थोडक्यात नमनाला तेल, आम्ही सधन मध्यमवर्गीय कुटुंब (मी, नवरा, मुलगा) असून मुंबई उपनगरात १ RK (जो १ BHK) मध्ये बनवून घेतला आहे अश्या सोसायटीमध्ये राहतो. आमची २५ वर्ष जुनी सोसायटी आहे, जिला कुठल्याही सोयीसुविधा (गॅलेरी, गार्डन, स्विमिंगपूल वैगेरे उपलब्ध नाहीत.) आमचे स्वप्न आहे गॅलेरीवाले, चांगल्या अमिनिटीज असलेले आणि स्विमिंगपूल असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये स्वतःसाठी २ बीएचकेचे (विकेंड स्पेशल) घर घ्यावे. मुंबईत तर शक्य नाही म्हणून आम्ही मुंबई जवळच्या पालघर या ठिकाणी आमच्या बजेटमधील घर घेण्याचा विचार करतोय. आमचे घराचे बजेट साधारण २५ ते ३० लाख असून काही रकमेचे लोन काढून घर घेणार आहोत. ही आमच्या आयुष्यातली मोठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे म्हणून मला तुमच्या सगळ्यांकडून मार्गदर्शन हवे आहे.
नोंद- बिल्डरकडून कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून रेडी टू मूव्ह घर घेणार आहोत (बांधकाम सुरु असलेले नाही)
१) आजच्या अस्थिर वातावरणात (मंदी) स्वतःचे घर घेण्याचा विचार योग्य आहे का? (मेडिक्लेम पॉलिसी, बाकी सगळ्या इन्व्हेस्टमेंट योग्यरीतीने केल्या आहेत.)
२) पालघरला सध्या रिसेल व्हॅल्यू नाही हे माहित आहे पण आम्हाला हव्या असलेल्या अमिनिटीजवाले घर तिथे बजेटमध्ये मिळतेय तर विकत घेण्याचा विचार करावा का?
३) पालघर सेकंड होम म्हणून योग्य पर्याय ठरेल का?
४) घर घेताना अजून कुठल्या मुद्यांचा विचार करण्याची गरज आहे?
५) तुम्हाला अजून काही सुचत असेल तर नक्की सांगा
कृपया मार्गदर्शन करा. कारण ही आमच्या आयुष्यातली मोठी इन्व्हेस्टमेंट असणार आहे.
धन्यवाद
निक्षीपा
सेकंड होम म्हणून घेणार असाल
सेकंड होम म्हणून घेणार असाल तर त्याचा खरेच किती वापर होणार हा नीट विचार करा. खरेच तिकडे जाणे आणि राहणे होणार का? एका वर्षात किती वेळा होणार?
अशा घरांमध्ये / सोसायटी मध्ये रहायची हौस असेल तर सरळ भाड्याने राहता येईल. त्यासाठी कर्ज काढून हफ्ते कशाला भरत बसायचे?
फक्त हौस म्हणून राहायचे असेल तर मस्त Airbnb वरून दर आठवड्याला / महिन्याला नवीन घर बघा आणि विकेंडला 2 दिवस राहून या. लोन पेक्षा कमी खर्च येईल आणि नवनवीन घरांमध्ये पण राहता येईल. ☺ हवं तर अजून तीन वर्षे मोजा आपण आपल्या शेड्युल मधून किती वेळा आवर्जून असे जाऊन राहतो. तुम्हाला घर घेऊन जो हफ्ता पडणार आहे त्यापेक्षा airbnb वर जास्त खर्च व्हायला लागला तर मग घर घ्यायचा विचार करा.
ज्या Index II मध्ये माझं नाव नाही त्या घरात राहणार नाही असाच हट्ट आणि हौस असेल तर मग करून टाका बुकिंग. हाकानाका !
इन्व्हेस्टमेंट म्हणून घर
इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेताना जर अंडर construction, रेपुटेड बिल्डर घेतलं तर फायदा मिळतो. एक ready to move-इन घेतले कारण बिल्डर काही नावाजलेला नव्हता. तिथे आम्हाला rental इनकम आहे पण 8 वर्ष झाली तरी profit नाही. आम्ही फ्लॅट विकत घेतल्या-घेतल्या रिअल इस्टेट market पडले आणि आत्ता ते परत आम्ही घेतलेल्या किमतीला झालंय,असं वाटतंय. विकायला constraints येत आहेत कारण लोकं नवे फ्लॅट्स बघतात.
बाकी मला मुंबई उपनगराची काही माहिती नाही.
अतरंगी+१. आणि शिवाय इथे राहून
अतरंगी+१. आणि शिवाय इथे राहून तिथे कबुतरांची घाण झाली नसेल ना? कुणी खिडक्या दारे तोडून शिरणार तर नाही ना? आता परवा जायचं आहे तर मावशी येऊन साफ सफाई करून गेली असेल ना? नाहीतर पैसे घेऊन फोन नाही उचलायची आणि आपण आपली सुट्टी सफाई करण्यात घालवायची. एक ना हजार शंका तेही पैसे देऊन. ऐसी बात इन्व्हेस्टमेंट नही होती जी.
करा बिनधास्त
करा बिनधास्त
तुम्ही विचार केलाय तसले घर
तुम्ही विचार केलाय तसले घर असावे असे तर बहुतेकांचे स्वप्न असते. पण ते फक्त विकेंड करता?
तुम्ही कष्टाने साठवलेली पुंजी घालून, वर कर्ज घेऊन आणि त्याचे व्याज फेडण्यास अजून कष्टाची पुंजी घालवणार आहात, कशासाठी तर केवळ विकांत बाल्कनी असलेल्या, मोठ्या असलेल्या घरात घालवण्यासाठी? त्याच त्या जागी जात राहून असे किती विकांत तुम्ही एन्जॉय करु शकाल?
हां, जर निवृत्तीनंतर जाउन रहाण्याची आताच सोय करत आहात, आणि निवृत्ती किमान आठ दहा वर्षात आहे, तर गोष्ट वेगळी. किंवा गुंतवणुकीची अशी काही योजना आहे की हौसे सोबत गुंतवणूक किमान आठ वर्षात दुप्पट होणार आहे तरी गोष्ट वेगळी.
केवळ विकांता करता इतर कितीतरी पर्याय असतील, थोडक्या खर्चात विविध ठिकाणांची मजा घेण्यास.
आमचे स्वप्न आहे गॅलेरीवाले,
आमचे स्वप्न आहे गॅलेरीवाले, चांगल्या अमिनिटीज असलेले आणि स्विमिंगपूल असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये >> अशा सुविधा व्यवस्थित चालु असतील तर मज्जा नाहीतर सजा... ज्या सोसायटीत तुम्ही घर बघितले आहे तिकडे येऊन राहणारे किती आहे आणि न राहता गुंतवणूक करणारे किती आहेत, ते बघा.. गुंतवणूकदार जास्त असेल तर अशा सुविधा व्यवस्थित चालू राहत नाही आणि देखभालचा खर्च उलट वाढतो.. आणि दूरच्या
अशा ठि़काणी पाणी/वीज/ प्रवासाच्या गैरसोयीमुळे भाडेकरूपण मिळत नाही.
दुसरा उपाय म्हणजे राहते घर विकून अशा सोयी असलेल्या १.५ बिएचके रिसेलमध्ये मुंबई/ २ बिएचके नवी मुंबईत (YMCA, बेलापूरच्या बाजूला) बघा...
नविन घर घेतलं तर राहत्या
नविन घर घेतलं तर राहत्या घरापासुन जवळच बघावं कुठेतरी.. आमचा अनुभव असा आहे कि आंम्ही राहतो इकडे अन घर मुंबईबाहेर.. मेंटेन्स होत नाहि घराचा.. आता विकायचं म्हटलं अन इकडे घ्यावं म्हटलं तर बायर खुप कमी.. अन मुंबईबाहेर असलं तर प्रवासाने खुप शिणायला होतं.. पण घरामध्ये गुंतवणूक बरी असं मला वाटतं.
अगदी बरोबर ,
अगदी बरोबर ,
म्हणून मी दोन फ्लॅट नेरळलाच घेतलेत , एक ठेसनजवळ ते फर्स्ट होम , एक आत जंगलात ते सेकंड होम
घरे घेताना टू बीचके घेण्यापेक्षा छोटे दोन 1 आर के , 1 बी एच के जवळजवळ घ्या, म्हातारपणी वाटणी करायला बरे
फार विचार न करता लवकर घर घ्या
फार विचार न करता लवकर घर घ्या. पालघर किंवा बोईसर.
नका घेऊ.
नका घेऊ.
कारणे -
१. बाजारभावाला अजिबात उठाव नाही. अजून २-४ वर्ष तरी भाव वाढणार नाहीत. अशा वेळी पैसे असतील तरी अगदी एफ डी सुद्धा बरा रिटर्न देईल. घरात पैसे कशाला गुंतवता? आणि ८.५-९% दराचे लोन काढून तर नकोच नको.
२. सेकंड होम म्हणून एकच मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा दर वीकेंडला नवीन ठिकाणी जा. आर्थिक दृष्ट्या ते परवडेल. (पण पण - तुमच्याकडे लईच पैसा आहे आणि काय करायचं सुचत नसेल तर वेगळी गोष्ट आहे)
३. सेकंड होम डेस्टिनेशन म्हणून ज्या ज्या जागा आहेत, तिथे अजिबात घर विक्री होत नाहीये. पुन्हा कधी घर विकायचे झाले, तरी निदान पुढची काही वर्षं कठीण जाऊ शकतं.
४. घराचा मेंटेनन्स त्रासदायक होऊ शकतो.
सेकंड होम डेस्टिनेशन म्हणून
सेकंड होम डेस्टिनेशन म्हणून ज्या ज्या जागा आहेत, तिथे अजिबात घर विक्री होत नाहीये.
- खरंय.
पण पालघर/ बोईसर त्यात नाही.
काही प्रस्तावित प्रकल्प होणार
काही प्रस्तावित प्रकल्प होणार आहेत का पालघरला. जरी पुढे भाव वाढणार असतिल तरी आता तिथे घर भाड्याने जाणार नाही जर तो उद्देश असेल तर.
गुंतवणुकीच्या दृष्टीने कुठे घर घ्यावे मुंबईत किंवा नवी मुंबईत, जे भाड्यानेही जाईल आणि पुढे भावही वाढेल.
नाही . नको. त्यापेक्षा तेच
नाही . नको. त्यापेक्षा तेच पैसे चांगल्या ब्लु चिप स्टॉक मध्ये गुंतवा. बोनस शेअर्स वगैरे मिळून पाल्याच्या शिक्षणाच्या वेळेस चांगले कॉर्पस हाताशी येइल.
हौस असेल तिथे जगभरात एअर बीएन बी घेउन राहता येइल. पालघर मध्ये घेण्या ऐव जी दापोली किंवा इतर भागात बघा.
घर हवंच आहे जरा बरं मोठं हा
घर हवंच आहे जरा बरं मोठं हा विचार असेल तरच घ्यावे. गुंतवणूक म्हणून नको असा माझाही विचार आहे.
ह:हगलो
हह:गलो
घर घ्यायलाच पाहिजे पण
घर घ्यायलाच पाहिजे पण आपल्याजवळील सगळेच साठवलेले पैसे देऊन आणि वर परत कर्ज काढून घर घेणे आणि मग पुढील २० वर्षे कर्जाचे हफ्ते देत राहणे थोडे पटत नाही. शेवटी २० वर्षानंतर त्याला किती किंमत येईल हे सुद्धा तूर्तास सांगणे कठीणच होते. तुम्ही जर विचार पक्का केला असेलच तर कर्जाची रक्कम, किती वर्षे साठी कर्ज घ्याल, त्याचा दरमहा येणार हफ्ता वगैरे वगैरे अगोदरच हिशेब काढून ठेवणे योग्य. एक अजून पर्याय आहे पण त्याला थोडे आर्थिक विश्लेषण करावी लागेल. काही पैसे debt mutual फंड मध्ये ठेवून तुम्ही आज करता येणारी खरेदी ३-४ वर्षांनी करता येईल. त्यामुळे घ्यावे लागलेलं कर्ज थोडे कमी होईल आणि दरमहा EMI काही अंशी कमी होईल. सावधपूर्वक गुंतवणूक केली तर मोठे लक्ष्य सुद्धा पूर्ण करता येते. फक्त आपल्याला वेळ ठरवावा लागेल. तुमचा कॅश फ्लो जास्त बिघडत असेल तर सध्याच तातडीने निर्णय घेतल्यापेक्षा लांबणीवर टाकणे हे कधीही परवडेल. हे झाले माझे वैयक्तिक मत. एखाद्या चांगल्या आर्थिक तज्ज्ञाला विचारून निर्णय घ्या.
चांगल्या आर्थिक सवयी कशा लावून घ्याव्यात ?
https://akshargaane.blogspot.com/2019/11/blog-post.html