Submitted by सूलू_८२ on 15 October, 2019 - 08:53
सु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिळतात. माझ्याकडे किंडल वरून
मिळतात. माझ्याकडे किंडल वरून बरीच सु शि पुस्तके आहेत.बुकगंगा ची पण.संदर्भासाठी लिस्ट देते माझ्याकडच्या विकत च्या पुस्तकांची
अरे वा, आज बर्याच
अरे वा, आज बर्याच दिवसान्नी धाग्यावर हालचाल दिसतीये.
मस्तच अनु,धन्स
मस्तच अनु,धन्स
पण पुस्तकांची price 0 का दिसतेय
ही कुठून घेतली आहेत तुम्ही
माहीत नाही, आता 0 दिसतेय
माहीत नाही, आता 0 दिसतेय
सगळी किमतीतच आहेत.बऱ्याच काळापूर्वी घेतल्याने असेल कदाचित
बुकगंगा वर
किंडल चा अनुभव कसा आहे? आणि
किंडल चा अनुभव कसा आहे? आणि कुठलं version वापरताय ?
मला इंग्लिश वाचायचा कंटाळा येतो. मराठी पुस्तके इतक्या प्रमाणात उपलब्ध आहेत का ए पुस्तके म्हणून? is it worth to buy kindle ?
किंडल खरेदी न करता तुमच्या
किंडल खरेदी न करता तुमच्या टॅब किंवा मोठ्या फोनवर किंडल ऍप टाकून पुस्तक खरेदी करून वाचता येईल.
किंडल वर खूप पुस्तकं आहेत.वाचनाची आवड असल्यास किंडल वर किंडल अनलिमिटेड घेऊन बरीच पुस्तकं फुकट आहेत.शिवाय प्राईम सबस्क्रिप्शन घेतल्यास बरीच पुस्तकं फुकट आहेत.
छापील पुस्तकांच्या किमती, लागणारी जागा, रात्री झोपताना पडून वाचायचे असल्यास आजूबाजूच्या मेम्बराना लाईट चा त्रास वगैरे मुद्दे पाहता किंडल बुकगंगा पैसे वसूल ऍप आहेत.
धन्यवाद..
धन्यवाद..
समांतर वर वेब सिरीज आली
समांतर वर वेब सिरीज आली
शेवट काय होते ?
सुशिंची पुस्तके कंटेंट पेक्षा
सुशिंची पुस्तके कंटेंट पेक्षा लेखनशैलीसाठीच आवडतात. त्यांची लेखनशैली खरंच भन्नाट होती. @ अस्मानी ....
१००% सहमत ...मी सुशिंची अजूनही जबरदस्त फॅन आहे. त्यांच्या अल्मोस्ट सगळ्या पुस्तकांची अगदी पारायणं केलेली आहेत. दुनियादारी तर किती वेळा वाचलं असेल मलाच माहित नाही.
सालेम (salam ) देखील खूप आवडतं पुस्तक आहे.
सुशींनी जेव्हां पुस्तके
सुशींनी जेव्हां पुस्तके लिहीली तेव्हांचा काळ लक्षात घेतला तर प्रस्थापित होणे अवघड होते. सुशींकडे लिखाणाची जबरदस्त अशी शैली होती. मात्र थेट कादंबरी लिखाणात त्यांना कुणीही उभे केले नसते.
त्या वेळी एक तर प्रस्थापितांचे साहीत्य किंवा रहस्यकथा हे दोनच प्रकार छापले जायचे. रहस्यकथा लेखकांना प्रस्थापितांचे स्टेटस नव्हते. सुशी हे धूर्त आनि चतुर असावेत. त्यांनी सुरूवात रहस्यकथा (बाबूराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, हेमन कर्णिक इ) लिखाणापासून सुरूवात केली. त्यातही त्यांचे वेगळेपण दिसून आले. त्यांना एक वाचकवर्ग लाभला. या सुरूवातीच्या काळात त्यांनी अमर विश्वास, फिरोज इराणी, मंदार पटवर्धन आणि दारा बुलंद ही चार पात्रे जन्माला घातली. पुढे या कथांचा संग्रह करून प्रकाशक पुस्तके छापू लागले.
या काळापासून त्यांनी कादंबरीकडे मोर्चा वळवला. रहस्यकथा जवळपास थांबवल्या. त्या ऐवजी गूढ कथा, विस्मयकथा आणि भयकथांकडे मोर्चा वळवला. विस्मयकथा हा त्यांनीच आणलेला प्रकार. स्वतःच्या विस्मयकथातल्या पात्रांवर एक कादंबरीही लिहीली. ज्यात ही सर्व पात्रे लेखकाला एका कॉटेजमधे जाब विचारायला येतात. एक रोज लहान होत जाणारा मनुष्य, रोज बौद्धीक वयाने वाढणारी एक मुलगी (जी शरीराने तरूण होईपर्यंत अध्यात्माच्या ओढीला लागलेली असते) अशी काही पात्रे भन्नाट होती.
टीन एज ते तिशीपर्यंत प्रस्थापितांचे लिखाण महाबोअर वाटत असते. अशा वेळी सुशींनी रसिकांची सेवा केली. आता ते टीन एजच्या अनेक गोष्टींप्रमाणे मागे पडलेत इतकेच. पण वाचनाची आवड त्यांनी लावली.
पहाटवारा ही त्यांची सर्वात आवडलेली कादंबरी. यावर चित्रपट निघेल असे वाटत होते. सुशींच्या लिखाणात व्हिज्युअल इफेक्ट्स असत. जणू काही पडद्यावर चित्रपट बघतोय असे वाटे. पहाटवारा वाचताना चित्रपट पाहील्यासारखे वाटले. चित्रपटाचा क्लायमॅक्स जितका थरारक असणार नाही तितका या कादंबरीचा शेवट थरारक आहे. जर ही कादंबरी पडद्यावर हाताळताना चूक झाली तर त्यातली मजाच निघून जाईल.
अमूक एक लेखक वाचणार नाही अशा घोषणा करणा-यांची गंमत वाटते. अशी घोषणा केली नसती तर त्यांना फाशी देण्यात येणार होती का ?
धुकं धुकं, क्षणोक्षणी आणि
धुकं धुकं, क्षणोक्षणी आणि वेशीपलिकडे ही पुस्तकं वाचली आहेत. पण कुठल्या पुस्तकात कोणती कथा हे आठवत नाही.
क्षणोक्षणी बहुतेक विमान अपघातात वाचलेल्या एका पायलटचा जीव वाचवताना क्षणोक्षणी घडणारे नाट्य आणि जीव वाचवताना एक एक क्षणाचा खेळ असे काहीतरी असावे.
एका जहाजावर च्या कप्तानाला आपल्या जहाजाचा विलक्षण अपघात होऊन आपण एका बेटावर पोहोचलो आहोत, इथली दुनिया खूप वेगळी आहे. लोक डोकं द्दुखत असल्यास डॉक्टरकडे जाऊन डोकं ठेवून दुसरं डोकं घेऊन जात असतात असं काहीसं कथानक आहे. ते त्याचं स्वप्न असतं. स्व्पनातून जागा झाल्यावर स्वप्नात जसा अपघात होतो तसाच अपघात आता होताना त्याला दिसतो अशी एक कथा होती.
विलक्षण नावाचे पुस्तक बहुतेक संकलित कथा होत्या.
धारपांची आणि सुशींची पुस्तके प्रकाशकाप्रमाणे नवीन रूपात येतात. त्या वेळी नाव बदललेले असते. आधीच्या संचात वेगळ्या कथा असतात, या संचात वेगळ्या. ज्या नावाने पुस्तक आहे ती कथा फक्त कॉमन असते.
एका कथेचं नाव कुणाला माहीत
एका कथेचं नाव कुणाला माहीत आहे का ?
देशाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशी माहिती घेऊन आलेल्या एका गुप्तहेरावर जीवघेणा हल्ला होतो. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमधे नेण्यात येते. तिथे तो कोमात जातो. त्याच्या मेंदूत बहुधा रक्ताच्या गाठी झालेल्या असतात. या अवस्थेत त्याचा जीव गेला तर ती माहिती कायमची जाण्याधी धास्ती असते. त्या वेळी माणसाला नॅनो आकारात लहान करण्याची एक मशीन विकसित झालेली असते. टॉप लेव्हलला निर्णय होतो की या मशीनचा उपयोग करून डॉक्टरांना सूक्ष्म बनवून रूग्णाच्या मेंदूत सोडायचे. तिथे ते रक्तवाहिनीतले अडथळे दूर करतील.
एक डॉक्टर देशप्रेमाने प्रेरीत होऊन ही रिस्क घ्यायला तयार होतात. ते पेशंटच्या रक्तवाहिनीत शिरतात. पुढे त्यांच्यावर पांढ-या पेशींचे सैन्य कसे आक्रमण करते, ते कसे जीव वाचवत मेंदूत पोहोचतात आणि अडथळा हुडकून काढतात हे छान लिहीले होते. या कथेचा शेवट धक्कादायक होता. विस्मयकथामालिकेतलीच ती कथा होती.
https://www.imdb.com/title
https://www.imdb.com/title/tt0060397/ हीच ती कथा का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=tZNDVDkddSI
ही गोष्ट का ?
सुशींची एक कथा कुठल्या तरी
सुशींची एक कथा कुठल्या तरी विदेशी कथेवर बेतलेली आहे हे वाचून न वाचण्याचा निर्धार केलेल्यांचा आदर आहेच.
नटसम्राट हे जर कुठल्या एखाद्या विदेशी कथेवरून बेतलेले असेल तर ते वि वा शिरवाडकरांना पण हाच न्याय लावतील का ?
ती फुलराणी हे नाटक ही मूळ एखाद्या विदेशी नाटकावरून बेतलेले असेल तर ?
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Fantastic_Voyage
हा सिनेमा आलेला आहे या विषयावर १९६६ साली
समथींग माझी आवडती कादंबरी.
समथींग माझी आवडती कादंबरी. सुरेख कथा आणि मांडणी. आजकालच्या सर्व भयकथामंध्ये भूत कथेच्या दुसऱ्या-तिसऱ्या पानांवरच अवतीर्ण होते. समथींग मध्ये तसे नाही. एक प्रेमकथा व्यवस्थित फुलवलेली आहे आणि त्या कथेचाच पुढचा भाग भयकथेत परिवर्तीत होतो.
बादवे, दुनियादारी, फिरोज इराणी, मंदार, दारा बुलंद ह्या कथा मला कधीच आवडल्या नाहीत. उलट सुशींच्या सुरुवातीच्या काळातल्या , जास्त लांबट न लावता ओघवत्या शैलीत लिहिलेल्या स्वतंत्र कथा सर्वात भारी वाटतात.
स्टुपिड, जाता-येता, बरसात चांदण्यांची, कोसळ, एका कथेत एका कुटुंबारवर माथेरानला माकडांनी केलेल्या हल्ल्याची स्टोरी आहे-नाव आठवत नाही, मातम, धुकं धुकं
अरेच्चा !
अरेच्चा !
शोलेबद्दल झालंय की इथे. ज्यांना ज्यांना सुशींच्या कथा ढापलेल्या आहेत असे वाटते त्या सर्वांनी शोल पाहण्यास नकार दिला असेल असे समजायचे का ? किंवा नंतर समजल्यावर रमेश सिप्पी यांनी त्यांची फसवणूक केली असे आजवर मत बाळगले असेल का ?
कथा ढापण्याचे समर्थन अजिबात नाही. मात्र सकाळी वर दोन ज्यांची उदाहरणे दिलेली आहेत ती नावे मराठी क्षेत्रात वंदनीय आहेत. त्यांच्याबाबत या आयडींचे मत काय असेल हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे. नटसम्राट आणि ती फुलराणी कशावरून घेतलेय हे माहीत नसेल तर कळवावे.
मराठीत ऐतिहासिक कादंब-यांची
मराठीत ऐतिहासिक कादंब-यांची सुरूवात झाली तो काळ साहीत्य क्षेत्रात शेक्सपीअरचं गारूड असण्याचा होता. शेक्सपीअरप्रमाणे आपल्या भाषेत भरजरी कलाकृती असायला हव्यात या वेडाने अनेकांनी कादंबरी लिखाण म्हणजे ऐतिहासिक आणि पौराणिक व त्याला भरजरी संस्कृतप्रचुर भाषा असे स्वरूप दिले. त्याचा परिणाम म्हणून मराठीत कथा कादंब-या लिहायच्या तर अशीच भाषा वापरायला हवी असा समज वाचकांचाही झालेला होता. यातून शंकर पाटील. दमा मिरासदार, पुल देशपांडे अशा लेखकांनी वेगळ्या वाटा दाखवल्या. दलित साहीत्याचा प्रवाह आला. मुस्लीम साहीत्याचा प्रवाह आला. तरीही मुलांना उत्तम वाचायला देणे म्हणजे श्रीमान योगी ते स्वामी ही परंपरा अजूनही आहे.
त्या काळात बहुतांश मराठी वाचक इंग्रजी वाचत नव्हता. पेरी मॅसन या पात्रावर बेतलेला अमर विश्वास मराठीत आणला याचा अर्थ पेरी मॅसनच्या कथा ढापल्या असे नाही. सत्यजित रे यांनी शेरलॉक होम्स वरून व्योमकेश बक्षी हे पात्र आणले. तर मग सत्यजित रे हे उचल्या झाले का ?
थोडक्यात असे.
सत्यजित रे यांनी शेरलॉक होम्स
सत्यजित रे यांनी शेरलॉक होम्स वरून व्योमकेश बक्षी हे पात्र आणले. तर मग सत्यजित रे हे उचल्या झाले का ?>.>>>
तुम्हाला शरदेंंदू बंदोपाध्याय म्हणायचे असेल नाही का?
पण ओरिजिनल ते ओरिजिनल आणि कॉपी ती कॉपी. ह्यात वादावादी करण्या सारखे काही नाही.
सत्यजित रे यांनी शेरलॉक होम्स
सत्यजित रे यांनी शेरलॉक होम्स वरून व्योमकेश बक्षी हे पात्र आणले.>> किती सहज ही एकाचीच अनेक पात्रे ज्ञान किरण पाजळत असतात
पण ओरिजिनल ते ओरिजिनल आणि
पण ओरिजिनल ते ओरिजिनल आणि कॉपी ती कॉपी. ह्यात वादावादी करण्या सारखे काही नाही. >>> सरजी असे मी कुठे म्हटलेय ?
माझा मुद्दा नीट वाचा. जर हीच भूमिका असेल तर ती फुलराणी आणि नटसम्राट हे ओरिजिनल नाही म्हणून या लेखकांची पुस्तके वाचणार नाही अशी भूमिका घेणार काय ? यात ढापाढापाच्या समर्थनाचा प्रश्न आला कुठे ?
सत्यजित रे यांचा उल्लेख चुकून झाल्याबद्दल क्षमा.
शांत माणुस सहमत आहे मी
शांत माणुस सहमत आहे मी तुमच्याशी. मी अजूनही फिरोज, अमर, मंदार कथांची पारायणे करते. बरसात चांदण्यांची सोडली तर बाकी रोमँटीक कथा बहुतेक मी वाचल्याच नसतील, कारण मुळातच मला रोमँटीक कथा आवडत नाहीत.
बरसात चांदण्यांची खूप गोड आहे
बरसात चांदण्यांची खूप गोड आहे.
जाता येता पण
ती अजून एक आहे, आंतर धर्मीय प्रेम कथा वाली. बहुतेक आसमां महल
ती पण चांगली वाटली होती.
तलाश नावाची कादंबरी का
तलाश नावाची कादंबरी का आंतरधर्मिय प्रेमाची ?
किती सहज ही एकाचीच अनेक
किती सहज ही एकाचीच अनेक पात्रे ज्ञान किरण पाजळत असतात Wink
Submitted by Filmy on 5 July, 2021 - 07:03 >>> भरतजी, तुमचा गैस होतोय. वाटल्यास वेमा किंवा अॅडमिन यांच्याकडून आयपी अॅड्रेस मागवून टॅली करून घ्या. हे दोघे तुम्हाला पात्र समजत असतील तर
भरतजी, मी काय म्हणतो तुम्ही आणि तुमचे ड्युआयडीज राजकारणाच्या चिखलापुरते मर्यादीत ठेवावेत. इतरांना बाकी ठिकाणी काय करायचे ते करू द्यावे. काय म्हणता ? मी कोण हे समजत नसल्याने तुमचा होणारा चडफडाट पाहून वाईट वाटतंय.
नाव नाही आठवत.
नाव नाही आठवत.
तलाश बहुतेक ती रसिक नावाचा चित्रकार आणि सीमा नावाच्या मुलीची का?
तलाश मधे मुलगा मुस्लीम असतो.
तलाश मधे मुलगा मुस्लीम असतो. मुलगी हिंदू. किंवा उलट. दंगलीमुळे वातावरण बिघडतं. त्या मुलीला मुहल्ल्यातली मुलं त्रास देतात. पुढे ती पळून जाते आणि मुंबईत येते. हा सातत्याने तिचा शोध घेत मुंबईत येतो. जेव्हां सापडते तेव्हां ती ओळख देत नाही. ती मुलगी वेश्यावस्तीत अडकलेली असते. तिथून तिच्या सुटकेचे प्रयत्न तो करत राहतो. उत्कंठा ताणून धरणे हा सुशींचा युएसपी इथेही आहे.
माझा मुद्दा नीट वाचा. जर हीच
माझा मुद्दा नीट वाचा. जर हीच भूमिका असेल तर ती फुलराणी आणि नटसम्राट हे ओरिजिनल नाही म्हणून या लेखकांची पुस्तके वाचणार नाही अशी भूमिका घेणार काय ? यात ढापाढापाच्या समर्थनाचा प्रश्न आला कुठे ?>>>
ओहो शांत माणसा, मी कुठे काय म्हणतोय? मी पण ही पुस्तक आवडीने वाचतो .तुम्ही पण वाचा. तुम्ही कॉपी पेस्ट चे समर्थन करत आहात असेही मी कुठे म्हटले नाही. मी फक्त एवढेच म्हणतो आहे की "पण ओरिजिनल ते ओरिजिनल आणि कॉपी ती कॉपी. ह्यात वादावादी करण्या सारखे काही नाही." कॉपी पेस्ट करून मराठी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या सगळ्या लेखकांचे मनःपूर्वक आभार.
प्रभुदेसाईजी, धागा
प्रभुदेसाईजी, धागा पहिल्यापासून वाचा. अशा शब्दच्छलात विनाकारण उर्जा खर्च करण्यात हंशील नाही.
Pages