तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

आमच्याकडे निळ्या रंगांची मार्गारिटा आहे ,दीड वर्षांपूर्वी गोव्याहून आणली होती,कशी प्यायची असते ती?
मी अजून दारूचा थेंब सुद्धा प्यायले नाही,पण हीचा रंग बघून प्यावीशी वाटत आहे,
जरा व्यवस्थित लागेल चवीला असे प्रकार सांगा

अल्कोहोल आहे का नुसता मार्गारिटा मिक्स आहे?>>>>नाही माहीत Sad मला वाटले गोव्यातून घेतली म्हणजे अल्कोहोल असणारच,पण हा तर नवाच मुद्द्या निघाला
खरंतर नवऱ्याला जरा सरप्राईज द्यायचा विचार होता,डायरेक्ट एकदम भारी सर्व करून ,बघूया शनिवार पर्यन्त काही चांगले क्लू मिळाले तर बरे होईल Happy

अजून एक त्यावर बेस्ट बिफोर असे लिहिले नाही,17 ची मनुफॅक्टअरिंग आहे,आता 2yrs झाली तर असेल का चांगली?
नाहींतर मारे मी इथे शोधून,विचारून काहीतरी भारी सर्व्ह करेन आणि एक्सपायरी डेट झाल्यामुळे ते प्रकरण भलतंच काहीतरी व्हायचं Lol
आणि ,मी कधी दारू बिअर थोडे पण टेस्ट केलं नाही,मी ही एक्सपायरी डेट चीमार्गारिटा पिऊन आजारी पडले तर दवाखान्यात जायची पण लाज वाटेल हो Lol

>>अजून एक त्यावर बेस्ट बिफोर असे लिहिले नाही,17 ची मनुफॅक्टअरिंग आहे,आता 2yrs झाली तर असेल का चांगली?<<
मार्गरिटा ब्लेंड असावी (तकिला + क्युरसाव). ब्लेंड असली तर तारखेची चिंता करु नका. मार्गरिटाच्या भरपुर रेसिपिज नेट वर सापडतील...

थोडे वेगळ्या वाटेला जाउया.
आपापल्या आवडीनुसार मनसोक्त प्राशन झाळयानंतरही अपूर्ण वाटत राहात . आता पुढे काय असा प्रश्न पडतो. आलेल्या सुंदर झोक्याला अजून मोहक कसे बनवता येईल ?
त्यावर अचानकच एक शोध लागला.
मन्डळी निघतानाच्या गप्पा मारत पानवाल्याच्या ठेल्यापाशी उभे होतो. इतक्यात एका मित्राने एक , पानाचा एक तृतियांश / चतकोर आणून दिला आणि अलगद तोण्डात धरून ठेवायला सांगितले. हळूःहळू रस जसा विरघळू लागला तसा एक सुंदर धक्का मिळाला... धडधड जाणवू लागली.. मोरपिसासारखे "वार्‍यावारती घेत लकेरी" अवस्था आली. यातून बाहेर पडावेसे वाटत होते पण जमात नव्हते.....
मग एक दोन घोट पाणी प्यायालयानंतर परत माणसात येऊन ठेपलो.
हे पान म्हणजे + रिमझीम + वेलची" असे होते !
जरा जपूनच ! मात्र परत परत ट्राय करावेसे वाटण्याची हमी आहे.

BTW
मी तंबाखू तर जाउ द्या , साधं पानही ना खाणारा माणूस आहे.

<<रिमझिम घातलेल्या पानाला फुलचन्द पान म्हणतात ना..>>
खर्ं तर मला फारशी कल्पना नाही.

<<रिमझिम म्हणजे?>>
हा तम्बाकूचा एक "खानदानी" नातलग असावा!

नका खाऊ रिमझिम, तो तंबाखू पेक्षा गुटख्याच्या जवळ जातो
अतिशय बेकार
बेकार शॉट लागतो आणि मी एकदा खाउन पहिला कुतूहलापोटी
बकाबका ओकलो होतो रस्त्यातच आणि नंतर कितीतरी वेळ कळत नव्हतं काय चाललंय ते
तेव्हा कानाला खडा, परत आयुष्यात कधी खाणार नाही

दारू वर जर्दा/तंबाखू हे कॉम्बिनेशन डेंजर ठरू शकते.
त्याने hallucinations होऊ शकतात, डोक्यात जे येत आहे ते खरंच घडत आहे, आणि इतर प्रकारचे.

काही पानवाले ग्राहक आपल्याकडे परत परत यावे म्हणून त्यात अगदी कमी प्रमाणात भांग घालतात ज्यामुळे खाणाऱ्याची "ब्रम्हानंदी टाळी" लागते.
असेच काही वर लिहिले तेथे झाले असू शकते.
अशा पानवाल्यांपासून लांब रहावे ही विनंती.

तीच तीच कॅप्टन मॉर्गन, सिग्नेचर, RC, अँटिक्विटी वगैरे घेऊन कंटाळा आलाय, ओल्ड मॉंक आवडते, पण काहीतरी चेंज पाहिजे.. एखादा बजेट ब्रँड सुचवा..

ओल्ड मॉंक चा कंटाळा येतो या विधानाला जोरदार आक्षेप

पाहिजे तर त्यांचा प्रीमियम ट्राय करा, एकदम समुद

बदल केला आशुभाऊ, लिहितानाच मला चुकल्यासारखं वाटत होतं खरं तर, पण चवीत बदल हवा म्हणून.. पुण्यात mansion house सहजासहजी भेटत नाहीये, दुसरी कोणती ब्रँडी चांगली आहे?

Pages