Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रपंच माका काय सुचू देवू नाय
प्रपंच माका काय सुचू देवू नाय. नायतर लय काय काय बोलायच हाय>> ह्या काय..? माईसारखा तुपण सौंसारात गुरफटान गेलो काय..? तु सांगितल्यान तसा म्या आकेरीक जाऊन ईलंय.. फोटो बघला कांय..?
वच्छी बहुतेक शोभाच्या
वच्छी बहुतेक शोभाच्या धसक्यानंच जाणार ... तिला वेगळं मारायची गरज नाही अण्णाला .....
आबांचं काय होतं बघावे लागेल ... बिचारा निष्पाप जीव ...
चोंगट्या अन शेवंता जाणारच .... बहुतेक महिनाभरात किंवा त्याआधीच सीरियल संपतेय ...
आणखी कंगोरे दाखवता आले असते अण्णाच्या स्वभावाचे .पण आता सीरियल संपवायच्या मूडमध्ये दिसतायत .
ज्याना कोकणातील भाषा आवडते त्यानी सोनी वरच्या हास्यजत्रेत श्रमेश प्रथमेश ची प्रहसने नक्की बघा ... खूप छान आहेत !
Sony Marathi
Sony Marathi
महाराष्ट्राची हास्यजत्रा
https://youtu.be/VbZ9oXMTsEU
@DJ काय सांगता ... कसा वाटला
@DJ काय सांगता ... कसा वाटला तुमका वाडा? खंय अंसा फोटो? माका लिंक देवा. फोटो बघूचे लागतील.
@ Namrata Siddapur : माका
@ Namrata Siddapur : माका वाडो लय आवडल्यान.. वच्छीच्या मांगरात पन जाऊक ईलंय. पान नंबर २६ वर अशात ता फोटॉ.
@ Mandar Katre : तुम्ही म्हणात तसा माका पण ह्या शिरेल महिन्याभरात संपात असां वाटताहा.. पण काह्यो झाला तरी ह्या शिरेल संपुक नको असा पण वाटताहा..!
आबा आणि वच्छी दोघे जाणार
आबा आणि वच्छी दोघे जाणार नाहीत. कारण सिझन 1 मध्ये चुलत घराण्याचा ओझरता का होईना पण उल्लेख होता.
हायला, आज रात्री मला
हायला, आज रात्री मला झोपायच्या आधी बेडखाली पाहिलं पाहिजे. अनेक हॉरर मुव्हिज पाहिले असल्याने ज्या खोलीत शोभाला मारलं तिथून exorcist मधल्या त्या भयानक सीन सारखी ती उलटी चालत बाहेर येताना शेवंताला दिसतेय. किंवा अण्णाच्या बेडमधून दोन हात येउन त्याचा गळा धरताहेत असं काहितरी पांडू दाखवेल की काय असं वाटू लागलं एपिसोडच्या शेवटी. बाकी शोभाने काशीला रात्री बोलवायला लावायचा आवाज अण्णासाठी लावला असं वाटत होतं
अण्णुकला ताकाच्या तारेत
अण्णुकला ताकाच्या तारेत असल्याने चोन्गटयाच्या शब्दांचं गांभीर्य त्याच्या ध्यानात आलेलं दिसत नाही. शुध्दीत आला की चोन्गटयाच्या पतन्गाचा दोर तुटणार. ह्या सिरियलमध्ये रात्री जितक्या घटना घडतात तेव्हढ्या दिवसा घडत नाहीत. अण्णा, शेवंता, चोन्गटया, वच्छी, आबा....रात्री जो तो आपला गप अन्थरुनात पडायचं सोडून धावतोय इथेतिथे. सिरियलीचं नाव सार्थक करताहेत. सीरियलचं नाव मात्र रात्रीस 'झोल' चाले असं अधिक शोभल्ं असतं
शेवंता पलंगाखाली बघते ते
शेवंता पलंगाखाली बघते ते सगळ्यात भयानक होतं. पण शोभा अचानक कशी जागी झाली. खूप दिवस झाले ना तिला मरून. काशी आणि शेवंता काय कनेक्शन. वर कोणीतरी लिहिलंय ना.
शोभा जिता हय?
शोभा जिता हय?
माका काय कळणां नाय...
ह्या सिरियलमध्ये रात्री
ह्या सिरियलमध्ये रात्री जितक्या घटना घडतात तेव्हढ्या दिवसा घडत नाहीत. >>>>> अगो बाय म्हणून तर रात्रीस खेळ चाले ना.
चोन्गटयाच्या शब्दांचं गांभीर्य >> काय म्हणाला चोंगट्या?
झंपी, शोभा मेला हा.. आण्णान
झंपी, शोभा मेला हा.. आण्णान तिकां मारल्यान.
स्वप्ना-राज काय काय बोलतां तां वाचुन आता मी हसान मरात
DJ..
DJ..
>>काय म्हणाला चोंगट्या?
ओरडून सांगितलं शेवंताला की तुम्ही उगाच मला पेटीत शोभा होती असं सांगितलं म्हणून. तेव्हा अण्णा मागे उभा होता येऊन तिच्या. त्यालाही चोंगट्या म्हणाला की मी शोभाला पाहिलं आत्ताच. ती जिवंत आहे. येऊ देत पोलिस. काही नाहिये त्या पेटीत.
रात्रीस खेळ चाले हरिभाऊ
रात्रीस खेळ चाले हरिभाऊ नाईकांचा
संपेल का कधीही हा खेळ नाईकांचा
ही शेवंता ना बायको, तरी धाक दावताहा
अन शोभाच्या भुताचा त्रास भोगताहा
गाडण्यास होई साक्षी हा नाथा नाईकांचा
आभास काशीचा हा नसतो खरा कधीच
जे सत्य भासती ते असती वच्छीचे भास
टरकतात सावलीला हा दोष भेकडांचा
या हॉरर क्षणांना का जीव ये मुठीत
मावतील सर्व प्रेतं मोठाल्या त्या पेटीत
गवसेल तोल अण्णा बेवड्या जीवनाचा
ओके. स्वप्ना. आता चोंगट्या
ओके. स्वप्ना. आता चोंगट्या पेटीत जाणार वाटतं
चोन्गटयाचा एक पाय पेटीतच आहे
चोन्गटयाचा एक पाय पेटीतच आहे जवळपास
काल चोंगट्याच्या पाठीवर
काल चोंगट्याच्या पाठीवर शोभाला बघून दचकायला झालं .
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे तरी बरं शोभा आधी गेली. पाटणकरणीला खांद्यावर घेतलं असतं तर चोंगट्याला खांदा द्यायची वेळ आली असती लोकांवर. एका टेकमध्ये शॉट ओके करवला असता त्याने.
स्वप्ना धमाल पोस्ट्स आहेत.
स्वप्ना धमाल पोस्ट्स आहेत.
होय, स्वप्ना धमाल पोस्ट्स
होय, स्वप्ना धमाल पोस्ट्स
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे Proud तरी बरं शोभा आधी गेली. पाटणकरणीला खांद्यावर घेतलं असतं तर चोंगट्याला खांदा द्यायची वेळ आली असती लोकांवर. एका टेकमध्ये शॉट ओके करवला असता त्याने.+++१११
मेलय... मेलयं....
धन्स लोक्स
धन्स लोक्स
आं?? माधवची बायको पण प्रेगंट आहे? पण सिझन 1 मध्ये माधवचा मुलगा दत्ताच्या मुलीपेक्षा मोठा वाटत होता नै??
बरोबर आहे. दत्ताचा मुलगा मोठा
बरोबर आहे. दत्ताचा मुलगा मोठा गणेश जो माधव च्या बरोबरीचा आहे आणि मुलगी पूर्वा त्याच्या पेक्षा लहान.
अरे हो, तो दत्ताचा मुलगा
अरे हो, तो दत्ताचा मुलगा माझ्या लक्षातच रहात नाही. पूर्वाच आठवते
आणि दत्ता म्हणतोय अशी गोड
आणि दत्ता म्हणतोय अशी गोड जबाबदारी कोणाला नको? 10-12 हव्यात म्हणाला का तो? क्रिकेट टीम काढायचीय काय? बरं, त्यात सगळा त्रास त्या बायकोला. ह्याला काय जातंय सांगायला.
ती सगळी भुतं अण्णाला काही करु
ती सगळी भुतं अण्णाला काही करु शकली नाहीच, मग काय उपयोग. छानपैकी सगळी नातवंडं मोठी होईपर्यंत जगला की. सगळ्यांना पोचवून आरामात राहीला इतकी वर्ष.
Swapna mast Kavita jamliye
Swapna mast Kavita jamliye
काल वच्छीला घेऊन गाववाले
काल वच्छीला घेऊन गाववाले तिच्या घरात आलेले. तिच्या कागाळ्या आबांना सांगितल्या. हज्जारदा संगुनही ती या सर्वांच्या घरात शोभाला शोधण्यास येते आणि त्यांच्या गह्रातील सुनांना हाताला धरुन घरी चल म्हणते म्हणुन ते सर्व वैतागलेले होते. आबांनी त्यांची माफी मागितली पण वच्छीने फणा काढलाच. त्या सर्वांना तिने नेहमीच्या शैलीत चांगलेच फैलावर घेतले आणि घरातुन पिटाळले.
नंतर सकाळी सकाळी आबा वाड्यावर आलेले. आण्णांनी बोलवलं होतं म्हणे. मग ते तिथुन पोलिसस्टेशनला गेले अन शोभाला शोधा म्हणुन सांगितले. पोलिसांनी शोध घेऊनही शोभा सापडत नाही म्हटल्यावर तिचं नक्कीच बरंवाईट झालं असणार म्हणुन आबांनी तिचं कार्य घालायचं ठरवलं. पण वच्छीन त्यांना तसा सज्जड दम दिला. त्यानंतर वच्छी अन आबा वाड्यावर आले. वच्छीने आबा कसे वागतात हे माई-दत्ताला सांगितले आणि मग शोभाला शोधायला बाहेर पडली.
त्यानंतर आण्णा दारु पिऊन त्यांच्या खोलीत पलंगावर पडलेले असतात तेव्हा त्यांचा दुसरा नोकर (नाव इसारलं ) त्यांना हाका मारुन उठवत असतो.. भुयाराचं झाकण निघालंय असं सांगतो ते ऐकुन आण्णा तिरमिरत उठुन भुयारात जातात आणि सगळी भुतं त्यांची मानगुट पकडतात असं दाखवलं.
मला तरी असं वाटतंय शोभा मेलेली नसणार.. तिनेच भुयाराचं झाकण उघडुन पोबारा केलेला असणार. ती जिवंत आहे हे फक्त वच्छीलाच माहीत होणार आणि दोघी मिळुन आण्णाचा काटा काढणार... अभिरामच्या लग्नात आण्णा मेले ते शोभा + वच्छीच्याच कारवायांनी असे मला आता वाटु लागले आहे..
सगळी भुतं अण्णाला काही करु
सगळी भुतं अण्णाला काही करु शकली नाहीच, मग काय उपयोग. छानपैकी सगळी नातवंडं मोठी होईपर्यंत जगला की. सगळ्यांना पोचवून आरामात राहीला इतकी वर्ष.<<<
जर आण्णा ला तुरुंगात पाठवले तिथे त्याने सक्तमजुरी भोगली आणि घरी आल्यावर भुतांनी त्याचा काटा काढला असे दाखवले तर जास्त आवडेल
भुते कशी काटा काढतील..? ती
भुते कशी काटा काढतील..? ती भुते म्हणजे आण्णाचे भास आहेत. वास्तवाचे भान राखत शेवट केला तर गेल्यावेळसारखे अधांतरी सुटलेले धागे बांधायला चान्स मिळेल.
मला तरी शोभा जिवंत आहे असा भास होतोय
Pages