२९ सप्टेंबर २०१४
--------------------
उद्या लुक्लासाठी निघायचं असल्यामुळे थोडीफार आवश्यक खरेदी आणि bag packing ही दोन मुख्य कामे होती. त्याशिवाय लेहमधल्या expedition ‘स्टोक कांगरी’चा आमचा स्वैपाकी प्रकाश भेटायला येणार होता. त्या ट्रेकमधल्या त्याने बनवलेल्या चवदार खाण्यामुळे आम्ही त्याचे नाव Delicious ठेवले होते. तर असा हा ‘डेलिशियस’ दोन वर्षांनी मला भेटला. थोडावेळ त्याच्याशी गप्पा मारून इतर बारीक-सारीक कामं उरकली आणि जास्तीचं सामान आमच्या हॉटेलमधेच जमा करून लवकरच झोपून गेलो.
३० सप्टेंबर २०१४
--------------------
शेवटी तो दिवस उजाडलाच. ४:४५ चा गजर वाजला. खरंतर रात्रभर झोप अशी लागलीच नव्हती. ५:३० वाजता बाहेर पडलो.टॅक्सीने डोमेस्टिक एअरपोर्टवर पोहोचलो. विमानतळाला जवळजवळ एखाद्या बस स्टेशनची कळा आली होती. सगळ्या गडबड-गोंधळात तारा एअरलाइन्सच्या एका काउंटरवर थोडावेळ उभे राहिलो. मग तिथून आम्हाला दुसरीकडे जाण्यास सांगितलं. सामान जमा करून बोर्डिंग पासेस घेऊन आत गेलो. फ्लाइट अनाउन्स होऊन आम्ही बसमधे बसलो. एअरपोर्टवर पोहोचून तिथे बराच वेळ नुसतेच थांबल्यावर आम्हाला परत main buildling कडे नेण्यात आलं. विचारल्यावर कळलं, की आमच्या विमानाचं टायर पंक्चर झालं होतं. उडताना नसता तरी land होताना problem होऊ शकला असता.मग जवळजवळ दोन तासांनी आम्ही परत बसमधे बसलो आणि पूर्ण एअरपोर्टला एक फेरी मारून आमच्या छोटेखानी विमानाजवळ आलो. आत बसल्यावर मात्र अजिबात वेळ न घालवता विमानाने take off घेतला होता.
तेनसिंग नोर्गे एअरपोर्ट म्हणूनदेखील ओळखला जाणारं हे विमानतळ सर्वांत भयानक म्हणून गणलं गेलं आहे.
याफ्लाइटबद्दल आणिलँडिंगबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्याबद्दल थोडी भीती आणि उत्सुकता दोन्हीही होतं. इथल्या अरुंद आणि उतारावर असलेल्या धावपट्टीमुळं इथे छोटी विमानंच उतरू शकतात. अशा धावपट्टीवर विमान उतरवणे आणी पुन्हा उडवणं यासाठी मोठंच कौशल्य लागतं. आमच्या विमानाने take off घेतला आणी आम्हाला हिमच्छादित पर्वतरांगांवरून ४५ मिनिटांत लुक्लाला आणले. चढत जाणाऱ्या धावपट्टीवर जेव्हा विमान अलगदपणे उतरले, तेव्हा सर्व प्रवाशांनी वैमानिकाच्या कौशल्याला उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली.
सामान घेऊन जवळच्याच एका cafe मधे breakfast करून आमच्या पहिल्या camp कडे चालू लागलो. खरंतर आज मोंजो या ठिकाणी पोहोचायचा विचार होता. परंतु उशिरा पोहोचल्यामुळे‘फाकडिंग’ या ठिकाणी पहिला मुक्काम करायचं ठरवलं. ११ वाजता चालायला सुरुवात केली. चालताना वेगवेगळ्या ठिकाणांहुन आलेले लोक भेटत होते आणि आम्ही दोन भारतीय मुली असल्याचं बघुन त्यांना कौतुकही वाटत होते,भारतीय आणि ते पण मुली अशा एकट्या कुठे जात नाहीत असा त्यांचा समज होता.
खूप सारी वळणे, थोडी चढण आणि थोडा उतार... खालच्या दरीमधून ‘दूधकोसी’ वाहताना दिसत राहते. कित्येक झुलते पूल पार करून आम्ही फाकडिंगला पोहोचलो. ‘स्नोलँड टी हाउस’मधे खोली घेऊन गावात थोडे फिरून आलो.डायनिंग रूममधे बसलो असताना अमेरिकेहून आलेल्या कार्लची ओळख झाली. तो इथून जवळच असलेल्या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमधे volunteering साठी आला होता. ऑस्ट्रेलियाहून आलेल्या तिघी मैत्रिणी आणी कार्ल यांच्याशी बोलत वेळ पटपट गेला. जेवणं झाल्यावर लवकरच बिछाना गाठला.
१ ऑक्टोबर २०१४
--------------------
आज आम्हाला नामचे बझार या ठिकाणी पोचायचं होतं. सुरुवातीला थोडा चढ आणि उतार चालून झाल्यावर ‘जोरसाले’ नावाच्या गावी जेवणासाठी थांबलो. जोरसालेच्या थोडं अलीकडंच सागरमाथा नॅशनल पार्कसाठीचं entry permit office आहे. जोरसालेनंतर वाट बरीचशी चढावाची असूनही ती खूपच सुंदर, दाट जंगलांतून जाणारी असल्याने उन्हाचा त्रास होत नाही आणि चालणं खूपच सुखकर होतं. नामचेच्या अलीकडंफर्स्ट व्ह्यू पॉइंट आहे. इथं‘माउंट एव्हरेस्ट’चं पहिलं दर्शन घडतं. परंतु आज ढगाळ वातावरणामुळं काहीच दिसत नव्हतं. नामचे बझारची समुद्रसपाटीपासुन उंची ३४५० मीटर असल्यामुळं इथे तुमचं शरीर उंच हवामानाला सरावलेलं (acclimatize) नसेल तर त्रास होऊ शकतो. त्यामुळं बहुतेक जण इथं एक दिवसाची विश्रांती घेतात. ‘एव्हरेस्ट लॉज’मधे थांबलो.
आधिचा भाग वाचा,
https://www.maayboli.com/node/72444
वाचतोय
वाचतोय
मी पण. भाग थोडे मोठे चालतील.
मी पण. भाग थोडे मोठे चालतील.
वा... छान चालु आहे... अजुन
वा... छान चालु आहे... अजुन थोडं सविस्तर माहिती आणि फोटो आले तर मजा येईल वाचायला....
वाह!!! फार रोचक सफर आहे.
वाह!!! फार रोचक सफर आहे. वर्णनही खूप मस्त करताय.
वाचतेय..
वाचतेय..
वाचतेय. थोडे मोठे भाग टाकाल
वाचतेय. थोडे मोठे भाग टाकाल का?
मस्तच पुढचा भाग लवकर येउदे!
मस्तच पुढचा भाग लवकर येउदे!