मोबाईल कुठला घ्यावा ? - २

Submitted by योकु on 23 July, 2018 - 13:53

मोबाईल कुठला घ्यावा ?
याच्या चर्चेकरता हा दुसरा धागा. चलो हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेकिचा अडिच वर्शापुर्वी घेतलेला आयफोन एस इ अचानक चार्ज व्हायचा थाबला, फोन चार्ज होत नाही म्हणुन अ‍ॅपल वाल्यानी कानावर हात ठेवले, (तसही ट्रेड इन व्हॅल्यु नगन्य आहे फोन ची) फिक्स वैगरे दुकानात चार्जिग पोर्ट बदलुनही फोन चार्ज होइना वरतुन ग्लिच पण करतोय, मदरबोर्ड बदला अस त्याच म्हणण आहे.
इथे कुणी सर्टिफाइड रिफर्बिश फोन वापरला आहे का? कुठुन घ्यावा? लेकिला आयफोन च हवा आहे, नविन फोनच सध्या बजेट नाही ( नुकताच तिला नविन क्रोमबुक घेतलाय)
वालमार्टचे रिव्ह्यु चान्गले नाहित.
आयफोन ला पर्यायी $१५०-१७५ मधे दुसरा कुठला फोन घ्यावा?

लेकिला आयफोन च हवा आहे, नविन फोनच सध्या बजेट नाही>>>
मार्च २०२० पर्यंत वाट पहायला सांगा. SE-2 (iPhone 9) तेव्हा येईल अश्या बातम्या आहेत. (गुगलून पहा). बजेट मधे आहे.
सध्या लगेचच पर्याय XR आहे, पण एवढी मोठी स्क्रीन वाला फोन मला स्वतःला आवडत नसल्याने, मी पण 5S वरुन upgrade करण्यासाठी ४.७" वाल्या SE-2 (iPhone 9) ची वाट पाहतोय Happy

@हप, samsung phone मध्ये स्टोरेज आणि मेमरी ( available. RAM ) चेक केली का? ती फारच कमी असते. ४जीबी पैकी किती.
क्याम्रा स्लो टु फोकस?

Huawai P 30 सिरिझ मधले फोने कोनि वापरले आहेत का? Huawai P 30 लाइट घ्यायचा विचार करतोय.

Huawai कंपनीच्या ((धुमधडाका प्रगतीमुळे ??)अमेरिकेने त्यांना गूगल प्रॉडक्टस वापरण्यावर बंदी आणलेली ते डेटा चीन सरकारला देतात असे कारण सांगून. त्यामुळे जरा लोचा झाला. बाकी त्यांचे फोन्स इतरांना टेक्नॉलजीत भारी पडणारे आहेत.

हुआवै Uhoh च्या फोन्स मध्ये गुगल प्ले स्टोर नसतं असं ऐकून आहे. खखोदेजा. सो सीम्स दे फोर्स टू यूज देअर ओन डेव्हलप्ड अ‍ॅप्स (?)

नवीन फोन्समध्ये देत नाहीत, जुन्या अँड्राईडची मुदत वाढवली किंवा कंटिन्यू ठेवलीय. तरी सावध करण्याच्या हेतूने पोस्ट दिली आहे.

10-15 हजारात नवऱ्याला फोन हवाय.
सध्या mi चा आहे त्यात त्याचा आवाज पलीकडे पोहोचत नाहीय.
म्हणून दुसरा घ्यायचाय.
Samsung, vivo दोन्हीचे मोबाईल वापरून झालेत. ते नको
आणि mi चा मीही सध्या वापरतीय. तो नको असं वाटतंय.
अजून कोणते ऑपशन्स आहेत?
त्याचा उपयोग ऑफिस मेल्स चेक करणे, ब्राउजिंग ह्यासाठी आहें.
आणि अर्थात कॉलिंगसाठी.

मोटोरोलाने जी नवीन मॉडेल आणलीत त्यात मोटोपॉवरमध्ये ५००० एमेच ब्याटरी दिली आहे. बाकीमध्ये ३००० एमेच.

मोठ्या ब्याटरीला पर्याय नाही. ती कमी करून प्रसेसर वरच्या ग्रेडचा टाकणे हे काही पटत नाही.
बाकी 'मी ७एस' बऱ्याच लोकांना पटला आहे म्हणतात.

मोटोरोलाने जी नवीन मॉडेल आणलीत त्यात मोटोपॉवरमध्ये ५००० एमेच ब्याटरी दिली आहे. बाकीमध्ये ३००० एमेच.>>ओके.

लिंक moto g7 power

किंवा
लिंक moto g 8 plus
4000mah battery
हा अधिक पावरफुल आहे पण एक सिम आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये सिम/मेमरी कार्ड राहील.

-----------
१) २०१९ मधले काही फोनस ड्युल-सिम-ड्युल-वोल्टे आले आहेत. कामाची गोष्ट आहे. म्हणजे दोन जिओ सिम active ठेवणे
२) एकाच मोबाईलवर दोन वाटसप अकाउंटस (मल्टी अकाउंट्स फीचर हेसुद्धा कामाचे आहे.)
३) ओटीजी सपोर्ट हवाच.

मी ओला / उबर वर चालक आहे, त्यासाठी नवीन मोबाईल पायजे.
बजेट - ५-६ हजार रुपये
हर ट्रीपसाठी २ टायमाला नेविगेशन लागते, (pickup & drop) म्हणून Google maps पटापट चालले पाहिजे. इतर अप्प्स जी पयल्यापासून असतात (अमेझोन वैगेरे) नसली तरी चालतील. नसलेलीच बरी.

१)मोबाईलचे मागचे आवरण मेटल नको. त्यात रेंज कमी येते. प्लास्टिक असावे.
२) लोकेशन : GPS, AGPS, BAIDU, GALELEO वगैरे जेवढे जास्ती पर्याय तेवढे चांगले.
३) RAM MEMORY : यामध्ये गंडवतात. RAM ३ GB लिहितात पण प्रत्यक्ष वापरायला ७०० kB असते. Map tracing गंडते लवकर. Available RAM जास्ती हवी.
४) स्क्रीन ब्राईटनेस चांगला आणि battery ४००० mAh. Audio speaker ऐकून पाहा.

बजेट प्रमाणे सर्व योग्य मिळणार नसले तरी Vijay sales वगैरे दुकानात जे डिवाइस सांपल ठेवलेले असतात ते या दृष्टीने पाहता येतील. खरेदी मात्र flipcart/Amazon वर करता येईल. मार्चमध्ये होळीनंतर भाव खाली येतात.
इतर ड्रायवरांचेही पाहा. Android /७/८ असावा.

..

आयफोन एक्स आर वापर्कर्त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करावेत अशी विनंती. हा फोन २०२० मधे घ्यावा का?

एस ई २ बद्दल बरेच ऐकिवात आहे, काय खरे, काय खोटे?

आयफोन टेन(एक्स) आर बँग ऑन हिट फोन आहे. मी दिवाळीच्या सेल मध्ये घेतला. मात्र ३५ के ला फ्लॅश सेल ऑफर मध्ये.
पहिला आयफोन आहे जो आक्खा दिवस सिंगल चार्ज वर पुरतो फोर जी डेटा ऑफिस च्या वेळी आणि बाकी वेळी वायफाय (डेटा बंद वगैरे कधीही करत नाही). फेस आयडी फार व्यवसथित काम करतं. अगदी किर्र काळोख असेल तरीही एका ग्लान्स मध्ये फोन अन्लॉक होतो. ६४ जिबी स्टोरेज लई होतं मला. अ‍ॅपल म्युझिक वापरत असल्यानी फोन वर काहीही गाणी साठवत नाही. जिओ/ एअरटेल असेल तर वायफाय कॉलिंग सुद्धा मिळतं आताशा.
डायमेशन्स वाईज जरा मोठा आहे पण तरीही अगदी वयस्थित हाताळता येतो.

RAM MEMORY : यामध्ये गंडवतात. RAM ३ GB लिहितात पण प्रत्यक्ष वापरायला ७०० kB असते. Map tracing गंडते लवकर. Available RAM जास्ती हवी. >> हे कस्काय बघायचं? आणि उपलब्ध प्रोग्राम मेमरी पण जास्त असायला हवी ना?

@ चिवट, हे करून पाहा -
हे app simple system monitor दाखवेल RAM used.

Background ला चालू असलेली apps बंद करून, फोन स्विच ओफ करून पुन्हा चालू करून हे app run केल्यास वेगळे कमी RAM used दाखवेल. काही फोनांत हा आकडा जास्तीच असतो. ( फ्री available memory कमी असते.)

गाडीवान,

आजकाल जुन्या गाडीलाही डिजिटल नॅव्हिगेशन युनिट बसवून मिळते. ४-५ हजारात साउंड सिस्टीमसह जीपीएस नॅव्हिगेशन मिळून जाईल. चांगला ६ इंची तरी स्क्रीन मिळतो. मोबाईलची गरज पडत नाही. सिमकार्ड्/रिचार्जही नको.

मला चांगला कॅमेरा आणि जास्त memory असलेला मोबाईल घ्यायचा आहे.. साधारण 15000 च्या बजेट मध्ये कोणता मोबाईल घेता येईल?

Pages