२०१९ सह एक दशकही संपले. बरेच कार्यक्रमात या दशकातील उल्लेखनीय घटनांचा आढावा घेतला जात आहे. आपणही का मागे राहावे.
चित्रपट-राजकारण-क्रिकेट, खेळ आणि कलाजगत, सामाजिक राजकीय वा अराजकीय घडामोडी, भारतातल्या, जगातल्या, तुमच्या गावखेड्यातल्या, आपल्या मायबोलीवरच्या वा वैयक्तिक आयुष्यातल्या ... चला लिहूया
थोडीशी सुरुवात करतो
१) राजकारण वा चालू घडामोडी भारताबद्दल बोलायचे झाल्यास मोदींचे पंतप्रधान होणे ही या दशकातील सर्वात मोठी घटना आहे. या दशकाला मोदीयुगही म्हणू शकतो. मग नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, काश्मीर ३७०, सध्याचे चर्चेत असलेले CAA आणि NRC या याच्याच उपघटना म्हणू शकतो.
२) क्रिकेटमधील विशेष घटना जरी भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकणे असली तरी त्यापेक्षा मोठी चटका लावणारी घटना सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती होती.
३) चित्रपटक्षेत्रात अशी एक घटना मला सांगता येणार नाही. पण हे दशक संपता संपता खान सुपर्रस्टारची सद्दी संपली आणि आयुष्यमान, राजकुमार राव, नवाझुद्दीन सिद्धीकी अश्या ऑफबीट कलाकारांचे ऑफबीट चित्रपट मुख्य प्रवाहात आले. दिपिका, आलिया अश्या स्टार हिरोईनी केवळ शोभेच्या बाहुल्या उरल्या नाहीत. सध्याचे क्मर्शिअल चित्रपटांचे स्टार सुपर्रस्टार रणवीर, रणबीर, शाहीद वगैरे काळाची गरज ओळखून विविध प्रयोग करत आहेत. कदाचित पुढच्या दशकात सुपर्रस्टार असे काही बिरुदच नसेल. आणि हे दशक त्याची नांदी ठरेल.
४) वैयक्तिक आयुष्यात बरेच घटना घडल्या ज्या विशेष म्हणता येतील. मग तो माझा नाच असो, वा माझा आजार असो, दक्षिण मुंबईकर मी जन्मापासून होतोच आणि राहीन पण् हे दशक संपता संपता मी नवी मुंबईकर सुद्धा झालो. जॉब बदलत बदलत अखेर एका जागी सेटल झालो. पण या दशकातली सर्वात मोठी घटना जिने माझे आयुष्य जगण्याची शैलीच बदलून टाकली ती म्हणजे माझे बाप होणे. माझ्या मुलीचा जन्म
५) ... क्रमश:
... प्रतिसादांत भर टाकूया
सर्वात महत्त्वाचं बदल.
सर्वात महत्त्वाचं बदल.
नव नवीन शोध लागल्या मुळे सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल बघायला मिळाला.
कृत्रिम बुध्दी मत्तेचा वापर वाढल्या मुळे बेरोजगारीचे संकट देशा समोर आणि जगा समोर उभ्ये आहे.
पर्यावरण बदलाचा फटका जगाला बसायला सुरवात झाली आहे
भारताची अंतराळ विज्ञान मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे.
गेले शतक आणि येणारे शतक मानव जाती साठी आव्हानात्मक आहे.
काय सांगावे अस्तित्व ला च सुरुंग लागू शकतो.
ह्या दशकात लोक अजून
ह्या दशकात लोक अजून एकमेकांपासून दूर गेले असे मला वाटते.
त्याचवेळी, ह्या दशकाच्या शेवटी शेवटी लोकांना आपण काय काय गमावतोय याची जाणीव होऊन शक्य तितक्या दुरुस्त्या केल्या जात आहेत.
मायबोली गेल्या दशकात खूप वेगाने वाढली. या दशकाच्या उत्तरार्धात तिची वाढ स्थिर झाली म्हणता येईल.
पण इथे ओळख झालेले लगेच व्हाट्सअप्पवर जात असल्यामुळे इथले हितगुज-माझ्या गावात हे धागे बहुतांश बंद पडले. आणि त्यामुळे इथे जे कौटुंबिक वातावरण होते ते संपले. आधीचे सगळे चांगले व आताचे टाकाऊ असे मी म्हणणार नाही पण आधीची मायबोली जास्त जवळची वाटत होती.
हे दशक अजून संपले नाही
हे दशक अजून संपले नाही हेमावैम. 2021 ला नवे दशक सुरू होईल.
हेमावैम कशाला? खोट्या गोष्टी
हेमावैम कशाला? खोट्या गोष्टी बिनदिक्कत खऱ्या सांगताना वैम नसते बरेचदा ते का बरे? जे खरे आहे ते खरे आहे. ज्यांना पटत नाही त्यांना गणिताचा आब्यास करायला सांगायचे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>पण आधीची मायबोली जास्त
>>>पण आधीची मायबोली जास्त जवळची वाटत होती.>>> आधीच्या मायबोलीवर मी ३ महीन्यातून एकदा वगैरे फेरफटका मारायचे. अश्विनीचा 'स्तोत्रे' धागा वाचायचे व अपडेटही करायचे. पण जे इतर धागे वाचायचे त्यामध्ये हे कौटुंबिक व एक आपुलकीचे, नॉन-ट्रोलिंग व एक समंजस वातावरण आढळायचे. त्या पुण्याईवरती अजुनही चांगले लेखक माबोला मिळोत. अब है वोह है! लोग आते गए, कारवां बनता गया| जे आता दिसत नाहीत, ते आयडीजही परत यावेत असेच वाटते.
ओह. दशकाचाही वाद आहे का?
ओह. दशकाचाही वाद आहे का?
मला वाटते पहिली तारीख १ जानेवारी ०० होती की १ जानेवारी ०१ होती यावर दशक कधी संपते हे ठरेल.
पण हा एक एप्रोच झाला. अजून एक एप्रोच असा की आपण आपल्या सोयीने एखादे दशक कुठून मोजायला सुरुवात करतो. जेव्हा आपण म्हणतो माझा जन्म ऐंशीच्या दशकातला तेव्हा १ जानेवारी ८० ते ३१ डिसेंबर ८९ पर्यंतचा काळ पकडतो. ९० साली प्रदर्शित झालेल्या सिनेमांना नव्वदीच्या दशकातले सिनेमे म्हणतो.
अर्थात या केसमध्ये जर कालगणना १ जानेवारी ०१ या तारखेपासून सुरु झाली असेल तर पहिल्या दशकात केवळ नऊच वर्षे येतील. पण ईटस ओके. सध्या आपण कुठल्या दहा वर्षांच्या सेटला दशक म्हणतो हे जास्त महत्वाचे असे मला वाटते.
जाऊ दे ऋ भाय. तू सगळ्यांच्या
जाऊ दे ऋ भाय. तू सगळ्यांच्या एक वर्षानं पुढे आहेस. बाकी लोग एक बरस पिछे हैत.
बिटीडब्ल्यू.
मी तुला तूझ्या पोस्टींवरुन कोवळा, राजबिंडा, इनोसंट पंचविशीचा तरुण समजत होतो, फोटो पाहून तू ब्राच प्रौढ असल्याचं पाहून शॉक लागला.
कृहघे रे भावा.
राजदिप भाय,
राजदिप भाय,
बस दिल जवॉ होना चाहिये
मी तुला तूझ्या पोस्टींवरुन
बिटीडब्ल्यू.
मी तुला तूझ्या पोस्टींवरुन कोवळा, राजबिंडा, इनोसंट पंचविशीचा तरुण समजत होतो,....
टीवाईएस्सेम फॉर कॉम्प्लिमेंट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानवमामा तुम्ही तो ऑर्कुटवाला
मानवमामा तुम्ही तो ऑर्कुटवाला धूम्रपानाचा धागा काढा ना.. मागेही म्हणालेलो. नाहीयेत का त्या पोस्ट आता?>>
)
आज जुन्या लॅपटॉपवर शोधले, नाही सापडल्या पोस्ट्स.
गेली दोनेक वर्षे मला लिखाणाचा आणि वाचनापण भारीच आळस चढलाय. (ही सुद्धा गेल्या दशकातील वैयक्तीक उल्लेखनीय घटना म्हणावी लागेल
गूढ शब्दकोडी धागासुद्धा काढायचा होता पण लिहायला घेतलं की कंटाळा येतो.
कधी मूड लागला की काढेन धागे.
ओके
ओके
Pages