हॉटेल शिवीभोजन थाळी
मालक: हॅ हॅ हॅ.
मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्हाईक आलं.
हॅ हॅ हॅ या या या.
बसा बसा बसा.
मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्हाईकाला काय लागते ते पुस.
हॅ हॅ हॅ.
मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय?
मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्हाईकाला तुझे पाणी पाज. हॅ हॅ हॅ.
मालक: अरे तो ढिल्ला पोळीवाला आला नाही अजून सोन्या? कुठे उलथला काय माहित.
त्या आठवी नापास मंदने अजून पोळ्या दिल्या नाहीत. मग भो**च्या थाळीत काय फक्त भात देवू काय रे सोन्या गाढवीच्या?
गिर्हाईक देव आहे आपला. त्याला ताटकळत ठेवून ताटात काय ठेवू? आमचा हा? म्हणजे मेंदू?
मालक: अरे दळभद्री, अरे तो गॅस संपलाय किचनमध्ये बघ जरा. नाहितर तुला बसवेल गॅसच्या जागी. हॅ हॅ हॅ.
गिर्हाईक १: ओ मालक, किती वेळ लागेल अजून थाळी सजवायला?
मालक: तुम्ही थोडे थांबा हं गिर्हाईकदादा. ह्या भा**ऊ पाजी गॅसला आताच संपायला पाहिजे होते. माठ्या, सोन्या भामट्या बघ जरा. येथे येणारे मोठे भुक्कड असतात त्यांची सोय पहायला नको का घनचक्कर? ती कोण पाहणार? तुझा ठोल्या बाप की माझा उलथलेला चुलता?
गिर्हाईक २: ओ मालक येथे बघा. चमचा बघा किती घाण आहे? न धुतलेलाच दिलेला दिसतोय.
मालक: अरे तिच्यायला! अरे पोंग्या, बघ जरा तो चमचा, बदलून दे तिन नंबरला. हॅ हॅ हॅ, आजकाल चमचे जरा जास्तच झालेत हो. मधे मधे कडमडतात. त्यामुळे होते चुकून. बाजूला राहून जातो एखादा डुकरासारखा चमचा. आमच्या मोरीतले माणसे म्हणजे एकदम छपरी आहेत बघा. आताच त्या बोंगाड्यांना तासतो.
मालक: अरे ए सुक्काळीचे, जास्त बेवडा मारून आलेत काय आज सकाळी? दळभद्री साले, रोज कुत्र्यासारखे खातात फक्त. अन भांडी निट घासायला नको का तुम्हा नालायकांना? अरे गिर्हाईक आमच्या नावाने ओरडते ना बैलांनो.
नोकर: मालक नळाला पाणी आलेले नाही कालपासून. जे आहे त्यातच घकवतोय.
मालक: अरे ए बिनडोक टमरेल, भो**च्य, तु मला आज सांगतो? कालच सांगितले असते तर मागवला असता एखादा पाण्याचा टँकर.
वेटर: एक वडापाव, पंधरा रुपये घ्या मालक.
मालक: अहो, सुटे द्या साहेब पंधरा रुपये. *टभर बिलासाठी कुठे उगीचच पाचशेची नोट काढता.
वेटर: मालक पुढचे गिर्हाईक. पाच नंबर. शिवीभोजन थाळी. दहा रुपये घ्या.
गिर्हाईक १: हे घ्या दहा रुपये.
मालक: नाव सांगा.
गिर्हाईक १: नाव कशाला?
मालक: अहो थाळी घेतली तर नाव सांगावे लागेल. च्यामारी, *टभर पैसे मिळवायचे अन सगळ्या नोंदी ठेवायच्या असे फुकटे काम दिले आहे बघा सरकारने.
गिर्हाईक काय एकदम उपाशी असते. येते आपले हादडायला, हॅ हॅ हॅ, म्हणजे तुम्ही नाही हो. उगाच आपले हे.
गिर्हाईक १: बरं बरं राहूद्या ते.
मालक: काम काय करतात ते सांगा.
गिर्हाईक १: अहो ते कशाला आणखी.
मालक: असे कसे? अहो सगळी कुंडली द्यावी लागेल बघा एकदा का शिवीभोजन थाळी खाल्ली तर. अनुदानीत आहे ना. *टभर पैशात पोटभर खा. हॅ हॅ हॅ.
गिर्हाईक १: अच्छा.
मालक: आधार क्रमांक काय?
गिर्हाईक १: आता तो पण द्यायचा का?
मालक: मग! अहो आता तर तो येथे द्यावा लागतोय. काय सांगावे पुढे मागे तर सुलभातही द्यावा लागेल. आहात कोठे. आता उद्याच या. रात्री शिवीथाळीची अपेक्षा करू नका. उपाशी झोपा. या पुन्हा शिवीभोजनाचा लाभ घ्यायला.
हॅ हॅ हॅ.
मालक: सोन्या खुळ्या बधीर लेका, शिव्याथाळीचा आजचा कोटा संपला बघ. त्यातल्या त्यात या फुकट्या कामात बरे आहे की फक्त दिवसाच हि शिवीथाळी द्यावी लागते आहे. सोन्या फुकट्या दलिंदरा, अरे, बाहेर बोर्ड लाव शिवीथाळी संपली म्हणून.
हॅ हॅ हॅ.
शिवीभोजन, शिव्याथाळी >>>>>या
शिवीभोजन, शिव्याथाळी >>>>>या शब्दांचा अर्थ काय आणि ते असेच का लिहावेसे वाटले ????
अच्छा हां विनोदी लेखनाचा
अच्छा हां विनोदी लेखनाचा प्रयत्न होता का नक्की कुठं हसु अपेक्षित आहे ते कंसात दिले तर आम्ही त्या त्या वाक्याला हसून घेऊ बर्र...
माफ़ करा पण ही थाळी काय झेपली नाही तुम्हाला नीट सजवुन इकडे मांडायला इतके नक्की !!
२६ जानेवारी पासून हि थाळी
२६ जानेवारी पासून हि थाळी मिळायला लागणार आहे याबाबत आपण अज्ञानी आहात काय?
या तुम्ही आमच्या हॉटेलात.
खॅ खॅ खॅ
हा लेख काही जमला नाही बघा.
हा लेख काही जमला नाही बघा.
मस्त प्रहसन. लेख आवडला. मालक
मस्त प्रहसन. लेख आवडला. मालक कोकणातले असावेत बहुतेक.
मालक कोकणातले असावेत बहुतेक..
मालक कोकणातले असावेत बहुतेक....+१११
कारण इथे खान्ग्रेस्सी असावेत असेही म्हणून चालणार नाही
की घड्याळबाबू आहेत ऐसेही नसावे पण मग उरले काय !!
फ़ुलात फूल कमलाचं फूल
यंदाच मांडलीय अलग चुल
दश्शी फेकून करणार
पोटाची आग कुल कुल
दश्शी डायरेक्ट द्यायची आणि
दश्शी डायरेक्ट द्यायची आणि अनुदानाचे चाळीस आपल्याच बोकांडी इनडायरेक्टली. कुणाची थाळी कुणाच्या पैशांवर?
>>>>>>>>>गिर्हाईक काय एकदम
>>>>>>>>>गिर्हाईक काय एकदम उपाशी असते. येते आपले हादडायला, हॅ हॅ हॅ, म्हणजे तुम्ही नाही हो. उगाच आपले हे.>>>>>> हाहाहा!!
>>>>> अहो आता तर तो येथे द्यावा लागतोय. काय सांगावे पुढे मागे तर सुलभातही द्यावा लागेल. आहात कोठे.>>>> अरारा!! =))
शिव्यापुर्ण थाळी नाही वाचल्या
शिव्यापुर्ण थाळी नाही वाचल्या जात..
नक्की राग कुणावर आहे ते कळले
लेखातुन कुणावर राग काढला आहे ते कळले नाही.
घ्या. आता रागच काढणार का? अहो
घ्या. आता रागच काढणार का? अहो विनोदी लिहीलेय. डीजे साहेब!.
वाजवा डीजे आता.
बाप रे ! शिव्यांची यादीच
बाप रे ! शिव्यांची यादीच तयार केली आहे. माहीत असणाऱ्या, नसणाऱ्या, नव्या, जुन्या शिव्या वाचायला मिळाल्या. मला तरी थोडंसं हसू आलं.
मला स्वतःला शिवी देणं जमत नाही. माझी अतीव टोकाची अगदी संतापातून आलेली शिवी म्हणजे 'इडियट साला', त्यामुळे वाचताना सुद्धा धडधडलं जरा
सौम्य शिव्या आहेत या.
सौम्य शिव्या आहेत या.
विशेषण असाव्यात अश्या.
अन शिव्याही खाल्या जातात ना म्हणून हि शिव्यांची थाळी शिवीभोजन थाळी.
(सौम्य आहे म्हणूनच येथे वाढली आहे.)
(धागा असा उलगडून वाचकांना सांगावा लागतो म्हणजे कमाल आहे!)
धागा असा उलगडून वाचकांना
धागा असा उलगडून वाचकांना सांगावा लागतो म्हणजे कमाल आहे!
>>> यावरून तुम्हाला कळलं असेल कि हा प्रयत्न फसला म्हणून ... पाभे चा चहा घ्या आणि येऊ द्या पुढचा लेख...
फुल्यांनी मजा घालवली... जी
फुल्यांनी मजा घालवली... जी मजा भो स डी च्या वाचण्यात आहे ती # # डी च्या वाचण्यात नाही. जर कथेची गरज शिव्या असेल तर ताकाला जाऊन गिलास ल्पवण्यात अर्थ काय?
यावर ईतर वाचकांचे मत जाणून घ्यायला ऊत्सुक.. कारण मलाही एक शिव्यांनी भरलेला लेख लिहायची खूप ईच्छा आहे. पुन्हा बालपणात रमायची ईच्छा आहे...
>>जर कथेची गरज शिव्या असेल तर
>>जर कथेची गरज शिव्या असेल तर ताकाला जाऊन गिलास ल्पवण्यात अर्थ काय?<<. +१
हल्ली शिव्या सगळीकडेच मेनस्ट्रीम मध्ये आल्या आहेत. नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मने तर हिंदी सिनेमाचं ट्रांस्फॉर्मेशन केलेलं आहे. पण शिव्या द्यायला हि सराव लागतो, नाहितर ती शेफाली शहा कुठल्याशा सिरिज मध्ये शिव्या देताना केविलवाणी दिसली होती. असो.
बोलताना शिवी कचकन आली नाहि किंवा ऋन्म्या वर म्हणतोय तशी बुरखा पांघरुन लिखाणात आली तर ती शिवी वाटत नाहि...
फारसं हसू आलं नाही...
फारसं हसू आलं नाही...
ऋन्मेषशी सहमत आहे. शिर्षकातच 'शिवी'बद्दल वॉर्निन्ग आलेली असताना खाली लेखात फुल्याफुल्या वापरण्याची गरज नव्हती.
पण तसं लेखन माबो पॉलिसीत बसतं की नाही हे मला माहीत नाही.
शिव्या देण्याची पण एक स्टाईल
शिव्या देण्याची पण एक स्टाईल असते, प्रत्येकाला ते जमत नाही, ज्यांना जमतं ते लोक जेव्हा चिडतात शिव्या देतात तेव्हा खरंतर तो एक प्रेक्षणीय सोहळा असतो. माझा एक मित्र जब्राट शिव्या घालायचा. त्याची स्टाईल म्हणजे एखाद्या लहान मुलाला समजवून सांगावं अश्या सौम्य, प्रेमळ आवाजात शिव्या देणे. म्हणजे आपण "अरे बाळा, असं नको वागूस" असं म्हणू तर हा "अरे गांडू,असं नको वागूस रे" असं अगदी प्रेमळ आवाजात बोलणार. बऱ्याचदा तर ज्याला शिव्या घातल्यात तोच हसायचा..
आमचे एक जवळपास समवयस्क काका आहेत दूरचे, ड्रायव्हर आहेत, त्यांच्या गाडीपुढे कुणी आलं तर ते अश्लील शिवी देत नाहीत पण काहीतरी विचित्र बोलतात, त्यांच्या शिव्या म्हणजे होल्डर, अडकित्ता, पिपाण्या, हेकन्या, बारदान, क्वाटर, झाकण, कपाट, झब्बू, किल्वर वगैरे.. आम्ही जाम हसायचो त्यांचा हा शब्दसंग्रह ऐकून.
व्यक्तिशः मला अश्या शिव्या ज्यात आई- बहीण काढली जाते, त्यांचा अश्लील उल्लेख केल्या जातो, त्या देणे ऐकणे पटत नाही. parched सिनेमा बघताना एका प्रसंगात राधिका आपटे आणि तिच्या मैत्रिणी जेव्हा विचार करतात कि सगळ्या शिव्या आई- बहिणी वरून का आहेत? बापावरून, भावावरून का नाहीत? तेव्हा मनात आलं ते असं कि, आपल्या समाजाने स्त्रियाना त्यांच्या कासोट्यापुरतं मर्यादित करून ठेवलं आहे, घराण्याची इज्जत वगैरे सगळ्याच गोष्टी, स्त्रीच्या शरीरावर सोपवून टाकल्यात, असो.
म्हणूनच सौम्य भाषेत आहे संवाद
म्हणूनच सौम्य भाषेत आहे संवाद.
काय आहे की कुणाला स्पेशल डिश लागते, कुणाला चुरचुरीत लागते, कुणाला जास्त तिखट सोसवत नाही. आणि येथले कस्टंबर फारच निराळे आहेत.
त्यामुळे एकाच थाळीसाठी अशा निरनिराळ्या चवी आम्ही देवू शकत नाही.
म्हणून स्पेशल तिखट शिवीभोजन थाळी आम्ही बनवत नाही.
तशीही शिवीभोजन थाळीचा कोटा मर्यादित असतो. अन शिवीभोजन थाळीसाठी कुणी हौसेने येत नाही. पदार्थ मर्यादीत असतात.
त्यामुळे जेवढ्या थाळ्या खपल्यात तेवढाच आमचा धंदा.
येतांना आधार कार्ड घेवून या.
खॅ खॅ खॅ.
हसु आले नाही.
हसु आले नाही.
ऋन्मेष आणि राज च्या पोस्टींशी सहमत