१ गड्डी फ्लॉवर/ पाव किलो
२-३ पाकळ्या लसूण (पातळ काप)
१ छोटा चमचा काळीमिरी पूड
चवीनुसार मीठ
अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स
अर्धा ते एक कप दूध (तापवून घेतलेलं)
ऑलिव्ह ऑइल किंवा बटर
फ्लॉवर ची फुलं बारीक करून पाण्यात चांगली उकळावी, उकळताना पातेल्यावर झाकण ठेऊ नये. फ्लॉवर चांगला शिजला की प्युरे करून घ्यावी. वाटताना थोडे पाणी घालून वाटले तर छान पेस्ट तयार होते.
सॉस पॅन मध्ये बटर किंवा ऑलिव्ह ऑइल गरम करावे, त्यात पातळ चिरलेले लसणाचे काप परतावे चांगले खमंग हलके ब्राऊन झाल्यावर तयार फ्लॉवर प्युरे त्यात घालावी, हलकेसे परतून त्यात पाणी ऍड करावे (फ्लॉवर शिजताना उरलेले पाणी वापरावे) थोडीशी उकळी आल्यावर त्यात कपभर दूध घालावे.
लहानशी उकळी फुटल्यावर मीठ मिरपूड घालावी, तिखटसर होण्यासाठी उकळताना चिली फ्लेक्स घातले तरी चालतील. २-३ मिनिटे हलकेसे उकळून दाट झाले की सर्व्ह करावे.
डाएट साठी उत्तम, दूध ही गायीचे वापरल्यास कॅलरीज कमी होतात!
(No subject)
veglich recepi. Try karun
veglich recepi. Try karun pahin
छान
छान
@ प्राजक्ता अहिरे nakki try
@ प्राजक्ता अहिरे nakki try kara, mala sanga kashi watli. Chan lagta he soup, sadharan white sauce cha javal janari chav!
हे उग्र नाही लागणार का?
हे उग्र नाही लागणार का?
पाकृ मस्त आहे पण. फोटोही छान.
@ harihar, ugra lagat nahi,
@ harihar, ugra lagat nahi, flower changla blanch kela ki ugrapana jato, cooker madhe shijvun kiva jhakan theun shijvun ghetla tar ugra hou shakel.. white sauce kiva cream of broccoli sarkhe lagte
छान वाटतेय रेसिपी
छान वाटतेय रेसिपी
हे मस्त दिसतंय. मला फ्लॉवर
हे मस्त दिसतंय. मला फ्लॉवर अजिबात आवडत नाही. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये प्रोटीन ( सामिष पदार्थ ) सोबत अनेकदा फ्लॉवरची प्युरी वापरलेली पाहिली, तेव्हा हे कसं लागेल याबद्दल कुतूहल वाटे.
कधीतरी करून पाहायला हवं.
फोटो छान आहेत. पण मला
फोटो छान आहेत. पण मला फ्लॉवरचं असं काही करवणार नाही. एकूणातच फ्लॉवरला चांगले दिवस आलेले दिसत आहेत. कॉलीफ्लॉवर क्रस्ट पिझ्झा, कॉलीफ्लॉवर राईस, बार्बेक्यू कॉलीफ्लॉवर टाको असे नवीन प्रकार पाहिलेत.
पाद्रूस वासाच्या कोबीला इतकं
पाद्रूस वासाच्या कोबीला इतकं नटवणं म्हणजे...
आमच्या इथे फुलकोबी भाजीत, मसालेभातात अन अतीच चांगला असेल (अर्थात भार्तातत्या हिवाळ्यात) तर तात्पुरत्या लोणच्यात सद्गती पावतो.
रच्याकने, वरच्या रेस्पीत थिकनिंक काहीही वापरलेलं नाहीत तरीही फोटोतला जिन्नस एकदम मऊ पोताचा, एकसंध वाटतोय ते कसं काय?
वा! नक्की करुन पहाणार
वा! नक्की करुन पहाणार
@भरत नक्की करून पाहा!
@भरत नक्की करून पाहा!
@अंजली_१२ मी बाकी अजून काही करून बघितलं नाही पण सूप आवडलं!
@योकु, फ्लॉवर लोणच्यात तर छान लागतोच, आणि प्युरे केल्याने आणि दूध घातल्याने सूप खूप क्रिमी होतं एकदा ट्राय करून बघा! खूप नटवावं लागलं नाही!
@सामो आवडलं का कळवा!
खूप पूर्वी ही रेसिपी केली
खूप पूर्वी ही रेसिपी केली होती, अजिबातच आवडली नव्हती. फक्त फ्लॉवर च नुसतं सूप काही छान लागत नाही
फ्लॉवरचा एक प्रकारचा बेचवपणा
फ्लॉवरचा एक प्रकारचा बेचवपणा आवडतो त्यामुळे सूप आवडेलसे वाटते. क्रीमी सूप्स आवडतातच.
@ सामो, क्रीमी सूप्स आवडतातच+
@ सामो, क्रीमी सूप्स आवडतातच++१
@ राजसी - ओह्ह, चालायचंच!
@ राजसी - ओह्ह, चालायचंच! फ्लॉवर ऐवजी ब्रोकोली + बदाम सूप ट्राय करून बघा मग!
फोटो एकदम भारी आलाय.
फोटो एकदम भारी आलाय.
फ्लॉवरची भाजी आवडते पण सूप आवडेल अस वाटत नाहीये.
हं, ब्रोकोली आमंड सूप ट्राय
हं, ब्रोकोली आमंड सूप ट्राय करीन. सीम्स इंटरेस्टिंग
@ मी नताशा, चालायचंच, पण करून
@ मी नताशा, चालायचंच, पण करून बघा कदाचित आवडेल!
@योकु, सीम्स इंटरेस्टिंग++१ येस!
योकु तुम्ही कोबी का लिहिलं
योकु तुम्ही कोबी का लिहिलं आहे, फ्लॉवरची रेसिपी आहे. सूप कॉर्न स्टार्च टाकल्यासारखं दाट दिसत आहे आणि टेम्पटिंग वाटतंय पण चवीबद्दल शंका आहे.
केलं. आत्ताच घाबरत घाबरत
केलं. आत्ताच घाबरत घाबरत टेस्ट केलं.
छान लागलं.
प्रतिसाद देऊन संपवतोय.
योकु तुम्ही कोबी का लिहिलं
योकु तुम्ही कोबी का लिहिलं आहे, फ्लॉवरची रेसिपी आहे>>>>>>>>>> मला पण हे कन्फुजन होतं पण बरेच लोकं 'फुलकोबी' फ्लॉवरला म्हणतात.
पर्वावर प्यूरे बऱ्यापैकी थिंक
फ्लावर प्यूरे बऱ्यापैकी थिक होते. उलट आणखी पाणी घालायला लागलं.
आज मुलगी घरी येणारे
आज मुलगी घरी येणारे (हॉस्टेलवरुन), अनायासे घरात फ्लॉवर आहे. सूप करेन पाककृती यमी आहे. धन्यवाद.
__________________
मी तूपामध्ये केलं. खूप छान लागलं. आवडलं.
@ भरत. सामो Dhanyawad chan
@ भरत. सामो Dhanyawad chan watla ki tumhi try kelat!
flower Pure ghatta hote! pani kiva dudh ghalun adjust karava lagta!
@सामो - tupat tar chanch lagta baryach lokana tupacha vaas awdat nahi mhanun butter ani olive oil cha option dila me ekti khanar asle ki tupat karte gharche koni asle ki olive oil!
फ्लावर आवडतो. करुन पाहीन.
फ्लावर आवडतो. करुन पाहीन.