अनेक वर्षे हे पुस्तक घरात होते पण वाचायचा योग आला नाही. पण काही दिवसापूर्वी 'राग दरबारीचे लेखक श्रीलाल शुक्ल यांचे निधन' अशी बातमी आली आणि बघूया तरी काय आहे ते या विचाराने वाचायला घेतले.
'शहर का किनारा, जिसे छोडते ही भारतीय देहातों का महासागर शुरु होता है' या पहिल्या वाक्यातच या पुस्तकाने माझ्यावर जो कब्जा मिळवला तो शेवटपर्यंत.
या पुस्तकची भाषा हा त्याचा सर्वात धमाल भाग आहे. वन-लायनर पंचेस, झणझणीत म्हणी आणि सणसणीत उपहास; काही उदाहरणे पहा
'उस ट्रक को देखते ही पता चलता था की उसका जनम सिर्फ सडकोंपे बलात्कार करने के लिए हुआ है'
'प्रचलित शिक्षा पद्धती सडक पे पडी कुतिया की तरह है, जिसे हर कोई लात मार के चला जाता है'
'वह शुद्ध भाव से बेला का मनन करने लगा, और चूंकी भाव शुद्ध था उसने उसके कपडों के बारे मेंभी नही सोचा'
'पढा-लिखा आदमी सुअर की लेंड की तरह होता है, न लिपने के काम आता है न जलाने के'
दुरदर्शनच्या बातम्यात, राष्ट्रभाषा सेवा समितीच्या वर्गात, सलिम-जावेद-कादरखान पासून राहीमासूमरजा- अब्रारअल्वी- गुलशननंदा पर्यंतच्या हिंदीसिनेमासंवादातदेखील कधीही न भेटलेली कचकचीत, 'रॉ' हिंदी. मजा आली!
म्हटलं तर या कादंबरीला कोणी एक नायक नाही, तसे फारसे कथानकही नाही. रंगनाथ नावाचा नवपदवीधर तब्येत सुधारण्यासाठी शिवपालगंज या त्याच्या मामाच्या गावाला सहा महिने जाउन राहतो. त्या काळात गावात घडलेल्या गोष्टी एवढीच कथा. पुन्हा रंगनाथ या कथेचा निवेदकही नाही, ते काम लेखकच करतो.
मिरासदारांच्या ग्रामीण नमुन्यांची आठवण करुन देणारी एकापेक्षा एक नामंकित पात्रे हे या कादंबरीचे दुसरे वैशिष्ठ्य. सर्व गावाचे नेतेपद संभाळणारे रंगनाथचे धूर्त मामा बैद्यजी, त्यांचा अडेलतट्टू मोठा मुलगा बद्री पहलवान, धाकटा हिरोछाप रुप्पन, बैद्यजींच्या घरी भांग घोटणे एवढ्या पात्रतेवर सरपंच बनणारा सनिचर, बापाला दररोज बदडणारा बद्रीचा शिष्योत्तम छोटे पहलवान, 'सत्त की लडाई' म्हणून लाच न देता सरकारी काम करु पाहणारा लंगड, लबाड आणि लाचार कॉलेज प्रिन्सिपल, लफडेबाज बेला आणि तिचा बाप गयादिन........
या सर्व गोतावळ्याला बरोबर घेउन, त्यांच्या वैयक्तिक कहाण्या सांगत, एका गोष्टीतून दुसरी अशा लोककथेच्या अंगाने ही कादंबरी पुढे सरकते.
पण भाषा आणि पात्रांच्याही पलिकडे जाउन ही कथा स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय-सामाजिक-नैतिक अधःपतनाची आहे. अत्यंत धारदार उपहास हे लेखकाचे मुख्य शस्त्र आहे. ब्लॅक ह्युमरचा इतका प्रभावी वापर भारतीय साहित्यात फार कमी वेळा झाला असेल. संवेदनाहीन आणि निरर्थक सिस्टीम, भाकड रोमँटीसिझम आणि तत्वज्ञानात अडकलेले तत्कालिन साहित्य, 'सुंदर ,निरागस खेडे' अशा आणि यासारख्या अनेक भ्रामक कल्पना; यासर्वांवरचा रंग शुक्लाजी खरवडून काढतात आणि आतले भीषण, नग्न वास्तव उघडे करतात.
श्रीलाल शुक्लांना १९७० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देणारी ही कादंबरी आजही तित़कीच किंबहुना जास्तच प्रासंगिक ठरावी यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते?
परवा कितव्यांदा तरी 'गंगाजल'
परवा कितव्यांदा तरी 'गंगाजल' पहात होतो. एस.पी. अमितकुमार गाडी बंद पडल्याने समोरच्या पोलिसस्टेशनात शिरतात हा पहिलाच सीन, 'राग दरबारी' मधले पोलिसस्टेशनचे वर्णन वाचूनच चित्रित केला असावा- 'पुलिस स्टेशन के अंदर की हर बात मध्ययुगीन थी'.
पुन्हा एकदा शुक्लजींना प्रणाम
राग दरबारी फारच अफाट पुस्तक
राग दरबारी फारच अफाट पुस्तक आहे. मराठी मधे वाचले मी ते, पण अनुवाद चांगला असल्याने मनापासून एन्जॉय केले.
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि लिंक दिल्याबद्दल तर फार च धन्यवाद. वाचायला घेअली आहे. सुरुवात आवडली. पण का कुणास ठाउक, ही हिंदी शाळेच्या पुस्तकातल्या सारखी च वाटतेय. कधीच ओरिजिनल हिंदी व्यक्तिला शुद्ध हिंदी बोलताना ऐकलं नाहिये त्यामुळे असेल मे बी. विवाह सिनेमा ची सुरुवात पहिली आहे. त्यात थोदं फार असच बोलतात लोक. "वो" च्या ऐवजी "वें" वगैरे.
यावरील दूरदर्शन मालिका पाहिली
यावरील दूरदर्शन मालिका पाहिली होती, मस्तच.
हा चांगला धागा आज पुन्हा वाचला याचे कारण त्यातील पुढचे वाक्य सध्या अस्वस्थ करतेय.....
ही कथा स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय-सामाजिक-नैतिक अधःपतनाची आहे.
आता हे वर आल्याने मूळ लेख परत
आता हे वर आल्याने मूळ लेख परत वाचला व आता पुस्तक वाचण्यात पुन्हा इण्टरेस्ट आला आहे.
हे पुस्तक घरी टेबलवर पडलेले असताना घरी आलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीचा समज झाला होता की मी शास्त्रीय संगीतावरची पुस्तके वाचतो
अरे हा धागा कसा काय सुटला
अरे हा धागा कसा काय सुटला नजरेतून. माझी अत्यंत आवडती कादंबरी. साहित्य अकादमीच्या कृपेने स्वस्तात मराठी भाषांतर मिळाले होते कॉलेजात असताना.
कादंबरीचा परामोच्च बिंदू आहे जेव्हा लोकशाही बैदजींच्या स्वप्नात येते. बिचारीच्या अंगावर कपडे नसतात. काय गजब वर्णन आहे. तसेच निवडणुका जिंकण्याच्या तीन पद्धती वगैरे. महानच.
वाह सुंदर परिचय.....मिळालं तर
वाह सुंदर परिचय.....मिळालं तर वाचेन पुस्तक....इतके दिवस संगीता वरचा लेख असेल म्हणून वाचला नव्हता....काय कोण जाणे...हलके फुलके लेख किंवा thrillers आधी वाच ले जातात आणि अभ्यासपूर्ण लेख नंतर वाचू म्हणत मागे पडतात.. लेख आवडला...
राग दरबारी का नाव दिलंय?
राग दरबारी का नाव दिलंय?
Pages