फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पवारांचे ट्वीट आहे कि तो अजितदादा चा व्यक्तिगत निर्णय आहे. ते बरोबरच असेल. इडीची भीती घालून त्याला आपल्याकडे वळवून घेतले असण्याची शक्यता आहे. अर्थात थोरल्या पवारांशी विचारविमर्श केल्या नंतरच हे झाले असणार यात शंका नाही. भुजबळ काका-पुतण्यांसोबत जे झाले त्यातून हा धडा घेतला असावा. बाकी, इतकी वर्षे मुतरा मुतरा म्हणून ज्याला चिडवले शेवटी त्यालाच खांद्यावर घ्यावे लागले.

तीन पक्ष नक्की काय करत होते म्हणे? एकमेकांस फेटे बांधत होते सभांतून?

जनता आता ओळखून आहे सगळे सत्ता पैसा यासाठीच खुर्ची धरत आहेत.
आता मुंबई महापालिकाही सेनेकडून जाणार.

ज्या माणसासाठी आर्थर रोड तुरूंगात कोठडी राखून ठेवली आहे, असे जे सांगत होते, तेच आता त्याच्या मांडीला मांडी लावून मंत्रीमंडळात बसणार.

>>>>>>>जर त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले असते तर त्याला कोठडीत टाकायला देवेंद्र मागे पुढे पाहणार नाही. वर त्यांच्या अधिपत्याखालील आमदार पुर्णत: भाजपच्या हाताखाली येतील.
ही देखिल भाजपाची खेळी असू शकते. आधी मंत्रीपद द्या आणि नंतर कोठडीत टाका. आमदार वाऱ्यावर तर राहणार नाहीत. त्यांना नेतृत्वाची गरज पडणारच.

राऊतला चाणक्य म्हणणे म्हणजे चायनीज गाडीवरच्या नेपाळ्याला ब्रूस ली म्हणणे आहे.>>>>>>>> अगदी अगदी! Lol अनुमोदन!

शरद पवारांची ची उध्दव बरोबर पत्रकार परिषद म्हणजे एक नाटक.
राजकीय विश्लेषक म्हणून tv वर जे अकलेचे तारे तोडत आहेत ते सर्व बिनडोक आहेत फक्त बुध्दीमान आहोत असे त्यांना स्वतःलाच वाटत .
आता जे घडत आहे ते ठरवून पद्धतशीर पने घडत आहे.
अचानक काहीच घडलेलं नाही.
राज ठाकरे चे काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा प्रचार करणे .मोदी वर निशाणा साधने.
हे सर्व प्लॅन चच हिस्सा आहे ह्याची जाणीव झाली नाही कोणाला.
सेनेला ला बंड करण्यास उस्कवणे,पाठिंबा देण्याचे नाटक करणे.
आणि शेवटी सेनेचा पोपट करणे.हे सर्व प्लॅन chach हिस्सा आहे.
आता अजित ला पुढे करून बंडाचे नाटक करणे.
आता शरद पवार आणि उध्दव ची पत्रकार परिषद ही परत शरद पवारांची चाल आहे.
सेनेची धोडिफर लाज रखण्या साठी

माझ्या काँगी मित्रानो , एव्हढे सटपटून जाऊ नका.
तुमच्या पक्षाचीही सत्ता कधी ना कधी येईलच. पण इतके दिवस एकमेकांविरुद्ध विचारधारा असलेले तीन पक्ष एकत्र येताना जे प्रश्न तुम्हाला सुचले नाहीत ते आता सुचताहेत, त्यामुळे झालेल्या घटनेने तुमच्या बालबुद्धीला चालना मिळालीय ही गोष्ट ध्यानात घ्या.

अजित पवारांना राष्ट्रवादीने विधिमंडळ नेतेपदावरून काढले.

यंदा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.

अजित पवार आणि शरद पवार चे वागणे म्हणजे.
तू मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो ह्याच प्रकारच आहे.

*मला पडलेले काही प्रश्न??*

*१)* राज्यपालांनी अचानक रात्री राष्ट्रपती राजवट कशी उठविली?

*२)* देवेंद्र फडणवीस यांनी १४५ आमदारांची यादी राज्यपालांना दिली का?

*३)* राज्यपालांनी आमदरांची ओळख परेड घेतली का?

*४)* इतक्या घाईत शपथविधी उरकण्याची आवश्यकता होती का?

*५)* देशावर, राज्यावर फार मोठे संकट उभे होते म्हणून शपथविधी उरकले का?

*६)* शरद पवारांना सोडून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांबरोबर जातील का?

*७)* अजित पवार इतका मोठा निर्णय शरद पवारांना न विचारता घेतील का?

*८)* राज्यपाल कोश्यारी दबावाखाली काम करतात आहेत का?

*९)* शिवसेनेला दोन दिवसाची मुदत न देणाऱ्या राज्यपालांनी एका रात्रीत बहुमत कसे मान्य केले?

*१०)* जनतेचा राज्यपालांवरुन विश्वास उडणार नाही का?

*११)* अशा घाणेरड्या राजकारणामुळे यापूढे निवडणूकीत मतदार मतदान करेल का? त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल असे राज्यपालांना वाटले नाही का?

असे अनेक प्रश्न अनुरुत्तित असताना लोकांच्या भावनेशी खेळण्याचा अधिकार राजकारण्यांना आणि राज्यपालांना कोणी दिला???????
घाणेरड्या राजकारणाचा जाहिर निषेध!

WA वरून साभार

जो पर्यंत शरद पवार हयात आहेत तो पर्यंत अजित पवार बंड करणार नाहीत .
आता सुधा जे घडल आहे ते शरद पवार chya सुचणे नुसारच .
पत्रकार परिषद घेवून सेनेचा पचका झाला आहे त्याला थोडा मुलामा मुलामा चढवला जाईल .
काही दिवसा नंतर अजित पवार साहेबांची माफी मागून रीतसर मनोमिलन चा कार्यक्रम करतील .
तो पर्यंत निवडणूक येईल .
परत शरद राव chya नेतृत्वात राष्ट्रवादी निवडणूक लढवेल.

अजित पवारांसोबत राजभवनावर गेलेले राकॉ चे आमदार म्हणताहेत , आम्हाला तिथे जे झालं त्यापेक्षा वेगळं काही सांगितलं होतं.
अजित पवारांनी राज्यपालांना दिलेली यादी काय म्हणून दिली हेही स्पष्ट नाही.

रून्मेष यांच्या पोस्टशी सहमत. देवेन्द्रचा पण सलमान झाला बघून मतदारांनी काय करायचं हा प्रश्न आहे आणि कायदा सर्वांसाठी समान नसतो, हे पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले. निरक्षीरविवेक अपेक्षीत असनारी व्यक्तीच दबावाला बळी पडून निर्णय घेत असेल व सर्व पायंडे मोडून रात्रीतून मुख्यमंत्री शपथविधी पार पडून मुख्यमंत्री देनार होते तर इतके दिवस राष्टपती राजवट लागू होवू देण्यामागचे कारण स्पष्ट होत नाही.

राष्ट्रवादीतला एक गट फोडून भाजपा सरकार स्थापन करेल हा अंदाज मी इथेच साधारण पंधरा एक दिवसापूर्वी व्यक्त केला होता तेंव्हा बहुतेकांनी ही शक्यता फेटाळली होती.
आता इथे इतके धागे निघालेत गेल्या महीनाभरात त्यामुळे कुठल्या धाग्यावर लिहलेले तेच मला आता सापडत नाहीये Wink

मागील वेळेप्रमाणे राष्ट्रवादी चे समर्थन पत्र सरकार दरबारी जमा झाले.
फ्लोवरवर गोंधळ घडवून भाजप सरकार तरेल.
बाकी अजित पवार यांची घरवापसी घडून बिजेपी × तिघे पुढील ५ वर्ष मागील प्रमाणे घडामोडी घडत रहातील.

मुंबई: अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनवर गेलेले काही आमदार काही तासांतच शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत. 'कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनवर बोलावण्यात आलं होतं. मात्र, आम्ही पक्षाच्या सोबत आहोत,' असं या आमदारांनी स्पष्ट केलं.

'असं राजकारण खूप पाहिलंय; भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही'राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळं धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्याच वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बुलडाण्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके यांनी आज सकाळपासूनचा घटनाक्रम सांगितला.
विश्वास ठेवायचा कुणावर?; सुप्रिया सुळे भावूक
आमदार काय म्हणाले...
'काल रात्री १२ वाजता आम्हाला फोन आला. सकाळी सात वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर या. महत्त्वाचं बोलायचं आहे, असं सांगण्यात आलं. नेत्यांचा फोन असल्यामुळं आम्ही गेलो. १०-१५ मिनिटांत तिथं आणखी काही आमदार आले. अजितदादा तिथं नव्हते. थोड्या वेळानं चर्चा करायला जायचं आहे असं सांगून आम्हाला राजभवनावर नेण्यात आलं. छोट्याशा हॉलमध्ये बसवण्यात आलं. तोपर्यंत आम्हाला काहीही माहीत नव्हतं. प्रवासात आम्ही आपसांत चर्चा केली. पण कुणालाही कशाचाही थांगपत्ता नव्हता. आमची चर्चा सुरू असतानाच तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व भाजपचे काही नेते आले. त्यानंतर शपथविधी झाला. आम्ही सगळे अतिशय अस्वस्थ होतो. तिथून थेट निघून साहेबांकडं आलो आणि त्यांच्याशी बोललो. आम्ही पक्षासोबतच आहोत.'

आता कोणाच्याच बोलण्यावर विश्वास बसत नाही.
56 गावचे पाणी पिलेले हे बोलणारे राष्ट्रवादीचे आमदार एवढे भोळे आहेत का.
केवढा तो निरागस पना
ह्यांच्या बोलण्यात

अजित पवारांना ब्लॅकमेल केलेय.

अजित पवार परत येण्याची शक्यता.

भाजपने राजकारणाची खालची पातळी गाठली आहे.

भाजपने शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊ नये.

भाजप कायद्याचा गैरवापर करतेय.

ही भाजपाच्या अंताची सुरुवात आहे.

सेनेचे आणि काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत. राष्ट्रवादीचे फुटलेले परत येतील.

हिंमत असल्यास बहुमत सिद्ध करा.

*- ईति संजय राऊत*

या खेळात पवार व शहा या कुशल खेळाडूंनी उद्धवचा पूर्ण पोपट केला. रोज मूर्खासारखे नळ गळल्यासारखे बरळण्यापेक्षा न बोलून कार्य साध्य करणे जास्त महत्त्वाचे असते.

एक उत्तम विश्लेषण
...

यात सर्वात महत्वाचे म्हणजे अजित पवारांना पक्षांतर बंदी कायद्यातून सुटका होण्यासाठी राष्ट्रवादीच्या २/३ म्हणजे किमान ३०+ आमदारांना फोडावे लागेल, त्यापेक्षा कमी संख्या असेल तर त्यांना राजीनामे देऊन निवडून आणावे लागेल. हे प्रकरण तेव्हडे सोपे वाटत नाही कारण मागे अजित पवारच म्हणाले होते की यापुढे कोणी फुटला तर सगळे मिळून त्याचा कार्यक्रम करू. त्यामुळे हे प्रकरण अजित पवार आणि भाजपला सोपे जाईल असे वाटत नाही.

दुसरी गोष्ट आज जे शरद पवारांना सांगत आहेत की आम्हीं तुमच्याच सोबत आहोत ते खरोखरच ३० तारखेपर्यंत त्यांच्या सोबत राहतील का ? आणि ऐनवेळी काय कांड करतील किंवा स्टँड घेतील हा ही प्रश्न आहे. हे डोक्यात यायचं कारण म्हणजे साम दाम दंड भेद यात BJP कोणालाही ऐकणारी नाही. आज प्रमुख यंत्रणा त्यांच्या हातात आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे ही त्यांना चांगलं माहिती आहे.

तिसरी गोष्ट यात सगळ्यात मोठा पोपट सेनेचा झाला आहे. जोपर्यंत सत्ता येताना दिसत होती तोपर्यंत नेते सगळे आपलं नेतृत्व लै भारी, चाणक्याचं बाप वैगरे वाटत/म्हणत होते पण आता सत्ता जाताना दिसत आहे तर काय मानसिकता असेल. आपलं नेतृत्व अदूरदर्शी किंवा दरबारी राजकारणात कमी पडतंय किंवा कमकुवत आहे हे जर मानसिकता तयार झाली असेल किंवा तशी जाणूनबुजून खतपाणी घातली गेली तर काय मानसिकता होईल यावर ही बऱ्याच गोष्टी आहेत. आणि वर साम दाम दंड भेदची जी गोष्ट सांगितली त्यांचा प्रयोग यांच्यावर होणार नाही असं होणार नाही.

चौथी गोष्ट काँग्रेसची. सुरवातीला तयार न्हवते पण शरद पवार यांनी गळ घातली म्हणून कॉमन प्रोग्रॅमच्या नावाखाली तयार झाले पण त्यातही थेट सेनेला पाठिंबा नाही तर राष्ट्रवादीला पाठिंबा हा स्टँड होता. पण तरीही मनात धाकधूक होती किंवा असेल की शरद पवार कधीहि फासे फिरवू शकतात. हीच गोष्ट आमदार बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली की ते जोपर्यंत सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवता येणार नाही. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे एका राज्याचा विचार करण्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो याचा जास्ती विचार करणारा आणि म्हणून सेनेच्या सोबत घेत जाऊन आपल्या राष्ट्रीय इमेजवर काय इम्पॅक्ट होईल हा विचार करून सुरवातीपासून सावध भूमिका घेत आला आहे. जर सत्ता जात असेल तर आपली सेक्युलर प्रतिमा अजून खराब होऊ नये म्हणून ऐनवेळी विरोधात बसन्याचा निर्णय घ्यायचं ठरवलं तर महाविकास आघाडीच्या गाडीचं चाक तिकडेच बसेल. असा ही शरद पवार यांनी दिरंगाईचा ब्लेम काँग्रेसवर टाकला आहेच उद्या प्रयोग फसला तर काँग्रेसवर हे खापर फुटणारच आहे किंवा फुटणार ही गोष्ट काँग्रेस नेत्यांना माहिती नसणार हे शक्य नाही आणि बाकी उरलेला ब्लेम अजित पवारांवर असेल. आता अजित पवारांचा गेम पाहून काँग्रेस नक्कीच नाराज झाली असणार आणि तेल ही गेले तूप ही गेले, सेनेच्या नादी लागून राष्ट्रीय इमेज ही जाणार हा विचार असणारच असणार. त्यामुळे यांचा पडद्यावरचा आणि पडद्या मागचा स्टॅण्ड काय राहतो महत्त्वाचे असणार.

पाचवी गोष्ट BJP ची. सर्वात जास्त आमदार निवडून आणून आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनून हे शांत बसतील असं कोणालाही वाटलं असेल तर. मी अनेकदा लिहलं आहे काँग्रेस पेक्षा BJP अधिक सत्ता पिपासू आणि हार्ड आहे. आता वाजपेयी वैगरेंचा टाईम गेला, आत्ताचे नेतृत्व वेगळं आहे आणि अत्यंत खुनशी + पाताळयंत्री आहे. त्यांचे डावपेच ओळखण्यात विरोधक कमी पडत आहेत. शत प्रतिशत हा BJP चा नारा आहे, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सत्ता स्थाने हातात असतील हे आजच्या नेतृत्वाला खूप चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्यामुळे नीतिमत्ता वैग्रेरे गोष्टी सकाळी चहा नाश्त्यासाठी बऱ्या असतात हा BJP चा ओव्हर ऑल attitude आहे.

असो, मला अजूनही असं वाटतंय की शरद पवारांच्या माहिती शिवाय हा गेम झाला नसावा किंवा होऊच शकत नाही. स्ट्रॉंग फिलिंग्ज आहेत "कुछ तो गडबड हें दया". शरद पवार ४५ मिनिटं मोदींशी फक्त शेतकरी प्रश्नावरच बोलले असतील ?? त्यानंतर अमित शहा यांच्याशी भेट घेतली अशी चर्चा आहे ती भेट नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई लवकरात लवकर द्या फक्त यासाठीच असेल ?

कदाचित यापेक्षाही काहितरी वेगळं पडद्याआड घडत असेल आणि कदाचित अजून मोठी कलाटणी या नाट्याला मिळेल ही. नंतर कदाचित या सर्व घडामोडी समोर येतील ही किंवा कधी येणार ही नाहीत कारण मोठ्या लोकांच्या गोष्टी कार्यकर्त्यांप्रमाणे कधीही रस्त्यावर किंवा दारूच्या गुत्त्यावर होत किंवा ठरत नसतात.

असो, मागे एका पोस्टमध्ये लिहल्या प्रमाणे "हॉलीवूड मुव्हीला ही लाजवेल एवढा मोठा सस्पेन्स आणि थ्रिल देणारा ड्रामा महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे", अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यातच आहेत. आपलं काम फक्त पॉपकॉर्न घेऊन हा ड्रामा एन्जॉय करणं Happy

- *नचिकेत गुरव*

निवडणूका बंदच करायला हव्यात. दर पाच वर्षांनी पक्षांनी घोडेबाजार भरवून वाटण्या करून शपथविधी उरकायचा.
कशाला उगाच जनतेला मतदानाचा त्रास.

Atishay uttam batami.
Serva sambandhitanche abhinandan.
Maha la punha Devendra Ji CM mhanun laabhale the khupach uttam.
Jay Maharashtra!

Pages