ट्वेंटी-२० वर्षाचे संकल्प
कुठे दिसला नाही हा धागा तर मीच काढला.
साधेसोपेसेच संकल्प आहेत. ईथे मांडले तर फॉलोअप घ्यायला बरे पडेल.
१) झोपायचा टाईम रात्री तीनचा झालाय. त्याला बारापर्यंत खेचायचेय.
२) ऑफिस नऊचे असते. मी दिवसा आड न चुकता ११ ला जातो. त्याला रेग्युलर करायचेय.
३) ९० टक्के बाहेर खातो. १० टक्के घरचे खातो. हे प्रमाण शक्य तितके उलटे करायचेय.
४) व्यायाम असा कधी आयुष्यात केला नव्हता. पण आता क्रिकेट किंवा ईतर खेळही खेळणे होत नाही. कधी नव्हे ते आयुष्यात थोडे पोट पुढे येऊ लागलेय. तर आता काहीतरी सुर्यनम्स्कार, जोरबैठका गेला बाजार जॉगिंग वगैरे सिरीअसली चालू करायला हवे. व्यायामाला वय आणि मुहुर्त नसतो. तर उगाच अभी तो मै जवान हू, पस्तिशी आल्यावर बघू म्हणण्यात अर्थ नाही.
५) २०१८ साली ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रणवीर सिंगच्या गाण्यावर नाचलेलो. २०१९ साली रणबीर कपूरच्या गाण्यावर नाचलो. आता आईला ऋत्विक रोशनचा नाच बघायची ईच्छा आहे. पण यंदा नाचाची प्रॅक्टीस करताना जाणवले की त्यासाठी फिटनेस वाढवणे गरजेचे. तर क्रमांक ४ या दृष्टीनेही सिरीअसली घेणार आणि ऋत्विकचा नाच नाचणार.
६) गेल्या वर्षात माबोपासून लांबच राहिलो. काही ज्वलंत धागे काढले अध्येमध्ये. पण लेख लिखाण थांबलेच. येत्या वर्षात या छंदासाठीही वेळ काढायचे ठरवले आहे. त्यासाठी क्रमांक १-२ मध्ये म्हटल्याप्रमाणे शेड्यूल रेग्युलर करायचेय.
७) हल्ली बरेच लोकांत ट्रेकिंगचे फॅड आलेय. मला एक तर वेळ मिळत नाही वा सुटेबल कंपनी कोणी नाही किंवा मी मला जमेल का विचार करून घाबरतो. यंदाच्या वर्षात मात्र हे फॅड करून बघायचे ठरवले आहे.
८) Cohn's disease म्हणून एक पोटाचा की आतड्याचा आजार आहे. त्यालाही खूप लाईटली घेतलेय गेली वर्ष दोन वर्षे. याचे शरीराकडून सिग्नलही मिळू लागलेत. औषधांचे डोस सातत्याने मिस करणे, रेग्युलर फॉलोअपला जाणे टाळणे वगैरे सवयच झालीय. तर वर फिटनेसबाबत जे जागरूक होणार आहे ते या आजाराचेही औषधपाणी नियमित करणार आहे.
९) सायकल चालवायला शिकायचेय. लोकं फिटनेससाठी सायकल चालवतात. मला दुर्दैवाने ती चालवताच येत नाही. शिकल्यावर ऑफिसला सायकलने जायचाही विचार आहे. नवीन घरापासून फार त्रास होऊ नये तसे जायला.
१०) गेल्या सहासात वर्षात मोजून १४-१५ चित्रपट पाहिले असतील. यंदाच्या एका वर्षात किमान १४-१५ चित्रपट बघायचा संकल्प आहे. थिएटर, टीव्ही, मोबाईल जिथे शक्य तिथे.
११) आईशी संवाद वाढवायचा आहे. तसे मी एकुलता एक आणि नो सख्खे भाऊबहीण असल्याने आईच लहानपणापासूनची सख्खी मैत्रीण. त्यात आमची केमिस्ट्रीही अफाट जुळते. मी त म्हटले की आईला ताकभात लगेच कळते. शाळाकॉलेजच्या सगळ्या गप्पा मी आईला सांगायचो तर आईच्या कहाण्या शाळाकॉलेजमध्ये. त्यामुळे मित्रांमध्ये माझे आईप्रेम आणि मम्माज बॉय असणे पहिल्यापासून फेमस. पण गेले काही काळ हे गृहीत धरल्यासारखे वाटतेय. ते टाळायचे आहे. आणि हे ठरवून नाही तर सहज घडवायचे आहे.
तुर्तास ईतकेच.....
काहीतरी भरीव आठवल्यास भर टाकतो. उगाच १ जानेवारीलाच जास्त लोड घेण्यात अर्थ नाही
सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा !
सर्वांचे संकल्प वाचण्यास उत्सुक
सस्मित, माझाही 2020 मध्ये
सस्मित, माझाही 2020 मध्ये एकही नवीन कपडा न घेण्याचा संकल्प आहे. आपली हरकत नसल्यास दर महिनाअखेरीला एकमेकींना अपडेट करायचे का? म्हणजे आपोआप morale high राहील?
>>>>गिफ्ट देण्याचं अॅडिक्शन
>>>>गिफ्ट देण्याचं अॅडिक्शन आहे असं म्हणालात तरी चालेल.>>>> रीया सेम हियर. पण ते चांगले व्यसन आहे. त्याला मुरड घालू नका.
पियू आणि सस्मित, त्यापेक्षा
पियू आणि सस्मित, त्यापेक्षा तुम्ही वजन कमी करायचे आहे या धर्तीवर कपडे कमी करायचे आहेत असा स्वतंत्र धागा काढा. बरेच जण ईथे यात उत्सुक दिसत आहेत. फक्त कपडे उद्योगात जागतिक मंदी आली तर धागाकर्तीला त्याची जव्वाबदारी घ्यावी लागेल !
>>>>फक्त कपडे उद्योगात जागतिक
>>>>फक्त कपडे उद्योगात जागतिक मंदी आली तर धागाकर्तीला त्याची जव्वाबदारी घ्यावी लागेल !>>> हाहाहा बिचार्या दुकानदारांच्या, टेक्स्टाइल बिझनेस वाल्यांच्या पोटावर पाय
ऑनलाईन शॉपिंग कमी करेन. जे
ऑनलाईन शॉपिंग कमी करेन. आधीचं मेकपचं सामान संपेपर्यंत नवीन विकत घेणार नाही. जे ढीगभर कपडे घेऊन ठेवलेत, त्यात फिट होण्यासाठी वजन कमी करेन, त्यासाठी डाएट आणि व्यायाम दोन्हीवर अंकुश ठेवेन. ऑफिस मधल्या लोकांच्या कामचोरीचा आणि बॉसच्या विक्षिप्तपणाचा उर्फ हलकटपणाचा त्रास करून घेणार नाही. माबो आणि फेबुवर कमीत कमी वेळ घालवणार, रात्री मोबाईल सर्फिंग बंद करून लवकर झोपून, लवकर उठणार.
नवीन वर्षात नवीन नोकरी शोधणार आणि त्यासाठी जो जरुरी अभ्यास आहे तो करणार.
हे एवढं झालं तरी खूप आहे माझ्यासाठी.
सर्वांना शुभेच्छा.
सर्वांना शुभेच्छा.
काही काळानंतर आपण कुठे पोहचलो ते नक्की चेक करा.
चिडचिड कमी करणार.
चिडचिड कमी करणार.
त्यासाठी रोज मेडिटेशन करणार आणि मनावर ताबा ठेवणार.
पुस्तकं वाचण्यासाठी जास्त वेळ
पुस्तकं वाचण्यासाठी जास्त वेळ द्यायचा ठरवलं आहे.
त्यामुळे मराठी आंतरजाल वावर कमी करणार.
१ तारखेपासून मिपा आणि ऐसीवर जाणे बंद केले आहे. आता फक्त माबो.
सस्मित, माझाही 2020 मध्ये
सस्मित, माझाही 2020 मध्ये एकही नवीन कपडा न घेण्याचा संकल्प आहे. आपली हरकत नसल्यास दर महिनाअखेरीला एकमेकींना अपडेट करायचे का? म्हणजे आपोआप morale high राहील?>>>> हो चालेल पियु. कसं करणार अपडेट? इथेच लिहायचं का? ऋण्मेषला चालेल ना?
ह्यावर्षी नवीन २० पुस्तके
ह्यावर्षी नवीन २० पुस्तके वाचण्याचा संकल्प आहे आणि योगासने शिकण्याचा (आणि करण्याचा पण ) विचार आहे. संकल्प करणे चांगलेच आहे पण काही वेळानंतर संकल्पाचे पालन करणे कठीण होते . त्यावर मला एक चांगले पुस्तक वाचण्यात आले. त्याचा सारांश मी खालील लेखात दिलेला आहे. रोज दोन पाने वाचायला घ्यायची म्हणजे आपसूकच ८-१० पाने वाचल्या जातात. रोज २ मिनिटे तरी व्यायाम करावा म्हणजे आपोआपच १० मिनिटे व्यायाम होईलच अशा छोट्या सवयींवर हे पुस्तक आधारलेले आहे.
नवीन वर्षाचे स्वागत आणि Pareto चा ८०-२० नियम
https://akshargaane.blogspot.com/2020/01/pareto.html
@सस्मित & पियु
@सस्मित & पियु
गुगल करून पहिल्यास मिनिमलिस्ट / कॅप्सूल वॉर्डरोब म्हणून एक संकल्पना आहे . ती फ़ॉलो केल्यास बऱ्याच प्रमाणात मदत होऊ शकते . मी हा कॉन्सेप्ट गेली २ वर्ष फॉलो करत आहे. माझ्या कडे एका वेळेला ३ च लेगगिंग्स आणि दुपट्टा सेट असतात (त्या मध्ये एक ब्लॅक सेट असतेच) आणि प्रत्येक pair वर match होणारे २- २ टॉप्स.
त्याशिवाय अधे मध्ये वापरायला २जीन्स (इथे एक ब्लॅक किंवा ग्रे असतेच) आणि ६-७ टॉप्स interchangeable बस !! त्यामुले कपाट उघडताय आणि कपडे पडतायत असे कधीच होत नाही आणि बाहेर जाताना हे घालू कि ते घालू असे प्रश्न हि पडत नाहीत
मिनिमलिस्ट / कॅप्सूल वॉर्डरोब
मिनिमलिस्ट / कॅप्सूल वॉर्डरोब म्हणून एक संकल्पना>>> कल्पना आहे. तरी बघते . धन्यवाद.
कपडे पडतायत असे कधीच होत नाही >>>> कपडे पडत नाहीयेत कपाटातुन. कारण ते नीट लावलेत
आणि बाहेर जाताना हे घालू कि ते घालू असे प्रश्न हि पडत नाहीत>>>>>> असंच काही होत नाहीये माझं. पण रोज एक ड्रेस घातला रीपीट न करता तरी दोन महिने जातील. हे जास्त नाहीये पण मलाच जास्त वाटु लागलंय. न घालण्याचे कपडे बांधुन ठेवलेत. ते वेगळे. आपण कपडे घेतो थोडे वापरतो आणि कुणालातरी देउन टाकतो. स्वतः वापरु शकत असलो, चांगले कपडे असले तरी किती वापरायचे बस आता असं वाटुन बाजुला ठेवतो. हा कुठेतरी वायफळ खर्च वाटु लागलाय. आणि हे आता डोक्यात ठाण मांडुन बसलंय.
<<<<<<<<<३ च लेगगिंग्स आणि दुपट्टा सेट असतात (त्या मध्ये एक ब्लॅक सेट असतेच) आणि प्रत्येक pair वर match होणारे २- २ टॉप्स.
त्याशिवाय अधे मध्ये वापरायला २जीन्स (इथे एक ब्लॅक किंवा ग्रे असतेच) आणि ६-७ टॉप्स interchangeable बस !! >>>> हे जमायला पाहिजे मला
इथेच लिहायचं का? ऋण्मेषला
इथेच लिहायचं का? ऋण्मेषला चालेल ना?
>>>
चांगुलपणा तो ही विचारून विचारून... मी तर म्हणतो सर्वांनीच अपडेटा.. होऊ दे हजार पोस्ट
आमच्या घरी कोणी आले की त्याला आपल्याच हक्काच्या घरी आल्यासारखे वाटावे असे आदारातिथ्य करायचा आमचा प्रयत्न असतो... माझ्या धाग्याबाबतही मी असाच दृष्टिकोन ठेवतो
(No subject)
कपडे पडत नाहीयेत कपाटातुन.
कपडे पडत नाहीयेत कपाटातुन. कारण ते नीट लावलेत >> @ सस्मित ... कृपया गैर समज करून घेऊ नका ... स्वानुभव आहे ४ वर्ष पूर्वीचा
एक ड्रेस घातला रीपीट न करता तरी दोन महिने जातील. >>>>> माझे साधारण ३-४ आठवडे जातात . मी एक लेगिंग्स दुपट्टा + टॉप ची जोडी किमान ४ वेळा घालते मगच वॉशिंग मशीन ला टाकते . अर्थात उन्हाळ्या पावसाळ्यात प्रमाण कमी जास्त होते
या लिंक मधून पण काही प्रमाणात motivation मिळू शकते
http://raisemehigher.com/2018/05/indian-capsule-wardrobe-how-to-create-i...
@ अक्षरगाणे >> रोज २ मिनिटे
@ अक्षरगाणे >> रोज २ मिनिटे तरी व्यायाम करावा म्हणजे आपोआपच १० मिनिटे व्यायाम होईलच अशा छोट्या सवयींवर हे पुस्तक आधारलेले आहे. .>>>> असं ऐकलं आहे कि कोणतीही सवय फॉर्म व्हायला २७ दिवस लागतात . त्यातीलही पहिले ५ दिवस फार कठीण असतात .
मी गेल्या वर्षी चहा आणि पर्यायाने साखर सोडण्याचा संकल्प केला होता . मी सकाळी १ कप आणि संध्याकाळी एक असा चहा पित होते पहिला आठवडा खरोखर खूप कठीण गेला होता . .. पण हळूहळू सवय झाली आणि जवळजवळ २ महिने मी हा संकल्प चालू ठेवला .. पण जून महिन्यात पाऊस आला आणि माझा संकल्प वाहून गेला
गैरसमज नाही काहीच
गैरसमज नाही काहीच
लिंकवरची साईट काही खास नाही. आवडली नाही.
मला अगदीच कॅप्सुल वॉर्ड्रोब नाही करायचाय. आहे तो ङिगारा वापरचाय फक्त नवीन काही घ्यायचं नाहीये.
एक लेगिंग्स दुपट्टा + टॉप ची जोडी किमान ४ वेळा घालते मगच वॉशिंग मशीन ला टाकते>>>>>हे नीट कळलं नाहीये. एक सेट एकदा घालुन न धुता हॅंगरला लावून पुन्हा घालता. आणखी ३ वेळा?
तुम्ही जॉब वैगेरे करता का? प्रवास किती कसा आहे?
मी एकदा घातलेले कपडे अजुन एकदा रीपीट करु शकते पण ४ वेळा नाहीच. कपड्यांची इस्त्री, फ्रेशनेस आणी हायजिन मुळे.
>>>>>>>>मी एक लेगिंग्स
>>>>>>>>मी एक लेगिंग्स दुपट्टा + टॉप ची जोडी किमान ४ वेळा घालते मगच वॉशिंग मशीन ला टाकते .>>>>> !!
एकही नवीन कपडा न घेण्याचा
एकही नवीन कपडा न घेण्याचा संकल्प बायांना तसा अवघडच पण जमेल. शुभेच्छा सस्मित.
मी कधीच संकल्प करत नाही कारण जमत नाही पाळायला. तरी काही सुचले तर लिहीनच
अॅमी, माबो. बंद करायचा संकल्प करु नका म्हणजे झाले.
ऋन्मेष, पोटाचा नक्की काय विकार आहे ते शोधले नाही पण ९०% बाहेर खाणे व ३-३ पर्यंत न झोपणे व कमी व्यायाम ही कारणे तशीही डेंजर वाटताहेत.
पण ९०% बाहेर खाणे व ३-३
पण ९०% बाहेर खाणे व ३-३ पर्यंत न झोपणे व कमी व्यायाम ही कारणे तशीही डेंजर वाटताहेत.
>>>>
हो कल्पना आहे. पोटाच्या किंबहुना आतड्याच्या त्या विकाराला पथ्य नाहीत. पण या सवयी तश्याही घातक आहेत. म्हणूनच बदलायचा प्रयत्न आहे. वर्ष उजाडलेय. अजून यश नाही. पण एकदा घडी लागली तर मिळेल. तुर्तास एक वाजत आलाय. झोपतो. शुभरात्री..... शब्बाखैर खुदाहाफिज !
उद्यापासुन रात्री १० च्या
उद्यापासुन रात्री १० च्या नंतर ऋमेषचा प्रतिसाद दिसला तर त्याला इथुन घालवुया , जोवर जात नाही तोवर...
केस रंगवणार नाहीये. आत्ता तरी
केस रंगवणार नाहीये. आत्ता तरी सॉल्ट & पेपर दिसतायत. मला तसे आवडतात. बघू आगे आगे होता है क्या होपफुली पांढरे होतानाही, आत्मविश्वास डगमगणार नाही.
उद्यापासुन रात्री १० च्या
उद्यापासुन रात्री १० च्या नंतर ऋमेषचा प्रतिसाद दिसला तर त्याला इथुन घालवुया Happy
>>>
१० खूप लवकर होतेय...
आता आमच्याकडे पहाटे चारचा दंगा सुरू झालाय...
. मी एक लेगिंग्स दुपट्टा +
. मी एक लेगिंग्स दुपट्टा + टॉप ची जोडी किमान ४ वेळा घालते मगच वॉशिंग मशीन ला टाकते . अर्थात उन्हाळ्या पावसाळ्यात प्रमाण कमी जास्त होते ....
एक सेट एकदा घालुन न धुता हॅंगरला लावून पुन्हा घालता. आणखी ३ वेळा? >> हो .. कधी कधी अजुन २ वेळा
तुम्ही जॉब वैगेरे करता का? प्रवास किती कसा आहे? >> मला अशा प्रतिक्रिया अपेक्षी होत्याच मी वेब / UX डिझायनर कम एच टि एम एल कोडर आहे . ऑफिस स्कुटी ने घरापासून हार्डली १० मिनिटा वर आहे
ऑफिस स्कुटी ने घरापासून
ऑफिस स्कुटी ने घरापासून हार्डली १० मिनिटा वर आहे>>>>>> ओके. म्हणूनच जमतंय.
मला घरापासुन स्टेशन २० मिनिट चालत. ट्रेन प्रवास २०-२५ मिनिट. तिथुन शेअर टॅक्सी ने ऑफिस १० मिनिट
संध्याकाळी ऑफिस ते स्टेशन २० मिनिट. ट्रेन प्रवास २०-२५ मिनिट. पुढे घरी कधी चालत कधी बाईक.>>> हुश्श
>> हो ना !!
ओके. म्हणूनच जमतंय >> हो ना !!
@ ऋन्मेष ४ क्रमांकाच्या संकल्पा मधील सूर्यनमस्कार आणि जोडीने प्राणायाम सूत्रबध्दते नुसार केलात तरीही बराच फरक पडेल . अगदी "सब दर्द कि एक दवा " असं काही नाहीये ... परंतु याने बराच फायदा होतो असं दिसलं आहे
नवीन वर्षाच्या संकल्पाना
नवीन वर्षाच्या संकल्पाना अनुसरून पहिला महिना संपता संपता चारपाच पिक्चर पाहिले.
१) तान्हाजी थिएटरात पाहिला - लहगे हाथ परीक्षणही लिहिले.
२) छिचोरे लिस्टमध्ये टॉपला होता. पाहून संकल्पाचे सार्थक झाले.
३) बधाई हो - आयुष्यमान खुराना - हा सुद्धा फार आवडला
४) सिंबा - बॉलीवूड मसालापट पाहिला. बरा वाटला. वेळ वाया गेला असे नाही वाटले.
५) ऊरी - जेवढे ऐकलेले तेवढा भारी न वाटल्याने अर्ध्यावर सोडला.
जानेवारीत व्यायामाकडे लक्ष
जानेवारीत व्यायामाकडे लक्ष नीट देता आल नाही. पण कासवाच्या गतीने चालयला सुरवात केलीये..
रात्री लवकर जेवुन लवकर झोपणे हे मात्र महिनाभरात एकदाही जमलेल नाही.
पहिल्याच महीन्यात दुर्लक्ष झाल पण अजुन ११ महीने बाकी आहेत. मेबी थोडा वेळ लागेल पण नक्की जमेल मला.
एकही नवीन कपडा न घेण्याचा
एकही नवीन कपडा न घेण्याचा संकल्प बायांना तसा अवघडच >>>
मुळात असा संकल्प करण्याची वेळ का यावी?
आणि या संकल्पाने भविष्यात खरंच फायदा होणार की गेल्यावर्षी एकही कपडा नाही घेतला म्हणून दुप्पट खरेदी होणार?
त्यापेक्षा झाले ते झाले आता गरज + हौस दोन्ही लक्षात घेऊन, परत असला संकल्प करण्याची गरज पडणार नाही एवढे कपडे दरवर्षी खरेदी करेन असा संकल्प का करत नाही?
जगात फक्त दोन प्रकारचे लोकं
जगात फक्त दोन प्रकारचे लोकं असतात..
एक संकल्प तोडणारे
दुसरे संकल्पच न करणारे..
व्यायामाचे अजून सुरुवातच नाही.. जीवनशैली जैसे थे आहे
Pages