काल इथं दोन धागे वाचले. समस्या खरी असल्याने मोठ्या अपेक्षेने मदत मागितली असावी. डिप्रेशन आणि ऑफिस पॉलिटिक्स विषय होते.
मला असे वाटते की अशा प्रकारच्या समस्या येण्याचं कारण बहुधा इनफेरियॉरिटी कॉम्प्लेक्स (न्यूनगंड) असतो. समाजात पुरेसे एक्स्पोजर मिळाले नसेल, स्वत: कडे कमीपणा घेण्याची सवय असेल किंवा अति हळवा स्वभाव असेल तर नवीन काम अंगावर घेताना, नवीन लोकांशी जुळवून घेताना, नवीन ठिकाणी शिफ्ट होताना समस्या येतात.
नव्या लोकांबरोबर जुळवून घेताना मनावर एक प्रकारचा ताण येतो की मला स्विकारलं जाईल का, माझं काम पसंत पडेल का?
हे होणं साहजिक आहे.
या समस्या हाताळण्यासाठी काही सॉफ्ट स्किल अवगत असावेत.
बरोबरीच्या सहकाऱ्यांना शक्य होईल ती मदत करावी. चुकुनही कुणाची निंदा करू नये. चुगली केली तर कधीतरी ज्याची केली त्याला समजतेच. कामाच्या वेळा पाळल्याच पाहिजेत. कुठलीही अडचण आली तर मनमोकळेपणाने सल्ला मागावा. आपल्याला काही त्रास आर्थिक, आरोग्याचा असेल तर अत्यंत जवळच्या व्यक्तीलाच फक्त सांगावं, रडगाणे गात फिरु नये. माणसांची पारख करून मगच त्यांना घरापर्यंत येऊ द्यावं. पैसे खर्च करायची वेळ आली तर हात आखडता घेऊ नये. सहकाऱ्यांना संधी मिळताच चहा, नाष्टा अवश्य देत जावे. आजारी सहकाऱ्यास सांभाळून घेतले तर तो आयुष्यभर आपलेपणाने वागेल. काही समारंभ ठरला तर समरसून भाग घ्यावा, अलिप्त राहू नये. इतरांच्या श्रध्देचा, धर्माचा मान ठेवावा.
काहीही करून काम पुर्णपणे शिकून घेणे, सतत स्वत:ला अपडेट ठेवणं हे खुप जरुरीचं आहे.
बॉसची खुशामत करु नये व जास्त सलगीही करायला जाऊ नये. बॉस हा प्राणी हायरार्की जपणारा असतो. हाताखालच्या लोकांना तो कधीच बरोबरीचा समजत नाही. एखादा अपवाद असतो.
भावना ताब्यात ठेवता आल्या पाहिजेत. खंबीरपणा स्वभावात असावा. आपले हात दगडाखाली आहेत तोवर माघार घेता आली पाहिजे व वेळ येताच उट्टे फेडले पाहिजे. बाकी नंतर.. ऋन्मेषचे प्रतिसाद अपेक्षित आहेत....
डिस्क्लेमर : माझ्या विचारांशी सहमत असलंच पाहिजे असे मुळीच नाही. सल्ला मानायचा की नाही याचं स्वातंत्र्य आहे.
माझा सल्ला ( माझे विचार)
Submitted by राजदीप on 23 January, 2020 - 10:26
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उत्तम विचार.
उत्तम विचार.
>>>>> चुकुनही कुणाची निंदा करू नये. >>> गोंदवलेकर महाराज तर म्हणतात परनिंदा विष्ठेसमान मानावी. हे मला फार पटते.
धन्यवाद सामो जी.
धन्यवाद सामो जी.
एकदम सटीक लिहिलंय.. भारीच
एकदम सटीक लिहिलंय.. भारीच
ठेंकू बोकलत भाई!
ठेंकू बोकलत भाई!
निंदा करणे आणि जे तांत्रिक
निंदा करणे आणि जे तांत्रिक दृष्ट्या चूक आहे त्याला चूक म्हणणे यात फरक करायला हवा. आणि अशा चुका सांगायला हव्यात. चुका सांगितल्या म्हणजे आपण सर्वगुणसंपन्न होतो असेही नाही. आपल्याही चुका होतात. त्या कुणी आपल्याला सांगित ल्याच नाहीत तर मग आपल्याला कळणार कशा?
शरदजी निंदा पाठीमागे केली
शरदजी निंदा पाठीमागे केली जाते. चुका सौम्य भाषेत हसतखेळत लक्षात आणून द्यायला हव्यात व इतरांनी आपल्या चुका लक्षात आणून दिल्या तर आनंदाने कबुल करुन सुधारणा केली पाहिजे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/324327337643107/posts/2640291836046634/
>>>निंदा पाठीमागे केली जाते.
>>>निंदा पाठीमागे केली जाते. चुका सौम्य भाषेत हसतखेळत लक्षात आणून द्यायला हव्यात व इतरांनी आपल्या चुका लक्षात आणून दिल्या तर आनंदाने कबुल करुन सुधारणा केली पाहिजे.>>> उत्तम प्रतिवाद.
धन्यवाद सामो जी.
धन्यवाद सामो जी.