कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आता शरद पवार म्हणतायेत सत्ता स्थापनेला वेळ लागणार आहे, आता ह्या सर्वांनी जास्त वेळ लावला तर फडणवीस मुख्यमंत्री होतीलही, काहीतरी जुगाड करून.

नाहीतर एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे जास्त चान्सेस वाटतायेत.

काहीतरी जुगाड म्हणजे आमदार फोडायचे किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावून बहुमताचा आकडा खाली आणायचा. कर्नाटक ऑपरेशन कमलासारखं.
कर्नाटकात येत्या तीन आठवड्यांत पोटनिवडणुका आहेत.
त्यांचा निकाल महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचा आहे.

शिवसेनेने सत्तेसाठी बंड केले की पक्ष वाचवण्यासाठी.
Bjp बरोबर राहिलो तर हळू हळू महत्व कमी होईल आणि पक्ष संपेल ही तर भीती नाही ना

भरत असंच काहीतरी करतील असं वाटतंय, नाहीतर येणार कसे, कुठल्यातरी पक्षाचा बाहेरून पाठिंबा किंवा सत्तेत सहभाग असल्याशिवाय कसे येणार. पण ते तर सांगतायेत भाजपचं सरकार येईल आणि बाकीच्यांचं ठरत नाहीये अजूनही.

>>> असे का वाटते तुम्हाला? >>>

फेरनिवडणुकी भाजप (२५.७५ टक्के), शिवसेना (१६.२५ टक्के) व कॉंग्रेस-राष्ट्रवादी (३२+ टक्के) यांच्यात लढत होईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपल्या आघाडीत मनसे, वंचित असे नवे मित्र घेतील व ममतदानाची टक्केवारी ३५+ करतील.

अशा परिस्थितीत ३५+ टक्केवालेच जिंकतील.

खरं तर भाजप-सेना यांच्या भांडणामुळे व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने भाजप व सेनेची कमी होणारी मते या आकडेवारीत धरलेली नाहीत.

फेरनिवडणुकी भाजप (२५.७५ टक्के), शिवसेना (१६.२५ टक्के) व कॉंग्रेस-राष्ट्रवादी (३२+ टक्के) यांच्यात लढत होईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपल्या आघाडीत मनसे, वंचित असे नवे मित्र घेतील व ममतदानाची टक्केवारी ३५+ करतील. >> ओके.
मला कारण जाणून घेण्यात जास्त ईंट्रेस्ट आहे... मतांची ही सेम टक्केवारी २०-२५ जागा ईकडे तिकडे करू शकते हे आपल्याला माहित आहेच.

>>(सूत्रांकडून)
Submitted by ऋन्मेऽऽष on 14 November, 2019 - 13:33<<
ऋन्म्या, मस्त फॉरवर्ड आहे. काल अजुन एक फॉरवर्ड वाचण्यात आला, महाराष्ट्रात भाजपाने केलेल्या विश्वासघात आणि भिकार## पणा बद्दलचा. बहुतेक त्या घटनांचा गंध, आणि त्याचे दूरगामी परिणाम याचा मागमुस हि इथल्या फुटसोल्जरस्ना नसेल...

असो, सेना+राकाँ+काँ यांचं सरकार आता आल्यातच जमा आहे. शेवटी जो जिता वोहि सिकंदर; मग फडणविस आणि त्यांचे फुटसोल्जर्स कितीहि ठणाणा करु दे, त्यामुळे ग्राउंड रियॅलिटी बदलणार नाहि...

मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या होऊ घातलेल्या 'महाआघाडी'वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच हिंदुत्वाशी तडजोड करणार नाहीत अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. तसंच सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याच्या मागणीवरून ठाकरे मागे हटणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

----

महाराष्ट्रात अर्धवट सत्ता, केंद्रात फाटलेले
मग आता ठाकरे वचन कसे पाळणार ?

टू मेनी धागे.
कुठे काय चाललंय ते कळेना.
आधी कसे हजारी , दोन हजारी धागे चालायचे आणि मग पुरेशी चर्चा झाली की ॲडमिन ते वाहते करायचे. Wink

सावरकरांना भारतरत्न देणं हा निवडणुकीचा मुद्दा होता का?
मोदी सरकार आल्यावर पाच प्रजासत्ताक दिन झाले. त्यांचं सावरकरांचा नंबर लागला नाही.
प्रणवबाबूंचा लागला. त्यांच्यासाठी रेकमेंडेशन कोणी केलं?

पाच वर्षांत मतदारांबद्दल अविश्वास वाटला नव्हता.
निवडणुकांच्या तोंडावर वाटला म्हणून युती, मेगा भरती आणि सावरकर.?

सावरकर आता राजकीय मुद्दा झाले आहेत हे दुर्दैव. निवडणूक जिंकली 'तर' त्यांना भारतरत्न देऊ हे ५ वर्ष सत्ता राबवून नंतर सांगायला एक पराकोटीचा निर्लज्जपणाच फक्त लागतो.

बाकी शरद पवारांचं सावरकरांचं गुणगौरव करणारं एक भाषण युट्यूबवर आहे. (हो पवारच लिहिलंय, पोंक्षे नाही.)
https://www.youtube.com/watch?v=pohxVTG5uaA

त्यामुळे राजकीय मुद्दा होण्याआधी सावरकर दोन्ही बाजूना अस्पृश्य नसावेत असा एक अंदाज आहे.

जाऊदे ज्याच्या नशिबात असेल तो होईल, एक किंवा जास्त. एक पाच वर्षे किंवा वेगवेगळे अडीच वर्षे किंवा काही सांगू शकत नाही.

पाच वर्षे सलग फडणवीस राहिले बहुतेक नाहीतर शेवटी काही ना काही कारणाने बदलतात. असं बरेचदा बघितलं आहे.

>>>>>त्यामुळे राजकीय मुद्दा होण्याआधी सावरकर दोन्ही बाजूना अस्पृश्य नसावेत असा एक अंदाज आहे. <<<<<<

अस्पृश्य नसावेत . खुपच माईल्ड शब्द वापरलात. काॅंग्रेसच्या काळात ( मणि शंकर अय्यर सारख्यांच्या प्रवेशा नंतर )
सावरकरांवर जाणिव पुर्वक हल्ला केला गेला. जिथे जिथे सावरकरांचे नाव होते तिथुन व्यक्तीगत खुन्नस असल्या प्रमाणे हटवल्या गेल्या. त्याकाळात महाराष्ट्रात काॅग्रेसचेच सरकार होते व त्यातल्या एकानेही ह्या घटनेची नोंद सुद्धा घेतली नाही. १९७० च्या नंतर
हिंदु समाजाचे खच्चिकरण हा एक अग्रमी कार्यक्रम भारतात राबवायला सुरुवात झाली.
अयोध्या केस मध्ये अर्बन नक्षली रोमीला थापर , ईर्फान हबिब गॅंगने ५०-६० लोकांच्या सह्यानीशी खोटे एफिडेव्हीट कोर्टाला सादर करणे ह्याचाच एक भाग होता. चक्क बाबरी मस्जिदच्या खाली मंदिराचे कोणतेही अवशेष नाहीत अस छाती ठोक खोट पत्र ह्या लोकांनी कोर्टाला दिल. अयोध्या केस जाणिव पुर्वक मुसलमानांच्या बाजुला वळवण्याचा प्रयत्न केला गेला.

हिंदु समाजा सारख्या कुंभकर्णाची झोप घेणार्यांना येन केन प्रकारेण झोपे तुन जागे करुन एकजुट करणे महत्वाचे आहे.
आजच हैदराबाद मध्ये राम मंदिर तोडेंगे , बाबरी मस्जीद वापस लेंगे असा मोर्चा काढण्यात आलेला आहे. ह्या
मोर्च्याच्या मागे असद्दुदीन ओवेसी आहे.
भारताच्या कायद्यानुसार ह्यात काही गैर नाही. हल्लीच कमलेश तिवारीचा दिवसा ढवळ्या भर वस्तीत घरात घुसुन खुन केला गेला पण कोणीही प्रदर्शन केल नाही ना कोणाला भारतात रहायला भिती वाटली. खुन करणारे मुसलमान युवक सुरत वरुन आले. खुन केल्यावर त्यांना बरेलीत रहायची लपायची व्यवस्था करण्यात आलेली होती.

कांग्रेसचा मुख्यमंत्री आणि सभापती झाला तरच आघाडीत येणार. यामुळेच अडलंय. ४४ जागांत १२ पदंही घेणार म्हणजे सरकार आघाडीचं नाही तर कांग्रेसचंच.

वाघाने तोंडाला पट्ट्या गुंडाळून घेतल्या आहेत. नखे ओढून आत घेतली. हे पाहून बाळासाहेबांना आनंदच झाला असता. बाकी व्यंगचित्रे राज काढतीलच.

भाजपवाल्यांनी आपल्याकडे स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कोणीही नसल्याच्या महान कर्तबगारीला गालबोट लागू नये म्हणून सावरकरांना (त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी सावकाश) आपलंसं करण्याचा प्रयत्न केल्यानंतरच सावरकरांच्या नशिबी हे भोग आले असावेत.

म्हणजे काय?

ऱाजवाड्यात राहून गाद्यागिरद्यांवर लोळत स्थानबद्धतेचे नाटक करून ब्रिटिशांच्या हिताचे काम करणारे भाजपत कोणीही नव्हते?

अहिंसेच्या असहकार चळवळीच्या जोरावर भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिल अस जनतेच्या मनावर ठसवण्याच्या महान कर्तबगारीला काॅंग्रेस वाले स्वातंत्र्यलढा म्हणत होते !!
स्वातंत्र मिळाल्यावर फक्त काॅंग्रेसी जनांनीच मलाई आपापल्यात वाटुन घेतली आणि शहिद भगत सिंग, राजगुरु सुखदेव व नेताजी सुभाष सारखे जनतेमध्ये प्रिय नेत्यांना अडगळीत टाकले.

बरं. संघ, जनसंघ , भाजपने इतकी वर्षं सावरकरांसाठी काय केलं ते सांगा. ते जिवंत असताना आणि ते गेल्यानंतरही.
------------
कर्नाटकमधल्या भाजप समर्थकांसाठी -
नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या आणि आता निवडणुकीला उभे राहिलेल्या भावी मंत्र्यांच्या निवडणूक घोषणापत्रांचा अभ्यास करून त्यांच्या संपत्तीत किती वाढ / घट झाली ते इथे लिहाल का?

सेना>> राकां >>कां अशी प्रगती झाली म्हणजे शेवटचा पक्ष सर्वाधिक कमाई मागणार आणि पहिला गमावणार.
आता जर सेना उपमुमंत्रीपदावर तयार झाली तर शिवसैनिक बिथरणारच. आणि कां मुमंत्रीपदावरच अडून बसल्याने राऊतांचे कठीण आहे.

नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या आणि आता निवडणुकीला उभे राहिलेल्या भावी मंत्र्यांच्या निवडणूक घोषणापत्रांचा अभ्यास करून त्यांच्या संपत्तीत किती वाढ / घट झाली ते इथे लिहाल का? >>>> वाडवडिलार्जित संपत्ती काहीही नाही, घरातील कुणीही कधीही पोटापाण्यासाठी नोकरी वगैरे केली नाही, राजकारणात आले तरी आमदारकीचं वेतनही नाही तरी ठाकर्‍यांची संपत्ती दिवसागणिक कशी वाढतीय हे रहस्यही सांगून टाका एकदा.

ह्या देशात सर्व पक्ष,सर्व राजकीय नेते टक्केवारी मध्ये पैसे कमावतात हे उघड सत्य आहे.
तेव्हा कोणीच कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला क्लीन चीट देवू नये

संसदेच्या दोन्ही सभागृहात शिवसेना आता विरोधी बाकावर दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार आणि गटनेते विनायक राऊत यांनीही याबाबत माहिती दिली. ‘शिवसेनेला एनडीएच्या बैठकीला आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीला जाणार आहोत, आम्ही बाहेर पडण्याबाबत अजून कुठेही जाहीर केलेलं नाही. राज्यसभेतील आमच्या खासदारांच्या आसन व्यवस्थेत बदल केल्याचंही कानावर आलं आहे. भाजपला ही दुर्बुद्धी सुचली असेल तरीही आम्हाला त्याचा फरक पडणार नाही,’ असं ते म्हणाले.
राज्यातील राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरु केली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपलाही सत्तेपासून दूर राहण्याची परिस्थिती उद्भवली आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होतं. मात्र राज्यातील घडामोडींनंतर त्यांनीही राजीनामा दिला. यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील दुरावा आणखीच वाढला.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाशिवआघाडी आकाराला येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष या महाशिवआघाडीमध्ये आहेत. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महाशिवआघाडीच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान या महाशिवआघाडीकडून भाजपाला नाशिकमध्ये पहिला धक्का मिळू शकतो.

Pages