Submitted by नानबा on 3 April, 2016 - 15:51
ह्या सगळ्या बातम्या ऐकून जरा नाराजच झाले मी.
म्हणाले त्यांना,
'देवा , न्यायप्रीय म्हणून तुमची ख्याती.
तुमच्यावर किती विश्वास आमचा!
आणि तुमच्या देवळातही , केवळ शारिरीक फरकावरून तुम्ही आम्हाला प्रवेश नाकारावा!'
त्यावर ते हसले, म्हणाले,
'बेटा, तुला खरच असं वाटतय का की प्रवेश नाकारणारा मीच आहे?
असं असतं तर पेटवल का असतं मी हे रान माझ्याच ठेकेदारांविरुद्ध?
मी न्यायाची खात्री देतो, पण संघर्षाशिवाय तो मिळावा/मिळेलच, असं कुठे आहे?
असं स्वत्वाकरता लढताना माणूस जसा झळाळून निघतो ना, तीच माझी खरी कृपा असते.
न्याय मग आपसूकच पदरात पडतो'.
परंपरेची फारशी काळजी मी आताशा करत नाही.
- शिरीष
४ एप्रिल २०१६
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा..... छान....
वा..... छान....
वाह!! सुरेख!! मनस्वी.
वाह!! सुरेख!! मनस्वी.
अरेच्चा, चक्क मराठीत दिसतंय
अरेच्चा, चक्क मराठीत दिसतंय लेखन.
आय.डी. हॅक झाला की काय?
खूप छान विचार.. आवडली.
खूप छान विचार.. आवडली.
मस्त.
मस्त.