आक्षांसाठी
ताजी कोवळी लसणीची पात 1 जुडी
नवीन तांदूळ २ वाट्या
मेथीदाणे 1 लहान चमचा
जीरे 1 लहान चमचा
हिरवी मिरची- 1
मीठ चवीपुरते
टोमॅटो-लसूण सार
पाती काढून घेतल्यावर उरलेले ओले लसूण
टोमॅटो -2
कांदा - 1 लहान
कढीपता 2 डहाळ्या
हिरव्या मिरच्या - 2
मिरे - 4,5
मोहरी
हिंग
मेथीदाणे 3-4
चिंच (कोळून)
रसम पावडर (ओँपशनल)
मीठ चवीनुसार
साखर चिमूट्भर
१. लसणाचे आक्षे
लसूण पात बारीक चिरून घ्या
तांदूळ स्वच्छ धुवून त्यात चिरलेली पात आणि मेथीदाणे घालून 4-5 तास भिजत ठेवा.
आता भिजलेले मिश्रण, हिरवी मिर्ची, जीरे, आणि मीठ हे सगळे मिक्सरमधे वाटून एकजीव करा. साधारण डोशाच्या बँटरएवढे गाढे (पातळ) असावे.
तव्यावर थोड़े तेल घालून त्यावर बँटर गोल घाला. फार जाड किंवा फार पातळही नको. पातळ असेल तर तव्याला चिकटेल आणि चिवट होइल. जाड झाले तर नीट शिजणार नाही.
तव्यावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर साधारण 2-3 मिनिटांनी परत आक्ष्यावर थोड़े तेल सोडा व आक्षे उलटवा आणि अर्धा मिनिट खरपूस होऊ द्या.
२.
टोमॅटो-लसूण सार
पाती काढून घेतल्यावर उरलेल्या ओल्या लसणाचे तुकडे करून घ्या. कांदा उभा चिरून घ्या. आता चिरलेला कांदा लसूण्, टोमॅटो (+ आकारात चिरा देऊन), कढीपत्ता आणि
हिरव्या मिरच्या 3 कप पाण्यात चांगले उकळून घ्या. रोळून घ्या. पाणी फ़ेकून देऊ नका. थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
एका पातेल्यात तेल/तूप/बटर (आवडीप्रमाणे) गरम करून त्यात मोहरी, हिंग, मीरे व मेथीदाण्याची फोडणी करून घ्या. त्यात वाटलेले मिश्रण घाला. चिंचेचा कोळ आणि मीठ, साखर घालून खमंग परतून घ्या. आवडत/अव्हेलेबल असल्यास रसम पावडर घाला (मी MTR रसम मसाला वापरला)
जरा तेल सुटू लागलं की भाज्या उकळलेले पाणी घालून मंद आचेवर 10 मिनिटे उकळा.
गरम गरम प्यायला घ्या
पूर्व विदर्भात या सिझनला घरोघरी केला जाणारा पदार्थ आहे.
आक्षे बनवण्यासाठी तांदूळ नवीनच वापरावा.
तांदूळ जर कमी झाले तर आक्षे तव्याला चिकटतात. तेव्हा आक्षे जमले नाहीत तर थोडे तांदळाचे पीठ घाला.
टोमॅटो-लसूण सार हे पारम्परिक रसम नाही पण चव अफलातून लागते. नक्की करून पहा.
एकदम भारी आहेत दोन्ही पदार्थ
एकदम भारी आहेत दोन्ही पदार्थ आणि फोटोही मस्त. आक्षे नवीनच, पहिल्यांदा ऐकलं. सारपण ह्या पद्धतीने केलं नाही कधी.
छान
छान
भारीच. वेगळेच पदार्थ आहेत
भारीच. वेगळेच पदार्थ आहेत एकदम. लसणीची पात तर कधी बघितली नाही, पण साधा नेहमीचा लसूण वापरून ते सार/सूप चांगलं लागेल का ते करून बघितलं पाहिजे.
अहाहा ! जबरी रेसेपी. थंडी
अहाहा ! जबरी रेसेपी. थंडी सुरु झाली अखेर. धन्यवाद मनीम्याऊ.
लय भारी! नक्की करून बघेन.
लय भारी! नक्की करून बघेन.
वावा छान वाटतेय, करुन बघितली
वावा छान वाटतेय, करुन बघितली पाहीजे. आता पाती लसूण पण मिळतोय
तोंपासु रेसिपी! नक्की करुन
तोंपासु रेसिपी! नक्की करुन बघते..
मस्तच रेसीपी आहे. इथे लसणाची
मस्तच रेसीपी आहे. इथे लसणाची पात कोरिअन मार्केट मध्ये एकदम मस्त मिळते . करुन बघणार त्यामुळ.
लसणिची पात २ आठवड्यात उगवून येते खरतर पण इथे थंडी चालू आहे.
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
<<साधा नेहमीचा लसूण वापरून ते सार/सूप चांगलं लागेल का ते करून बघितलं पाहिजे>>
चव जरा जरा उग्र लागेल. पण मग थोडा कमीच लसूण घालून बघा.
आक्षे पहिल्यांदाच वाचलं...
आक्षे पहिल्यांदाच वाचलं....टोमॅटो सार मी कांदा आणि लसूण घालून करते. थोड बेसन लावायच ...मस्त होते.
भंडारा-गोंदिया भागात
भंडारा-गोंदिया भागात प्रामुख्याने केले जातात. ह्याच सिझनात कांदा पात व नवीन तांदूळाची कणी वापरून करतात... आक्षे भंडाऱयातल्या मैत्रीणीकडे खाल्ले आहेत.... करायला हवे ... टोमॅटो सारासह
मस्त रेसिपी ! फोटो तोंपासू
अरे वा! अगदी तोंपासू प्रकरण
अरे वा! अगदी तोंपासू प्रकरण आहे. प्रथमच वाचली ही पाकृ. रंगही सुरेख आहे अगदी. नक्कीच चवदार लागेल. सार तर भन्नाटच दिसतेय.
आमच्याकडे नेहमी गावठी लसुन असतो भरपुर पण ही पाकृ करत नाही कुणी. खलबत्यामध्ये कुटून ठेचा सारखा प्रकार होतो आमच्याकडे. तोही ताटात घेवून कुणी खात नाही. गरम भाकरीवर घ्यायचा व खात खात कामावर जायचे. आता हा प्रकार नक्की करायला सांगेन.
भारी आहे हा प्रकार करून बघणार
भारी आहे हा प्रकार
करून बघणार
आक्षे अन सार सुरेख दिसतंय.
आक्षे अन सार सुरेख दिसतंय. पात मिळते आहे आजकाल सहजच. करून पाहू आता सुट्ट्या आल्यात तर.
वाह!!! फार चविष्ट वाटते आहे,
वाह!!! फार चविष्ट वाटते आहे, पाकॄ.
छान पाककृती. फोटो तर जबरदस्त
छान पाककृती. फोटो तर जबरदस्त यम्मी दिसताहेत. इथे लसणाची पात मिळते पण करायचं काय माहीत नव्हतं. आम्ही आणत नाही याची खात्री असल्याने, स्वयंपाकाच्या मावशींनी ' हूं .... त्यात काय, सोप्प तर आहे' म्हटलं, ते त्यांना महागात पडेल.
लसणाच्या पातीचं फोडणी चं वरण
लसणाच्या पातीचं फोडणी चं वरण फार सुरेख होतं. यात चिंच, आमसूल, गूळ, गोडा मसाला इ काहीही वापरायचं नाही. हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली लसणीची पात आणि तुरीचं वरण, नंतर उकळी फुटल्यावर मीठ. बास.
वांग्याच्या भरतात सुद्धा फार सुरेख लागते ही पात. थोडक्यात जिथे नेहेमीचा लसूण वापरल्या जातो तिथे ही पात वापरायची.
लसणाची पाती आणि लसून याच्या
लसणाची पाती आणि लसून याच्या चवीत मोठा नेहमीचा कांदा आणि कांद्याची पात यामध्ये जेवढा फरक त्यापेक्षा जास्तच फरक पडेल.
एक वेगळीच चव येते लसणाची पात वापरली कि.
पहिल्यांदा वाचले! ऐकले.
पहिल्यांदा वाचले! ऐकले. लसणीची पात कुठे मिळेल?
लसणीची पात मिळते की; आम्ही
लसणीची पात मिळते की; आम्ही बेसनात घालतो. बेसन म्हणजे पोळा(आमच्याकडे).
पुर्व विदर्भात, तांदूळ होतो काय?
>>लसणाची पाती आणि लसून याच्या
>>लसणाची पाती आणि लसून याच्या चवीत मोठा नेहमीचा कांदा आणि कांद्याची पात यामध्ये जेवढा फरक त्यापेक्षा जास्तच फरक पडेल.
एक वेगळीच चव येते लसणाची पात वापरली कि.>> +1
पुर्व विदर्भात, तांदूळ होतो काय?>>
पूर्व विदर्भात तांदूळ हेच मुख्य पीक आणि भात हे प्रमुख अन्न आहे. In fact आज जेवायला काय? या प्रश्नाचे उत्तर म्हणून
फक्त भाजीचे नाव सांगतात. भात understood असतो
अवांतर : पुर्व विदर्भात,
अवांतर : पुर्व विदर्भात, तांदूळ होतो काय? >>>>>> मम्याने उत्तर दिलेच आहे पण मुंबई/पुण्या पलिकडे महाराष्ट्राचा काही भाग आहे...आजही ह्या भागाबद्दल अजान आहे (डोक्यावर हात मारणारी बाहुली) पूर्व महाराष्ट्र व त्याला जोडून असलेला छत्तीसगढला राईस बाऊल /धान की कटोरी म्हणतात...
आमच्याकडे नेहमी गावठी लसुन
आमच्याकडे नेहमी गावठी लसुन असतो भरपुर पण ही पाकृ करत नाही कुणी. खलबत्यामध्ये कुटून ठेचा सारखा प्रकार होतो आमच्याकडे. तोही ताटात घेवून कुणी खात नाही. गरम भाकरीवर घ्यायचा व खात खात कामावर जायचे. आता हा प्रकार नक्की करायला सांगेन.>>>>>> अहो रेसेपी पण लिहायला सांगा की वहिनींना.
लसणाची पात पुण्यात शनीपार- गोरे मंडळींचे दुकान आहे ना तिथे रस्त्यावरच मिळते. आता हिवाळ्यात नक्कीच मिळेल.
विदर्भाबद्दल बरच इथे वाचून
विदर्भाबद्दल बरच इथे वाचून किंवा tv वर बघून माहितेय, विशेषतः डिशेस. तुम्ही कोणी डीटेल्स लिहिलंत तर आवडेल वाचायला. विदर्भातल्या एका भागाला वऱ्हाड प्रांतपण म्हणतात ना. सर्वच कोणी सविस्तर लिहा.
(No subject)
अरे वा मंजूताई.. छान बातमी..
अरे वा मंजूताई.. छान बातमी.. खरच चिनोरची चव अप्रतिम असते. आमचे बरेच नातेवाईक मुंबई/ पुण्यात रहातात. ते सारे नागपूरला भेट देउन परत जाताना चिनोर हमखास बरोबर नेतात.
मस्त !
मस्त !
वा छान, मला हा तांदुळाचा
वा छान, मला हा तांदुळाचा प्रकार माहीतीच नव्हता.
नाय नाय, आमचा इंद्रायणी
नाय नाय, आमचा इंद्रायणी तांदूळच सगळ्यात भारी.
अंजू, आम्ही फक्त हाच तांदूळ
अंजू, आम्ही फक्त हाच तांदूळ खातो... छान मऊ मोकळा सुवासिक भात होतो
Pages