अत्याचार

Submitted by सोहनी सोहनी on 30 November, 2019 - 06:32

आज कधी नव्हे ते इन्स्पेक्टर मोरे वेळेत पोलीस स्टेशन वर पोहोचले होते, सगळे किंचित आश्चर्यानेच त्यांच्याकडे पाहत होते,
आल्याआल्याच त्यांनी शिंदे मॅडमला ऑर्डर दिली, एक केस येतेय, त्या मुलीने खून केला आहे,
खूप महत्वाची आहे केस आहे, गुन्ह्याचे सगळे पुरावे मिळाले आहेत फक्त तिच्या कडून कबुली स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्यायचा आहे आणि कबुली रिपोर्टवर सही, बस्स बाकी काही विचारायचं नाहीये, कळलं?
केस क्लिअर आहे आणि वरून ऑर्डर आल्या आहेत, आमदार खोत साहेबांच्या भाच्याचा खून करून पसार झाली होती ती मुलगी, त्यांच्याच माणसांनी पकडलं आहे, इकडेच घेऊन येत आहेत तिला, कसून चौकशी घ्या, आणि आपल्याला हि केस लवकर आटपायची आहे, वरून प्रेशर आहे माझ्यावर, काय ??
शिंदे मॅडम गांभीर्य ओळखून सज्ज होत्या.

हि केस खोत साहेबांना पाहिजे त्या प्रमाणेच कोर्टासमोर उभी करायची होती त्यासाठी मोरेंना त्या कामाची इच्छित किंमत घरी पोहोचली गेली होती,
आता फक्त शिंदे मॅडमने तिच्याकडून पाहिजे ते वदवून घ्यायचं इतकंच काम उरलं होतं,
बाकी तिने खून का केला कश्या परिस्थितीमध्ये केला, ह्याच्याशी त्या भ्रष्ट मोरेंना काही घेणं देणं नव्हतं.

मोरेंचं बोलणं संपल्याच्या अगदी दहाव्या मिनिटाला पोलीस स्टेशन पुढे एक मोठी गाडी उभी राहीली त्या मागे अजून चार कार आल्या
मोठ्या गाडीतून एक महिला पोलीस हवालदार एका चोवीस पंचवीस वर्ष्याच्या मुलीला हाताला पकडून जवळ जवळ खेचत घेऊन येत होत्या.
दिसायला सुंदर पण चेहऱ्यावर जिवंतपणाचं तेज नव्हतं ना डोळ्यात कसली भावना, अंगात कसलंच अवसान नव्हतं जसकाही चार पाच दिवस अन्नाचा कां देखील तिने खाल्ला नसावा, गोऱ्याश्या चेहर्यावर लाल काळे ओरखडे स्पष्ट दिसत होते आणि त्या महिला पोलीस हवालदाराच्या बोटांचे निशाण, आजूबाजूची लोक कुतूहलाने तिच्याकडे वळून वळून पाहत होते, पण तिचा चेहरा अगदीच निर्विकार जणू तिला कशाचं काही घेणं देणं नसावं,आजूबाजूला सगळे तिला पाहत आहेत, तिला पोलिसांनी पकडून आणली आहे आणि चक्क एका चालत्या बोलत्या माणसाचा खून केलाय तरीही तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव दिसत नव्हते.

तिला आत घेऊन येत होते त्याच बरोबर स्वतः आमदार खोत त्यांचे जवळचे तीन चार कारकर्ते आणि मयत मुलाचे आई वडील असे सगळे आत शिरले,
सगळ्यांच्या डोळ्यात तिच्याविषयी प्रचंड राग दिसत होता, जर खुनाची बातमी पोलिसांपर्यंत आली नसती तर त्या मुलीचा बाहेरच काय तो सोक्षमोक्ष लावला असता, हे मोरेला व्यवस्थित माहित होतं,आली संधी का सोडायची, त्या मुलीचे हवे तसे स्टेटमेंट घेऊन कोर्टासमोर फक्त गुन्हा काबुल करावा, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही बोलणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची इतकंच काम करायचं होतं, त्यासाठी मिळणारा बक्कळ पैसे विनाकारण का सोडायचा . . .

तिला जेलमध्ये टाकलं,
आमदारांनी मोरेला पुन्हा काय ते डोळ्यांनीच समजावलं, मोरेला काय ते कळलं, तिला पाहून मोरेला एकदाही वाटलं नाही कि हिने एक खून केला असेल, त्याला पैस्याशिवाय कशाशी काही घेणं देणं नव्हतं.

मोरे मॅडम आत गेली, मोरे मॅडम म्हणजे एक भरदार व्यक्तिमत्व, तिची एक चपराक जरी पडली तरी पूर्ण शरीराला झिणझिण्या येतील, महिला गुन्हेगारांची चौकशी हे त्यांचंच काम,
ती एका कोपऱ्यात निर्विकार उभी होती, कसल्याश्या विचारांत गढलेली,
मोरेंनी तिची कसून चौकशी घ्या मॅडम काही करा पण तिची जबानी रेकॉर्ड करा आणि लिखित सह्या घ्या अशी पुन्हा ऑर्डर दिली.

शिंदेच्या आवाजाने ती भानावर आली, हरवलेली नजर तुसभरही ना हलवता ती तशीच उभी राहिली, शिंदेनी तिला बसायला सांगितलं आणि बाजूलाच असलेल्या मडक्यातुन कपभर पाणी तिच्या पुढे सरकवत तिच्या अगदीच समोर बसल्या . . .
ती बसली पण ना शिंदे मॅडमकडे पाहिलं ना त्या पाण्याकडे ..

शिंदेंनी चौकशी करायला सुरुवात केली . . .
नाव ??
आसावरी
पुढे?? आडनाव नाही का?
आसावरी क्षीरसागर.
वय ??
वय - 25
काय करते ??
ऑफिस, जॉब करते.
अविवाहित आहेस, सगळं चांगलं दिसतंय, मग आता सांग का खून केला ???
त्या माणसाला कसं ओळखते ??
बोल लवकर ???

ती पुन्हा निर्विकार , निशब्द ...

काय विचारते मी ?? तुझा आणि आमदार साहेबांच्या भाच्याचा काय संबंध ???
ऐकायला येत नाही का ग ?? का खून केलास?
शिंदे मॅडम आता शांतता सोडून पोलिसी खाक्यात बोलत होत्या, ती काहीच बोलत नव्हती, प्रश्नांना उत्तर देतनव्हती त्यामुळे शिंदे आता खवळल्या होत्या.

त्या जागेवरून उठल्या आणि सटकन तिच्या कानाखाली वाजवली, मोरे तिकडून कुत्सित हसले.
लवकर गुन्हा काबुल कर नाहीतर विनाकारण त्रास होईल तुला आणि आम्हालाही, सही कर ह्या स्टेटमेंट वर कि तूच खून केला आहे. . .

ती पुन्हा तशीच निशब्द. .

तुला बंगल्यातून हात रक्ताने माखलेले घेऊन जातानाची विडिओ आहे आमच्याकडे पुरावा म्हणून,
म्हणून गुन्हा काबुल कर आणि आमचा वेळ वाया घालवू नकोस.
तुझे आणि त्याचे काही संबंध होते का ??? कि लफडं होतं तुझं त्याच्यासोबत सांग लवकर..
ती काही प्रतिउत्तर देत नाही म्हणून चौताळून शिंदेनि अजून एक चपराक गालावर लगावली,
तिचा कान जोरात खेचून शिंदे तिला विचारत होती.

मी नाही ओळखत त्याला, एकदम थंडपणे आसावरी बोलली
ओळखत नाहीस मग, तू तिथे कशी गेलीस? काय करत होतीस तिकडे?
आणि असं काय झालं जे सरळ खून केलास तू ?
तिकडून मोरे ओरडले, शिंदे टाईमपास करू नका, तिच्याकडून गुन्हा काबुल करून घ्या लवकर.

आमदार साहेब म्हणाले तुझे आणि त्याचे संबंध होते, तुला दोन तीन वेळा त्यांनी स्वतः हार्महाऊस पाहिलं होतं त्याच्यासोबत, त्याच्या मित्रांसोबत. नक्की कसले धंधे करतेस हा??
ती काहीच म्हणाली नाही . . .
देहव्यापार करतेस तू ??? शिंदे रागात म्हणाल्या
धंधा करतेस तू, वैश्या आहेस तू ??...

वैश्या शब्द ऐकताच तिने शिंदेमॅडम कडे अश्या नजरेनं पाहिलं कि शिंदेला जागीच जाळून टाकेल, समोरचा पाण्याने भरलेला ग्लास त्वेषाने जेलच्या साळयांवर भिरकावून तिने इतका वेळ धरलेला मौन तोडला आणि एका वाघिणी सारखी गरजली

तुझ्या मुलीवर त्या आमदाराच्या भाच्याने बलात्कार केला असता तर तुझ्या मुलीला वैश्या ठरवली असती तू???

तिचा आवाज इतका धारदार होता कि जवळपास पूर्ण स्टेशन शांत झालं ,शिंदे दोन पाऊले मागे सरकल्या आणि मोरे राग आणि भीती दोन्ही भाव चेहऱ्यावर ठेऊन तिच्याकडे पाहत होते.

हेच कोर्टासमोर आमदारांना आणायचं नव्हतं. तिने सरळ गुन्हा मान्य करावा आणि तिला सजा व्हावी आणि नावावर कलंक लागू नये,हि त्यांची योजना होती तिच्यासोबत त्याने काय केलं ते माहित असूनहि.
शिंदे प्रश्नार्थक नजरेने मोरेकडे पाहत राहिल्या,
खरं काय ते बाहेर येऊ नये म्हणून मोरे उठून शिंदेनाम्हणाले, मॅडम खून केला आहे तिने, बचावासाठी काहीही बनाव करेल ती,
आणि काय ग काय पुरावा आहे तुझ्याकडे???मोरे असावरील उद्धेशून म्हणाले . .

जर मी घरातून बाहेर जातानाचा विडिओ आहे मग आत कशी गेली हे कॅमेरामध्ये नाही का रेकॉर्ड झालं???
ओरिजिनल पुरावे कधीच नष्ट केले असतील, हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये नामोरे साहेब .
आसावरी मोरेकडे पाहत रागाने बोलत होती.
एव्हाना शिंदेनी तिला चांगलंच बदल असत पण ती जे बोलली त्या शॉक मध्ये अजून शिंदे होती, तसंही मोरे किती भ्रष्ट आहे ते पूर्ण स्टाफ ला माहित होतं, त्यामुळे शिंदे जागीच थांबली, एव्हाना इतर आलेली माणसे देखील असावारीच्या आवाजावर कान देऊन होती..

काहीहि बोलू नकोस तू ??आणि शिंदे पाहत काय बसलाय तुम्ही काम करा
जे पाहिजे ते वदवून घ्या हिच्याकडून लवकर ...

एव्हाना असावारीला धाप लागली होती, कसेतरी अवसान एकवटून ती शिंदेला म्हणाली, तुम्ही पहिली ती विडिओ खूपच छोटी होती मी पूर्ण विडिओ आणि विडिओ बाहेरच पण सांगते.
मोरे तिला गप्प बसवणार होते पण सगळ्यांचं लक्ष्य तिच्यावर होतं आणि शिंदेदेखील मोरेकडे संशयाने पाहत होती,त्यामुळे मोरे खार खाऊन जागीच थांबले.

ऑफिसमध्ये त्या दिवशी जरा जास्त काम होतं, उशीर होणार होता. आईला कळवलं तर ती वैतागलीच
कारण ऑफिसवरून लेट गेले तरी लोकांच्या नजरा कोणासोबत मज्जा मारून,फिरून आलीये अश्या असतात .
म्हणून जमेल तसं पटापट काम उरकून निघाले, बराच उशीर झाला होता, ऑफिसची बस नव्हती, मी जवळजवळ धावतच रिक्षा स्टॅंडकडे चाललेहोते, ऑफिस ते रिक्षा स्टॅन्ड पर्यंत रास्ता थोडा रिकामाच असतो नेहमी, तुरळक मानस असतात नेहमी, मी तिथून चालले होते तेव्हाही एक दोन माणसेच होती, मी माझ्याच धुंदीत रिक्षाचा विचार करत चालले असताना अचानक एक स्कॉर्पिओ वेगाने पुढे गेली, मी आपली पुढेच चालली होते तर तीच गाडी पुन्हा मागे आली. माझ्या मनात काहीच विचार नव्हते ती गाडी का मागे येते, त्यात कोण असेल ,आपल्याला काही धोका असेल ,मला फक्त रिक्षा पाहिजे होती लवकर घरी पोहोचायला.

ती गाडी माझ्या जवळ येऊन थांबली आणि एका मुलाने माझा हात खेचून गाडीत ओढलं मी बेसावध होते त्यामुळे पटकन गाडीत ओढले गेले, दार लॉक करून वेगाने गाडी पळाली, गाडीत एकूण तिघेजण होते, गाडी कुणी तरी चालवत होता आणि मागे एकाने माझ्या तोंडाला रुमाल धरून पकडलं होतं आणि दुसर्याने हात पाय घट्ट पकडले होते.
मी त्या तिघांना कोणालाही ओळखत नव्हते,
मी खूप ओरडायचा प्रयत्न केला पण मला इतकं घट्ट पकडलं होतं कि मला हलताहि येत
नव्हतं आणि आवाजहि निघत नव्हता तोंडातून इतका घट्ट रुमाल आवळला होता तोंडावर,पुढे काय होईल ह्या भीतीने माझं अंग थरथरत होतं. गाडीत नुसता दारूचा वास येत होता जो मला सहन होत नव्हता.
थोड्याच वेळात गाडी थांबली गाडी चालवणारा माणूस खाली उतरला आजूबाजूला कुणी आहे का पाहायला असेल, माळ जोरात त्या दोघांनी बाहेर खेचलं,
फार्म हाऊस होते ते आणि आजूबाजूला एकहि घर नव्हतं ना कुणी माणसं, मला अजून घट्ट पकडून ते लोक आत नेत होते.
मी खूप प्रतिकार केला,पाय आपटले जोर दिला पण त्यांच्या जोरापुढे माझं काही चाललं नाही.
तो गाडी चालवणारा आमदाराचा भाचा होता मला माहित नव्हतं, त्यानेही खूप दारू पिली होती, मी त्या तिघांच्याही हात जोडत होते मला सोडा म्हणून पण ते फक्त हसत होते.

तो दारातून आत गेला आणि मला त्या दोघांनी आत ढकलून दार बाहेरून लॉक घेतलं,
मी धावत येऊन दारावर जोरात हात मारत होते आणि विनवण्या करत होते दार उघडायला बाहेरून ते दोघे जोरात हसत होते आणि म्हणत होते,
दादा तुमचं मन भरलं कि आम्हाला पण चान्स द्या आणि हसण्याचा आवाज लांब होत गेला, एव्हाना माझ्यासोबत काय होणार हे मला कळलं होतं,मी खूप घाबरले होते.
हरिणीला आणि एका भुकेल्या वाघाला एक रूम मध्ये बंद करावं तसं झालं होतं माझं, माझं हृदय घाबरून बाहेर येईल इतकं जोरात वाजत होतं,
तो माझ्या जवळ येत होता डोळ्यात दारूची आणि वासनेची नशा स्पष्ट दिसत होती,
तो जवळ येत होता त्याने त्याचा हात पुढे केला आणि मी त्या हॉलमध्ये स्वतःला त्याच्यापासून वाचवायला पळत होते, हातात मिळेल ते फेकत होते , त्याला प्रचंड राग आलेला दिसत होता, रागाने त्याने माझी वेणी पकडली.
तानपुऱ्याच्या तारा अतिताणाने तुटतात तसे एक एक करून माझे केस तुटल्याची जाणीव मला झाली आणि ती वेदना असह्य होऊन माझी पावले जागीच थांबली.
डोळ्यातून माझ्याही नकळत पाणी आलं. त्याने मला जोरात धक्का दिला मी खाली कोसळले,
त्याने माझा हात खेचत एकाद्या प्राण्याला खेचत न्यावं तसं जिन्यावरून वर खेचत नेलं,

त्यानेही माझी तिथे धंदेवाल्यांशी तुलना केली म्हणाला, थोड्या वेळाचच काम आहे, इतकी नाटक कशाला करतेस, माझं काम झालं कि सोडतो तुला घरी, हवंतर तुला पैसे पण मोजतो,त्या बाया घेतात त्यांच्यापेक्षा चारपट जास्त.
मी त्याचे पाय पकडून दयेची भीक मागत होते पण त्याला दया नाही आली.

त्या जिन्याच्या पायऱ्यांचे काठ मला खूप लागत होते,मी विव्हळत होते पण त्याला काही घेणं देणं नव्हतं
ना मी त्याला कधी पाहिलं होतं ना त्याने मला फक्त मी रस्त्यात दिसले आणि उचलायच मन झालं आणि त्यांनी मला उचललं.

त्याच्या पूर्ण फार्महाऊसमध्ये कॅमेरा होते मॅडम, मी त्याला मारायला वस्तू शोधताना मला दिसले होते.

त्याने लाथेने दरवाजा उघडला आणि मला आत फेकलं,स्वतःची इज्जत वाचावण्यासाठी मी जमेल तितकी धडपड करत होते, रूममध्ये दिसेल ते फेकत होते त्याच्या अंगावर,
मी बाथरूम मध्ये पळणार तोच त्याने हाताला ओढून कानाखाली इतक्या जोरात वाजवली कि त्याने दिलेली शिवी पण मला ऐकायला आली नाही.
त्याने मला त्याच्या बेडवर लोटलं, मी खूप झटपट केली,विनवण्या केल्या, म्हणजे माझ्या शक्तीपेक्षा खूप जास्त प्रतिकार केला,पण त्याच्यासमोर माझा टिकाव लागला नाही.

प्रथमच मला मी स्त्री असल्याचा राग आला कारण मी स्वतःच रक्षणहि करू शकत नव्हते इतकी कमजोर होते मी त्याच्यासमोर. पुरुषापुढे जर संरक्षणासाठी स्वतःची हिम्मत कमी पडत असेल तर नको होतं मला ते बाईपण नाजूकपण ...

प्रतिकार करून शरीर दमल होतं आणि माझ्या डोळ्यात रागाची जागा असाहाय्यतेने आणि वेदनेने घेतली
डोळ्यातून गरम धार चालू झाली, स्वतःच्या असाहाय्यतेवर कीव आली मला, त्याच्या हालचाली वाढल्या इतरत्र त्याच्या होणाऱ्या स्पर्शाची शिसारी येत होती, किळस वाटत होती.
त्याच्या स्पर्शाची त्याच्या शरीराची आणि स्वतःच्या शरीराचीहि किळस वाटत होती ...
प्रथमच होणाऱ्या पुरुषी स्पर्शाने ते हि अश्या प्रकारे होणाऱ्या घाणेरड्या किळसवाण्या स्पर्शाने उलटी येत होती मला, त्याच्या श्वासांचा आवाज कान फाटतील इतका कर्कश वाटत होता,
खूप प्रयत्न केला प्रतिकार करायचा पण त्याच्या वजनापुढे माझं शरीर चाल करत नव्हतं, खूप दुखत होतं सगळीकडे,
भावना वेदना असलेला निश्चल यंत्रमानव सारखं माझं शरीर झालं होतं.
ज्याला त्रास होतोय दुखतंय घाण वाटतेय किळस येतोय पण त्याला हलता येत नाही.
वाहणाऱ्या डोळ्यातून फक्त पाणी नाही तर माझी तुटलेली स्वप्ने, माणुसकीवरून उठलेला विश्वास,इतके वर्ष जपलेली इज्जत तुकडे तुकडे होऊन वाहत होती.
उतरणाऱ्या कपड्यातून इतके वर्ष जपलेली लाज,शील,अब्रू, आई वडिलांची इज्जत उतरत होती ...

वेदना असह्य होतं होत्या आतून आणि बाहेरूनहि,
एकदा कुत्रा वैगेरे मेला आणि काही दिवसांनी त्याच्यावर किडे येतात किती घाण आणि किळसवाणं वाटत ते लांबून पाहिलं तरी,
त्याच्या स्पर्श त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त किळसवाणा वाटत होता मला.
असं वाटत होती त्याच पूर्णशरीर त्या कुजलेल्या किड्यांनी भरलं आहे आणि मला ते शरीर माझ्या मनाविरुद्ध स्पर्श करतेय.
ते किळसवाणे किडे चावत आहेत मला, ते घाणेरडं शरीर माझी इज्जत ओरबाडून खात होतं आणि मी काही करू शकत नव्हते.
एका वेळेस इतकी भयंकर वेदना झाली कि मी बेशुद्ध पडले त्यानंतर माझ्यासोबत काय झालं मला नाही माहित. त्याच्या मित्रांनी येऊन पुन्हा तेच केलं कि नाही मला काही माहित नाही.
पण मला जाग आली तेव्हा तोच माझ्या बाजूला झोपला होता. मला पळायचं होतं पण उठण्याइतकाहि त्राण नव्हता अंगात, भयंकर वेदना होतं होत्या पूर्ण शरीरभर,मी शरीराने कमी पण मनाने पूर्णपणे अपंग झाले होते.
माझं पूर्ण आयुष्य उध्वस्त झालं होतं, इतके वर्ष जी इज्जत जपली ती काहीच क्षणात गमावली होती,मी छताकडे पाहत राहिले एक मिनीट, आणि मला पुन्हा सगळं आठवायला लागलं,
तो घाणेरडा स्पर्श आणि त्या वेदना शरीरावरच्या मनावरच्या, ते किडे ,मला हळू हळू ते किडे माझ्या पूर्ण शरीरभर जाणवत होते. मला उठायची पण हिम्मत नव्हती तरीही मी धावत बाथरूम मध्ये गेले आणि उलटी केली.
तिथल्याच थंड पाण्याच्या नळाखाली रडत बसले, माझ्यासोबत काय झालं आहे ती भावना पूर्ण मनव्यापून होती,बधिर झाले होते मी काही सुचत नव्हतं. शरीर थंड पडलं पण मनाचं काय ???

बाथरूममध्ये एक सळईवर माझी नजर खिळून पडली होती ,
डोळे बंद केले आणि उघडले तेव्हा ती सळई मला जाणवली मी काही विचार न करता सळई घेऊन बाहेर आले. दारूच्या नशेत तो तोंड उशीवर ठेऊन पोटावर झोपला होता.

ज्याने माझं आयुष्य उध्वस्त केलं,ज्याला स्त्रीच्या भावनेची इच्छेची, माणूसपणाची किंमत नाही,ज्याने मला एखाद्या गुरासारखं वागवलं,मला आतून बाहेरून ओरबाडलं, मला अशी जखम दिली जी कधी भरणार नाही, त्या माणसाला जगायचाकाही अधिकार नाही.
मी मागे पुढे विचार केला नाही आणि ती सळई त्याच्या पाठीत जमेल तितक्या ताकतीने खुपसली. एका वेळेतच त्याच्या पाठीत काहीतरी आत तूटल्याचा आवाज आला.
जागचा हलला पण नाही तो . .

आईने उंदीर पकडल तर मी तिच्या नकळत त्याला लांब कचऱ्यात सोडून यायचे कारण आईने त्याला मारू नये आणि आज मी एक जिवंत माणूस मारला होता.
माझे पाय हात तोंड त्याच्या रक्ताने माखले होते, मी तिथले माझे कडपे घातले आणि तशीच बाहेर निघाले.

हि आहे पूर्ण विडिओ मोरे साहेब ऐकलं शिंदे मॅडम.
धंधा नाही करत मी, बोलताना तिला त्रास होतं होता तरीही ती बोलत होती जणू शेवटचं, ह्यानंतर तिला बोलायलामिळ्णार नाही किंवा . . .

घरी गेले, आई काळजीने काकुळतीला आलेली, माझ्या अवतारावरून समजायचं ते समजलं तिला, माझ्या
तिने जोरात खेचलं आत मला आणि दार लावून घेतलं.
मला तिच्या कुशीत शिरायचं होतं खूप रडायचं होतं, पण तिने पाहिलं वाक्य हेच उद्गारल आणि रडायला लागली...
" कुठे आमचं तोंड काळं करून आलीस, अरे माझ्या कर्म बलात्कार झालेल्या पोरीला कोण करेल,कोण नांदवेल?"
मी तिच्याकडे आसवेभरून पाहत होते, तिने मला ओढत बाथरूममध्ये लोटलं ...

बलात्कार झाला म्हणजे नक्की काय होतं ते मी अनुभवलं मनाने आणि शरीरानेदेखील.
बलात्कार होत नाही केलं जातो, जबरदस्तीने. . .अश्या वेदना दिल्या जातात ज्या शरीरावर आणि मनावर ओरखडे सोडून जातात.
कालान्तराने शरीरावरील ओरखडे लपतात किंवा पुसटतात पण मनाचं काय ?? मनावर होणारे ओरखडे कायम ताजे राहतात. कारण शरीरावरील जखमांपेक्षा मनावरील जखम जास्त वेदनादायक असतात.
त्या जखमा ताज्या राखल्या जातात, ताज्या केल्या जातात पुन्हा पुन्हा लोकांच्या नजरेने,तिला मारल्या जाणाऱ्या टोमण्यांनी, प्रत्येकवेळी बलात्कारिक म्हणून टोचून बोलण्याने,
सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा एखादी महिला तिच्या भावना वेदना न समजून बलात्कार झालाय म्हणजे तिने पाप केला आहे ह्या अविर्भाने पाहते.

प्रत्येक्षपणे एबलात्कार एकदाच सहन केलं जातो पण तो अनुभव हजारदा सहन करावा लागतो.
ती एक एक नजर तो अनुभव पुन्हा पुन्हा ताजे करून देतो ...

गोष्ट एकच फक्त स्वतःची मर्जी आणि बळजबरी ह्यावर सगळं डिपेंड असत.
स्वतःच्या मर्जीने केलं तर ती गोष्ट अमर्याद सुख आनंद समाधान देते
आणि
बळजबरीने झालं तर असह्य वेदना,अमर्याद आणि खोलपर्यंत मनाला आणि शरीराला ओरखडे देते.

काय किंमत असते हो एका बलात्कारिक स्त्रीला समाजात???
कधीच बलात्कारिक महिलेला सामान वागणूक मिळत नाही,तिला त्याच नजरेने पाहिलं जातं आणि अशी वागणूक मिळते कि पुन्हा नव्याने सुरुवात करणं अशक्य होऊन जातं.

नव्याने सुरुवात का केली पाहिजे ??
तीच जे आयुष्य चालू होत ते पुन्हा नीट चालू करायला का नाही कुणी मदत करत ??
नेहमीच तिच्या सोबत काहीतरी भयंकर घडलं आहे ह्याची जाणीव का करून दिली जाते ??

एका बलात्कार झालेल्या मुलीच लग्न झालंच तर तिला एखादा 3 मुलं असलेला माणूस किंवा बायको मेली आहे म्हणून पोरांना सांभाळणारी कुणीतरी पाहिजे, किंवा चाळीस पंचेचाळीस वय असलेला माणूस ज्याला त्याच्या मुलांनी वेगळं काढलं आहे,
कुणी तरी सोबत पाहिजे आयुष्य काढायला म्हणून त्या मुलीचं अश्या एखाद्या माणसासोबत लग्न लावलं जातं.

का ???
बलात्कार झालाय म्हणून ???
तिची इज्जत ओरबाडली गेली म्हणून ? ???
वीस पंचवीस वर्षाच्या मुलीनं चाळीस पन्नास वर्षाच्या माणसासोबत लग्न करायचं
आणि कमीत कमी लग्न झालं ह्या विचाराने समाधान मानायचं ????

लग्नआधी शरीर संबंध असलेल्या मुलींसोबत वाजत गाजत लग्न करतात,
काहींना माहित नसत आणि काहींना असलं माहित तरी भारी पोरगी भेटतेय म्हणून लपवून ठेवतात
ते चालत पण स्वतःची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करणारी नाही चालत.
का तर तिच्यासोबत जे झालं ते जगजाहीर झालं म्हणून ??
असं का वागवलं जातं तिला
तिची काय चूक, मी बोलले होते मला उचलून घेऊन जा ?? माझा रेप करा ??
माझी काय चुकी आहे शिंदे मॅडम ? ??

अंघोळ केली आणि तशीच बाहेर पडले घराच्या, आईने खूप थांबवलं, पण नाही थांबले, काय करणार होते थांबून आणि जगून तरी ??
दोन दिवस असंच वणवण फिरले,विचार करत बसले,ना खाल्लं ना पाणी घेतलं, जीव द्यायचा होता मला पण जमत नव्हतं.
काल अचानक ह्या लोकांनी मला शोधून नेलं
तिथे हि त्या मुलाच्या आईने पाच सहा कानाखाली वाजवल्या, त्यांच्या लोकांनी मारहाण केली
घाणेरड्या शिव्या दिल्या.

मला ते घेऊन जाताना कुणी पाहिलं आणि पोलिसात कळलं म्हणून मी इथे जिवंत आहे नाहीतर तुम्हाला माहित आहेच मोरे साहेब, नाही ??
..

पण खरं सांगू नाही जगायचं मला
अश्या समाजात,अश्या लोकांमध्ये जिथ अपराध्याला सोडून ज्याच्यावर अत्याचार झालाय त्यालाच सजा दिली जाते.
आणि जरी शासनाने मला सोडलं तरी सामाज्याचा नजरा पुन्हा पुन्हा बलात्कार करत राहतील ...
कुणी काही बोलत नव्हतं ना मोरे ना शिंदे
आजूबाजूची सगळी शांत
आसावरीने डोळे बंद केले
एक घामाची ओघळ तिच्या कानामागून गेली आणि ती कोसळली
शिंदे नि तिला उचललं मोरेनि दवाखान्यात दाखल केलं पण
3 दिवस अन्नाचा कणही नघेतल्याने आणि पाणी हि न पिल्याने
अंतर बाह्य शारीरिक वेदना त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने
अति विचार आणि अंगात त्राण नसताना पुन्हा ओल्या जखमांवर मार पडल्याने
हॉस्पिटल मध्ये पोहोचायला ती सगळ्या वेदना आणि प्रश्न मागे सोडून पुढच्या प्रवासाला पुढे निघून गेली होती . . . .

( हि कथा खूपच संवेदशील आहे , हल्ली घडत असलेल्या गुन्ह्यामुळं
कमीत कमी त्या महिलेच्या भावनांची वेदनांची पुसटशी जाणीव व्हावी ह्या साठी हा प्रयत्न
शासनाला चुकीचा ठरवण्याचा हेतू नाहीये
)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

असल्या लोकांना भर चौकात चांगला आठवडाभर हालहाल करून ठार मारला पाहिजे. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवायला पाहिजे म्हणजे हे प्रकार कमी होतील.

तुमची लिखाण शैली खरोखर उत्तम आहे.
वाचणारा त्या कथेत गुरफडून जातो प्रत्येक प्रसंग समोर घडत आहेत असे वाटत.
बाकी बलात्कार हा स्त्री च्या मनावर खोलवर आघात करतो.
आणि असा गुन्हा करणाऱ्या व्यक्ती ल अत्यंत कडक ,वेदना देणारी शिक्षा हवी असे माझे मत आहे.
पण काही स्त्रिया अशा कायद्यांचा गैर वापर करतात त्या मुळे कायद्या चे आणि अशा घटनेचे गांभीर्य कमी होत..
ही पण दुसरी बाजू आहे..
बलात्कार म्हणजे काय ह्याची चुणूक जाणवून घ्यायच्ची असेल तर .
ट्रेन मध्ये,किंवा बस मध्ये गर्दीच्या वेळी समलैंगिक व्यक्ती जेव्हा आपल्या मनाविरुद्ध आपल्या शरीराला स्पर्श करतात तेव्हा आपल्या कशा भावना होतात ह्याची आठवण काढावी.
प्रचंड संताप,आणि घृणा मना मध्ये येते

शिंदे कोण मोरे कोण काय कळालं नाही.

> देहव्यापार करतेस तू ??? शिंदे रागात म्हणाल्या
धंधा करतेस तू, वैश्या आहेस तू ??...
वैश्या शब्द ऐकताच तिने शिंदेमॅडम कडे अश्या नजरेनं पाहिलं कि शिंदेला जागीच जाळून टाकेल, समोरचा पाण्याने भरलेला ग्लास त्वेषाने जेलच्या साळयांवर भिरकावून तिने इतका वेळ धरलेला मौन तोडला आणि एका वाघिणी सारखी गरजली
तुझ्या मुलीवर त्या आमदाराच्या भाच्याने बलात्कार केला असता तर तुझ्या मुलीला वैश्या ठरवली असती तू??? > हे वाचून कालची समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट आठवली

Sameer Gaikwad
एका पोस्टवर वाचलं - इतकाच कंड होता तर ते वेश्यांकडे का गेले नाहीत !
लिहिणाऱ्याने संतापाच्या भरात उद्विग्न होऊन लिहिलेलं असणार. माझ्या मात्र काळजात धस्स झालं.
बंगालच्या उत्तर चोबीस परगणा जिल्हयातल्या खिदीरपाडा गावातून विकलं गेलेली नऊ वर्षाची शायना आठवली.
शायनाला दोनअडीच वर्षाचं असताना बांग्लादेशमधील प्रागपूरमधून विकलेलं होतं.
कोंबड्या ठेवायची खुराडी असतात तशी मुलींची खुराडी बांग्लादेशच्या सीमेवरील बऱ्याचशा खेडयात आढळतात.
शायनाला नंतर कोलकत्याच्या बाओबाजारमध्ये धंद्याला लावलेलं होतं.
एका रात्री ती गुरासारखी ओरडत होती, रडून ओरडून ती बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात न्यावं लागलं कारण काही केल्या ती शुद्धीवरच आली नव्हती. उगाच नसती ब्याद नको म्हणून अड्डेवाल्या मौसीने तिला डॉक्टरांकडे नेलं.
तिची अवस्था पाहून त्या महिला डॉक्टर ढसाढसा रडल्या, त्यांना गरगरलं !
तिला एका साध्या इस्पितळात भरती केलं गेलं, आठवडाभर इलाज चालला आणि अर्धवट बऱ्या झालेल्या अवस्थेत डिसचार्ज घेतला गेला.
तिला ज्यांनी तपासलं त्या डॉक्टरना हॉन्टेड फिल होऊ लागलं.
जेमतेम काही दिवसाच्या विश्रांतीनंतर तिला पुन्हा बिस्तर सजवावा लागला.
काही महिन्यानंतर अनेक विकृत लोक तिला शोधत येऊ लागले, एका विकृताने दुसऱ्याला सांगितलं आणि तिच्याकडे विकृतांची रीघ लागली.
वयाच्या विसाव्या वर्षी ती एड्सने गेली सुद्धा !
शायनाला काय झालं होतं जाणून घ्यायचंय ?
त्या रात्री तिच्याहून चौपट वय आणि वजन असलेल्या एका ट्रक ड्रायव्हरने तिची दोन्ही स्तनाग्रे चावून खाल्ली होती, छातीला जखमा झाल्या होत्या ! नऊ वर्षाच्या मुलीला उरोज ते किती असणार ! त्याने तिच्या अख्ख्या छातीला चावे घेतले होते..
नंतर निपललेस ब्रेस्टससाठीचे विकृत तिच्याकडे येत राहिले, त्यांनी तिला नासवलं...
कोलकत्याच्या सोनागाचीत वेश्यांसाठी काम करणाऱ्या दरबार एनजीओच्या कोणत्याही वेश्येला शायनाबद्दल विचारलं की त्यांचे डोळे टच्चकन पाण्याने भरतात.
इथे कुणी तरी सहज लिहून जातो, त्या ट्रक ड्रायव्हर - क्लिनरला इतकाच कंड होता तर त्यांनी वेश्येकडे जायला हवं होतं !
मुद्दा त्यांनी कुठं जायला हवं होतं हा कधीच नव्हता हेच आपल्याला कळत नाही,
त्यांनी आपल्या कामेच्छांचं काय करायला हवं होतं हे त्यांनाच नव्हे तर प्रत्येक पुरुषाला नेमकं आणि नेटकं कळायला हवं हा मुद्दा आहे आणि त्यापासून सगळेच पळ काढताहेत ...
- समीर गायकवाड.
===

पुढे कथा वाचली नाही.
पण परत एकदा पात्रांची (आड)नावं काय ठेवायची हे लेखक कसे ठरवतात हा विचार मनात आलाच.

इथे कुणी तरी सहज लिहून जातो, त्या ट्रक ड्रायव्हर - क्लिनरला इतकाच कंड होता तर त्यांनी वेश्येकडे जायला हवं होतं !
मुद्दा त्यांनी कुठं जायला हवं होतं हा कधीच नव्हता हेच आपल्याला कळत नाही,
त्यांनी आपल्या कामेच्छांचं काय करायला हवं होतं हे त्यांनाच नव्हे तर प्रत्येक पुरुषाला नेमकं आणि नेटकं कळायला हवं हा मुद्दा आहे आणि त्यापासून सगळेच पळ काढताहेत ...
- समीर गायकवाड. >>>>>> वाचून निशब्ध व्हायला झाले घशाला कोरड पडली.

एका पोस्टवर वाचलं - इतकाच कंड होता तर ते वेश्यांकडे का गेले नाहीत !
लिहिणाऱ्याने संतापाच्या भरात उद्विग्न होऊन लिहिलेलं असणार. माझ्या मात्र काळजात धस्स झालं.
बंगालच्या उत्तर चोबीस परगणा जिल्हयातल्या खिदीरपाडा गावातून विकलं गेलेली नऊ वर्षाची शायना आठवली.
शायनाला दोनअडीच वर्षाचं असताना बांग्लादेशमधील प्रागपूरमधून विकलेलं होतं.
कोंबड्या ठेवायची खुराडी असतात तशी मुलींची खुराडी बांग्लादेशच्या सीमेवरील बऱ्याचशा खेडयात आढळतात.
शायनाला नंतर कोलकत्याच्या बाओबाजारमध्ये धंद्याला लावलेलं होतं.
एका रात्री ती गुरासारखी ओरडत होती, रडून ओरडून ती बेशुद्ध पडली. दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात न्यावं लागलं कारण काही केल्या ती शुद्धीवरच आली नव्हती. उगाच नसती ब्याद नको म्हणून अड्डेवाल्या मौसीने तिला डॉक्टरांकडे नेलं.
तिची अवस्था पाहून त्या महिला डॉक्टर ढसाढसा रडल्या, त्यांना गरगरलं !
तिला एका साध्या इस्पितळात भरती केलं गेलं, आठवडाभर इलाज चालला आणि अर्धवट बऱ्या झालेल्या अवस्थेत डिसचार्ज घेतला गेला.
तिला ज्यांनी तपासलं त्या डॉक्टरना हॉन्टेड फिल होऊ लागलं.
जेमतेम काही दिवसाच्या विश्रांतीनंतर तिला पुन्हा बिस्तर सजवावा लागला.
काही महिन्यानंतर अनेक विकृत लोक तिला शोधत येऊ लागले, एका विकृताने दुसऱ्याला सांगितलं आणि तिच्याकडे विकृतांची रीघ लागली.
वयाच्या विसाव्या वर्षी ती एड्सने गेली सुद्धा !
शायनाला काय झालं होतं जाणून घ्यायचंय ?
त्या रात्री तिच्याहून चौपट वय आणि वजन असलेल्या एका ट्रक ड्रायव्हरने तिची दोन्ही स्तनाग्रे चावून खाल्ली होती, छातीला जखमा झाल्या होत्या ! नऊ वर्षाच्या मुलीला उरोज ते किती असणार ! त्याने तिच्या अख्ख्या छातीला चावे घेतले होते..
नंतर निपललेस ब्रेस्टससाठीचे विकृत तिच्याकडे येत राहिले, त्यांनी तिला नासवलं...
कोलकत्याच्या सोनागाचीत वेश्यांसाठी काम करणाऱ्या दरबार एनजीओच्या कोणत्याही वेश्येला शायनाबद्दल विचारलं की त्यांचे डोळे टच्चकन पाण्याने भरतात.
इथे कुणी तरी सहज लिहून जातो, त्या ट्रक ड्रायव्हर - क्लिनरला इतकाच कंड होता तर त्यांनी वेश्येकडे जायला हवं होतं !
मुद्दा त्यांनी कुठं जायला हवं होतं हा कधीच नव्हता हेच आपल्याला कळत नाही,
त्यांनी आपल्या कामेच्छांचं काय करायला हवं होतं हे त्यांनाच नव्हे तर प्रत्येक पुरुषाला नेमकं आणि नेटकं कळायला हवं हा मुद्दा आहे आणि त्यापासून सगळेच पळ काढताहेत ...
- समीर गायकवाड.
===मी कथा पूर्ण नाही वाचली , पण अँमी यांची ही प्रतिक्रिया वाचून सुन्न झाले .

AMI मॅम तुमची पोस्ट पाहून निशब्द . . .
आतून काहीतरी झालं ते वाचून, काय ते शब्दांत नाही सांगू शकते .. .

खरे सांगायचे तर.
भारतात पोलिस यंत्रणा आणि न्याय यंत्रणा
सक्षम नाही.
सवेदांशिलाता,तत्पर पना,कायद्याची बुज,
प्रामाणिक आणि कार्याला वाहून घेणारी वृत्ती नाही त्या मुळेच समाजात गुन्हेगारी वाढली आहे.
समाजाचं बोललं तर समाज मृत झालेला आहे.
सोशल नेटवर्क वरील व्यक्त होणार समाज आणि प्रतकाशात अस्तित्वात असलेला समाज ह्या मध्ये खूप अंतर आहे.
सर्व समक्ष गुन्हे घडत असताना तटस्थ राहणारा समाज सोशल मीडिया व्यक्त होताना समाजप्रिय आणि कर्तव्य निश्ट असल्याचा भास निर्माण करतात.
मुळात समाज जर जागरूक असता तर .
न्याय यंत्रणा आणि पोलिस ह्यांना काही कामच शिल्लक राहिले नसते.
गुन्हा सिद्ध करण्यासाठी साक्षीदार मिळत नाहीत.त्या मुळे किती तरी केस मध्ये गुन्हेगार कोर्टात निर्दोष सुटतात..
साक्ष देण्यास सुधा समाजात कोण्ही पुढे येत नाही ही रिऍलिटी आहे.
फक्त fb आणि बाकी मीडिया वर च खर आहे असं मानलं तर ही वेळ यायलाच नाही पाहिजे

सोहनी सोहनी ..तुमची लिखाण शैली खूपच चांगली आहे..जे लिहिता ते पोहचत वाचका पर्यंत..कथेतील पात्रामध्ये अडकला जातो वाचक..मन सुन्न झाले शोकाने आणि रागाने...समाज बदलला पाहिजे..घरातूनच मुलांना लहापणापासूनच स्त्रियांचा आदर करायला शिकवायला पाहिजे आणि मुलींना आत्मसंरक्षन करायला ..शयाना ची कथा वाचून तर वाटले की माणसापेक्षा प्राणीच चांगले आहेत ..कमीतकमी त्यांच्यात नर मादीच्या इच्छेचा मान ठेवतो...इथे तर हे लोक स्त्री शरीर भक्षी राक्षस आहेत Sad

खूप भयानक आहे हे सगळ.....खूप डिप्रेस्ड वाटतंय वाचून....राक्षस च भरलेत का जगात......कधी मिळणार यांना शिक्षा.....आणि वेष्या असली म्हणून काय झालं, ती काय स्वतःच्या मनाने पडते का या धंद्यात....तीच आयुष्य कस असेल कल्पनाही करता येत नाही....देव नाहीच आहे का जगात

वेडोबा रडोबा होवू नका.
सर्व क्षेत्रात स्त्रिया नी उतुंग भरारी मारली आहे.
आरक्षण देवून लोकसभा पासून ग्राम पंचायत पर्यंत स्त्री ल प्रतींधित्व दिले आहे.
आज राष्ट्रपती पासून सरपंच पर्यंत स्त्रिया विराजमान आहेत.
करोडो स्त्रिया हवे तसे कपडे परिथान करून मुक्त जीवन जगत आहेत..
लष्करी दलात स्त्रिया क्षत्रु chya मनात धडकी भरवत आहेत.
असंख्य कायद्याचे मजबुत कवच स्त्रिया न भोवती आहे.
संकट अनेक प्रकारची असतात ती येतच राहणार .
विश्वाच्या अंतापर्यंत