फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजित पवारांनी राज्यपालांना दिलेलं आमदारांच्या सह्याचं पत्र फोर्ज्ड होतं अशी बातमी बाहेर येतेय. धिस इट्सेल्फ इज ए क्रिमिनल ऑफेंस. फडणविस्/शहा सटिया गये है क्या?..

ते कळेलच!
नुसते राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनेचे आणि कॉंग्रेसचे आमदार भाजपाच्या रडारवर असतील Happy

भाजपाला पक्की खात्री असल्याशिवाय भाजपा असला डाव खेळणारच नाही

फ्लोअर टेस्टला गैरहजर राहूनही अनेकजण भाजपाला हातभार लावू शकतात Wink

काही म्हणा, भक्तांच्या निष्ठेचे कौतुक करावे तेवढे कमीच. आपले ध्येय साधण्यासाठी इतकी पराकोटीची विधिनिषेधशून्यता यापूर्वी फक्त जिहादी गटांमध्ये पाहिली आहे.

धन्यवाद लसावी... पण कॉंगी गुलाम व शिवसैनिकांच्या लवचिक कण्यासमोर भाजपा म्हणजे काहीच नाही.

भक्त म्हणा नाहीतर अजुन काही पण "शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस" पेक्षा "भाजपा-राष्ट्रवादी" हा ऑप्शन बरा आहे

बाकी हमाममे सभी नंगे है Proud

>>एव्हढे धोबीपछाड मिळून सुद्धा अजुन याना चाणक्य शेखाचिल्लीच वाटतात <<
थांबा, इतक्यात उत्तेजीत होउ नका. घोडामैदान फार दूर नाहि; हा धोबीपछाड आहे कि धोब्याच्या गाढवामागे उभं राहिल्याने मिळालेली लाथ आहे ते लवकरच कळेल... Wink

>>> काही म्हणा, भक्तांच्या निष्ठेचे कौतुक करावे तेवढे कमीच. आपले ध्येय साधण्यासाठी इतकी पराकोटीची विधिनिषेधशून्यता यापूर्वी फक्त जिहादी गटांमध्ये पाहिली आहे. >>>

+ १

राष्ट्रवादीचे नेते आयात केल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या असे भाजपसमर्थक निकालानंतर म्हणत होते.
आताही भाजपने रा कॉ च्या नेत्यांशीच घरोबा केलाय. तर आनंद व्यक्त करताहेत.्अजून किती लवचिकपणा हवाय?

फडणवीसांची त्रिवार विधानं आहेत.
या कॉ शी संबंध नाही.
अजित पवारांना घेणार नाही.
फोडाफोडीचे राजकारण करणार नाही.

त्यांची लवचिकता तर नादिया कोमेन्सीलाही लाजवणारी आहे.

आरे ,नीतीच्या आणि आदर्शाच्या उपदेशाचे डोस पाजणारे स्तताला नीती मान आणि इतरांना बेईमान समजणारे ते संघ प्रमुख कुठे आहेत हिच्या का संघ आणि भाजपची नीती मत्ता यापुढे उपदेश करु नका.

*शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस* यांचं बहुमत सिद्ध होतय हे भाजपा ला माहीत आहे त्यामुळे त्यांनी राज्यात जलद राष्ट्रपती राजवट लागू केली, *पण केंद्रीय मंजुरी असल्याशिवाय राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेता येत नाही,*

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी राष्ट्रपती राजवट *मागे घेण्याचा प्रस्ताव दिला असता* तर भाजपा ने प्रस्ताव नामंजूर करून पुढील ६ महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली असती.

*पण, शरद पवार बापमाणूस आहे.*

त्यांना या अगोदरच कल्पना व जाणीव होती म्हणून त्यांनी *अजित पवारांना* फडणवीसांना *पाठिंबा द्यायला लावून पहिला राष्ट्रपती राजवट संपवली,* आता पुढील ७ दिवसात फडणवीसांना बहुमत सिद्ध करावं लागेल आणि *फडणवीस ते सिद्ध करू शकणार नाहीत* त्यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस बहुमत सिद्ध करणार आणि ७ दिवसानंतर
*शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होणार*
त्यामुळे आपल्याला हवी असणारी *महाशिवाघाडीच सरकार* स्थापन होणार...

*याला म्हणतात मास्टर स्ट्रोक...*

Whatsaap forward

बाकी काही म्हणा राव... त्या आमदार लोकांची शाळेत घेतात तशी पटावरील हजेरी आणि मग बस मधून सहल हे पाहिल्यावर शाळेतले दिवस आठवले. मागच्या बाकावरून केलेल्या खोड्या आणि पहिल्या बाकावरील आदर्श पोरे... आज मागच्या बाकावरील आणि पहिल्या बाकावरील सगळेच दुसर्‍यांकडे धुणी भांडी (नोकरी!) करत आहेत. तेव्हा, फार काही बिघडलले नाही. Happy
सत्तेचे देखिल तेच सुरू आहे... चार दिवस करमणूक, तमाशा, मग पुन्हा सर्व नेहेमीचे.
तेव्हा गंमत बघत रहावी हेच बरे.
हे सर्व असेच चालू रहावे... द्विपक्षिय लोकशाही कडे आपली चाल वेगाने सुरू आहे ते होईलच, फक्त तत्पुर्वी हे असं rude awakening गरजेचं आहे.

ऊध्दव जीं चे मात्र वाईट वाटते... ताटावर बसतात तोवर पदार्थ संपलेले असतात. पुन्हा नविन 'खिचडी'.. Proud
(संजय ऊवाचः काका मला वाचवा!) Proud

ह्या नाट्यात सगळ्या कोनातून फायदा भाजपाचाच आहे असे दिसते.
फ्लोअर टेस्ट मध्ये भाजप जिंकले तर विषयच संपला, हरले तरी ही परिस्थिती आजिबात प्रयत्न न करता जर 'शि+रा+काँ' आघाडी होऊन तिने सत्तेचा ताबा घेण्याच्या परिस्थितीपेक्षा भाजपसाठी खूपच सोयीची आहे.
कारण राष्ट्रवादी फुटलेली आहे, शरद पवार (ह्या नाट्यामागे शरद पवारांचा हात नाही हे गृहीत धरून) पार्टी एकसंध ठेवण्यात अपयशी झाल्याने शरद पवारांच्या नेतृत्वावर प्रशन्चिन्ह ऊभे राहिले आहे, ह्या सगळ्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा डळमळीत झाला आहे (खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बाराना अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे) आणि महत्वाचे म्हणजे तीन पक्षांच्या आघाडीत वणव्यासारखे पसरलेले अविश्वासाचे वातावरण.
जो तो आपल्याच सहपक्षीयांसहित आघाडातील ईतर पक्षीयांना सुद्धा संशयाच्या नजरेने बघत आहे. अशा वातावरणात आघाडी कशी चालायची असे चित्र ऊभे रहात आहे.
ह्या संभ्रमाच्या परिस्थितीचा सगळा फायदा भाजपाला होणार असे दिसते. संभ्रमाचे वातावरण तयार करत रहाणे ही पवारांनी आजवर ईतरांना खाऊ घातलेली कडू गोळी आज त्यांनाच घशाखाली ऊतरवावी लागत आहे.
पण मला वाटते ह्या सगळ्या नाट्याचे सुत्रधार पवार नसले तरी ते हे नाट्य घडवून आणण्यात नक्कीच सहभागी आहेत.
अजून बरेच नाट्य ऊलगडणे बाकी असावे.

>>भाऊ म्हणताय ते खरं आहे का?<<
शेवटच्या पॅरात केलेली नारायण राणे यांच्याबाबतची तुलना चूकीची आहे. त्यावेळेला सरकार सत्तेत होतं, बरखास्त झालेलं न्हवतं. यावेळेला सरकारंच जिथे मूळात अस्तित्वात नाहि तिथे गटनेता मतं कशी फिरवणार? शिवाय आजच्या घडामोडिंमुळे अजित पवारांची हकालपट्टी होउन नविन गटनेता नियुक्त झालेला असल्याने तांत्रिकदृष्ट्या ते सभागृहात गटनेते असल्याचा दावा करु शकत नाहि...

राज्यपालांच्या हातात जे पत्र दिले त्यानुसार तर अजूनतरी अजित पवारच गटनेते आहेत. पाटलांची नियुक्ती अवैध आहे.

>>राज्यपालांच्या हातात जे पत्र दिले त्यानुसार तर अजूनतरी अजित पवारच गटनेते आहेत.<<
उद्या सुप्रिम कोर्ट काय म्हणतंय ते पाहुया. अजित पवारांचं पत्रंच अवैध ठरवलं गेलं तर गेम ओवर...

दोन्ही शक्यतांमधे अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार होते. छान झाले. फडविसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी शुभेच्छा.

एक राजकीय गेम म्हणून भन्नाट जबरी मूव्ह आहे ही. आता इथून "वर्स्ट केस सिच्युएशन" अशी होउ शकते की ३० तारखेला बहुमत सिद्ध होणार नाही व पुन्हा काही दिवसांनी सेना-कॉंग्रेस आणि फुटलेली राष्ट्रवादी यांची आघाडी बहुमत सिद्ध करेल. अगदी तसे घडले तरी काल जे सरकार बनणार होते या तिन्ही पक्षांचे त्यापेक्षा ते खिळखिळे असेल, आणि ते ही जरी नाही धरले तरी जे काल होणार होते ते लांबणीवर टाकून मधल्या काळात काही करता येते का हे बघायला भाजपला वेळ मिळाला. यात भाजपला ला राजकीय लॉस काहीही नाही. पाठिराख्यांपैकी अनेकांना ही मूव्ह आवडणार नाही. त्यातून होणारे परिणाम माहीत नाहीत. भक्त लोक एनीवे महाभारतातील एखादी सिच्युएशन आठवून हे तसेच आहे वगैरे रॅशनलाइज करून हे स्वतःला आवडून घेतील.

आणि वरच्या "वर्स्ट केस सिच्युएशन" पेक्षा वेगळे काहीही झाले तरी भाजपचा फायदाच दिसतोय यात. एकतर काँग्रेसला आता या आघाडीतील लोकांवर विश्वास कमी होईल, विशेषतः राष्ट्रवादीतील आमदारांवर. तसेच सत्तेत संधी दिसल्यावर सेनेचे आमदारही बहुमत सिद्ध करायच्या वेळेस मदत करतील अशीही एक शक्यता आहे.

अजित पवारांना दोन्ही पर्यायांपैकी भाजपबरोबर जाण्याचा पर्याय जास्त स्थिर वाटला असेल. नाहीतरी दोन्ही पर्यायांमधे त्यांच्या पक्षाच्या विरोधी विचार असलेल्या पक्षाशी हातमिळवणी होणारच होती. मग तेथे इतर दोन पक्षातील विविध लोकांच्या नाकदुर्‍या काढण्यापेक्षा एकसंध भाजपबरोबर जाणे हितकारक वाटले असेल यात काही आश्चर्य नाही.

टेनिस, क्रिकेट वगैरे मधे गेम जितका जास्त लांबेल तितका काही संघांना फायदेशीर असतो, काहींना नाही. शिवसेनेचे बहुतांश राजकारण आली लहर केला कहर स्टाइल असते. २-३ आठवडे लांबण लावून दोन तीन देशव्यापी पक्षांच्या नेत्यांशी डीप राजकारण करणे हे त्यांच्या स्वभावात नाही. ही गेम लांबणे हे त्यांच्या हिताचे कधीच नव्हते. त्यात काहीही ठाम न मिळवता आधीच आपल्या केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यायला लावणे वगैरे वरून निगोशिएशन्स मधे ते कच्चे आहेत हे सरळ कोणालाही दिसेल.

एका बाजूने शरद पवारांची राज्याच्या राजकारणावर जी काही मर्यादित पकड आहे त्याला हा मोठा धक्का आहे. पण ही इतकी मोठी बंडाळी त्यांना माहीत नसेल अशी शक्यता फार कमी आहे. पवार आणि भाजप एकमेकांना विरोध करतात पण मोक्याच्या वेळी कड्यावरून ढकलून देत नाहीत असा पॅटर्न २०१४ पासून दिसलेला आहे.

थांबा, इतक्यात उत्तेजीत होउ नका. घोडामैदान फार दूर नाहि; हा धोबीपछाड आहे कि धोब्याच्या गाढवामागे उभं राहिल्याने मिळालेली लाथ आहे ते लवकरच कळेल... Wink

Submitted by राज on 23 November, 2019 - 20:34 >>>

मी सुद्धा तुम्हाला हेच सांगेन... त्या शेखचिल्ली वगैरे कॉमेंट्स बद्धल

सभागृहातील पक्षाचे गटनेते असे हवे तेव्हा बदलते आले असते तर त्या पदाचा काही अर्थच उरत नाही. बाकी राज्यपाल आता दिल्लीत आहेत नी नवीन कुठले लेटर ते स्वीकारतील अशी आशा एखादा मूर्खच करू शकतो. आता एकतर स्वतच्या मर्जीने किंवा फरफटत अजित पवारांच्या मागे जाण्याशिवाय शरद पवारांना पर्याय नाही.

बाकी पवार काही देव नाहीत की त्यांना सगळ्याच गोष्टी समजाव्यात. त्यांच्याही limitations आहेत.

माझ्या आकलनानुसार हे असे झाले असावे.

शिवसेनेमुळे पाणी जवळ दिसत असूनही सत्तेसाठी तहानलेला भाजपचा ऊंट शरद पवारांनी सही सही पहाड के नीचे आणला.
अजित पवारांमुळे आता शरद पवार सत्तेतही आहेत आणि विरोधी पक्षातही.
शिवसेनेची मागची पाच वर्षातली फरफट पाहता शरद पवारांनी भाजपला ऊघड ऊघड सपोर्ट देऊन महत्व कमी करून द्यायला नकार दिला. कारण एकदा असा पाठिंबा दिल्यावर पुन्हा पुढच्या निवडणुकीत आम्ही वेगळे लढणार म्हंटल्यावर जनता विश्वास ठेवत नाही.
म्हणून त्यांनी अजित पवारांच्या रूपाने भाजपाच्या हत्तीला तेवढेच शेपूट दिले जेवढे घेऊन हा भाजपाचा हत्ती विश्वासदर्शक ठरावाच्या भोकातून जाऊ तर शकेल पण वेळ पडल्यास तोच हत्ती अजित पवारांचे शेपूट वापरून पुन्हा भोकातून मागेही खेचता येईल. ह्यासाठी अजित पवारांच्या मिडियात चाललेल्या नाराजीच्या चर्चेचा त्यांच्या बॅड-बॉय ईमेजचा खुबीने वापर त्यांनी करून घेतला. ऊपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेऊन (अजित पवारांना किंवा त्यांच्या बरोबर आलेल्या आमदाराला अजून एखाद-दुसरे पद सुद्धा मिळेल) मंत्रिमंडळात नुसती नावापुरती नाही तर महत्वाची हजेरी आणि थोडा फार वचक सुद्धा मिळवला जेणेकरून भाजप सरकारात राष्ट्रवादीचे महत्व टिकून राहिल. पुन्हा ह्या सत्तेच्या खेळात आम्ही विक्टिम झालो असे म्हणत जनतेची सिंपथी सुद्धा मिळवता येईल.

मला वाटते पुढे आता असे होईल.. नारायण राणे आता शिवसेनेचे काही आमदार ( किती? अजित पवारां बरोबर गेलेल्या आमदारांपेक्षा कमीतकमी ३ जास्त) फुटतील/फोडले जातील... त्यांची आमदारकी रद्द होईल आणि राष्ट्रवादी सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून सभागृहात येईल आणि विरोधी पक्ष नेते पदाचे महत्वाचे पद त्यांच्या हातात येईल. ह्या बदल्यात सगळ्या राष्ट्रवादी नेत्यांची ईडी/एसीबी/लिंबू-मिर्ची चौकशी थांबेल. विश्वासदर्शक ठराव मागच्यावेळेसारखा आवाजी किंवा ह्यावेळी गोपनीय पद्धतीने होईल, ज्यात कोणी कोणाला मत दिले ते सहजी कळून येणार नाही. शरद पवार हा विश्वासदर्शक ठराव पास होईल ह्याची पुरेपूर काळजी घेतील.
मग भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेत सुद्धा आणि विरोधी पक्षात सुद्धा (नाही तरी शरद पवार पहिल्यापासून म्हणतच आहेत आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत).... भाजप आणि राष्ट्रवादी दोघांची चारो ऊंगलिया तुपात आणि काँग्रेस व शिवसेना तुपाच्या रिकाम्या डब्यात.

ह्यात भाजपाचा मोठा फायदा असा की महाविकास आघाडी तर तुटलीच, सत्ता सुद्धा मिळतेच आहे, शिवसेनेचे पूर्ण पानिपत जी वोटबँक भाजपाला मिळणार, शिवसेनेच्या धुसफुशीपुढे नमून त्यांना सेनेला जेवढे द्यावे लागले असते त्यामानाने राष्ट्रवादीला काहीच द्यावे लागणार नाही...आणि पुन्हा बीएमसी हातात घेता येईल ही चेरी ऑन द टॉप.
ते म्हणतात ना केक खायचा पण आणि ठेवायचा पण...राष्ट्रवादीचे बॅड बॉय अजित पवारांच्या मोबदल्यात शरद पवारांनी हे घडवून आणले.
आता अजित पवारांसहित अनेक राष्ट्रवादी नेत्यांचा चिदंबरम तर होणार नाहीच पण तुरुंगातल्या जेवणाऐवजी सत्तेची रसाळ आणि गोमटी फळेही त्यांना चाखायला मिळणार.

एकेकाचे काय झाले असेल याचे अंदाज वाचायला मजा येत आहे.
शंभर टक्के बरोबर कोणाचाच अंदाज नसणार हे ही खरेय. तरी येत्या काही दिवसात ऊंट कुठे बसतोय आणि कोणाचा अंदाज बरोबर येतोय हे बघायला मजा येणार आहे. फक्त पुर्ण खेळ संपल्याशिवाय मी हे आधीच अमुकतमुक तारखेला बोल्लो होतो अशी घाई कोणी करू नका. पिच्चरचा आज फक्त ईण्टरवल झालाय एका ट्विस्टने. असली पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त !

शिवसेनेने अरविंद सावंतना परत बोलावल्यावर ह्या सगळ्याला घडामोडींना वेग आला. महाविकास आघाडीची चर्चा, "कॉमन मिनिमम प्रोग्राम' वगैरे नावाखाली पवारांनी जमेल तितका वेळ काढला आणि हा वेळ भाजपाशी बोलणी करण्यात आणि आपली स्ट्रॅटेजी बनवण्यात योग्य प्रकारे वापराला. परवाची मोदी-शहा भेट ही शरद पवारांच्या भाजपशी आजवरच्या चर्चेचे फलित आणि त्यावर भाजप अध्यक्ष आणि मोदींनी शिक्कामोर्तब करण्या करिता झाली.

जेव्हा महाविकास आघाडीची चर्चा अजून स्टॉल करणे अवघड झाले आणि आता ऊद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करावीच लागणार आणि ती होणारच असे दिसले तेव्हाच अजित पवारांना सिग्नल मिळाला. राज्यपालांसमोर पाठिंब्याची तात्कालिक टेक्निकॅलिटी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्याचे पत्र वगैरे ह्या नाटकातले शपधविधी पार पाडण्याकरिता वापरलेले एक प्रॉप होते त्याची पुढे काही चर्चा होणार नाही. हे सगळे महाविकासाआघाडीच्या आधी आपला विश्वासदर्शक ठराव घडवून आणण्यासाठी झाले.
घाई घाईत श्यपथविधी का ऊरकावा लागला? तर आम्ही अजित पवारांना अर्थ देऊ, महसूल देऊ, गृह वगैरे देऊ चाललेच नसते कारण खाते वाटप माझ्या मते विश्वासदर्शक ठरावाशिवाय होत नाही आणि शिवसेनेकडून धडा घेत भाजपाच्या शब्दावर विश्वास ठेवण्याची चूक शरद पवार करणार नाहीत. म्हणून अजित पवारांचे ऊपमुख्यमंत्री नक्की झाले आणि हे लागलीच त्यांचा शपथविधी करून घेऊन जनतेला करार झाल्याचे दाखवण्यात आले. (अन्यथा चार -सहा आमदार घेऊ येणार्‍याला कशाला द्यावे लागते ऊपमुख्यमंत्री पद?)
आता ह्या 'देवयानी-कच मधल्या कच टाईप' कामासाठी बृहस्पती शरद पवारांनी अजित पवारांना का निवडले? तर अजित पवारांवर चौकशीचा बडगा होता हे त्यांचे बंडखोरी करण्यासाठी एक मोठे कारण होते. अजित पवार घरातले आहेत आणि मुख्य म्हणजे खमके आहेत जे गरज पडल्यास आढ्यताखोर भाजपाला काही छोट्या मोठ्या बाबींमध्ये सुनावू शकतील, धमकी देऊ शकतील, आडवे घुसू शकतील.

दोन्ही पोस्ट आवडल्या, क्लिअर बहुमत मिळुन भाजपाने सहजी महा राज्य जाउ देणे तसही शक्यच नव्हत, आजच्या मुव्ह मधे बिजेपीच काहिही नुकसान नाही, सगळ्या पक्षात मधे केयॉस क्रियेट करण्यात ते यश्स्वी झाले आहेत.
शरद पवारानी केलेल्या मुव्ह येवढया वर्शाच्या अनुभवाततुन च येण शक्य आहे.

Pages