब्रुवारी १९१० रात्र-इंग्लंड
वरीलप्रमाणेच. पण यावेळी डॉक्टर आले आहेत.
मुलगी जन्मते. डॉक्टर सर्जिकल कात्रीने पटकन नाळेचा फास कापतात आणि मुलगी जगते.

पण जसजशी ती मोठी होत जाते तसतसे पुढे दरवेळी वेगवेगळे काहीतरी घोळ होत राहतात आणि पुन्हा आरंभबिंदूकडे जावे लागते....
What if you had the chance to live your life again and again, until you finally got it right?

आपापल्या भूतकाळात डोकावून पाहिल्यास प्रत्येकाला असे बिंदू आठवतील की जिथे एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध होते; आणि तेव्हा आपण जो निवडला त्याच्यापेक्षा वेगळा पर्याय जर निवडला असता तर आपलं आयुष्य आता आहे त्यापेक्षा अगदीअगदी पूर्णपणे बदललं असतं. कधी स्वतःचा निर्णय, कधी आपल्या हाताबाहेर असलेली आजूबाजूची परिस्थिती....

Groundhog Day, Edge of Tomorrow, If Only, Miss Peregrine's Home for Peculiar Children, Atonement वगैरेमधे ही थीम येऊन गेली आहे. तरीही हे पुस्तक मला खूपखूप आवडलं.
पाचशे पानं, हलकासा बदल होऊन काही भाग रिपीट होत राहणं, सुरवातीचा बराचसा भाग डोमेस्टिक फिक्शन असणं (माइंड यू हे मराठीतल्या डोफिसारखं नाहीय. उच्चवर्गातल्या गृहिणीचे विचार-वागणूक इथे खवचट किंवा विनोदी पद्धतीने येते, इमोसनल अत्याचार पद्धतीने नाही. + एका उवगृ सिल्व्हीसाठी दुसरी बंडखोर इझ्झी असतेच) वगैरे काहीजणांसाठी टर्नऑफ असू शकतात. पण तरीही शिफारस करते की हे पुस्तक वाचा. कारण शेवटची १००-१२५ पानं असलेलं दुसऱ्या महायुद्धाचं सामान्याच्या नजरेतून वर्णन. बापरे!! असलं काही मी याआधी कधीच वाचलं नव्हतं. गुडरीड्सवरच्या परिक्षणातून उचललेल्या शब्दांत सांगायचं झालं तर sublime, philosophical, dazzling, wit humour and charm, compassion, practical and unhysterical perfection इ इ असलेलं पुस्तक.

हरिहर, सुलू, टवणे, सनव, सामो, ललिता,
प्रोत्साहनासाठी खूपखूप आभार _/\_
===

ललिता,
डोफि आवडतच नसेल तर ही दोन्ही पुस्तकं वाचली नाहीत तरी चालेल. नक्की वाचा अशी नाहीयत.
पण जर Olive Again वाचणार असशील तर Olive Kitteridge देखील वाचल्यास बरं पडेल. पुस्तकं तशी इंडिपेंडंटच आहेत पण पहिले वाचले असल्यास ऑलिव्हच्या व्यक्तिरेखेचा नीट अंदाज येईल. + पुलित्झर विजेत्या पुस्तकाची 'वाचलेल्या यादी'त नोंद होईल Wink

पण पहिले वाचले असल्यास ऑलिव्हच्या व्यक्तिरेखेचा नीट अंदाज येईल. + पुलित्झर विजेत्या पुस्तकाची 'वाचलेल्या यादी'त नोंद होईल >>> ओक्के. आधी सॅम्पलं डालो करून चाळून बघते.

Life After Life (2013) - विशलिस्टमध्ये टाकलं.

पुस्तकाचे नाव: Hit Them Where it Hurts (1983)
लेखक: James Hadley Chase
रेटिंग: २.५/५

पुस्तकाची सुरवात चांगली आहे. न्वारच्या सोनेरी काळात असायच्या तशाच व्यक्तिरेखा आहेत. पण मध्य आणि शेवट बालिश म्हणता येईल असा झालाय. आजच्या नजरेतून पाहिल्यास, काही वर्णनांमधे वंशभेद जाणवतो.

पुस्तकाचे नाव: The Better Liar (2020)
लेखक: Tanen Jones
रेटिंग: ३.५/५

Most Anticipated of 2020 यादीत पुस्तकाचे मुखपृष्ठ चांगले वाटल्याने + अर्ली रिव्ह्यू चांगले असल्याने हे वाचले.

एवढे काही खास नाही, ठीक आहे. सस्पेन्स मलातरी अगदी सुरवातीलाच ओळखता आला होता. शेवटी येतो तो ट्विस्टदेखील ठीकच. चॅप्टर ५२, ५४ आणि लेखिकेची नोट मात्र विचार करण्यासारखी आहे. मदरहुड, पोस्टपार्टम, अमेरिकेत हेल्थ सर्व्हिस मिळवण्यात होणारा वंशभेद याबद्दल थोडंफार लिहलं आहे. पण फक्त तेवढ्यासाठी अख्खे पुस्तक वाचायची गरज नाही. आणि हो ही लेखिका queer आहे.

शॉर्ट रिव्ह्यूज आवडले.
1983 सालचं बुक कसं काय वाचलंस? जनरली मला तरी रिलेट नाही होत इतकी जुनी पुस्तकं. तू कसं सिलेक्ट करतेस एखादं पुस्तक याबद्दल पण जमल्यास लिही.

And then she was gone
वाचलं असल्यास तुझा टेक लिही. नसल्यास हायली रेकमेंडेड!

> 1983 सालचं बुक कसं काय वाचलंस? जनरली मला तरी रिलेट नाही होत इतकी जुनी पुस्तकं. > यावर्षी एक इतर कोणतेतरी पुस्तक वाचायचे आणि एक जेहॅचे चे पुस्तक वाचायचे असा प्लॅन केला होता. त्यामुळे हे वाचलं. पटकन वाचून होणारी चीप थ्रिल्स! गुडरीड्स चॅलेंजमधे काऊंट दिसायला बरा दिसतो म्हणून वाचतेय Wink Proud

> तू कसं सिलेक्ट करतेस एखादं पुस्तक याबद्दल पण जमल्यास लिही. >
मी वर दिलेल्या लिंक वापरते. त्यात क्लासिक्स आहेत, गेल्यावर्षीच्या लोकप्रिय पुस्तकांची यादी आहे, येत्यावर्षीच्या कोणत्या पुस्तकांकडे लक्ष ठेवावं हे आहे. आजच काळ्या आणि आयरिश लेखकांची कोणती पुस्तकं वाचावी याच्या लिंक ऍड केल्यात.
त्याखेरीज गुडरीड्स फेसबुक पेजवर दर शुक्रवारी येणाऱ्या What you are reading this weekend पोस्टचा वापर मी करते. भारतीय शनीवारी सकाळी तिथे जायचं, 25+ लाईक आलेल्या पुस्तकाला गुडरीड्सवर शोधायचं, जर लाख+ लोकांनी 3.5+ रेट केलं असेल तर ते टूरिड यादीत टाकायचं.
===

Lisa Jewellचं Then She was Gone का?
2018 मधेच वाचलेलं. फारसं आवडलं नव्हतं ३/५ रेट केलंय. काय ती बाई ऑब्सेस्ड असते मुलासाठी. आणि कैच्याकै मार्ग निवडते eyeroll.
तुला कसं वाटलं?

हो हो तेच! मला आवडलं कारण बर्‍याच दिवसांनी असं काहीतरी वाचलं जे वाचताना खरोखर भीती वाटत होती! डार्क वातावरण निर्मिती मस्त झालीय.

> तू कसं सिलेक्ट करतेस एखादं पुस्तक याबद्दल पण जमल्यास लिही. >
मी वर दिलेल्या लिंक वापरते. त्यात क्लासिक्स आहेत, गेल्यावर्षीच्या लोकप्रिय पुस्तकांची यादी आहे, येत्यावर्षीच्या कोणत्या पुस्तकांकडे लक्ष ठेवावं हे आहे. आजच काळ्या आणि आयरिश लेखकांची कोणती पुस्तकं वाचावी याच्या लिंक ऍड केल्यात.
त्याखेरीज गुडरीड्स फेसबुक पेजवर दर शुक्रवारी येणाऱ्या What you are reading this weekend पोस्टचा वापर मी करते. भारतीय शनीवारी सकाळी तिथे जायचं, 25+ लाईक आलेल्या पुस्तकाला गुडरीड्सवर शोधायचं, जर लाख+ लोकांनी 3.5+ रेट केलं असेल तर ते टूरिड यादीत टाकायचं.

हे खूपच हेल्पफुल आहे इथे वाचन वाढवू इच्छिणार्‍या सगळ्यांनाच. मी एक लिस्ट बनवून ठेवली आहे फोनमध्ये ज्यात वाचायची पुस्तकं, बघायचे शोज , मुव्हीज टाकून ठेवते.

तू Verity आणि The Dry वाचलेत का? नसेल तर टोटली रेकमेन्डेड!!

> हो हो तेच! मला आवडलं कारण बर्याच दिवसांनी असं काहीतरी वाचलं जे वाचताना खरोखर भीती वाटत होती! डार्क वातावरण निर्मिती मस्त झालीय. > आता काही दिवसांपूर्वीच मी Room वाचायला चालू केलं होतं. पण फार डिस्टर्ब झाले म्हणून काही पानांनंतर सोडून दिलं. हे Then She was Gone वाचताना मात्र मी एवढी डिस्टर्ब झाले नव्हते.

> हे खूपच हेल्पफुल आहे इथे वाचन वाढवू इच्छिणार्या सगळ्यांनाच. मी एक लिस्ट बनवून ठेवली आहे फोनमध्ये ज्यात वाचायची पुस्तकं, बघायचे शोज , मुव्हीज टाकून ठेवते. > हो हे मीपण करते Happy

मस्त धागा..
तुम्ही एवढ कसं काय वाचता राव
कमालीचा आदर आहे.. नमन घ्या !

मी रूम आधी वाचलंय. हे पुस्तक वाचताना रूमची आठवण सतत येतच होती.
तू रूम नेटाने पूर्ण कर. इट गेट्स बेटर. डोन्ट मिस इट.

तू त्या बाईच्या मुलासाठीच्या ओब्सेस्ड असण्याबद्दल लिहिलं आहेस ती कॉमन थीम आहे पोस्ट-गॉन गर्ल सायकॉलॉजीकल थ्रिलर्समध्ये. Infertility, ivf treatment, किंवा प्रजननक्षम असून इतर कारणामुळे मूल नसणं. गॉन गर्ल, गर्ल ऑन द ट्रेन, वाईफ बिटविन अस, लिटल फायर्स इव्हरिव्हेअर, समटाइम्स आय लाय.

व्हेरिटी आहे लिस्टमध्ये, ड्राय पण टाकते आता.

Then She was Gone गुडरीड्सवर आणि किंडलवर बघते.

नुकतंच गुडरिड्सचंही app डालो केलंय, कसा आणि किती वेळ जातो कळत नाही :डोळ्यांत बदाम:

पुस्तकाचे नाव: Americanah (2013)
लेखक: Chimamanda Ngozi Adichie
रेटिंग: ३.५/५

नायजेरिया म्हणलं की आपल्याला फ्रॉड आणि ड्रग्ज आठवण्याची शक्यताच जास्त. पण या पुस्तकात थोडा वेगळा नायजेरिया भेटतो. बालपणापासून इंग्रजी बोलणारी,पौगंड वयात जेम्स हॅडली चेस वाचणारी, कनिष्ठ-मध्यम वर्गातली Ifemelu, १९ वर्षांची असताना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाते. आणि तिला वंशभेद म्हणजे काय हे कळू लागतं. मग ती "Raceteenth or Various Observations About American Blacks (Those Formerly Known as Negroes) by a Non-American Black" नावाचा ब्लॉग चालू करते, जो खूप यशस्वी होतो. एका गोऱ्याला आणि एका अमेरिकन-काळ्याला डेट करून झाल्यावर, १३ वर्षांनी ती परत मायदेशी येते. बदलेल्या तिला, बदलेला नायजेरिया कसा दिसतो. आणि हा सगळा काळ हृदयाच्या तळाशी कायम वास्तव्य करून असलेल्या शाळकरी वयातील प्रेमी Obinze च काय?

मी शक्यतो पुस्तकाची (किंवा सिनेमाची) कथा सांगत नसते. पण याची सांगून टाकली. कारण मला ती फारशी आवडली नाही. नायिकेच्या सगळ्या ब्लॉगपोस्ट फारच चांगल्या आहेत. वंशभेदाबद्दल किती खोलात जाऊन विचार करता येतो, हे सगळं आपल्याकडच्या जातीभेदाला लागू होतं का वगैरे भरपूर थॉटप्रोव्होकींग मुद्देमाल आहे पुस्तकात. पण कथा मलातरी काही खास वाटली नाही Sad

पुस्तकाचं प्रमोशन म्हणून तो ब्लॉग खरंच चालू केला असता आणि त्यावर त्या सगळ्या पोस्ट आल्या असत्या तर फक्त तेवढ्याच वाचण्याची खूप शिफारस केली असती. पण One Day सारख्या प्रेमकथा किंवा Coming of age कथा फारच आवडत असतील तरच हे पुस्तक वाचा असं सांगेन.

> तू रूम नेटाने पूर्ण कर. इट गेट्स बेटर. डोन्ट मिस इट. > सध्यातरी हिंमत होत नाहीय पुस्तक वाचायची. बघू नंतर कधीतरी... तोपर्यंत मी Fritzl, तत्सम केसबद्दलच विकी वाचून घेतलं.

> तू त्या बाईच्या मुलासाठीच्या ओब्सेस्ड असण्याबद्दल लिहिलं आहेस ती कॉमन थीम आहे पोस्ट-गॉन गर्ल सायकॉलॉजीकल थ्रिलर्समध्ये. Infertility, ivf treatment, किंवा प्रजननक्षम असून इतर कारणामुळे मूल नसणं. गॉन गर्ल, गर्ल ऑन द ट्रेन, वाईफ बिटविन अस, लिटल फायर्स इव्हरिव्हेअर, समटाइम्स आय लाय. >हम्म. मला वाटतं लग्न आणि डिसेप्शन या मुख्य थीम आहेत या सगळ्या पुस्तकात. पण तू म्हणल्यावर लक्षात आलं की (TSWG इतका प्रबळ नसला तरी) प्रजनन हादेखील समान धागा आहे...

पुस्तकाचे नाव: The Wives (2019)
लेखक: Tarryn Fisher
रेटिंग: २.५/५

खुळयांचा बाजारए नुस्ता! अजिबात वाचायचे कष्ट घेऊ नका. ही बाई कोलीन हुवरसारखीच नियमीत रोमान्स पाडणारी आहे बहुतेक, भरपूर स्त्रीवाचक असलेली. आणि तिने थ्रिलर लिहलं म्हणून सगळे चानचान म्हणत सुटलेत.
मुखपृष्ठावरच्या बायका छानेत. त्यांचे कपडे आणि हेअरकट बघू शकता Wink