दहा रुपयांत ब्रॅण्डेड..

Submitted by राजदीप on 20 January, 2020 - 03:47

दहा रुपयांत ब्रॅण्डेड विदेशी क्वार्टर मिळणार..
दुकान २४ तास उघडं राहील.
व्हिस्की, रम, जीन, व्होडका ज्याला जो हवा तो ब्रॅण्ड मिळेल.
कागदपत्रे दाखवायची गरज नाही.
वयाची अट नाही.
प्रत्येक चौकात दुकान..
मदिरा शौकिनांची चंगळ होणार..
आयाबायांच्या संसाराला झळ बसणार नाही..
फक्त दहा रुपये....
कितीही बाटल्या मिळतील...
पण थोडी वाट पहावी लागेल..
पुढच्या विधानसभा निवडणुकीत माझं सरकार आलं नि मी मुख्यमंत्री झालो की पहिला निर्णय हाच घेणार.
तोवर वाट बघा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक कमेंट..
नवीन Submitted by DJ.. on 20 January, 2020 - 05:55
>> कमेंट नसती केली तरी मला फरक पडला नसता. मी हिकडं स्वानंदासाठी लिहितो मनलं डीजे .

आता पण मुंबईत रात्री जागीच असतात माणसं.
>>>>

एक्झॅक्टली! त्याच जागे असणारया लोकांसाठी हे सुरू केलेय. आधी पावभाजी भुर्जीपाव आणि एक कटींगच्या शोधात या लोकांना रात्री भटकावे लागायचे. आता तंदूरी शंदूरी खातील दारू वारू पितील मज्जानू लाईफ जगतील...
रात्री एक ते चार जागणारीही माणसेच असतात. त्यांचाही मौजमजेवर हक्क आहे.

ऋ भाय तू छाटछूट नोकरी करण्यापेक्षा पब नायतर बार चालू कर ना!
>>>>

माझा मद्याला विरोध आहे. मी तिथे सलाडचा स्टॉल लाऊ शकतो.
लोकं रात्री पितील आणि पहाटे ऊतरल्यावर घरी जातील तर ते तुलनेत चांगलेच आहे.

बाकी माझी नोकरी छाटछूट नाही. मनाप्रमाणे आणि राजासारखे जगायची मुभा आहे मला त्यात.

मुंबईत नाईट लाईफ सुरू करतो म्हणणे म्हणजे हैद्राबादला बिर्याणी सुरू करतो म्हणण्यासारखे आहे.

दम असेल तर पुण्यात दु. १ ते ४ लाईफ सुरू करून दाखवा म्हणावं.