Submitted by कटप्पा on 3 November, 2019 - 21:13
सरळ मुद्द्यावर येतो .
एक घर आवडले आहे , ऑफर एक्सेप्ट झाली आहे .
20% डाउनपेमेंट करणे चांगले कि 5/10 टक्के विथ मोटगेज इन्सु हा माझा प्रश्न आहे .
घर तीन वर्षाने विकण्याचे असू शकेल , परत भारतात जाण्याचा प्लॅन आहे .
जाणकारांच्या सल्ल्याचा आणि उत्तरांच्या प्रतीक्षेत . हा सिरीयस धागा आहे .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण टॅक्स बेनिफिट मिळेल हे
पण टॅक्स बेनिफिट मिळेल हे राहिले आहे . >>दादा तुम्ही अमेरिकेतच राहता की कुठे ऊत्तर ध्रुवावर?
ट्रंपने मागच्या वर्षी मॉर्टगेज ईंट्रेस्ट वर घेता येणारा टॅक्स ब्रेक कर्ब करून स्टँडर्ड डिडक्शन वाढवल्याचे सगळ्यांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले आहे ते ऐकले नाहीत का?
आता मॅरिड कपलसाठी स्टॅ.डि. १२००० चे २४००० झाले आहे. तुमचा मॉर्टगेज ईंट्रेस्ट किती पडणार आहे तो धरून जर डिडक्शन २४००० च्या खाली असल्यास विसरा टॅक्स ब्रेक...
मागच्या वर्षीचे तुमचे टॅक्स डॉक्युमेंट बघा आयटेमाईझ केले होते की स्टॅ. डि. घेतले होते?
आयटेमाइझ केले असल्यास ज्यावर डिडक्शन घेतले होते त्या आमाऊंटमध्ये आता मॉर्टगेज ईंट्रेस्ट आणि प्रॉपर्टी टॅक्स अॅड करा... ही अमाऊंट २४००० च्या वर गेल्यासच तुम्हाला त्या वरच्या रकमेवर टॅक्स ब्रेक मिळेल. म्हणजे २४००० वरच्या पर १००० मागे तुम्ही साधारण २०० टॅक्स वाचवाल.
मागच्या वर्षी स्टॅ. डि. घेतले असल्यास आणि तुमची मॉर्टगेज ईंट्रेस्ट + प्रॉपर्टी टॅक्स वॅल्यू १२००० पेक्षा कमी असल्यास पुन्हा स्टॅ.डि. घ्यावे लागणार जे तुम्ही घर घेतलेले नसते तरी तुम्हाला मिळालेच असते. मग टॅक्सच्या दृष्टीकोनातून काय फायदा झाला घर घेऊन?
हे वाचा https://www.creditkarma.com/tax/i/mortgage-interest-deduction-cap/
एरिया चांगला आहे आणि स्कूल्स
एरिया चांगला आहे आणि स्कूल्स 10 रेटिंग असल्यामुळे रिसेल होईलच आणि रेंट ने देखील जाईल याची ग्यारंटी आहे . >> जस्ट एक थॉटच बरं
आजकाल हे नकारात्मक आहे हे गंभीर आहे असे सांगावे लागते..
. असो.
का... पुन्हा म्हणाल गांभीर्याने लिहिले नाही
स्कूल रेटिंग चांगले आणि म्हणून रिसेल चांगला आणि म्हणून रेंट चांगले असे धडधडीत स्पष्ट कोरिलेशन असते हे तुम्हाला कोणी संगितले?
तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना अजून चार पाच वर्षे स्कूलला पाठवणार नसाल तर 'व्हाय डू यू केअर अबाऊट स्कूल रेटिंग्ज?'. स्कूल रेटिंग चांगले असण्याचा लाभ तुम्ही ऊठवू शकत नसाल तर ऊगीचच त्यासाठी पैसे का भरताय?
म्हणजे २००० sqft चे घर १० रेटिंग असलेल्या कम्युनिटीत ४०० के ला मिळत असेल
आणि तेवढेच घर ७-८ रेटिंग असलेल्या कम्युनिटीमध्ये ३५० के ला मिळत असेल आणि तुम्ही अजून पाच सात वर्षे कोणाला जिथे खरे खुरे रेटिंग मॅटर करते अशा ईयत्तेत पाठवणार नसाल तर एक्स्ट्रा ५० के चा बोजा किस खुषी मे घेताय?
ह्या पैशांवर महिन्याकाठी वाचलेले व्याजाचे २००-२५० रुपये मुलांच्या ह्या वयातल्या अॅक्टिविटीवर खर्च करू शकता.
२००० sqft घराची प्राईस जिथे जेवढी जास्त अॅफॉर्डेबल असेल तिथे चांगल्या रिसेल आणि रेंट ची प्रॉबॅबिलिटी वाढते...
स्कूल रेटिंग वगैरे गोष्टी मॅटर करतात, पण ज्यांना रेटिंग बघणे मस्ट आहे त्यांच्यासाठी.. ईतरांसाठी त्या दुय्यम आहेत.
बघा बुवा!!
कटप्पा - तुमचा घर घेण्याचा
कटप्पा - तुमचा घर घेण्याचा निर्णय उत्तम, त्याचे मी समर्थन करते. आपण मराठी माणसे खूप घाबरतो, पटकन निर्णय घेत नाही. तुम्ही त्याला अपवाद म्हणून तुमचे अभिनंदन.
अमेरिकेत घर हा निर्णय कधीही आर्थिक दृष्टीकोनातून समर्थनीय होऊ शकत नाही. घर घेतले की प्रॉपर्टी टॅक्स येतो, घरच्या बाजूचे अंगण साफ ठेवायला खर्च होतो, नवीन फर्निचर घेतले जाते, दागडुजीचा खर्च होतो.
खर्चा होतो पण त्यातून समाधान खूप जास्त मिळते. आपल्या स्वतःच्या जोरावर आपले पहिले घर घेतल्याचा आनंद , त्यातून मिळणारा आत्मविश्वास आणि समाधान ह्याचे पैशात मोल होत नाही.
तुमचा ३ वर्षानंतर वीसा परत रिन्यू होऊदे ही सदिच्छा. ऑस्टिन शहर वाढत आहेत, कॅलिफॉर्निया वरुन भरपूर लोक टेक्सास मधे येत आहेत, घरच्या किमती नक्कीच वाढणार आहेत. तुमचा निर्णय उत्तम. अभिनंदन, फोटो पाठवा.
Mortgage Interest Rates सध्या
Mortgage Interest Rates सध्या खूप चांगले आहेत. साधारणपणे ३० वर्ष फिक्स ३.५% आणि ५/१ आर्म ३ पर्यंत मिळेल. ह्याचा लाभ नक्की घ्या.
ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर
ऑन अ सिरियस नोट, रिअॅल्टर नामक प्राण्यावर फारसा विश्वास ठेवू नका. >>> पहिले घर असेल तर रिअॅल्टर शिवाय पर्याय नाही. जेव्हा दुसरे किंवा तिसरे घ्याल तेव्हा रिअॅल्टर ला विसरा आणि ३% जे रिअॅल्टर च्या घशात जातात ते वाचवा. सध्या बर्याच नवीन कंपनी आहेत जे फिक्स $५००० मधे घरे विकून किंवा रीबेट देतात.
तेव्हडे घर घेतले कि आम्हाला
तेव्हडे घर घेतले कि आम्हाला वास्तुशांतीला बोलवा बरं का ?
सध्या बर्याच नवीन कंपनी आहेत
सध्या बर्याच नवीन कंपनी आहेत जे फिक्स $५००० मधे घरे विकून किंवा रीबेट देतात.>>याबद्दल काही माहिती देऊ शकता का?
सध्या बर्याच नवीन कंपनी आहेत
सध्या बर्याच नवीन कंपनी आहेत जे फिक्स $५००० मधे घरे विकून किंवा रीबेट देतात.>>याबद्दल काही माहिती देऊ शकता का?
>>>>
https://shopprop.com/
अभिनंदन आणि शुभेच्छा कटप्पा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा कटप्पा!!
सर्वांचे धन्यवाद. गेला एक
सर्वांचे धन्यवाद. गेला एक
महिना मायबोलीवर येऊ शकलो नाही .
वीस टक्के डीपी करायचा निर्णय घेतला सगळे प्रतिसाद वाचून आणि काही मित्रांशी डिस्कस करून .
प्रमुख कारण म्हणजे मला पर मंथ पेमेंट एका ठराविक रकमेच्या आत हवा होता .
खूप खूप धन्यवाद .
अभिनंदन!
अभिनंदन!
२०% करू शकत असलेल्यांनी तसे न करण्याचे काहीच कारण नाही असे मला वाटते (बे एरिया सारखे एखादे मार्केट वगळता), तेव्हा योग्य निर्णय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ कटप्पा, नवीन घराबद्दल
@ कटप्पा, नवीन घराबद्दल अभिनंदन.
Pages