फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by भरत. on 24 November, 2019 - 22:22 >>>

आता मोड ऑफ केलात तरी हरकत नाही...

राज +१.
आक्षेप रा काँ चा पाठिंबा घेण्याला नाही. इतक्या साधनशुचितेची अपेक्षा तर आता कुणीच करत नाही ( एखाद्या अधिकार्‍याने पैसे खाऊच नयेत हे फार आदर्शवादी झाले, कमी खावेत व कामे करावीत हेच फार झले)

अजित पवार यांनी खरेच काही आमदार घेऊन पक्ष फोडला असतात तर इतकी टीका झाली नसती. पण हे अती किळसवणे आहे. उद्या एखाद्या रेंडम माणसाने विनोद तावडेंसारखा मेक अप केला व मध्यरात्री राज्यपालांना निम्म्या भाजप आमदारांच्या "सह्या" असलेले पत्र दिले तर त्याचा पहाटे शपथ विधी करणार का ? अपलेच पैसे बेंकेतून काढताना सही चारदा तपासली जाते. इथे सह्याच्या कागदावर शपथविधी. तोही पहाटे ?

अरे लोकहो,
२०१४ पासून आपण द्विपक्षीय अध्यक्षीय राजवटीच्या दिशेने जोरदार वाटचाल केलेली आहे. आता राजकारणात भाजप आणि कॉग्रेस हे दोनच ध्रुव आहेत आणि राहतील. ते का आहेत कारण स्पर्धा/निवडणूक म्हंटली की कमीतकमी दोन लागतात. बाकी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे ह्या दोन ध्रुवांचे तापुरते खेळणे आहेत. ठाकरे, पवार ह्या थोडी ताकद आणि करिष्मा बाळगून असलेल्या लोकांमुळे हे खेळणी अस्तित्वात आहेत ईतकेच. बाकी राष्ट्रवादी ही काँग्रेसच आहे आणि आता शिवसेनेचा बराचसा मतदार भाजपकडे वळत आहे.
दोन ध्रुवीय पक्षात मोठे सरदार आपापल्या जागी खंबीर आहेत छोटे सरदार आणि शिलेदार ईथून तिथून एकच आहेत आणि ते दलबदल करीत राहतील. त्यांना फार महत्व नाही द्यायचे, अशा लोकांना फार मोठा भविष्यकाळ नाही.
दोनेक दशकात फक्त काँग्रेस आणि भाजप असेच चित्र असणार आहे. कॉग्रेस आज जेवढी हतबल आणि कमकुवत आहे ती सुद्धा गांधी नाव टाकून देऊन पुन्हा सक्षम होईल. तोवर ह्या दोन्ही ध्रुवांच्या मधले खेळणे पक्ष कोणाच्या हातात आहेत ते जास्त मनावर नाही घ्यायचे.

नवीन Submitted by vijaykulkarni on 24 November, 2019 - 22:41 >>>

न्यायाधीश महाराज, आपल्या देशात याकुब मेमनच्या फाशीला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टीसना मध्यरात्री उठवण्यात आले होते. तेव्हा तुम्ही काय प्रतिसाद लिहिलेला त्याची लिंक देता का?

{अजित पवार भाजपला पाठिंबा देतायत म्हंटल्यावर जर सृष्टीची उलथापालथ होत असेल, तर इतकी वर्षे त्यांना पाठिंबा देणार्‍या शरद पवारांचे, रावा मधल्या बाकी नेत्यांचे काय? काल पर्यंत त्यांना पाठिंबा दिलेल्या काँग्रेसचे काय?}
अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले?
फडणवीस म्हणतात आम्ही एकट्याने.
कॉं , या पवारांना भ्रष्टाचारी म्हणतच नाहीएत. तर प्रश्न कुठे येतो?
फडणवीस त्यांना चक्की पिसिंगसाठी पाठवणार होते, ती ही चक्की का?

>>फडणवीस त्यांना चक्की पिसिंगसाठी पाठवणार होते, ती ही चक्की का?<<

मग तुमची (सध्या लाडकी झालेली) शिवसेना त्यांना कुठे पाठवणार होती म्हणे?

अजित पवार यांनी खरेच काही आमदार घेऊन पक्ष फोडला असतात तर इतकी टीका झाली नसती. >>> राज्यपालांच्या दृष्टीने अधिकृतरीत्या राष्ट्रवादीचा पाठिंबाच आहे ना? अजित पवार गटनेते आहेत - किमान तेव्हा होते.

आता ३० तारखेला नाही सिद्ध झाले बहुमत तर अजून काही दिवस त्रिशंकू अवस्था आणि मग कदाचित आघाडी सरकार. पण मधे भाजपला काड्या करायला वेळ मिळाला, आघाडीच्या घटक पक्षांमधे गोंधळ, अविश्वास निर्माण झाला, आणि तेथील गोंधळापेक्षा भाजपशी तडजोड करण्यात आपले हित आहे असा अनेकांचा समज झाला तर भाजपचा फायदाच आहे. आमदारांना लपवावे लागत आहे हे तेच दाखवते.

हेच शरद पवार करतात तेव्हा "बाप", "एकाच फटक्यात अमुक केले" वगैरे स्तुतीसुमने लोकसत्तेपासून ते बिगुल पर्यंत फिरतात. नावडतीचे मीठ अळणी वगैरे वगैरे.

कॉं , या पवारांना भ्रष्टाचारी म्हणतच नाहीएत. तर प्रश्न कुठे येतो? >>> तेथेच त्यांची गोची होत आहे

अजित पवार जर भ्रष्ट नसतील - तर इतके दिवस जे केले ते राजकीय posturing होते. आणि त्याने भाजपवरची टीका ही फक्त पोश्चरिंगपुरतीच राहील.
अजित पवार जर भ्रष्ट असतील - तर भाजपपासून ते काँग्रेस व शरद पवारांपर्यंत सर्वच जण यात दोषी आहेत. कारण त्यांना कल्पना नसणे शक्यच नाही. "महाराष्ट्रात त्यांच्या माहितीशिवाय कोठेही खुट्ट सुद्धा..."

आमदारांना पळवावे लागते आहे यात काहीच वावगे नाही?
कर्नाटकमधल्या एका फुटलेल्या आमदाराच्या खात्यात आठ दिवसांत ४८ कोटी जमा झाले. येडियुरप्पा चर्या पेपर्स त्यांच्याच सहकाऱ्याने फोडल्या. (फडणवीसांनी तावडे, मुंढे, खडसे आदिंपासून सावध रहावं)

यापेक्षा आयपीएलसारखा लिलाव करायचा.
रक्कम आमदाराला देण्याऐवजी त्यांच्या पक्षाला द्यायची. तेही हसत तयार होतील. Wink

हॉटेल हयाट मधली सगळी तयारी पूर्ण झाली तेव्हा रेनेसाँमधून हयाटमध्ये मंडळींना हलवले आहे.
रात्रीचा लास्ट शो चांगलाच रंगला आहे.
रात्रीच्या गर्भात उद्याचा रम्य उष:काल !
ता. क. : पक्षाच्या आदेशानुसारच पोचिंगसाठी मान आणि खिसा पुढे केला जात असेल तर पक्षालाही वट्ट वटणावळ जाणारच.

पण शिवसेना कुठे बसवणार होती त्यांना?
तिथेच भाजपाने बसवले तर का इतकी जळजळ?

(आणि आता तुमची (लाडकी झालेली) शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध काही बोललीच नव्हती बहुतेक.... खरेय ना?)

अरे व्वा. ज्यांना चक्की दिसायला पाठवणार होते, त्यांना उपमु केलं आणि गोची कॉं, रा ची होतेय?
गंमतच आहे.
अर्थात भाजपने मुकुल रॉय, हिंमत बिस्व सरमा पचवले तसे अ‌प.ही पचवतील.

भरत, तुम्ही या आधी फडणवीसांच्या कुठल्या वक्तव्यावर विश्वास ठेवून त्यांना (म्हणजे भाजपाला) मत दिले? तसे काही केले नसेल तर फडणविसांची विश्वासार्हता काय किंवा त्यांच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवायचा ही उठाठेव कशाला करताय? ते सर्व भाजपच्या मतदारांवर सोडा... पुढे २०२४ च्या निवडणुकांत बघू... तोपर्यंत या सगळ्या गोंधळात कुणाच्या खिजगणतीतही नसलेल्या व सध्या ज्यांचे 4 आमदार गायब आहेत त्या भारतातील लोकशाहीत भ्रष्टाचार व घोडेबाजार आणणाऱ्या काँग्रेसचे दुःख कुरवाळत बसा...

पुणेकर, अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप एकट्या भाजपने केलेत. शिवसेनेने नाही.- इति त्रिवार फडणवीस.
त्यामुळे सेना त्यांना कुठेही बसवू शकते.
फडणवीस तीन तीनदा उच्चारलेले शब्द कसे गिळणार आहेत?

> राज्यपालांच्या दृष्टीने अधिकृतरीत्या राष्ट्रवादीचा पाठिंबाच आहे ना? अजित पवार गटनेते आहेत - किमान तेव्हा होते.

फारेंड तुम्हीही इतके टोन डीफ अहात का ? एखाद्या पक्षाचा गटनेता अचानक पाठिंब्याचे पत्र घेऊन मध्यरात्री येतो तेव्हा राज्यपालंनी जजमेंट वापरणे अपेक्षित नाही का? निदान सकाळपर्यंत थांबणे ? राज्यपाल बातम्या बघत नाहीत का? हे सगळे अ‍ॅब्युसिन्ग द प्रोसेस आहे.

हे सगळे अ‍ॅब्युसिन्ग द प्रोसेस आहे.

नवीन Submitted by vijaykulkarni on 24 November, 2019 - 23:04 >>>

चला आहे, मग काय?

फारेंड तुम्हीही इतके टोन डीफ अहात का ? >>> ओके ओके विकु Happy थांबू शकले असते. एनीवे विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेलच, तेव्हा दोन पक्षांचे नेते जर क्लेम करत असतील आणि त्यांचे एकत्रित नंबर्स जर १४५+ होत असतील तर त्यांना शपथ घेउ द्यायला राज्यपाल तयार झाले असतील (आणि मोकळे झाले असतील) अशा अर्थाने ते लिहीले आहे. But I get your point.

तुमचा आधीचा विनोद मला समजला होता हे विसरू नका Wink

भाजपाची मदार अजुनहि अजित पवार्/गट नेता/व्हिप यावर लोंबकळत असेल तर कपाळमोक्ष ठरलेला. पुरोगामी यांनी उल्हास बापट(?) या घटनातज्ञांचं मत इथेच कुठेतरी शेर केलं होतं. त्या मतानुसार सध्याच्या परिस्थितीत अजिन पवार इज नो बडी - जस्ट अ‍ॅन एमएलए.

उद्या सुप्रिम कोर्टाने भाजपाचा शपथविधी आणि सरकार स्थापण्याचा दावाच अवैध ठरवला तर हे सगळे हवेतले पतंग जमिनिवर उतरतील...

तुम्हीही इतके टोन डीफ अहात का ? एखाद्या पक्षाचा गटनेता अचानक पाठिंब्याचे पत्र घेऊन मध्यरात्री येतो तेव्हा राज्यपालंनी जजमेंट वापरणे अपेक्षित नाही का? निदान सकाळपर्यंत थांबणे ? राज्यपाल बातम्या बघत नाहीत का? हे सगळे अ‍ॅब्युसिन्ग द प्रोसेस आहे. >> विकु तुम्हीही ईतके काँग्रेसब्लाईंड आहात का? Wink
काँग्रेस आणि काँग्रेसच्या राज्यपालांची पापे तुम्हाला माहित नाहीत का? चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. Proud

फेब्रुवारी २००५ बिहार ईलेक्शन.
एका बाजूला भाजप (३७) आणि नितिश कुमारांचा जद (५५) ह्यांचा एनडीए आणि दुसर्‍या बाजूला काँग्रेस (१०) आणि लालूंचा राजद (७५) ह्यांचा युपीए अशी परिस्थिती होती.
निर्णायक बहूमत पासवानांचा लोजप (२९) पुरवणार होता, पासवानांना ही पैसे बनवण्याची सुवर्णसंधीच चालून आली होती. त्यांनी दोन्ही बाजुंशी सौदेबाजी लिलाव लावल्याप्रमाणे चालू ठेवली. ह्या दरम्यान काँग्रेस सरकारात भ्रष्टाचाराचे आरोप लागल्याने राजकारणातून डीमोशन झालेले बुटा सिंग बिहारचे राज्यपाल होते. त्यांनी पासवान ह्यांच्याशी बोलणे करून त्यांना अजून कोणत्याच बाजूला सपोर्ट करण्याची ईच्छा नाही पण ते भाजपकडे झुकू शकतात हे ताडून तडकाफडकी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून पत्र पाठवले.

दरम्यान राष्ट्रपती राजवट लागल्याने राबडी देवी सरकार एक्सपायर झाले. काही दिवसांतच पासवान एनडीए कडे झुकत आहे हे कळताच आणि एनडीए (भाजप+जद) सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी येणार असे समजताच काँग्रेसला पसवानांना फितवण्यासाठी अजून वेळ मिळण्यासाठी बुटा सिंगांनी परिस्थिती चिघळल्याची खोटी भिती सांगत (राजभवन )गवर्नर बंगल्याच्या २०० मीटर आवारात जमावबंदीचे आदेश देऊन शेकडोंनी पोलिसांचा फौजफाटा लगावला जेणेकरून एनडीए पैकी कोणीही आपल्याला अ‍ॅप्रोच करू नये.
पण हा ऊपाय फार दिवस ताणता येणार नाही हे कळल्यावर त्यांनी तडकाफडकी रात्रीतून फॅक्स मशीन सहित दिल्लीला पळ काढला. त्यांनी मनमोहन सिंघांना बिहार मध्ये आमदारांचा घोडेबाजार चालू आहे आणि परिस्थिती गंभीर आहे म्हणून ही विधानसभा बरखास्त करावी अशी सिफारिश केली. ह्यावेळी राष्ट्रपती अब्दुल कलाम मॉस्को मध्ये होते. मनमोहन सरकारने रात्रीतून ऑफिसे ऊघडून बिहारमधली परिस्थिती किती गंभीर आहे अशी खोटी परिस्थिती राष्ट्रपतींना कथन करून रातोरात मॉस्कोवरून ही बिहार विधानसभा बरखास्त झाली (म्हणजे निवडणुकांचे निकाल रद्द झाले) असे पत्र मिळवले.

शेवटी ऑक्टो-नोव्हें मध्ये बिहारला पुन्हा नव्या निवडणुकांना सामोरे जावे लागले. ह्यावेळी मात्र एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. Happy

हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आजवर कधीही न वापरलेल्या कडक शब्दात बुटा सिंगांच्या निर्णयक्षमतेवर घणघणाती टीका केली. त्यांनी एका पार्टीला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व केले असा आरोप लावला आणि त्याचबरोबर राष्ट्रपती आणि केंद्र सरकार ह्यांना बिहार मधल्या परिस्थितीची चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप सुद्धा ठेवला. कोर्टाने तेव्हाच्या मनमोहनसिंग सरकारवरही परिस्थितीची शहानिशा न करता विधानसभेची तत्काळ बरखास्ती करण्यासंबंधी राष्ट्रपतींना तडकाफडकी जी खोटी माहिती पुरवली ह्या त्यांच्या वागण्यावरही आक्षेप घेतला.
ह्या सगळ्याचे खापर काँग्रेसने बुटासिंगांच्या डोक्यावर फोडल्याने पर्यायाने बुटा सिंगांना तातडीने पदाचा राजीनामा द्यावा लागला. कोर्टाच्या निकालामुळे ह्या विवादास्पद प्रकरणाला मनमोहन सिंग सरकार, राज्यपाल बुटासिंग ह्यांच्या बरोबर आपणही आरोप आहोत असे वाटून कलमांना एवढा मनस्ताप झाला की ह्याची नैतिक जबाबदारी घेत त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. ह्या निकालानंतर दोनच महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश ह्यांची भारतभेट होणार होती आणि तेव्हा कलामांनी राजीनामा दिला असता तर जे राजनैतिक वादळ देशात आणि भारताच्या परराष्ट्र संबंधांत आले असते ते निस्तरणे अवघड झाले असते म्हणून अनेक मोठमोठ्या लोकांच्या मनधरणीनंतर कलामांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला.

जो काँग्रेस सरकार आणि बुटासिंगांनी केला त्याला म्हणतात सत्तेचा आणि पदाचा अब्युज Proud

फडणवीसांच्या पिकाला अजित पवारांचं पाणी लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. या सत्तेच्या रस्साकशीत भाजपनं फडणवीसांच्या इमेजचा, शिवसेनेनं कट्टर हिंदुत्वाचा आणि कांग्रेसनं आपल्या सेक्युलरवादाचा हातोहात बळी दिला.

आता हेच सरकार तगलं तरी सरसकट कर्जमाफी, क्लीन चिट, बुडीत बॅंकांना पॅकेज ह्यातच भरडल जाणार. अर्थात महाशिवआघाडीत ह्यापेक्षा काही वेगळं होणार नव्हतंच, तेव्हा दोन्ही सरकारांना माझा (जुल्माचा) रामराम.

या सगळ्या धुरळ्यात अजितदादांना फोडणे, हाच खरा टर्निंग पॉइंट. कारण हे एकच समीकरण असं होतं ज्याची कल्पना कुणाच्याही ध्यानीमनी नव्हती. शिवसेनेची अख्खी बार्गेनिंग 'भाजपकडे दुसरा पर्यायच नाही' या एका गोष्टीवर चालत होती. तेल लावलेले पैलवान त्याच जोरावर मैदान गाजवत होते. हा सगळा नंगानाच चालू असताना भाजपनेही कमरेचं सोडून त्यात उडी घेतली, तीही अशी का तिचे हादरे बारामती अन वांद्र्यात आठवडाभर जाणवत राहतील. आता उद्या फक्त आकडेवारीचा खेळ पैजा लावत पाहायचं एवढंच काम उरलय.

मला पर्सनली भाजप यावेळी विरोधात बसलेला जास्ती आवडला असता. पण आता जर ठिगळं जोडलेलं सरकारच आमच्या नशिबी असेल, तर त्यातल्यातात जास्त स्थिर सरकारच यावं हीच इच्छा.

सगळ्या पक्षांनी असेल नसेल ती प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळं लढत अगदी चुरशीची झालीय. बाकी पवारांच्या एकूण हालचाली आणि त्यांनी अजित पवारांसाठी अजूनही उघडं ठेवलेलं मागच दार पाहता, उद्या फासे भाजपच्या बाजूनं पडायचे चान्सेस जास्ती वाटताहेत. बघू उद्या पवार वर्सेस पवार च्या ग्रँड फिनालेत...

काँग्रेस ने आत्ता पर्यंत जे जे केले ते सर्व आदर्श होते व सर्वांनी त्याचे अनुकरण करावे असे मी म्हणलेले नाही. आणीबाणी हे भारतीय इतिहासातले काळेकुट्ट पान होते असे मी आजही म्हणतो. वर घडलेले बिहारचेही ही सर्वथा अयोग्य होते. काँग्रेसने इतरही चुक्ला केल्या आहेतच. पण तुम्ही क्ष का केले या प्रश्नाचे उत्तर नेहेमीच काँग्रेसनेही क्ष केले होते हेच असेल तर मग काँग्रेस काय वाईट होती? निदान विकासदर आठ वरून चार वर तरी आला नसता.

फारेंड , Happy थोडे जास्तच तिखट शब्द वापरल्या बद्दल क्षमस्व. उदय चोप्रा ची अभिनयात चूक झाली तर राग येत नाही, अमीर खानची झाली तर येतो.

पण तुम्ही क्ष का केले या प्रश्नाचे उत्तर नेहेमीच काँग्रेसनेही क्ष केले होते हेच असेल तर मग काँग्रेस काय वाईट होती? >> नाही मी असे काहीच whataboutry टाईप म्हणत नाहीये, कोण्या एकाचीच बाजू बरोबर असे सुद्धा म्हणत नाहीये. मुद्दा एवढाच आहे की राजकारणातली नैतिकता नावाची म्हातारी मेली आहे आणि पैसा नावाचा काळ सोकावला आहे.
हे सत्ता स्थापने संदर्भात आहे म्हणून आपल्याला जास्त प्रकर्षाने कळते आहे. ह्यापेक्षा अनैतिक गोष्टी सिस्टिममधले सगळेच लोक सत्ता असतांना करतात.....नव्हे त्यांना त्या करायच्या आहेत म्हणूनच ही टोकाची अनैतिकता आत्ता बघायला मिळते आहे. हे असेच चालू राहणार आहे. कधी हे करतील कधी ते करतील ईतकाच काय तो फरक.

माझ्यासाठी एकच तेवढ्यातल्या तेवढ्यात जरा महत्वाचे आहे की सर्वात मोठा जनादेश असलेली पार्टी सत्तेत येणे जरूरी आहे, महाराष्ट्राच्या केस मध्ये ती भाजप आहे. ईतर राज्यात भाजप सर्वात मोठी पार्टी नसतांना सत्तेत आली असेल तर माझ्या मते तिथली जनता दुर्दैवी आहे ... जसे आपण सगळे वीपी सिंग किंवा चंद्रशेखर ह्यांच्या काळात होतो.

हे अगदी असच महाराष्ट्रात होणार आहे जर विश्वासदर्शक ठराव पास होऊ शकत नसेल तर! बिजेपी, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही. अगदी काहीच फोडाफोडी जमली नाही तर विधानसभा बरखास्त करून पुन्हा फ्लॅश इलेक्शन! काँग्रेस जितका बेदरकार निर्लज्ज संधीसाधू पणा करायची तोच आज भाजपा करत आहे. त्यात गुणात्मक फरक करायची काही गरज नाही.

सर्वच अनाकलनिय आहे.... आणि हुकुमाचा पत्ता अजुनही शरदचंद्ररावजी पवार साहेब यांच्या हाता मधे आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध होणार, नाही होणार, अजुन फोडा फोडी... सर्वच मज्जा येणार.

राज्यपालांची कृती १०० % भाजपाला मदत आणि पक्षपात करणारी आहे. अगदी सहा वाजता शपथविधी उरकण्याची घाई म्हणजे कालचा गोंधळ बरा होता असे म्हणावे लागेल.

Pages