फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
पण आता ते गेले !
मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.
तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.
तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?
मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!
गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.
तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?
मला तर असे वाटते आहे की आता
मला तर असे वाटते आहे की आता "ओवेसी खरे किंग मेकर होणार आहेत" अशी न्यूज येईल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काँग्रेस पार्टी, सेना + राष्ट्रवादी अलायंस मध्ये येणार नाही.
मग ठाकरे, पवारांना चिल्लर गोळा करत फिरावे लागेल आणि शेवटी ओवेसींच्या दोन सीटांसाठी ते त्यांना बरोबर घेतील.
राज्यपालांनी बहुधा वेळ संपल्याने दारं बंद करून घेतलीत.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असं खरंच झालं असेल तर इथेही कर्नाटकसारखं प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयाकडे जावं लागेल. >> काँग्रेस पाठिंबा देणार असेल तर शिवसेनेकडे भरपूर वेळ आहे. शिवसेनेला मुदतीत ऑन पेपर बहुमत दाखवता आले नाही तर आता राष्ट्र्वादीला आणि नंतर काँग्रेसला राज्यपाल बोलावतील जिथे ते म्हणून शकतात हो, आम्ही सरकार बनवू ईच्छितो आणि आमच्याकडे पाठिंबा आहे ज्यात शिवसेना असेल आणि मुख्यमंत्री तर काय शपथविधीच्या काही मिनिटे आधी ठरवता येतो.
तर टेक्निकली थेट ओवेसींना राज्यपालांनी बोलावेपर्यंत शिवसेनेकडे वेळ आहे.
( ते काही तरी मिनिमम १०% वोट शेअर वगैरेची टेक्निकॅलिटी असते ना एखाद्या पक्षाला राज्यपालांनी बोलावण्यासाठी)
अर्थात सगळीकडे ज्याना
अर्थात सगळीकडे ज्याना मनोरंजनाची साधने हवी व डेली सोप सारखा राज्याचा कारभार चालावा असे ज्याना वाटते ,त्यांचे मनोगत वरीलप्रमाणेच असेल...
नवीन Submitted by मी-माझा on 11 November, 2019 - 19:48
नको ५ वर्षं पुरेसं मनोरंजन झालं आहे. आयटेम गर्ल आता स्वतःच्या गावी किंवा दिल्लीला परत गेली तर बरं होईल. लाज (इतरांना) आणली होती. (इथे मी आयटेम गर्ल कोण ते न लिहिताही कोणाबद्द्ल लिहिलंय ते सर्वांना कळतंय म्हणजे बघा. पदाचा काही आब वगैरे असतो की नाही. हॉरिबल प्रकार सुरु होता ५ वर्ष.)
सेना-काँग्रेस मुख्यमंत्री २.५
सेना-काँग्रेस मुख्यमंत्री २.५-२.५ वर्षे
रिमोट क्ंट्रोल राष्ट्रवादी पवारांच्या हाती अशी लक्ष्णे दिसत आहेत.
पण असे होणार असेल तर भाज्प सेना २.५-२.५ का झाले नाहीत?
दहा वर्षांचा विचार करता ७.५-२.५ भाजप सेना हे योग्य वाटत होते.
>>मला तर असे वाटते आहे की आता
>>मला तर असे वाटते आहे की आता "ओवेसी खरे किंग मेकर होणार आहेत" अशी न्यूज येईल.<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता जर-तर चे राजकिय पतंग उडतंच आहेत तर अजुन एक फँटसी - राकाँ चे भाजपात गेलेले (~३५) आमदार पवार साहेबांच्या डॉग व्हिसलची वाट बघत आहेत. सत्ता तर हातातुन निसटलीच आहे, पवार साहेबांशी संबंध तरी टिकुन रहातील. ते म्हणतांत ना - भागते भूत कि लंगोटी हि सहि...
सोनियाच्या कांग्रेसचा पाठिंबा
सोनियाच्या कांग्रेसचा पाठिंबा मिळणार हे सेना कशाच्या आधारावर सांगत होती? ज्यांना तुडवतुडव तुडवले ते पाठिंबा देणार आणि तेही सेना म्हणेल त्या अटींवर?
असं खरंच झालं असेल तर इथेही
असं खरंच झालं असेल तर इथेही कर्नाटकसारखं प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयाकडे जावं लागेल. >> कशासाठी ? कॉन्ग्रेसला एका दिवसात निर्णय घेता येत नाही म्हणुन ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कर्नाटकात काँग्रेसने एका
कर्नाटकात काँग्रेसने एका दिवसातच निर्णय घेतला होता. जद सोबत युती करण्याचा . पण राज्यपालांनी भाजपला आमंत्रण दिलं आणि बहुमत सिद्ध करायला भरघोस मुदत दिली. ती न्यायालयात जाऊन कमी करावी लागली.
मग काँग्रेसचे आमदार फोडले. (फडणवीसांनीच त्यांना इथे पोलिस पहार्यात ठेवलं होतं). त्यांना सभापतीनी अपात्र ठरवलं . तेही प्रकरण न्यायालयात आहे. ते आमदार अजूनही अपात्र आहेत.
हं, आता गोव्या त भाजपने रात्रीत बरेच उद्योग केलेत. पर्रिकरांना मुमं करणं. ते गे ल्यावर एक अख्खा पक्ष आणि काँग्रेसचे आमदार विलीन करून घेणं. इ.इ. ते काँग्रेसला जमलं नाही.
एव्हढे धडे मिळुनही आज
एव्हढे धडे मिळुनही आज कॉन्ग्रेस्ला १ दिवसात निर्णय घेता आला नाही... इतर गोष्टी जमायचं लांबच राहीलं.
असो, राष्ट्रपती राजवटीतही सरकार स्थापनेसाठी पक्ष पुढाकार घेउ शकतात. कदाचित २-३ महिन्यांनी कॉन्ग्रेसचा निर्णय होईल अशी आशा आहे.
पण आता मांजरीचा विश्वास कुणावरच राहिलेला नाही. कंठ व नख्याही लीलावतीत आहेत. शिवसेनेची आता कीव यायला लागलीय.
आता जर-तर चे राजकिय पतंग
आता जर-तर चे राजकिय पतंग उडतंच आहेत >> पतंग नाही हो.. ही सर्कस पाहता सेना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सत्तेसाठीमहाराष्ट्राच्या जनतेचे भले करण्यासाठीहपापलेलीकटिबद्ध असतांना थेट ओवेसींच्या सुद्धा गळ्यात गळे घालू शकते असे सुचवायचे होते.आता म्हणे राज्यपालांनी
आता म्हणे राज्यपालांनी राष्ट्रवादीला बोलावलंय.
राज्यपालांना न्यायालयाकडून धडे मिळत राहणं पुढेही चालू राहणार.
एव्हढे धडे मिळुनही आज
एव्हढे धडे मिळुनही आज कॉन्ग्रेस्ला १ दिवसात निर्णय घेता आला नाही... इतर गोष्टी जमायचं लांबच राहीलं.
मुद्दाम शिव सेनेचा गेम आहे
आता अजित पवार का शरद पवार
आता अजित पवार का शरद पवार मुख्यमंत्री होणार यावर चर्चा सुरू.
२४ तासांनी अशोक चव्हाण का पृथ्विराज चव्हाण मुख्यमंत्री होणार त्यावर चर्चा.
लोकहो, आपण इथे तावातावावे बोलत असतो. पण ही राजकारणी मंडळीॅच वेगळच चालू असतं.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राज्यपालांना न्यायालयाकडून
राज्यपालांना न्यायालयाकडून धडे मिळत राहणं पुढेही चालू राहणार.
Submitted by भरत. on 11 November, 2019 - 20:56 >>
बिल्कुल नाही... शिवसेनेला बोलवायचा निर्णय आता राष्ट्रवादीला बोलावल्यामुळे ओव्हरराईड झाला, तोही नियमाप्रमाणे.
बिल्कुल नाही... शिवसेनेला
बिल्कुल नाही... शिवसेनेला बोलवायचा निर्णय आता राष्ट्रवादीला बोलावल्यामुळे ओव्हरराईड झाला, तोही नियमाप्रमाणे.
>>
शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने कहा कि हमारा दावा अभी खारिज नहीं हुआ है और हम भी सरकार बनाना चाहते हैं. ठाकरे ने कहा कि अन्य दलों से हमारी बातचीत जारी है और उनका समर्थन पत्र हासिल करने में वक्त लग रहा है. अब गेंद राज्यपाल के पाले में हैं, वह आज रात को महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगा सकते हैं. वैसे राज्यपाल ने शिवसेना के दावे को खारिज भी नहीं किया है और शिवसेना जब समर्थन पत्र लेकर दावे पेश करने जाती है तो राज्यपाल उसे मौका दे सकते हैं.
https://aajtak.intoday.in/news/liveblog/maharashtra-government-shivsena-...
आता राज्यपालांना भेटून
आता राज्यपालांना भेटून आल्यानंतर जयंत पाटील म्हणत आहेत की आम्ही आमच्या अलायंस पार्टी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जबरोबर बोलून ऊद्या संध्याकाळपर्यंत काय ते फिक्स सांगू.अलायंस पार्टीचा ऊल्लेख राष्ट्रवादी सिंग्यूलर करीत आहेत ह्यावरून शिवसेना सर्वायवल फिअर मध्ये पुढचे २४ तास झोपणार नाही हे नक्की.
अलायंस पार्टीचा ऊल्लेख
अलायंस पार्टीचा ऊल्लेख राष्ट्रवादी सिंग्यूलर करीत आहेत ह्यावरून शिवसेना सर्वायवल फिअर मध्ये पुढचे २४ तास झोपणार नाही हे नक्की.
संजय राउत बीपी २७०
लिलावति ला पोलिस पहारा डबल
राष्ट्रपती शासन हे कलम
राष्ट्रपती शासन हे कलम
Dr बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी समाविष्ट केले पण त्याचा वापर न करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.
घटना दुरुस्ती करून घटक राज्यांचे सार्वभौमत्व जपण्यासाठी ते कलम सर्व प्रादेशिक पक्षांनी hatvaycha हट्ट धरला पाहिजे
घटक राज्य हे सार्वभौम आहेत.
घटक राज्य हे सार्वभौम आहेत.
केंद्र सरकारच्या कोणत्याच यंत्रणेची लुडबुड नको
मीडियावाल्यांची चंगळ झाली
मीडियावाल्यांची चंगळ झाली असेल आज..
आता हे तर आता ते...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ckWBcQPDoMw
५० वर्षांपूर्वीचे सटायर!
बर्ग मराठी नेत्यांचं इंग्रजी
बर्ग मराठी नेत्यांचं इंग्रजी कच्चे असते. एक वचन अनेक वचने काही कळत नाही त्यांना.मला तर वाटतंय सगळ्यांचं सगळे ठरले आहे. लोकांना शेंड्या लावत आहेत.
सेने चा खेळ खल्लास!
सेने चा खेळ खल्लास!
ऊध्दव जी, नी बॅट हातात घेण्यापूर्वीच पंचांनी सामना रद्द केला कारण ते दोन रनर आलेच नाहीत...! हाय रे दैवा! आता राष्ट्रवादी व काँ बरोबर जायचे तर पुरताच खेळ फसलेला.. तेलही गेले तूपही गेले, धुपाटणेही गेले... हाती राहिलाय फक्त दात नसलेला वाघ.
केविलवाणा शब्द ईथे तोकडा वाटतोय. आदित्य ठाकरे यांना पहिलाच पेपर आ ऊ ट ऑफ पोर्शन आला. पुढील वाटचाल महा अवघड ठरणार. आणि आधार गट शिल्लक असेल का हे सांगणे कठीण आहे.
राहिला प्रश्ण सराकर स्थापनेचा मला तर असे वाटते आहे राष्तर्पती राजवट येणार.. एकाच महिन्यात सेने चे अनेक आमदार फुटून भाजपा मध्ये जातील. आणि मग भाजप आपल्या टर्म्स वर ठरवेल की सरकार स्थापन करायचे का फेर निवडणूका..
सरकार स्थापनेच्या दाव्या आधी भाजपाने राज्यपालांची 'तांत्रिक व कायदेशीर' बाबीं बाबत अडिच तास चर्चा केली होती. तेव्हाच कळून चुकले होते की थे ग्रेट चाणक्य अमित शाह यांनी हे जाणले असेल की पुढचे चित्र कसे रंगणार आहे. आणि भाजपा ने सत्त स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय हा पुन्हा एक मास्टरस्ट्रोक ठरण्याची लक्षणे आहेत. तो पर्यंत या रोजच्या सर्कशीत अजून काय घडते कोण कोण रिंगणात फिरतय. कोण जोकर ठरतय हे पुढील काही दिवस ऊलगडत जाणार आहे... अचानक मिडीया कं ला भारी खमंग कंटेंट मिळालाय आणि ते संधी पुरेपूर वसूल करत आहेत.
एक बरे झाले या सर्कशीने मात्र सर्वच पक्षांना व नेत्यांना अक्षरशः नंगे केले आहे. ईस हमाम मे सभी नंगे है...!
मतदार पुढील वेळेस अधीक जागृकतेने मतदान करेल हेच काय ते या सर्कशीचे फलित.
>>ऊध्दव जी, नी बॅट हातात
>>ऊध्दव जी, नी बॅट हातात घेण्यापूर्वीच पंचांनी सामना रद्द केला कारण ते दोन रनर आलेच नाहीत<<
थांबा. शेवटचा चेंडु पडेपर्यंत सामन्याचा निर्णय लागत नाहि. अजुन दोन इनिंग्ज बाकि आहेत. उठा मोकेपे चौका लगावतात कि हिटविकेट/रन आउट होतात हे येत्या दोन दिवसातच कळेल...
कर्नाटकच्या आमदारांना कुणी
कर्नाटकच्या आमदारांना कुणी डांबले इथे? मग कांग्रेसचे आमदारांना जयपूरमध्ये डांबले होते?
---
आता आदित्यचाही संजय राऊत होत आहे. बडबड सुरू.
फडणवीस जोकर झाले नाहीत, आघाडीतलेही कुणी होणार नाही. तेवढी अक्कल बाळगून आहेत. हो/नाही एवढेच उत्तर देतील.
-------
फक्त ५६ लोकांची नावे देऊन राज्यपालांना म्हणे "आम्ही सरकार बनवणार, आणखी दोन दिवस मुदत द्या. उरलेले शंभर येतच आहेत."
-फाजिलपणा- आहे.
-–-------–
शेतकऱ्यांची शेवा हे करणार होते .
मी काय म्हणते मनसेचा करा,
मी काय म्हणते मनसेचा करा
, आमच्या एरियाला CM पद मिळेल, बाकी सगळ्या पक्षातले मंत्री करा.
ही निवडणूक वेगळीच होती.
ही निवडणूक वेगळीच होती.
पाहिले तर निवडणूक पूर्व निकालाचे सर्व अंदाज साफ चुकले.
नंतर युती चेच सरकार बनणार ह्याची 100% शास्वती असताना ते बनलं नाही
नंतर शिवसेनेला काँगेस,राष्ट्रवादी बिनशर्त पाठिंबा देवून सेनेचे सरकार येईल असं सर्वांना वाटतं होते ते सर्व तोंडावर पडले
संजय राऊत हॉस्पिटल मध्ये बेडवर पडला.
शिवसेना सत्तेच्या परिपाठ मध्ये तोंडावर आपटली.
आता अंदाज व्यक्त करायची हिम्मत नाही राहिली कोणाकडे
राकां नी दावा केल्यावर त्याला
राकां नी दावा केल्यावर त्याला सेना पाठिंबा देणार का लिहून?
आता एकच उपाय आहे. शिवसेना व
आता एकच उपाय आहे. शिवसेना व काँग्रेसने वाटाघाटी नंतर कराव्यात व पाठिंब्याची पत्रे आधी द्यावीत.
सेनेने कोणालाच पाठींबा देऊ
सेनेने कोणालाच पाठींबा देऊ नये. सेनेचे आमदार आता मात्र फुटण्याची भीती आहे, भाजपला पाठींबा देतील फुटून. सेनेचं म्हणजे बुडत्याचा पाय खोलात.
चांगलं उपमुख्यमंत्रीपद मिळत होतं, जास्त मंत्रीपदंही मिळाली असती पहील्या आठवड्यात जरा शांतपणे विचार केला असता तर, राणेंनाही लांब ठेवता आलं असतं, सर्व झालं असतं. जणू काय दोन्ही कॉग्रेस ह्यांच्या स्वागतासाठीच बसली आहे, अशा थाटात सर्व होतं. इतक्या वर्षानंतर उद्धव सेनेला कोणाचेच डावपेच कळत नसतील तर काय धन्यच आहेत.
खूप म्हणजे खूप अवघड आहे अंदाज
खूप म्हणजे खूप अवघड आहे अंदाज व्यक्त करणे.
जरा कुठे सरकार बनेल अशी स्थिती निर्माण होत
आहे तो पर्यंत परिस्थिती विपरीत दिशेनी बदलत आहे.
राष्ट्रवादी ला पाठिंबा देण्याचा निर्णय सेने नी घावा आणि तिकडे bjp मुख्यमंत्री पद सेनेला देण्यासाठी तयार आहे कुजबुज चालू व्हावी .
झाले ना सर्व अंदाज परत पाण्यात जातील
Pages