Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>Swapna mast Kavita jamliye
>>Swapna mast Kavita jamliye
धन्स
भुत्ं म्हणजे अण्णाच्या मनाचे भास आहेत. डीजे, त्या नोकराच्ं नाव नाथा. मला वाटतं शेवंता मरते आणि नाईक नाथाकदे सुषल्याला ठेवतात इथे मालिका संपेल. आता शेवंताचा काटा अण्णा काढतात का वच्छी एव्हढ्ंच बघायचं. तसंच खून करुन ती आत्महत्या आहे हे पोलिसांच्या गळी कसं उतरवलं हाही प्रश्न आहेच.
मला वाटतं शेवंता मरते आणि
डीजे, त्या नोकराच्ं नाव नाथा. >> हो ना.. विसरलंच.. धन्स
मला वाटतं शेवंता मरते आणि नाईक नाथाकदे सुषल्याला ठेवतात इथे मालिका संपेल. >> इथे कशी संपेल..? अभिरामाचं लग्न ठरलेलं दाखवायला लगणार.. आण्णा नेमकं कसे मेले तेही दाखवावे लागणार (८ खुन करुन काहीही शिक्षा न होता आरामात मेलेला दाखवणे म्हणजे अशी कृत्ये करणार्यांना मोकळीक देणे ठरेल ).. मला तर वाटते राखेचा१ च्या लास्ट एपिसोडच्या पुढचा एखादा प्रसंग (अथवा आण्णा कसे मेले ते शोधुन त्या आरोपीला शिक्षा वैगेरे दाखवायला हवे) दाखवायला हवा तर कुठे मनात शंकेची पाल चुकचुकायची नाही.
अहो पण अण्णाला हार्ट एटेक आला
अहो पण अण्णाला हार्ट एटेक आला होता ना.त्यात आरोपी कुठून आला??? मला तरी माधव किंवा छोटा अभिराम आता परत आणतील असं वाटत नाही.
>>८ खुन करुन काहीही शिक्षा न
>>८ खुन करुन काहीही शिक्षा न होता
बरोबर.....सात खून माफ....आठव्याला शिक्षा हवीच
(No subject)
अहो पण अण्णाला हार्ट एटेक आला
अहो पण अण्णाला हार्ट एटेक आला होता ना.त्यात आरोपी कुठून आला??? >> नक्की हार्ट अॅटॅक आलाय की शोभा+वच्छीने औषध दिलं काय माहीत.. इन्स्पेक्टर मंगेश जाधवला काम नको का काही..? काल भुयाराचा दरवाजा उघडा राहिला होता.. शोभा पळुन तर नसेल गेली..? की पाटणकरणीच्या सांगण्यावरुन चोंगट्याने उघडला..?
मला तरी माधव किंवा छोटा अभिराम आता परत आणतील असं वाटत नाही.>> हो ना.. तो माधव गब्दुल्ला होऊन दुसर्या चॅनेल वर काम करतोय.. तो कसला येतोय आता... नाही म्हणायला त्याचं पत्र आलं काल. काय तो म्हातारडा पोष्टमन.. अजुन रिटायर झाला नाही चिकट-लोचट कुठला .. येऊन-जाऊन त्या माईला चिकटत असतो.. ह्याच चिकट गुणामुळे आण्णाने त्याचं कलम लावलं असणार..!!
नक्की हार्ट अॅटॅक आलाय की
नक्की हार्ट अॅटॅक आलाय की शोभा+वच्छीने औषध दिलं काय माहीत.. >>>>>>> माईने तर नाही ना मारल अण्णाला?
@ सूलू_८२ - नाही हो सूलु_८२.
@ सूलू_८२ - नाही हो सूलु_८२.. माई असां करु शकणा नाय.. "काह्यो झालां तरी सात जल्मं आण्णाच घो म्हणान राहु दे रे रवळनाथा" असा गार्हाणं घालान तां
काय तो म्हातारडा पोष्टमन..
काय तो म्हातारडा पोष्टमन.. अजुन रिटायर झाला नाही >> काही त्यांच्या वयाचा मान आहे का नाही????
अरेच्चा.. एवढं रागवण्या सारखं
अरेच्चा.. एवढं रागवण्या सारखं काय आहे त्यात... माई, वच्छी, आण्णा, आबा, नाना या सर्वांना देखील अरे तुरे केलं जातं आणि ह्या पोष्ट्याला वयाचा मान दाखवायचा आग्रह का बरे? झी गौरवचां ओव्हर एक्टिंग पुरस्कार द्यायला हवा होता याला
रचक्याने त्या पोस्टमन चा
रचक्याने त्या पोस्टमन चा तरुणपणी पौर्णिमा गानु आताची मनोहर बरोबर फिल्म/ टेलिफिल्म आली होती चि. त्र्यं.खानोलकर यांच्या दीर्घ कथेवर आधारित आठवतीय का कोणाला? चांगले काम केले होते त्यांनी
अरे, तुरे वेगळं आणि म्हातारडा
अरे, तुरे वेगळं आणि म्हातारडा म्हणणं वेगळं. बाकी चालू द्या.
असूद्या आता... पुन्हा edit
असूद्या आता... पुन्हा edit नाही करता येत.
मागे एकदा माझ्या शेजारणी ने तिच्या कुत्र्याला मी कुत्रा म्हणालो म्हणून केवढा गाहजब केला होता ते आठवलं.. त्याचं बेल्बो हे नाव आठवलं नाही तर निदान डॉगी तरी म्हणा असा
तिचा आग्रह
हि मी परत बघायला लागले. माझी
हि मी परत बघायला लागले. माझी मालवणी उजळणी होतेय. आणि आठवणी सुद्धा,
आमच्या एका मामे मावशीचा प्रेमविवाह मालवणी घरात झालेला.
आम्ही गावी गेलो की, आम्ही तिच्या घराच्या फाटकात शिरलो की, तिची सगळी आजूबाजूच्या घरातील मालवणी बच्चे कंपनी आरोळी ठोकत ,
‘गे काकू, तुजी भन इलय, तिच्या वांगडा तिचा चेडू असा. मॉप चाय टाक. ‘
‘माका पन चाय दी... ‘ म्हणत ती सगळी उघडी पोरं आमच्या आधी चहा प्यायला हजर. तो दर वेळचा सीन आठवतो ते राखेचा घराचे फाटक पाहिले की.
मावशी मुंबईची म्हणून तिला , काकू म्हणत त्यांच्या लॉजिकने..
@ झंपी, भारी आठवण सांगितली हा
@ झंपी, भारी आठवण सांगितली हा..!
झंपी भारीच
झंपी भारीच
काल शोभाचं कार्य घालत असताना
काल शोभाचं कार्य घालत असताना वच्छी मधूनच निघून जाते आणि रस्त्याकडे शेतात बांधावर बसते. तिचं लक्ष शोभा कधी परत येते यावरच असतं. तिला माई समजाऊन सांगते पण ती काही घरी जात नाही. शेवटी माई, दत्ता, चोंगत्या कार्याला पोचतात आणि आण्णामागुन पण येतो.
इकडे बांधावर बसलेली वच्छी शोभाच्या नावाने आर्ट साद घालते आणि तेवढ्यात वावटळ उठते... कार्याला आलेल्या सर्वांच्या डोळ्यात धूळ जाते.. आण्णा डोळे चोळत असताना त्याला डोळे पांढरे झालेली शोभा दिसते.
नाथाने त्या भूयारावरचे झाकण निघाले असे आण्णा ला स्वप्नात आलेले असते की ते खरेच असते..?
अण्णा स्वप्नात बघतो. नन्तर
अण्णा स्वप्नात बघतो. नन्तर नाथाकडून खात्री करून घेतो सगळं आलबेल आहे ह्याची.
अण्णा स्वप्नात बघतो. नन्तर
अण्णा स्वप्नात बघतो. नन्तर नाथाकडून खात्री करून घेतो सगळं आलबेल आहे ह्याची.>> अरे देवा.. मला वाटलं की खरोखर झाकण उघडलं.. अरेरे म्हणजे शोभा जिवंत असण्याची उरलीसुरली आशा पण मावळली
ती शोभा मान एवढी वेळावते कि
ती शोभा मान एवढी वेळावते कि आता लचकेल किंवा मानच तुटून पडते कि काय असे वाटते. मरताना तिच्या चेहऱ्यावर एकही जखम न्हवती पण भूत बनल्यावर तिचा चेहरा रक्ताने कसा काय माखलाय?
वच्छीचा माका लय वाईट वाटता..
वच्छीचा माका लय वाईट वाटता.. शोभा येउचा नाय हे काय तिकां पटणा नाय.. तिचोवांगडा आबाचा फरफट होताहा
आजच्या भागात पाटणकरणीच्या पायाला काहितरी लागलं म्हणुन तिने चोंगट्याला हाताशी धरुन उभं रहाण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात आण्णा आला.. दोघांना एकमेकांचे हात धरलेलं बघतक्षणी त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.. अन त्याने पाटणकरणीचा गळा पकडला असं परवाच्या भागाच्या शेवटी दाखवलं.
खरे तर आठवडा भर काहीही घडले
खरे तर आठवडा भर काहीही घडले नाही. नुसता टाइ म पास झाला आहे. छोट्या गावा त अजून काय घडणार म्हणा. अजून तीन चार लोकांची लफडी दाखवली पाहिजेत. शोभा एक मायनर पात्र. शेवंता काय अता अपीलिन्ग दिसत नाही. जोपरेन्त पाटणकर होता व अफेअर चे टशन होते तो परेन्त चार्म होता. बाकी काय चिल्लर लोक मारुन टाकतो दारुडा.
परवा वच्छी अन काशीची मुलाखत
परवा वच्छी अन काशीची मुलाखत पाहिली टीव्ही९ वर. मस्त होती.
वच्छी एका सामन्य घरातील गृहिणी. तिचे मिस्टर क्राईम ब्रांच पोलिस मधे आहेत , मुलगा बारावीला आहे. तिचं आजोळ कणकवली शेजारी आहे त्यामुळे मालवणी लहानपणापासुन कानावर पडलेली.
अगदी अचानक आणि ध्यानीमनी नसताना तिला 'वच्छी' ची भुमिका मिळाली आणि तिने संधीचं सोनं केलं.
अजून तीन चार लोकांची लफडी
अजून तीन चार लोकांची लफडी दाखवली पाहिजेत.>>>>>
अजून तीन चार लोकांची लफडी
अजून तीन चार लोकांची लफडी दाखवली पाहिजेत.>> एकाचीच लफडी संपेनात
एकाचीच लफडी संपेनात >> लफडॅ
एकाचीच लफडी संपेनात >> लफडॅ कधीच संपले आहे. ती त्याला घरात जास्त वेळ ठेवुनही घेत नाही. पैशासाठी ब्लॅक मेल करत आहे आता. स्वतःचा नाश ओढवून घेत आहे सो कॉल्ड स्मार्ट लेडी.
वच्छी दिवसेंदिवस केवीलवाणी
वच्छी दिवसेंदिवस केवीलवाणी होत आहे. कालच्या भागात तिने अप्रतीम अभिनय केला. कालच्या भागात सावंतवाडीचं शुटींग होतं. वच्छी हातात शोभाचे फोटो घेऊन येणा-जाणार्याला विचारत होती की शोभाला कुठं पाहिलंय का..! (एखाद्याने तरी म्हणायचं ना की हो शोभाला राखेचा२ मधे पाहिलंय म्हणुन ) मोती तलाव आणि जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्द्यानाच्या आजु-बाजुचे शुटिंग होते.
Just time pass till next
Just time pass till next murder
माका सरीता दिसला राखेचा
माका सरीता दिसला राखेचा एकच्या शेवटच्या एपिसोडात्. पुलिस म्हणान निलिमा वांगडा दाखवला हा. https://youtu.be/msNakm9m0uo
होय मी पण केलं होतं ते
होय मी पण केलं होतं ते observe .
Pages