माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 January, 2020 - 18:52

सर्वसाधारणपणे लहान मुले रडत रडत जन्माला येतात, मी नाचत नाचत आलो...
अशी काहीतरी फुशारकी मी मारेन असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे. किंबहुना नाचाचा "न" माझ्या अंगात कुठल्या वयात निपजला हा एक संशोधनाचा विषय ठरेल.

ज्या ज्युनिअर सिनिअर केजीच्या बालवाडी वयात आपण नाचाच्या नावावर काहीssही उड्या मारल्या तरी घरच्यांना काय आपला बाबू नाचतो म्हणून कौतुकच वाटते त्या वयात देखील मी हातपाय फारसे हलवल्याचे आठवत नाही. प्राथमिक शाळेतही शारीरीक शिक्षणाच्या नावाखाली आगे मूड, पीछे मूड म्हणत होणार्‍या कसरती आणि मूड मूड के ना देख, मूड मूड के वर होणारा नाच हे माझ्यासाठी एकसमानच होते.

पौगंडावस्थेत तर विचारू नका, माझे भलतेच गैरसमज होते. म्हणजे मुले नाचत असताना मुली त्यांना निरखून बघतात आणि आपण घाणेरडे नाचलो तर त्या आपल्यावर अन-ईंप्रेसड होतात अश्या अफवांचा मी शिकार होतो. आणि तुम्हाला तर अनुभवाने माहीत असेलच, की पौगंडावस्थेत मुली पटवण्याच्या पलीकडे आयुष्यात दुसरे काही ध्येय नसते. त्यामुळे नाचाला मी नेहमी ‘नाs’च म्हटले.

पुढे कधीतरी साक्षात्कार झाला की मुलींना नाचणारी नाही तर त्यांच्या तालावर नाचणारी मुले आवडतात आणि हळूहळू मी चारचौघांसारखे नाचायला सुरुवात केली. तरीही आपण नाचताना लोकं बघतात हा संकोच मनात असायचाच. त्यामुळे कधी खुलून असा नाच बाहेर आलाच नाही.

कालांतराने ही अवस्थाही गेली आणि मी विचार करू लागलो की आपल्याला काही सोनेनाणे चिकटलेले नाही, ना आपण मदनाचे पुतळे आहोत... (हो, अ‍ॅक्चुअली त्या वयात माझा हा देखील एक गैरसमज होता की आपण अगदीच सामान्य रुपाचे आहोत.) असो.., तर अश्यात आपला नाचही काही भारी नाही, तर आपल्याला कश्याला कोण नाचताना बघतेय. बघणार्‍यांसाठी आजूबाजूला बरेच काही छान छान उपलब्ध आहे. ते आपले डोळे तिथे शेकतील, आपण आपले एक कोपरा पकडून नाचावे हे उत्तम.

आणि बघता बघता चिमित्कार झाला. एवढे दिवस जखडून ठेवलेले अंग अचानक मोकळे झाले. ना कोणाकडे बघून नाचायचो, ना कोणाला दाखवायला नाचायचो, पण माझी स्वत:ची अशी नाचाची शैली लोकांना आवडू लागली. हा काहीतरी भन्नाट नाचतो असे कोणी म्हटले की ते कौतुकाने असायचे की माझी मजा घेण्यासाठी हे आधी कळून यायचे नाही. पण सगळेच का मजा घेतील? मग मला जाणवू लागले की आपण रुढ अर्थाने नर्तक वगैरे नसलो तरी एक मनोरंजक प्रकार नक्की आहोत.

हळूहळू नवरात्रीचे नऊ दिवस माझा नाच बघायला बिल्डींगच्या गॅलर्‍या भरू लागल्या. त्यांच्या वाढत्या अपेक्षा पुर्ण करायला मी उत्स्फुर्तपणे वेगवेगळ्या शैलीत नाचू लागलो. गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला तर ईतके झिंगल्यासारखे अतरंगी नाच नाचायचो की दुसरे दिवशी केवळ माझ्यामुळे सारी पोरं दारू पिऊन नाचत होती म्हणून बदनाम व्हायची. कॉलेजमध्येही वार्षिक स्नेहसंमेलनात डीजे गाजवून सोडायचो. एकदा असेच माझा डान्स बघून मला कॉलेजच्या एका ग्रूपने त्यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करायची ऑफर दिली. आणि तिथेच माझ्या गाठीशी जो काही थोडाफार अहंकार जमा झाला होता तो गळून पडला.

जेव्हा मी त्या पोरांसोबत प्रॅक्टीसला गेलो तेव्हा जाणवले की ते वन-टू-थ्री-फोर फाईव्ह-सिक्स-सेव्हन-एट म्हणत सराईतपणे एका लयीत नाचत होती. माझे अंग मात्र भलतीकडेच अन भलत्याच स्पीडने हलत होते. ना मी त्यांच्या स्टेप्सला स्टेप्स मॅच करू शकत होतो ना त्यांच्या नाचाचा टेंपो पकडू शकत होतो. हे स्टेजवर स्टेप्स बसवून नाचणे आपल्या कपातला चहा नाही हे मी समजून चुकलो. त्यांचा मग फारसा वेळ न खाता मी तिथून कल्टी मारली.

पुढे कॉलेज संपले. जॉब लागला. साधारण वर्षवर्ष भर दोन ठिकाणी जॉब केले. दोन्ही ठिकाणी एकेकदा पार्टी पिकनिकच्या निमित्ताने नाचायचा योग आला, तिथे नेहमीसारखे नाव काढले. पुढे मग सध्या आहे त्या कंपनीत जॉब लागला. कॉलेजचा व्रात्यपणा मागे सोडून आता जरा सिन्सिअर बेअरींग पकडले होते ज्याला साजेशी माझी नृत्यशैली नसल्याने ऑफिसच्या पार्टीत नाचापासून दूरच राहणे पसंद करू लागलो. अगदी सर्वात मोठ्या साहेबांनी जरी माझा हात खेचून मला नाचायला आत ओढले तरी एक हात वर करून गर्दीत शिरायचो, आणि मला नाचता येत नाही म्हणत दुसर्‍या अंगाने बाहेर पडायचो. पुढे माझ्यावर सनी देओलचा शिक्का बसून लोकांनी हात धरून खेचायचेही बंद केले.
घरी मात्र येता जाता, सकाळी ऑफिसची तयारी करताना, घरी आल्यावर कपडे बदलताना, किचनमध्ये लुडबूड करताना, रात्री बेडवर झोपायला जाताना जिथे संधी मिळेल तिथे सारी कामे सवयीने नाचाच्या स्टेप्समध्येच व्हायची. त्यामुळे नाचाशी असलेली नाळ मात्र तुटली नव्हती.

अश्यातच गेले वर्षी ऑफिसने नवीन वर्षाच्या पार्टीत आपल्याच कर्मचार्‍यांचे नाचगाण्याचे कार्यक्रम करायचे ठरवले. आपण कधीकाळी कॉलेजला असताना स्टेजवर नाचायला कच खाल्लेली ही जुनी सल पुन्हा टोचू लागली. म्हटलं बस्स आता. ठरलं. नियतीने पुन्हा दिलेली ही संधी. हिची माती करायची नाही. आता नाचायचंच!

दिवस कमी होते, कामाचा लोड खूप होता, ग्रूप डान्स कसा बसवायचा, कोणी बसवायचा हा प्रश्नच होता. सोलो डान्सला परवानगी नव्हती. एकट्याने पाच मिनिटे स्टेजवर नाचायची हिंमतही नव्हती. अखेर जमवले. कसे जमवले, ते जमवताना काय धमाल केली, काय चुका केल्या, काय शिकलो, हे सारे अनुभव स्वतंत्र लेखाचा विषय होईल, त्यापेक्षा तुम्ही सरळ खालचा नाचच बघा.

मी नाचतो हाच तेव्हा ऑफिसमध्ये सर्वांसाठी धक्का होता. त्यामुळे या कार्यक्रमानंतर ऑफिसच्या कानाकोपरयात माझी किर्ती पसरली. ज्यांच्याशी कधी कामानिमित्त वा कुठल्याही निमित्ताने संबंध आला नव्हता त्यांच्यातही माझ्या नाचाने माझी ओळख बनवली.

....मग यावर्षी पुन्हा नाचायचे होते. गेल्यावेळचे चारातले दोन मित्र जॉब सोडून गेलेले. एक मी आणि माझी एक मैत्रीण. आम्ही दोघांनीच मग पुन्हा हे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. गेल्यावेळचे आव्हान वेगळे होते. स्टेज फिअर घालवायचा होता. यावेळी लोकांनी आधीपासूनच धरलेल्या अपेक्षांना जागायचे होते. त्यात यावेळीही प्रॅक्टीसला कमी वेळ म्हणजे फक्त शनिवार रविवारच मिळाले. पण तरीही लोकांच्या अपेक्षांना जागलो. येणारया प्रतिक्रियांवरून तसे वाटले Happy

हा नाचही खालच्याच विडिओत बघा. दोन्ही नाच एकत्रच जोडले आहेत. यूट्यूबवर अपलोड करायला प्रॉब्लेम येत होता म्हणून मायबोलीकरांच्या फर्माईशीनुसार दुसरया एका साईटवर खास माबोकरांसाठीच अपलोड केला आहे. बघितल्यावर प्रतिसाद द्यायला विसरू नका. मिक्स गाण्यांवर सोलो नाच आहेत पण प्रत्येकाच्या नाचात माझा थोडाफार सहभाग राहील आणि माझी नाचाची तसेच चमकोगिरीची भूक भागेल याची काळजी मी घेतली आहे Happy त्यामुळे सारी गाणी, सारे नाच दहा मिनिटे वेळ काढून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुर्णच बघा Happy

____________________________

माझे दोन्ही नाच एकत्र ईथे बघू शकता...

https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup

____________________________

जो देखे उसका भी भला, जो ना देखे उसका भी भला Happy
मनापासून धन्यवाद,
ऋन्मेष !

अरे हो, शीर्षक माझ्या नाचाचा प्रवास असे दिलेय जरी, पण खरे तर नाचाचा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे Happy

ओळख टीप -
१) पहिल्या वर्षीच्या डान्स शो मध्ये खलीबली गाण्यावर नाचलेला मी आहे. पुढेही प्रत्येक गाण्यात अध्येमध्ये काळ्या कपड्यात दिसत राहीन.
२) यंदाच्या वर्षी बचना ए हसीनो वर नाचलेला मी आहे. ढगाला लागली कळवर शेवटी पुन्हा एंट्री आहे.

________

कोणाला वरच्या लिंकला प्रॉब्लेम येत असल्यास खालील लिंकवर बघू शकता -

गेल्या वर्षीचा नाच - यूट्यूबवर

https://www.YouTube.com/watch?v=RrY3DLDFRwQ

यंदाचा नाच - फेसबूकवर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1337425706426139&id=10000476...

____________

यंदा मागच्या डिजिटल लाईटसमुळे विडिओत चेहरे दिसणे त्रासदायक झाले. पण प्रत्यक्षात लाईव्ह बघणारयांना ते छान दिसत होते. फोटो व्यव्स्थित आले. तरी नाचणारा मीच होतो हा संशय कोणाला पडलाच तर दूर करायला फोटो टाकायचा चान्स घेतो Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं सांगायचं तर ऋन्मेषच्या नाचत कोणालाही इंटरेस्ट नाही. ऋन्मेष या आयडीमागे कोण व्यक्ती आहे ते सगळ्यांना पाहायचं होतं.

Submitted by बोकलत on 6 January, 2020 - 12:04 १००%

हो...................... खरच

तुझा अभ्यास कमी पडतोय रीया, माझेच आहे ते.>>>>>>>> गपेए
दवणीय अंडे म्हणजे तू? काहीही. मै नही मानती. तो रविंद्र आहे.
पसरट भांड्याचा आणि सरकारी पडद्याचा संदर्भ काय?

कोण रविंद्र?
समोर या.....

@ आनंद.. आणि तुम्ही आता पुढे यांना उत्तर द्या.

पसरट भांड्याचा आणि सरकारी पडद्याचा संदर्भ काय?
>>>>
पसरट भांड्यासाठी तुमचा अभिषेक या आयडीचे माबो अकाऊण्ट चेक करा..
सरकारी पडदा... अपर्णा सरकार आयडी बहुधा.. पण तो अंदाज चुकलाय

तुमचा अभिषेक या आयडीचे माबो अकाऊण्ट चेक करा.>>>>>>.>केलं. तरी काही कळ्ळं नाही.
तू तुझं स्टेटस सिंगल लिहिलं आहेस ते दिसलं Happy

आमचा अभ्यास सांगतो, पसरट भांड्यात ठेवलेले दवणीय अंडे तुमचेच आहे ! त्यावरील 'सरकारी' पडदा हटवता का ?
>>>
नाही नाही त्यांचे नाहीये . वेगळ्या एकाचे आहे ते>>>
Uhoh

अपर्णा सरकार >>> अर्चना ! अर्चना सरकार Lol

हायला ! गंमत आहे.
गेली काही वर्षे सर्वात सक्सेसफुल डु आयडी बनून माबोवरील हजारो धाग्यांवर प्रतिसादरूपी नाच केलेली व्यक्ती 'माझा नाच' या धाग्यावर अधिकृतरित्या सर्वांसमोर आली. Happy

बाई दवे
अमानवीय धाग्यावरील ब्रो आणि अभीजित ब्रो हे आयडी पसरट भांड्यातील होते का ? Proud

घ्या १०० !

स्वामोनी धन्यवाद Happy

अहो सस्मित्, तुमचा अभिषेकच्या अबाऊट मी मध्ये असे काहीसे वाक्य लिहिले आहे... मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्यचे विचार क्षितिजापलीकडे अंधुक होतात वगैरे...

100
Par
शाहरूख chya dance la pan 100 comment yet नाहीत you tube var

_/\_ अ ना
अजि सोनियाचा दिनू

Submitted by पाथफाईंडर on 5 January, 2020 - 13:05
>>>
मला कोणी क्रेडिट द्याल का? मी अ ना (अभिषेक नाईक) यांचे स्वागत केले होते. ( या धाग्यावरील पान क्र १)

रच्याकने ते नाचणारे तुम्हीच आहात हे कसे बरं सिध्द कराल?
:विचारात पडलेला बाहूला:>>>>+७८६
त्यासाठी वेगळा धागा काढतो. 

नवीन Submitted by आनंद. on 5 January, 2020 - 08:05
>>>>>
प्रतिसादासाठी आयडी चुकला ? 

Submitted by पाथफाईंडर on 5 January, 2020 - 08:48
Screenshot_20200105-084853_Samsung Internet.jpg
=>=>
माझा पान १ वरील हा अजून एक प्रश्र्न,
ऋ =आनंद ????

कोणी प्रकाश टाकू शकेल?

ऋ = अभिषेक हे त्याने जाहीर करतानाच आनंद परत आलाय. Rofl

धन्यवाद सुनिधी, बस्स याच वाक्याची वाट बघत होतो. आता मी धागा शंभर पर्यंत पोहोचवतो >> तरीही नाही विश्वास. Happy तोवर इथली मजा वाचते. पोटाचा विकार खरंच असेल तर काळजी घ्यावी. बरा का होत नाहीये? ते ही थाप असेल तर बुक्की. Happy

सोनली
हो ना... Sad
डीआयडी च्या धाग्यावर डूआयडी ची चर्चा चालू आहे..

पण गंमतीचा भाग म्हणजे जे माझ्या ड्यूआयड्यांच्या मागे लागलेत त्यांच्या स्वत:वरही माझे डूआयडी असल्याचे आरोप होताहेत.
पण हलकीफुलकी चर्चा चार दिवस चालू द्या. या काळात धागा वर राहील. कोणी माझा डॅन्स बघायचा राहिले असतील ते बघतील Happy

सुनिधी कारण तो आजार बरा होतच नाही. फक्त कण्ट्रोल करू शकतो. Crohns disease वर नाव दिलेले. पण ठिक आहे. प्राणघातक नाहीये.

ऋ =आनंद ????>>>
Lol हे खरं आहे ! अंड्याचे फंडे वाचले नाहीत का ?

कारण तो आजार बरा होतच नाही. फक्त कण्ट्रोल करू शकतो. >>>
काळजी घ्या ! Happy
डु आयड्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.

डीआयडी च्या धाग्यावर डूआयडी ची चर्चा चालू आहे..

पण गंमतीचा भाग म्हणजे जे माझ्या ड्यूआयड्यांच्या मागे लागलेत त्यांच्या स्वत:वरही माझे डूआयडी असल्याचे आरोप होताहेत.
पण हलकीफुलकी चर्चा चार दिवस चालू द्या. या काळात धागा वर राहील. कोणी माझा डॅन्स बघायचा राहिले असतील ते बघतील 

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2020 - 23:57
>>>
कोणता धागा मला दिसत नाही.
लिंक द्याल का?
ग्रुप?

फेसबुकवर तुमचा अभिषेक आयडीच्या भिंतीवर जाऊन व्हिडिओ बघितला. तिकडे 4 मिनिट आणि 16mb चा आहे.
नाच चांगला केला आहे. दोघांनीही. कॉर्पोरेट क्षेत्रातली, बैठे काम करणारी, प्रोफेशनल डान्सर नसलेली लोकं अशीच नाचतात स्टेजवर. लय भारी नाच करणारे दुर्मिळ असतात.

बाकी नवीन वर्षाचा संकल्प होता का खऱ्या चेहर्याने समोर यायचा?

कधीच बरा न होणाऱ्या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी शुभेच्छा!

पण तरी > ते ही थाप असेल तर बुक्की. Happy> हे वाचून हसू आलं Lol Lol

ऋन्मेष/ अभिषेक, आता ऋन्मेष हा ड्यूआयडी का काढला यावर धागा येऊदेत. मला वाचायला नक्की आवडेल.
डान्सचे फोटो जास्त आवडले डान्सपेक्षा.

वावे धन्यवाद, आणि छान कल्पना आहे. त्यानिमित्ताने माझेही आत्मपरीक्षण होईल. तसेच सर्वसाधारणपणे लोकांचा पहिला समज असाच असतो की डुआयडी म्हणजे काड्या करायला काढलेला आयडी किंवा ओळख लपवणारा डरपोक वगैरे आयडी. यापलीकडे जे जे असतात त्यांनी खरे तर उघड केल्यावर जरूर लिहावे.

ॲमी धन्यवाद, फेसबूकला जाऊन बघितल्याबद्दल.

कोणाला वरच्या लिंकला प्रॉब्लेम येत असल्यास खालील लिंकवर बघू शकता -

गेल्या वर्षीचा नाच - यूट्यूबवर

https://www.YouTube.com/watch?v=RrY3DLDFRwQ

यंदाचा नाच - फेसबूकवर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1337425706426139&id=10000476...

धन्यवाद

ऋन्मेष/ अभिषेक, आता ऋन्मेष हा ड्यूआयडी का काढला यावर धागा येऊदेत>>>>त्यापेक्षा नरो वा कुंजरवो type मध्ये हजारो वेळा खरी ओळख लपवून झाल्यानंतर अचानक ओळख का दाखवली ,नक्की कोणत्या क्षणी हे भान आले वगैरे वगैरे वर धागा येउद्या Lol

Pages