ट्वेंटी-२० वर्षाचे संकल्प
कुठे दिसला नाही हा धागा तर मीच काढला.
साधेसोपेसेच संकल्प आहेत. ईथे मांडले तर फॉलोअप घ्यायला बरे पडेल.
१) झोपायचा टाईम रात्री तीनचा झालाय. त्याला बारापर्यंत खेचायचेय.
२) ऑफिस नऊचे असते. मी दिवसा आड न चुकता ११ ला जातो. त्याला रेग्युलर करायचेय.
३) ९० टक्के बाहेर खातो. १० टक्के घरचे खातो. हे प्रमाण शक्य तितके उलटे करायचेय.
४) व्यायाम असा कधी आयुष्यात केला नव्हता. पण आता क्रिकेट किंवा ईतर खेळही खेळणे होत नाही. कधी नव्हे ते आयुष्यात थोडे पोट पुढे येऊ लागलेय. तर आता काहीतरी सुर्यनम्स्कार, जोरबैठका गेला बाजार जॉगिंग वगैरे सिरीअसली चालू करायला हवे. व्यायामाला वय आणि मुहुर्त नसतो. तर उगाच अभी तो मै जवान हू, पस्तिशी आल्यावर बघू म्हणण्यात अर्थ नाही.
५) २०१८ साली ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रणवीर सिंगच्या गाण्यावर नाचलेलो. २०१९ साली रणबीर कपूरच्या गाण्यावर नाचलो. आता आईला ऋत्विक रोशनचा नाच बघायची ईच्छा आहे. पण यंदा नाचाची प्रॅक्टीस करताना जाणवले की त्यासाठी फिटनेस वाढवणे गरजेचे. तर क्रमांक ४ या दृष्टीनेही सिरीअसली घेणार आणि ऋत्विकचा नाच नाचणार.
६) गेल्या वर्षात माबोपासून लांबच राहिलो. काही ज्वलंत धागे काढले अध्येमध्ये. पण लेख लिखाण थांबलेच. येत्या वर्षात या छंदासाठीही वेळ काढायचे ठरवले आहे. त्यासाठी क्रमांक १-२ मध्ये म्हटल्याप्रमाणे शेड्यूल रेग्युलर करायचेय.
७) हल्ली बरेच लोकांत ट्रेकिंगचे फॅड आलेय. मला एक तर वेळ मिळत नाही वा सुटेबल कंपनी कोणी नाही किंवा मी मला जमेल का विचार करून घाबरतो. यंदाच्या वर्षात मात्र हे फॅड करून बघायचे ठरवले आहे.
८) Cohn's disease म्हणून एक पोटाचा की आतड्याचा आजार आहे. त्यालाही खूप लाईटली घेतलेय गेली वर्ष दोन वर्षे. याचे शरीराकडून सिग्नलही मिळू लागलेत. औषधांचे डोस सातत्याने मिस करणे, रेग्युलर फॉलोअपला जाणे टाळणे वगैरे सवयच झालीय. तर वर फिटनेसबाबत जे जागरूक होणार आहे ते या आजाराचेही औषधपाणी नियमित करणार आहे.
९) सायकल चालवायला शिकायचेय. लोकं फिटनेससाठी सायकल चालवतात. मला दुर्दैवाने ती चालवताच येत नाही. शिकल्यावर ऑफिसला सायकलने जायचाही विचार आहे. नवीन घरापासून फार त्रास होऊ नये तसे जायला.
१०) गेल्या सहासात वर्षात मोजून १४-१५ चित्रपट पाहिले असतील. यंदाच्या एका वर्षात किमान १४-१५ चित्रपट बघायचा संकल्प आहे. थिएटर, टीव्ही, मोबाईल जिथे शक्य तिथे.
११) आईशी संवाद वाढवायचा आहे. तसे मी एकुलता एक आणि नो सख्खे भाऊबहीण असल्याने आईच लहानपणापासूनची सख्खी मैत्रीण. त्यात आमची केमिस्ट्रीही अफाट जुळते. मी त म्हटले की आईला ताकभात लगेच कळते. शाळाकॉलेजच्या सगळ्या गप्पा मी आईला सांगायचो तर आईच्या कहाण्या शाळाकॉलेजमध्ये. त्यामुळे मित्रांमध्ये माझे आईप्रेम आणि मम्माज बॉय असणे पहिल्यापासून फेमस. पण गेले काही काळ हे गृहीत धरल्यासारखे वाटतेय. ते टाळायचे आहे. आणि हे ठरवून नाही तर सहज घडवायचे आहे.
तुर्तास ईतकेच.....
काहीतरी भरीव आठवल्यास भर टाकतो. उगाच १ जानेवारीलाच जास्त लोड घेण्यात अर्थ नाही
सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा !
सर्वांचे संकल्प वाचण्यास उत्सुक
आमेन
आमेन
Personal level चे आहेत संकल्प
Personal level चे आहेत संकल्प माझे फारच, इथे मांडू शकत नाही.. पण संकल्प करणाऱ्या आणि ते पाळू इच्छिणाऱ्या सर्वांना शुभेच्छा !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वजन कमी करणे.
वजन कमी करणे.
- मांसाहार व कर्बोदके (पोळी, भात,पास्ता, नुडल्स) टाळणे.
नियमित नामस्मरण सुरु करणे.
लवकर उठणे
व्यायामामध्ये नियमितता आणणे.
- व्यायाम कर कर म्हणून नवर्याला करवदायला न लावणे. आपण होउन करणे.
२०२० मधे कपडे खरेदी करणार
२०२० मधे कपडे खरेदी करणार नाही!!!
काय संकल्प नवीन वर्षा साठी
काय संकल्प नवीन वर्षा साठी केला ह्याला असा पण काही अर्थ नाही .
दर वर्षी करोडो लोक संकल्प करतात आणि त्या मधील हजारो च ते वर्ष भर पाळतात बाकी जानेवारी शेवटाला च ते आपलं काम नाही म्हणून माघार घेतात.
त्या पेक्षा गेल्या वर्षी काय संकल्प केला होता आणि वर्षभर तो संकल्प पाळला का हे वाचणे स्फूर्तिदायक ठरेल
कपडे खरेदी करणार नाही!!! >>>
कपडे खरेदी करणार नाही!!! >>> >>> अशक्यप्राय संकल्प वाटत आहे; तरी संकल्पपुर्तीसाठी all the best..
रोज किमान 1 तास व्यायामाला देऊन त्यात खंड न पडु देता फिअटनेसकडे लक्ष द्यायचंच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रात्री लवकर जेवुन लवकर झोपायच ठरवलंय.
फॉलोअपसाठी याच धाग्याचा वापर करेल.
अशक्यप्राय संकल्प आहे! >>>>>
अशक्यप्राय संकल्प आहे! >>>>>>असं नका हो बोलु.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
घरी दारी सगळे असंच बोलताहेत.
गेल्या वर्षी मी रोज व्यायाम
गेल्या वर्षी मी रोज व्यायाम शाळेत जावून व्यायाम करीन असा संकल्प केला होता 2 महिन्यात बारगळला .
रोज 50 मिन वॉकिंग करीन हा पण संकल्प केला होता तो मात्र पूर्ण झाला.
15/20 दिवस फक्त बारगळला होता.
ह्या वर्षी वाहतुकीचे सर्व नियम पाळी न.
गाडी पळवणार नाही सुरक्षित वेगात चालवणार असा संकल्प आहे .
व्यायाम करीन पण ते आताच सांगणार नाही वर्ष पूर्ण झाल्यावर सांगेन.
कपडे खरेदी करणार नाही!!! >>>
कपडे खरेदी करणार नाही!!! >>> >>> अशक्यप्राय संकल्प वाटत आहे
>
####
शक्य होऊ शकते हे स्वानुभावाने सांगू शकतो.
मलाही कॉलेज जमान्यापासून कपड्यांची फार आवड. जॉबला लागल्यावर तर पहिले काही वर्षे नुसते कपडे कपडे आणि कपडेच घ्यायचो. घरचे म्हणायचे तुझा पगार हवा तसा खर्च कर.
पण पुढे आवडी वा प्रायोरीटी बदलल्या म्हणा किंवा कमावलेल्या पैश्याची जाण आली म्हणा किंवा आणखी काही. आता वर्षाला फक्त दोन जोडी कपडे घेणे होतात. एक वाढदिवसाला, एक दिवाळीला.
सस्मित, खास खास खास शुभेच्छा
सस्मित, खास खास खास शुभेच्छा !!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आवडी वा प्रायोरीटी बदलल्या
आवडी वा प्रायोरीटी बदलल्या म्हणा किंवा कमावलेल्या पैश्याची जाण आली म्हणा किंवा आणखी काही>>>>>>>>>>> हे कधी व्हायचं आता माझ्याबाबतीत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण माझं ठरलंय. #नोमोरनवीनकपडे
सस्मित, खास खास खास शुभेच्छा
सस्मित, खास खास खास शुभेच्छा !!>>>>> धन्यवाद गं किल्ली
असं नका हो बोलु. घरी दारी
असं नका हो बोलु. घरी दारी सगळे असेच बोलताहेत..>>> >>> मी ते इन जनरल बोलले. माझ बोलण अजिबात मनावर घेऊ नका.. All the best त्यासाठीच केलंय तुम्हाला.. मला कृपया अहो-जाहो करु नका..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरोग्याची काळजी घेईन. किरकोळ
आरोग्याची काळजी घेईन. किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष नाही.सध्या एवढे केले तरी बास.
अपूर्ण कथा पूर्ण करेन
अपूर्ण कथा पूर्ण करेन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मी दिवसा आड न चुकता ११ ला
मी दिवसा आड न चुकता ११ ला जातो. त्याला रेग्युलर करायचेय. >>> म्हणजे आता रोज ११ वाजता जाणार का ???
सस्मित, हे मी साड्यांच्या
सस्मित, हे मी साड्यांच्या बाबतीत केलंय. तीन वर्षात एकही साडी खरेदी केली नाही. शुभेच्छा!
मागच्या वर्षीचा डायरी लिहीण्याचा संकल्प पूर्ण झालाय...तोच चालू ठेवीन म्हणतेय.. त्यात अजून एक पाच मि. मेडिटेशन जोडायचे आहे...
11no Sankalp नक्की करा
11no Sankalp नक्की करा
@मंजूताई - डायरी लेखन आवडते
@मंजूताई - डायरी लेखन आवडते पण कोणीतरी वाचेल या भीतीने कधीच लिहीत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
वाचायलाही कप्पाळ काहीही खाजगी नस तेच पण तरीही
_________
>>> त्या पेक्षा गेल्या वर्षी काय संकल्प केला होता आणि वर्षभर तो संकल्प पाळला का हे वाचणे स्फूर्तिदायक ठरेल>>> सत्य आहे!
टीकाटिप्पणी करणार नाही, फक्त
टीकाटिप्पणी करणार नाही, फक्त पुटपुटणार.
तिथे वर्षी माझै दोनच संकल्प
तिथे वर्षी माझै दोनच संकल्प आहेत.
मेडिटेशन करणार आहे. (गेल्या दोन वर्षांपासून दरवर्षीचा संकल्प... अद्याप पुर्णत्वास आलेला नाही.
)
फ्रेंच भाषा शिकणार आहे.
मी कोणताही संकल्प करणार नाही
मी कोणताही संकल्प करणार नाही असा संकल्प 10 वर्षांपूर्वी केला होता आणि गेली 10 वर्षे मी तो कसोशीने पाळला आहे.
पुढे पण पाळला जाईल अशी अपेक्षा आहे.
ऋत्विकचा नाच नाचणार. >>
ऋत्विकचा नाच नाचणार. >> आपल्या म-हाटी कलाकारांना पण एखाद्या वर्षी न्याय द्या.
मी प्रोग्रामिंग शिकणार आहे.
मी प्रोग्रामिंग शिकणार आहे. माझी प्रेरणा
सस्मित, हे मी साड्यांच्या
सस्मित, हे मी साड्यांच्या बाबतीत केलंय. तीन वर्षात एकही साडी खरेदी केली नाही. शुभेच्छा!> >>> धन्यवाद मंजूताई.
@ सस्मित
@ सस्मित
माझा पण हा संकल्प आहे. मलाही कपडे घ्यायची आवड आहे ...वेड म्हणता येईल इतकं,,,
ते यावर्षी कमी करणार आहे.
तुम्हाला शुभेच्छा !!
मि कमि बोलानर
मि कमि बोलानर
माझा या वर्शीचा संकल्प आहे की
माझा या वर्शीचा संकल्प आहे की मी कोणालाही कसलंच गिफ्ट देणार नाही (रिदित एकटाच अपवाद). मला इतरांना ख़ंडीभर गिफ्ट देण्याचं अॅडिक्शन आहे असं म्हणालात तरी चालेल.
घरी कोणी तरी पहिल्यांदा आलं किंवा नविन बाळ असेल किंवा लग्न असेल तर ते प्रसंग अपवाद
आजवर कधी संकल्प केला नाही
आजवर कधी संकल्प केला नाही कसलाच पण पुढील काही वर्ष फक्त इतरांच्या चॉईसने कपडे खरेदी करेन. काळं टी शर्ट व निळी जिन हे खुप झालं आता.
श्रवु यांचा संकल्प भारीच. मीही आता कमीत कमी बोलेन.
मीही आता कमीत कमी बोलेन>>>
मीही आता कमीत कमी बोलेन>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कमीत कमी बोला जास्तीत जास्त टंका ! (आम्हाला वाचायला)
Pages