जपानी प्रवासी हरुतो ताकाहाशी सान यांच्या प्रवासात चोरीला गेलेल्या डायरी मधील नोंदी:
हरुतो एअरपोर्टच्या बाहेर आला. बाहेर निघताना झालेल्या गर्दीतल्या धक्काबुक्कीमुळे त्याच्या वरच्या दोन गुड्या तुटल्या होत्या आणि चष्म्याची काडीही. भारतात यंदा ट्रॅव्हल सर्व सामान्य जनते प्रमाणे करायचा त्याचं स्वप्न होतं. बोकलवाडी च्या बस स्टैंड वर नागपूर बस ची वाट पाहताना पायावरती बसलेले लबाड डास मारता मारता त्याच्या मनात आलं, शॉर्ट ऐवजी फुल पॅन्ट घातली असती तर बर झाल असतं. बस स्टँड जवळ उघडे नाले असतात आणि नाल्यामुळे डास बस स्टॅन्ड मध्ये येतात अशी त्याने त्याच्या डायरीत नोंद केली. नागपूरची बस शोधताना दोन-चार बस त्याच्या अंगावर रिव्हर्स आल्या आणि त्यातून तो आणि त्याच्यासारखेच दोन-चार गोंधळलेले प्रवासी वाचले त्यामुळे भारतात देव असतो यावर त्याचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. एका आपल्याला इंग्लिश बोलता येते हा समज असलेल्या भारतीयाने केवळ फॉरेनरला बोलून इतरांनाही इम्प्रेस करण्याच्या नादात चुकीचे मार्गदर्शन केल्यामुळे तो नागपूरच्या ऐवजी कोल्हापूरच्या बसमध्ये बसला आहे हे त्याला कळण्याचा कोल्हापूरला पोहोचेपर्यंत तरी काहीच मार्ग नव्हता. लवकरच तिकीट घेतल्यावर सुट्टे नसतील तर मोठी नोट कंडक्टरच्या खिशात गडप होते अशी नोंद त्यांनी आपल्या डायरीत केली. खचाखच भरलेल्या बस मध्ये खिडकीची सीट शक्यतो घेऊ नये कारण सर्वात अलीकडे बसलेल्या माणसाला उलटी आली की तो आपल्या अंगावर ओणवां होत खिडकी चा वापर करतो असेही त्याने आपल्या डायरीत नमूद केले. बस मध्ये प्रवास करताना खिडकीतून लाल रंगाचे अचानक शिंतोडे चेहऱ्यावर अधून-मधून येतात असेही त्याने नमूद केले. भारतीय लोक पान वा तंबाखू खाऊन ते बसच्या खिडकीतून थुंकतात, त्यास बोलीभाषेत पिचकारी मारणे असे म्हणतात असेही त्यांनी डायरीत नमूद केले. एसटी बस मधून प्रवास करताना जर आपले आधीच रिझर्वेशन नसेल तर हरकत नाही बसमध्ये चढल्या च्या आधी बाहेरूनच एखाद्या रिकाम्या सीट वर खिडकीतून लहान मूल, रुमाल, मफलर, संत्रे, पाण्याची बाटली, चप्पल अथवा वर्तमानपत्र हे खिडकीतून टाकल्यास आपली सीट रिझर्व होते. ...(अपूर्ण कारण प्रवास अर्धवट सोडून हरुतो सान त्वरित जपानला गेला)
तो जपानी परत का गेला?
Submitted by सखा. on 22 January, 2020 - 03:24
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
बोकलवाडी की बोकलतवाडी?
बोकलवाडी की बोकलतवाडी?