फ्लॉवर सूप

Submitted by TI on 25 November, 2019 - 02:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ गड्डी फ्लॉवर/ पाव किलो
२-३ पाकळ्या लसूण (पातळ काप)
१ छोटा चमचा काळीमिरी पूड
चवीनुसार मीठ
अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स
अर्धा ते एक कप दूध (तापवून घेतलेलं)
ऑलिव्ह ऑइल किंवा बटर

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर ची फुलं बारीक करून पाण्यात चांगली उकळावी, उकळताना पातेल्यावर झाकण ठेऊ नये. फ्लॉवर चांगला शिजला की प्युरे करून घ्यावी. वाटताना थोडे पाणी घालून वाटले तर छान पेस्ट तयार होते.
सॉस पॅन मध्ये बटर किंवा ऑलिव्ह ऑइल गरम करावे, त्यात पातळ चिरलेले लसणाचे काप परतावे चांगले खमंग हलके ब्राऊन झाल्यावर तयार फ्लॉवर प्युरे त्यात घालावी, हलकेसे परतून त्यात पाणी ऍड करावे (फ्लॉवर शिजताना उरलेले पाणी वापरावे) थोडीशी उकळी आल्यावर त्यात कपभर दूध घालावे.
लहानशी उकळी फुटल्यावर मीठ मिरपूड घालावी, तिखटसर होण्यासाठी उकळताना चिली फ्लेक्स घातले तरी चालतील. २-३ मिनिटे हलकेसे उकळून दाट झाले की सर्व्ह करावे.

IMG_20191114_192011.jpgIMG_20191114_191934.jpg

वाढणी/प्रमाण: 
गार्निश - थोडेसे चिली फ्लेक्स, थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा तळलेले लसूण काप! वरील प्रमाण घेतल्यास अंदाजे २ जणांसाठी पुरते!
अधिक टिपा: 

डाएट साठी उत्तम, दूध ही गायीचे वापरल्यास कॅलरीज कमी होतात!

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ harihar, ugra lagat nahi, flower changla blanch kela ki ugrapana jato, cooker madhe shijvun kiva jhakan theun shijvun ghetla tar ugra hou shakel.. white sauce kiva cream of broccoli sarkhe lagte

हे मस्त दिसतंय. मला फ्लॉवर अजिबात आवडत नाही. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया मध्ये प्रोटीन ( सामिष पदार्थ ) सोबत अनेकदा फ्लॉवरची प्युरी वापरलेली पाहिली, तेव्हा हे कसं लागेल याबद्दल कुतूहल वाटे.
कधीतरी करून पाहायला हवं.

फोटो छान आहेत. पण मला फ्लॉवरचं असं काही करवणार नाही. एकूणातच फ्लॉवरला चांगले दिवस आलेले दिसत आहेत. कॉलीफ्लॉवर क्रस्ट पिझ्झा, कॉलीफ्लॉवर राईस, बार्बेक्यू कॉलीफ्लॉवर टाको असे नवीन प्रकार पाहिलेत.

पाद्रूस वासाच्या कोबीला इतकं नटवणं म्हणजे... Uhoh
आमच्या इथे फुलकोबी भाजीत, मसालेभातात अन अतीच चांगला असेल (अर्थात भार्तातत्या हिवाळ्यात) तर तात्पुरत्या लोणच्यात सद्गती पावतो.

रच्याकने, वरच्या रेस्पीत थिकनिंक काहीही वापरलेलं नाहीत तरीही फोटोतला जिन्नस एकदम मऊ पोताचा, एकसंध वाटतोय ते कसं काय?

@भरत नक्की करून पाहा!
@अंजली_१२ मी बाकी अजून काही करून बघितलं नाही पण सूप आवडलं!
@योकु, फ्लॉवर लोणच्यात तर छान लागतोच, आणि प्युरे केल्याने आणि दूध घातल्याने सूप खूप क्रिमी होतं एकदा ट्राय करून बघा! खूप नटवावं लागलं नाही!
@सामो Happy आवडलं का कळवा!

खूप पूर्वी ही रेसिपी केली होती, अजिबातच आवडली नव्हती. फक्त फ्लॉवर च नुसतं सूप काही छान लागत नाही

फोटो एकदम भारी आलाय.

फ्लॉवरची भाजी आवडते पण सूप आवडेल अस वाटत नाहीये.

योकु तुम्ही कोबी का लिहिलं आहे, फ्लॉवरची रेसिपी आहे. सूप कॉर्न स्टार्च टाकल्यासारखं दाट दिसत आहे आणि टेम्पटिंग वाटतंय पण चवीबद्दल शंका आहे.

योकु तुम्ही कोबी का लिहिलं आहे, फ्लॉवरची रेसिपी आहे>>>>>>>>>> मला पण हे कन्फुजन होतं पण बरेच लोकं 'फुलकोबी' फ्लॉवरला म्हणतात.

आज मुलगी घरी येणारे (हॉस्टेलवरुन), अनायासे घरात फ्लॉवर आहे. सूप करेन Happy पाककृती यमी आहे. धन्यवाद.
__________________
मी तूपामध्ये केलं. खूप छान लागलं. आवडलं.

@ भरत. सामो Dhanyawad Happy chan watla ki tumhi try kelat!
flower Pure ghatta hote! pani kiva dudh ghalun adjust karava lagta!
@सामो - tupat tar chanch lagta Happy baryach lokana tupacha vaas awdat nahi mhanun butter ani olive oil cha option dila Happy me ekti khanar asle ki tupat karte gharche koni asle ki olive oil! Happy