माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण राधिका माँ आणि सौमित्र जोडी छान दिसते...निदान वय तरी साजेसे वाटते.....आमच्या घरी कायम झी मराठी चालू असते संध्याकाळी...मी अजिबात फिरकत नाही टीव्ही समोर त्यावेळेला....तिळपापड होतो नुसता....

आणि सौमित्रचे वडिल विक्षिप्त दाखवून अजून जरा मसाला लावायचा प्रयत्न केला आहे.>>>>> मग ! सगळचं गोड गोड कसे चालेल ? थोडेसे आंबटगोड हवेच ना ! Biggrin Light 1

आंगो, जरा गंमत केली रागवु नको.

राधिका माँ >>>>>>>>>>> Rofl पण खरच राधिका आणि सौमित्रची जोडी शोभते.

झाल बाई ह्यान्च एकदाच लग्न. आता तरी सम्पवा म्हणावी सिरियल एकदाची. आता दाखवण्यासारख काय राहिल?

आणि सौमित्रचे वडिल विक्षिप्त दाखवून अजून जरा मसाला लावायचा प्रयत्न केला आहे >>>>>>>>> विक्षिप्त नाही म्हणता येणार पण वर्कोहोलिक कॅरेक्टर आहे. पण गौतम जोगळेकर सौमित्रचे वडिल आणि वसुन्धराचा नवरा नाही शोभत. लहान वाटतो तिच्यापेक्षा. सौमित्रचा मोठा भाऊ वाटतो. कोणीतरी अरुण नलावडेटाईप घ्यायला हवा होता.

अथर्व कुठे आहे........? >>>>>>>> आहे सिरियलमध्ये. झी २४ तासवर राधिकाच्या लग्नाच रिपोर्टिन्ग दाखवल होत स्पॉटलाईट मध्ये. त्यातही होता.

पण ती लाल बनारसी पाहुन सौमित्र जिभा चाटत होता. >>>>>>>> नैतर काय. ती साडी मला राधिकाला दयायची आहे हे सरळ सान्गायच ना त्याने बायकान्ना. त्यात लाजायच का? उगाच त्यान्ना मस्का लावायची गरज नव्हती.

फिके कपडे>>>>>>>> मला आवडले तिचे लाईट शेडसचे कपडे. कुठल्या तरी भागात तिने सफेद कुर्ता- पायजमा घातला होता. छान दिसत होती त्यात. हा मेकओवर मानवला तिला. ह्याआधीचे तिचे मेकओवर्स भयाण होते.

पण खरच राधिका आणि सौमित्रची जोडी शोभते.>> >>> का नै शोभणार. दोघांना कोलगेटन घासलेली बतीशी दाखवायला आवडत. जेव्हा बघाव तेवा राधाक्का रडत तरी असते नाहीतर दात दाखवत हसत असते.

ते एकदम वर गेलेत!!! म्हणजे काय १% का ५% का किती?! मग परत शयना म्हणते मी पार्टनर आहे तुम्ही मला असे हाकलून देउ शकत नाही!!! >>> अमा Lol इथेही चालू आहे कॉर्पोरेट कल्चर असे दिसते.

राधिका सौमित्र यांचा हनिमून दाखवणार आहेत. सुहागरात्री गुरु राडा करणार. मग राधिका नर्व्हस होणार. परत गुरुला धडा शिकवणार. हनिमून सफल होण्यासाठी अजून एखादं वर्ष लागेल. पहायची तयारी ठेवा.

का नै शोभणार. दोघांना कोलगेटन घासलेली बतीशी दाखवायला आवडत. जेव्हा बघाव तेवा राधाक्का रडत तरी असते नाहीतर दात दाखवत हसत असते..>>>>> Biggrin

का नै शोभणार. दोघांना कोलगेटन घासलेली बतीशी दाखवायला आवडत. जेव्हा बघाव तेवा राधाक्का रडत तरी असते नाहीतर दात दाखवत हसत असते. >>>>>>>> Rofl

मध्ये एकदा पाहिले तर सौमित्रच्या वडिलांनी राधा माँ आणि सौमित्र यांची युरोप टूरची तिकीटे काढली होती

हि मालिका अखंड चालू राहणार आहे. ...
घटकस्फोट होण्यासाठी, मग दुसरीकडे जुळण्यासाठी, दुसरे लग्न होण्यासाठी, आता दुसरे मूल होण्यासाठी, मग ते अथर्वने स्विकारण्यासाठी, मग पुढे गुरुची हालत, त्याची मुले दाखवतील त्यांच्यासाठी प्रत्येकी १-२ वर्षे सहज खपतील.

सुहागरात होण्याच्या आधी राधिकाने सौमित्रला मनापासून स्वीकारावे लागेल अशी सौमित्रची अट आहे. आता अशा प्रसंगांचा रतीब चालू आहे जिथे सौमित्र राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तिचा अपमान करत नाही, तिच्या मुलासाठी अंगाई गातो, गुलमोहर सोसायटीतल्या सगळ्या म्हातार्यांना दत्तक घेतो. एक दोन वर्षानंतर राधिकाला सौमित्रबद्दल नवरा म्हणून प्रेम वाटेल आणि सुहागरात होईल. कदाचित मूलही होईल आणि मालिका अखंड चालू राहील. शनाया आणि तिची आई या अतिशय किळसवाण्या बायका आहेत.

Expressions fame बकुळा शेण्याच म्हणते तिला.आणि राधिका शन्या म्हणते.
रच्याकने ते वृद्ध मेहता म्हणजे हेमबा मधले आनंद सर आहेत ना अनुचे बॉस

शनाया आणि तिची आई या अतिशय किळसवाण्या बायका आहेत.>>>>> अगदी.
अतिशय चीप.
इथे मला माझ्या आजीचा एक डायलॉग / म्हण आठवते. अगदी वाईट भाषेत आहे. पण अशा कॅरेक्टरना चपखल.
त्या नट्यांना तरी आपण काय भुमिका करतोय ते कळत नाही का?

ते सर्व कॅरेक्ट्र्स राधिकाचे कौतूक करण्यात अर्धा वेळ घालवतात ते फार इरि टेटि ग आहे.

सौमित्र इथे टाइम पास करत लाइन मारत होता तेव्हा त्याचे बाबा एकट्याने बिझनेस सांभाळत होते तो पण एक अर्धव ट मॅन चाइल्डच आहे. हा प्रयोग फसलयवर राधिकाला पण गुरूच बरा होता हा साक्षात्कार होईल

अमा .. Happy
सौमित्र व त्याचे बाबा एकाच बिझीनेस मधे आहेत होय? तरीच...!!! याला एव्हढा फावला वेळ मिळतोय!
सर्व कॅरेक्टर्स - नाना, नानी, आता जास्ती करुन महाजनी काका- काकू, आई -बाबा, सौमित्र ची आई, रघू भावजी , आनंद भावजी- जेनी....सगळे राधिकाच्या स्तुतीची संधी सोडत नाहीत ! रादर त्यांना डायलॉग्जच तसे लिहून दिले आहेत..... जसे आधी गणेश वंदना असते तसे!! Angry

पकाउ ताई आणि दाजी युरोप टूरला जाणार नाहीयेत.
बरं झालं नायतर केसरी/ वीणा च्या मेहरबानीने नवपरीणीत जुन्या जोडप्याचे युरोपात बागडतानाचे,
ताईचे ऑड कपडे (तिच्यासाठी) घालुन लाजण्या-मुरकण्याचे २-३ एपिसोड बघावे लागले असते.
ताईंनी समस्त गुलमोहर मधल्या म्हातार्यांना दत्तक घेतले आहे.
राधाचं मंदिर का नाही बांधत हे लोक Angry

ते वृद्ध (?!) Uhoh मेहता म्हणजे मला रविंद्र महाजनी वाटले! ! Biggrin
ही शनाया त्या मेहता शी का लग्न करतेय पण? काहीही!
केड्याची मती कुंठली आहे!

ही शनाया त्या मेहता शी का लग्न करतेय पण? काहीही!>> लग्न नाही नुसतेच आमिष दाखवून लुबाडा यचे असे त्यांचा प्लॅन असतो. फंडा म्हणजे पुण्यातल्या बायका म्हणू न ह्या दोघी दाखवल्या आहेत हे आजिबातच बरोबर नाही. पुनेरी आई मुलीला स्वतंत्र जगायला शि कवेल. अँड पुण्याच्या बायकामुली इतक्या मूर्ख दाखवणेच पटत नाही. खरे तर गुरूला फ्लॅट राहायला देउन आई बाबा आता नागपुरला जाउ शकतात ना!! पण नाही.

तो मेहता शनायाच्या आईलाच शनाया समजतोय. Lol तिच्या प्रेमात पडलाय.

सर्व कॅरेक्टर्स - नाना, नानी, आता जास्ती करुन महाजनी काका- काकू, आई -बाबा, सौमित्र ची आई, रघू भावजी , आनंद भावजी- जेनी....सगळे राधिकाच्या स्तुतीची संधी सोडत नाहीत ! >>>>>> ते आहेच. पण राधिका जिथे जाते तिथे आभारप्रदर्शनाच भाषण करते ते तर जास्तच इरिटेटिन्ग आहे. " आज मी जी कुणी आहे हे त्यान्च्यामुळे आहे. हे सगळे पाठीशी होते/आहेत म्हणून मी आज इथे आहे. यव नि त्यव."

सौमित्रच्या घरीही ही ऑफिसपेक्षा किचनमध्येच असते ( तिथे मोलकरीण असून सुद्दा). सौमित्रचे बिजनेस क्लायण्टस आले तर तिथेसुद्दा ऑलराऊण्डरपणा दाखवण्यासाठी पुढे पुढे करते.

राधिकाचा तो all-rounder पणा डोक्यात जातो. अशा नायिका दाखवून झी मराठी ला काय सिद्ध करायचे आहे की जी उत्तम स्वयंपाक करते(आठवा:आसावरी)आणि सहनशील, सोशिक, सासू सासर्यांचे निगुतीने करणारी तीच नायिका. आणि ही राधिका,तिच्या कंपनी ची प्रत्येक meeting successful होते. बघावं तेव्हा तो स्टाफ राधिकाचे personal problems सोडविण्यासाठी चर्चा करत असतो किंवा सेलिब्रेशन करत असतो. कामं कुठे करतात ते लोक

भयाण मस्त प्रतिसाद आहेत :स्मित : आणि जेनी ख्रिश्चन असल्याने बाकीच्या स्टाफच्या मराठी डायलॉग्जचं विंग्रजीकरण करताना दाखवतात.

सौमित्रच्या घरी आलेल्या बायका राधिकाला मेड समजतात, वास्तविक त्याही राधिकासारख्या घरगुतीच दिसत होत्या, थोडंफार इकडे तिकडे पण राधिकाला स्वतःला महान म्हणवून घेण्याची एक संधी सोडायची नसते. घरात स्वयंपाकाला बाई असताना राधिका सांबारवाडी तळत असते आणि कोणी मेड म्हणालं की चेहरा कसनुसा करते, की परत तिची स्तुती करा. इकडे सौमित्र म्हणतो ती मेड नाही हेड आहे या घरची आणि तिकडे स्वयंपाकाची बाई म्हणते, मालकीण असावी तर अशी. राधिकाचा उद्देश सुफळ संपूर्ण. सौमित्र वड्या हादडतो आणि स्वयंपाकीण आराम करते.
सौमित्रचं कुटुंब अनेक वर्ष अमेरिकेत होतं पण घर तर अगदी वापरातलं आहे आणि मोलकरीण पण जुनी आहे. फुकट्या सौमित्र राधिकाच्या घरी रहात होता किती दिवस ते का मग.
अमेरिकेत राहणारा मुलगा वाढदिवसाच्या दिवशी पार्टी करतो आणि वडिलांशी बोलायला वेळ नसतो हे किती अलका कुबल सिनेमा धर्तीवर आहे. माझं सासर माझं गुलमोहर असं काहीतरी नाव असायला पाहिजे होतं मालिकेचं.

माझं सासर
माझं गुलमोहर>> एपिक कमेंट Lol

Pages