Submitted by कटप्पा on 3 November, 2019 - 21:13
सरळ मुद्द्यावर येतो .
एक घर आवडले आहे , ऑफर एक्सेप्ट झाली आहे .
20% डाउनपेमेंट करणे चांगले कि 5/10 टक्के विथ मोटगेज इन्सु हा माझा प्रश्न आहे .
घर तीन वर्षाने विकण्याचे असू शकेल , परत भारतात जाण्याचा प्लॅन आहे .
जाणकारांच्या सल्ल्याचा आणि उत्तरांच्या प्रतीक्षेत . हा सिरीयस धागा आहे .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर
ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर नामक प्राण्यावर फारसा विश्वास ठेवू नका. >>> का?
मी दोन रिअल्टर्स बरोबर काम केले आहे. दोघी अत्यंत रिलाएबल आहेत.
रियल्टर शिवाय घर घेणार कसे.
रियल्टर शिवाय घर घेणार कसे. ब्रँड नव असेल तर वेगळी गोष्ट . माझे घर जुने आहे .
>>Submitted by च्रप्स on 4
>>Submitted by च्रप्स on 4 November, 2019 - 07:01>>
इक्विटी २०% होईपर्यंत मॉ. इंशु किंवा सिंगल बाय आउट असे असते ना? हे १८ महिने कुठून आले?
घराची किंमत पडली तरी तुम्ही जे लोन घेतले आहे ते फेडावेच लागणार ना ? घराची किंमत कमी झालेय आणि जोडीला कर्जाचा बोजा कमी डाऊन पेमेंट केल्याने आधीच जास्त आहे अशावेळी घर विकायची वेळ आली तर उलट जास्त प्रॉब्लेम होणार. याउलट जर घराची किंमत झटपट वाढेल अशी परीस्थिती असेल तर २०% पेक्षा कमी देणे बरे पडेल .
आम्ही घर बांधून घेतले आणि त्यानंतर काही गोष्टी स्वतंत्र करुन घेताना बफर असावे म्हणून १०% चा पर्याय वापरला. हप्त्या व्यतिरिक्त अगेन्स्ट मॉर्ट्गेज पैसे भरुन लोन कसे संपवायचे ते आधीच प्लॅन होते. तसे नसेल तर इंटरेस्ट पोटी जास्त पैसे जाणार हे देखील लक्षात घ्यावे.
>>ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर नामक प्राण्यावर फारसा विश्वास ठेवू नका.>> हे जनरलायझेशन का?
ब्रॅण्ड न्यू असेल तरी रिलर्टर
ब्रॅण्ड न्यू असेल तरी रिअल्टर प्रोसेस मधे असण्याचे खूप फायदे आहेत. बिल्डर, लोकेशन, कम्युनिटी मधले स्पेसिफक कोणते घर, आजूबाजूला टाउन चे काय प्लॅन्स आहेत - त्याचे फायदे तोटे, कॉम्प्स याबाबत चांगला/ली रिअल्टर खूप मदत करतात.
तीन वर्षांनी छू मंतर झाले
तीन वर्षांनी छू मंतर झाले तरिही किती घाट्याचा सौदा आहे बघ हा..
ऑस्टिनसारख्या ठिकाणी २-३ बेडरूम अपार्टमेंट वा लहान टाऊन होमचा रेंट पकडू $२०००.
$५००k वर ५% म्हणजे $२५k डाऊन पेमेंट केले.. लोअन अमाऊंट ४७५k.
मग $४७५k च्या लोनवर कमीतकमी $२५०० चे मॉर्टगेज पेमेंट बसले. PMI, ईंश्युरन्स, टॅक्स, मेंटेनन्स, एचओए असे मिनिमम $५०० पकड. टोटल झाला $३०००/महिना
तीन वर्षाचे झाले ३६*३००० = १०८k
त्यात अॅड करा पहिले डाऊन पेमेंट = २५k
म्हणजे तीन वर्षात बँकेला भरले $१३३k
जर घर न घेता तीन वर्ष $२००० चे घर रेंट केले असे समजले तर लागतील फक्त $७२k
म्हणजे घर टाकून पळून जाऊन $६१k चे नुकसानच सोसले ना विनाकारण
जर घर न घेता तीन वर्ष $३००० चे घर रेंट केले असे समजले तरी $२५k चे नुकसान आहेच.
परत भारतात सुद्धा लोन शार्क्स रक्ताचा माग काढत येतील ते वगळेच
------
च्र्प्स तुम्हाला
5 टक्के डीपी - 25k आणि 475k लोन... आणि जर घराची किंमत पडल्याने ४००k लाच विकले तर वरच्या ७५k साठी बँक म्हणेल.. चल रेहन दे! तू भी क्या याद करेगा किसी बडे दिलवाले से पाला पडा था.
असे तर नाही म्हणायचे ना?
च्र्प्स यांचा प्रतिसाद वाचून
च्र्प्स यांचा प्रतिसाद वाचून लहानपणी मी पहिल्यांदा क्रेडिट कार्ड ची जाहिरात पाहिली ( तेव्हा भारतात फक्त डायनर्स कार्ड होते) ते आठवले. कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलात जा, चापून खा, व निघताना ऐटीत ते कार्ड दाखवा ! त्या कार्डाचे दरमहा बिल येते व ते आपणच भरावे लागते हा तपशील नंतर कळला व बालसुलभ आनंदावर विरजण पडले.
ऑन अ सिरियस नोट तीन वर्षात घर विकायचे असेल तर घेऊ नये. किंमत वाढली तरी इतर सर्व खर्च पकडता केवळ अर्थिक पातळीवर घाटाच होईल. आता हौसेला मोल नसते वगैरे असेल तर...
त्या कार्डाचे दरमहा बिल येते
त्या कार्डाचे दरमहा बिल येते व ते आपणच भरावे लागते हा तपशील नंतर कळला व बालसुलभ आनंदावर विरजण पडले.>>>>>

माझी भाची लहान होती तेव्हा तिला जर विचारलं की पैसे कुठून येतात, तर ती म्हणायची ए टि एम मधून येतात. आपले संपले की तिथे जाऊन काढून आणायचे. तेवढ्च काय ते काम तिच्या बाबांना.
>>Submitted by च्रप्स on 4
>>Submitted by च्रप्स on 4 November, 2019 - 07:01>> अरे.. कोणी तरी हे गणित समजाऊन सांगा राव.<<

च्रप्स बहुतेक वेगसमध्ये ब्लॅकजॅक (किंवा क्रॅप्स) मध्ये पैसे छापत असावेत, अजुन इथे फिरकले नाहित म्हणजे...
मला समजलेला अर्थ - तीन वर्षांत घराच्या किंमती कमी झाल्या (५००के वरुन ४००के) तर त्यांनी केलेलं २०% डाउनपेमेंट (१००के) इवॅपरेट होणार; ५% केलं तर फक्त २५के. थोडक्यात, ५% डाउनपेमेंट मधे आर्थिक नुकसान कमी होईल असं सांगायचं आहे त्यांना...
>>ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर
>>ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर नामक प्राण्यावर फारसा विश्वास ठेवू नका.>> हे जनरलायझेशन का?
जनरलायझेशन नव्हे तर डोळे झाकून विश्वास ठेवू नका असे मी म्हणत आहे.
रिॲल्टरशिवाय सौदा करणे शक्य आहे पण ते नवख्या माणसासाठी फारच कटकटीचे होईल. लोकेशन, घराचे छुपे आणि आपल्या नजरेला सहज न समजणारे दोष, मार्केट प्रायसेस इ. टेक्निकल माहितीसाठी रिॲल्टरची बहुमूल्य मदत होतेच. त्यातही तो त्याच्या सोयीचेच कॉम्प्स आपल्याला दाखवणार. शेवटी सेलर, आणि कमिशन बेस्ड सेलर, बायर एजंट या तिघांचाही व्हेस्टेड इंटरेस्ट घर जास्तीत जास्त किंमतीत विकले जाण्यातच आहे ना? पण प्रायसिंगबाबतीत स्वतःचा गट फिलिंग वापरा.
माझा अनुभव नव्हता चांगला.
माझ्या सध्याच्या घराबाबत- मला रिॲल्टरने "आस्किंग प्राईसवर ऑफर दे. अफलातून घर आहे. याहीपेक्षा वरच्या किंमतीत जाऊ शकेल" असं सांगून येडा बनवून पेढा खिलवण्याचा प्रयत्न केला.
कॉम्युट जास्त असल्याने ते माझ्या प्रायोरिटीवर मागच्या नंबरवर होतं.
मग मी (माझ्या मते) अशक्य पाडून भाव मागितला.
*पाच* मिनिटांत ऑफर ॲक्सेप्ट झाल्याचा कॉल आला. (आय कॅन ओन्ली इमॅजिन हाऊ मच लोअर आय कूड हॅव गॉन)
आय रेस्ट माय केस.
काय ल्येको तुम्ही इनोद सांगाय
काय ल्येको तुम्ही इनोद सांगाय, दात काढाय अन डोले माराय लागले शिरेश धाग्यावर.आं.. . ईषयाचं गांभीर्य ठ्यवा की जरा
>>तीन वर्षांत घराच्या किंमती
>>तीन वर्षांत घराच्या किंमती कमी झाल्या (५००के वरुन ४००के) तर त्यांनी केलेलं २०% डाउनपेमेंट (१००के) इवॅपरेट होणार; ५% केलं तर फक्त २५के. थोडक्यात, ५% डाउनपेमेंट मधे आर्थिक नुकसान कमी होईल असं सांगायचं आहे त्यांना...>>
म्हणजे निगेटिव इक्विटी मोजतच नाहीयेत? कठीण आहे.
डाउनपेमेंट मध्ये तितकं
डाउनपेमेंट मध्ये तितकं नुस्कान होईल. काय चूक आहे त्यात? ऑ???
माफ करा हायझेनबर्ग - गोंधळ
माफ करा हायझेनबर्ग - गोंधळ झाला कॅल्क्युलेशन मध्ये.
स्वाती - तुम्ही बरोबर लिहिले आहे, वीस टक्के होईपर्यंत pmi भरावा लागेल.
कटप्पा, व्हिसा वर फक्त ३
कटप्पा, व्हिसा वर फक्त ३ वर्ष असतील तर लोन मिळेलच असे नाही. मिळाले तरी व्याजाचा रेट खुप जास्त असु शकेल.
चांगल्या लोन कंपनी बरोबर बोलून घ्या. नंतर बॅक आउट कराव लागलं तर उगाच मनस्ताप होईल.
२०% डाऊन पेक्षा ५ किंवा १०% डाऊन पेमेंट योग्य होईल. जर तुमच्या मिसेस चा जॉब असेल आणि सेव्हींग असेल तरच २०% करा.
कारण समजा इन केस जॉब वगैरे गेलाच तर दुसरा जॉब मिळु पर्यंत सेव्हिंग असेल तर जास्त कुशन मिळेल.
pmi मुळं इन्स्टालमेंट जास्त होईल पण तरीही ठिक आहे . दुसरं म्हणजे प्रॉपेर्टी टॅक्स विचारात घ्या. वर्षाच्या शेवटी स्टिकर शॉक बसु शकतो.
तुम्ही विचारल नाहीत पण तरीही लिहिते. (आणि तुम्ही थोडा इमोशनल विचार करून घर घेताय म्हणुनही.
व्यावहारीक दृष्या योग्य नसलं तरीही इच्छा असेल आणि परवडत असेल तर इथे घर जरुर घ्या. व्हिसा, ग्रीन कार्ड वगैरे गोष्टी तुमच्या हातात नाहीत पण पैसे कमावणे आणि स्वतःचे घर घेणं आहे. इस्पेशिअली मुलं लहान असतील तर घर घेण्यासारखा आनंद नाही. वर्ष येतील आणि जातील पण जे दिवस उर्मीचे असतात, धडाडीचे असतात तेव्हाच अशा रिस्की गोष्टी करायला मन धजावत.
फक्त हाब न म्हटलय तस जायचीच वेळ आली तर व्यवस्थित विकून जा. पण तो विचार आता करायची गरज नाही. ३ वर्ष भरपुर मोठा टाईम स्पॅन आहे. भरपूर गोष्टी चेंज होतील तोवर. बेस्ट लक.
>>म्हणजे निगेटिव इक्विटी
>>म्हणजे निगेटिव इक्विटी मोजतच नाहीयेत?<<
तीन वर्षांनंतर घर विकण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आता घर विकलंच, तर मग निगेटिव इक्विटीचा प्रश्न कसा उद्भवेल? हि हॅज टु जस्ट बुक द लॉस अँड मुव ऑन...
आता घर विकलंच, तर मग निगेटिव
आता घर विकलंच, तर मग निगेटिव इक्विटीचा प्रश्न कसा उद्भवेल? हि हॅज टु जस्ट बुक द लॉस अँड मुव ऑन...>>हो पण विसा संपतोय, परत जायलाच हवे अशा परीस्थितीत , होम लोन अंडरवॉटर असताना मुव ऑन करणे खरच सोपे असेल का? गॅप भरुन काढणे/शॉर्ट सेल / स्ट्रॅटेजिक डिफॉल्ट?
असो.
रेंट ने द्यायचा ऑप्शन असेल कि
रेंट ने द्यायचा ऑप्शन असेल कि ....
च्रप्स,
च्रप्स,
रेंटने देणे या पर्याय आहेच पण तुम्ही गेस्ट वर्कर आहात आणि विसा संपला म्हणून परत जावे लागणार आहे अशा वेळी जर पडझड झाली तर हातात अवधी कमी असल्याने बरेच प्रश्न उद्भवतात. मिळणारे भाडे हे कर्जाचा हप्ता आणि घरमालक म्हणून येणारे इतर खर्च यासाठी पुरेसे होईल याची काय शाश्वती? एकतर अंडरवॉटर घरासाठी तुम्हाला भाडेकरुची निकड आहे त्यामुळे समोरच्या पार्टीला अडवानटेज असतो. तुम्ही इथे रहाणार नाही म्हणजे प्रॉपर्टी मॅनेज करायला द्यावी लागणार तेव्हा त्यांचे चार्जेस आले. भाडेकरुने भाडे थकवले तर तो एक वेगळाच व्याप असतो. त्या काळात कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कुशन हवे. तुम्ही एकदा देशाबाहेर गेल्यावर या भानगडी निस्तरणे तसे कटकटीचे होते.
>> होम लोन अंडरवॉटर असताना
>> होम लोन अंडरवॉटर असताना मुव ऑन करणे खरच सोपे असेल का? <<
बट, इट अॅपियर्स, कटप्पा हॅज पुट ऑल हिज डक्स इन ए रो...
अर्थात नाहि. म्हणुनच सुरुवातीला मी लिहिलंय - ३-५ वर्षासाठी घर विकत घेण्याच्या भानगडित पडुच नका.
भारतात बसुन अमेरिकेतली प्रॉपर्टी मेंटेन करणं हे "टू गुड टु बी ट्रु" या कॅटेगोरीत मोडणारं प्रकरण आहे. काहिंचे पाझिटिव अनुभव अस्तील तर वाचायला आवडेल. (
ऑन द कांट्ररी, इथे मलाच भारतातली प्रॉपर्टी मेंटेन करायला नाकि नऊ येत आहेत, गिवन दॅट माय बॉय्ज वुडंट इवन थिंक अबाउट मुविंग टु इंडिया)...कटप्पा ने घर खरिदा क्या ?
कटप्पा ने घर खरिदा क्या ? यासाठी आता बाफ २ काढायला लागेल का ?
राज , अमेरिकेतील प्रॉपेर्टी लिझिंग कंपनीला देवून मेंटेन करायला काय प्रॉब्लेम येईल? लिझिंग कंपनी पैसे घेते पण बर्यापैकी मेंट्नन्स पण बघते निदान इथे टेक्सास मध्ये तरी.
सीमा - खरंच धन्यवाद . तुमची
सीमा - खरंच धन्यवाद . तुमची पोस्ट खूप आवडली .
बायकोला देखील दाखवली आणि खरे सांगतो तुम्ही जे विचार मांडले आहेत तेच आमच्या डोक्यात होते फक्त तुम्ही सांगितल्यावर आता फार बरे वाटत आहे . तुमचा प्रतिसाद प्रचंड पॉझिटिव्ह आहे . खरंच धन्यवाद .
माझे संपूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात गेले . मुलांना तरी स्वतःच्या घरात राहायला मिळावे ही भावना होती .
खरंच इमोशनल निर्णय जास्त आहे.
एरिया चांगला आहे आणि स्कूल्स 10 रेटिंग असल्यामुळे रिसेल होईलच आणि रेंट ने देखील जाईल याची ग्यारंटी आहे .
तुमची दुसरी पोस्टदेखील एकदम बरोबर आहे, लिसिंग कंपनी रेंट मॅनेज करेल .
स्वाती 2 तुम्ही बरोबर बोलत
स्वाती 2 तुम्ही बरोबर बोलत आहात . कुशन हवे पण भाडेकरू ने भाडे थकवले म्हणून नाही ( अमेरिकेत असे होणार नाही)
कुशन हवे जेंव्हा तुमचा भाडेकरू सोडून गेलाय आणि दुसरा भाडेकरू मिळेपर्यंत वेळ लागणार आहे . त्या दरम्यानचा मंथली पेमेंट तुम्हाला कुशन मधून करावा लागेल .नंतर रेंट सुरु झाला कि गोष्टी सोप्या होतील .
सर्वांचे धन्यवाद . चांगली चर्चा झाली , होतेय .
फायदाच होईल एखाद्याला .
हायझेनबर्ग - तुम्ही गणित
हायझेनबर्ग - तुम्ही गणित बरोबर मांडले आहे पण टॅक्स बेनिफिट मिळेल हे राहिले आहे .
सिरीयस धाग्या ची आठवण लोकांना करून दिल्याबद्धल आभारी आहे .
अमेरिकेत असे होणार नाही >>
अमेरिकेत असे होणार नाही >> बरं.
एव्हिकट करणं काही केस मध्ये कसं महत्कर्म कठीण होतं, विकणं ही कठीण होतं, tenant law असा काही अजिबात सर्च करू नका.
>> भाडेकरू ने भाडे थकवले
>> भाडेकरू ने भाडे थकवले म्हणून नाही ( अमेरिकेत असे होणार नाही)>> लिजिंग कंपनी हायर केली तर हा त्रास होत नाही. अन्यथा सिंगल फॅमिली होम रेंटने दिल्यावर भाडे थकवणे होऊ शकते. माझ्या मैत्रीणीची भाड्याने दिलेली घरे आहेत. अधुन मधुन एविक्शन प्रोसेस साठी कोर्टात जाणे वगैरे कटकटी होतात.
तुमच्याबाबतीत सगळे छान पार पडो आणि तुम्हाला कुटुंबियांसह स्वतःच्या घरात रहाण्याचे सुख मिळो हीच शुभेच्छा!
अमितव मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट
अमितव मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी थ्रू म्हणतोय . क्रेगलिस्ट किंवा फेसबुक वर ऍड टाकून नव्हे .
स्वाती - धन्यवाद .
स्वाती - धन्यवाद .
काही धाग्यांप्रमाणे हा धागा
काही धाग्यांप्रमाणे हा धागा वाचताना advice and validation या दोन संज्ञा आठवल्या.
>>राज , अमेरिकेतील प्रॉपेर्टी
>>राज , अमेरिकेतील प्रॉपेर्टी लिझिंग कंपनीला देवून मेंटेन करायला काय प्रॉब्लेम येईल?<<
शॉर्ट टर्म करता ठिक आहे, पण १०-१५ वर्षांकरता इट कुड बी पेन इन ए ##. मागे माझ्या टिममधे एक फोर्ट वर्थ वरुन मुव झाला. घर सुरुवातीला प्रॉपर्टी मॅनेजिंग कंपनीकडे दिलं, ते वर्कआउट झालं नाहि म्हणुन काहि महिने स्वतः मॅनेज करायचा प्रयत्न केला, आणि शेवटी कंटाळुन विकलं. इट्स इझियर सेड दॅन डन...
तटि: कटप्पा यांना नाउमेद करण्याचा हेतु अजिबात नाहि. त्यांना शुभेच्छा!!
टॅक्स बेनिफिट मिळेल हे राहिले
टॅक्स बेनिफिट मिळेल हे राहिले आहे >> नविन २०१७ च्या टॅक्स लॉ मुळे गृहकर्जावर मिळणारा टॅक्स बेनेफीट जवळ जवळ नाहीसा झालाय. त्यामुळे तो गणितात धरण्याची आवश्यकता वाटत नाही.
Pages