Submitted by निशिकांत on 16 September, 2019 - 00:27
ती गीत गात होती
मी जात येत होतो, ती येत जात होती
मजला हवे हवेसे ती गीत गात होती
उबदार गोड नाते विणले तिने असे की
मम वेदना जराशी टाकीत कात होती
खुदकन मधाळ हसता मोतीच सांडती अन्
वार्यासवे फुलांची आली वरात होती
स्वच्छंद उंच उडणे तिजला हवेहवेसे
डोळ्यात स्वप्न जपले, दृष्टी नभात होती
खळखळ प्रवाह वाहे आनंद अन् खुशीचा
ती आसपास असता स्वप्ने उरात होती
मी दार बंद केले लागो न दृष्ट तिजला
चंद्रास उमगले ती आली घरात होती
अंधार दाटलेला तिज आवडे न केंव्हा
ती मंद तेवणारी समईत वात होती
विसरून दु:ख हसणे मजला तिने शिकवले
मिसळीत ती सुराला माझ्या सुरात होती
"निशिकांत"ला न लागे म्हातारचळ कधीही
नटखट खट्याळ ती तर माझीच नात होती
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!!! क्यूटच
वाह!!! क्यूटच
अनपेक्षित शेवट!!
नटखट खट्याळ ती तर माझीच नात
नटखट खट्याळ ती तर माझीच नात होती > > वा सुंदर शेवट
मन गुंतले होते
सामो, यतीन, आभार दोघांचेही
सामो, यतीन, आभार दोघांचेही प्रतिसादासाठी.
गोड शेवट! आवडली..
गोड शेवट! आवडली..
कित्ती गोड !!
कित्ती गोड !!
मन्या, ऋचा मनापासून आभार
मन्या, ऋचा मनापासून आभार प्रतिसादासाठी.