आजचे भविष्य - या नावाचा प्रकार पेपरात येतो.
त्यात भविष्य व सल्ले असे दोन्ही असते.
काही नमुने!
=====
- आप्तस्वकियांशी वाद घालू नका
- वाहन चालवताना खबरदारी घ्या
- जुने प्रेम भेटेल
- अन्नदान करा! स्त्रीकडून अनादर!
- वडिलधार्यांचा कोप होईल
- ताण घेऊ नका! नडगी सांभाळा!
- मुले डोक्यावर बसतील. वरिष्ठांची मर्जी राखा.
- धनलाभ संभवतो. मैत्रीण भेटेल.
- ताण वाढेल. कपड्यांवरील खर्च टाळा. भावनांवर नियंत्रण हवे.
- त्रस्त व्हाल. ध्यान करा. मार्गात अडथळे येतील.
- उत्तम दिवस. कराल ते होईल.
- घासाघीस नको.
- स्त्रीहट्ट पुरवावा लागेल
- घामेजून जाल
- स्पर्धा टाळा. वीज वाचवाल. नको तिथे पोचाल.
- टाळी मिळेल. उपवास घडेल.
- बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विसंवाद घडेल. ठेच लागेल.
- प्रवास टाळा. अधिक मेहनत नको.
- सोपा उपाय सापडेल. बोलणी खावी लागतील.
- पारा चढेल. गाढव दिसेल.
- दिसेल त्याला फोडून काढा
- आजचा दिवस तुमचा
- कालचा गोंधळ बरा होता असे वाटेल
- व्यवसायात घाटा! अध्यात्मात मन रमेल!
- प्रेम जुळेल
- विदेश यात्रा निश्चीत होईल
- धक्के खाल. अपघात टाळा
- जुने मित्र भेटतील. नवे मित्र होतील.
- सक्रीय सहभाग टाळा
- शिवीगाळ होईल.
- आजचा दिवस कसाबसा घालवा
- उद्या तुमचाच आहे
- हकालपट्टी होईल
- बावळट असल्यासारखे वाटेल
- संसारात मन रमेल
- परस्त्रीची अभिलाषा नको
- कळकट्ट दिसाल
- लाकुड जवळ ठेवा
- थोबाड फुटेल
- आज प्रवास नको! उधळपट्टी कराल
- हरवलेली वस्तू मिळेल
- दागिने लंपास होतील
- इतरांच्या संसारात मन रमेल
- उदास व्हा
- जाल तिथे जिंकाल
- अंतिम निर्णय घ्याल
- नसाल तिथे दिसाल
- विचित्र घटना घडेल
- प्रफुल्ल राहा
- काहीही होऊ शकेल
- हा दिवस विसरा
- खूप हसू नका
- आज कुत्रा चावणार नाही
- दाढी वाढवा
- साखरपुडा ठरेल
- जीवनाचा खरा अर्थ कळेल
- स्वतःला कंटाळाल
- थेट अपमान करा
- मग्रूर व्हा
- गुप्तधन मिळणार
- नवीन दिशेला झेप घ्या
- सोलून काढले जाल
- धरा आणि ठोका
=====
-;बेफिकीर'!
हाहा मस्त. माझं आजचं भविष्य
हाहा मस्त. माझं आजचं भविष्य बहुतेक हे आहे - - पारा चढेल. गाढव दिसेल.
बघुया खरं होतं का...
बापरे बेफी. धमाल संकलन आहे
बापरे बेफी. धमाल संकलन आहे तुमच्याकडे
माझ्याकडून अजून भर:
-गृहकलह संभवतो
-अनावश्यक चुका टाळा
-महिलावर्गास/ व्यापारी वर्गास दिवस चांगला
-घरातील व्यक्तीचे सहाय्य मिळेल
-ऐनवेळी मागे हटू नका
+पडते घ्यावे लागेल
-आजचा दिवस अत्यंत शुभ आहे परंतू बालकांचे आरोग्य संभाळावे
- संततीमुळे त्रास संभवतो
जुने प्रेम भेटेल>> हे भविष्य
जुने प्रेम भेटेल>> हे भविष्य वाचनात नाही आलं अजुन.
बेफिकीर जी
बेफिकीर जी
बेफिकीर २०२० मध्ये परत लिहीते होतील हे भविष्य खरे ठरवा
मस्तच आहे.......वा!
मस्तच आहे.......वा!
सिंह राशीला बरेचदा
उद्धटपणाने वागू नका
आप्तस्वकीयाशी जुळणार नाही
मुलांचा, घरच्यांचा रोष संभवतो
नमते घ्यावे लागेल.
सिंह राशीला बरेचदा झी मराठी
सिंह राशीला बरेचदा झी मराठी चानेलवरचे भगरे गुरुजी " ओहोहोहोहो हो! दिवस तुमचाच आहे.
- दिसेल त्याला फोडून काढा>>>>
- दिसेल त्याला फोडून काढा>>>>>
शॉलिड् भविष्य !
खरंय काय एकेक लिहितात आजचे
खरंय काय एकेक लिहितात आजचे राशीभविष्य मधे


आज कुत्रा चावणार नाही>>>>>
घामेजून जाल>>>> ईईई काहीही
:-))
मस्त संकलन
बेफीकीर राहू नका
बेफीकीर राहू नका
मस्त आहे संकलन .
मस्त आहे संकलन .
माझी एक शंका :- पेपरात येणारे राशीभविष्य हे त्या त्या राशीच्या सर्वांसाठीच कस काय लागू होते ? कसला विचार करून क्रयटेरिया लावतात ?
हाहाहा..!!
हाहाहा..!!

खूपच हसले!
खूपच हसले!
कसला विचार करून क्रयटेरिया
कसला विचार करून क्रयटेरिया लावतात>>>>>मनोरंजन
माझ्याकडून दोन
माझ्याकडून दोन
1) आपल्याला बद्धकोष्ठ होईल
2) शेजाऱ्याला बद्ध कोष्ठ होईल
काळजी घ्या
))--((
पेक्तीनेट लाईन सुटेचीना
पेक्तीनेट लाईन सुटेचीना
नोकरदारांसाठी : कितीही चांगलं
नोकरदारांसाठी : कितीही चांगलं काम करा आज बॉस काही खुश होणार नाही.
नोकरदारांसाठी : कितीही चांगलं
नोकरदारांसाठी : कितीही चांगलं काम करा आज बॉस काही खुश होणार नाही.
हे भविष्य तर महिन्यात २९ दिवस लिहीतां येईल
'पुढे चला' !
'पुढे चला' !
मला अनेकदा 'पुढे चला' असे ठराविक दैनिक भविष्य असते.
तो सल्ला मी ऐकतो
- थेट अपमान करा.
- थेट अपमान करा.

काही लोक सकाळी-सकाळी हे भविष्य वाचुनच मा.बो.वर येतात वाटत.
निवडणूक हराल!
निवडणूक हराल!
- टाळी मिळेल. उपवास घडेल.
- टाळी मिळेल. उपवास घडेल.
- नसाल तिथे दिसाल
- दाढी वाढवा
>>>
विवाहयोग संभवतो :P:
विवाहयोग संभवतो :P:
जूने मित्र भेटतील.
जूने मित्र भेटतील.
महत्त्वाचे पत्र येईल.
गृहसौख्य मिळेल.
लाकुड जवळ ठेवा>> कशासाठी??
लाकुड जवळ ठेवा>> कशासाठी??
दूरच्या प्रवासाचे योग येतील.
दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.
मायबोली व मायबोलीकरांचे
..संपादीत केले.
नेट बंद होते, दुपारी चालू झाले. राजकीय धाग्यांवरचे महायुद्ध बघुन विषण्णता आली.
राजकीय धाग्यांवरचे महायुद्ध
राजकीय धाग्यांवरचे महायुद्ध बघुन विषण्णता येईल असे आपल्या आजच्या भविष्यात होते काय?
यावरून आठवले
यावरून आठवले
सामना चे फॅशन भविष्य
https://www.saamana.com/weekly-horoscope-manasi-inamdar-fashion-2/
शेजाऱ्याला बद्ध कोष्ठ होईल,
शेजाऱ्याला बद्ध कोष्ठ होईल, काळजी घ्या.
शेजाऱ्याला बद्धकोष्ठता होणार काळजी आपण काहुन घायची बर ?
Pages