Submitted by रेव्यु on 30 August, 2014 - 19:46
४ दिवस मी व पत्नी जबलपूर व निकटच्या पर्यटन स्थळांना ऑक्टोबर मध्यास भेट देत आहोत. हॉटेल व इतर काय काय पाहता ये ईल याची माहिती मिळेल का?
तेथे येण्या आधी खजुराहो व जवळपास ४ दिवस आहोत. त्या बद्दल ही सांगाल का? धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेव्यु जी, जबलपूर मधे भेडाघाट
रेव्यु जी, जबलपूर मधे भेडाघाट आणी तेथील मार्बल रॉक्स आणी धुंवाधार धबधबा , चौसष्ट योगिनी , पिसनहारी की मढिया ,कान्हा किसली नॅशनल पार्क, बांधवगढ नॅशनल पार्क फेमस फॉर व्हाईट टायगर..
राहण्याकरता हॉटेल थोडे बर्यापैकी ३०००/ डे या रेट ने मिळू शकेल.. सर्विस इज सो सो..
अजून काही आठवले तर इथेच अॅड करेन ..
वर्षू, तुला संपर्कामधून ईमेल
वर्षू, तुला संपर्कामधून ईमेल पाटवली आहे. पाहशील का?
kanha national park madhe Taj
kanha national park madhe Taj hotel pan ahe. Tyanchi jungle safari mast aste.
आणखी काही माहिती मिळाल्यास
आणखी काही माहिती मिळाल्यास स्वागत आहे/ आनंद होईल

खजुराहो- सटाना [रेल्वे
खजुराहो- सटाना [रेल्वे स्टेशन] मार्गावर 'पन्ना डायमंड माईन्स' आहेत पण पहाण्यासाठी तिथं ओळख काढून परवानगी मिळवावी लागते. शिवाय, याच रस्त्यावर छोट्या धबधब्याचं एक छान ठीकाण आहे [ पांडवांच्या वास्तव्यावरून नांव असल्याचं आठवतं]. खजुराहोला तुमचा मुक्काम असल्याने तिथं या दोन्ही ठीकाणांची माहिती मिळूं शकेल.
अर्थात, << भेडाघाट आणी तेथील मार्बल रॉक्स , कान्हा किसली नॅशनल पार्क, बांधवगढ नॅशनल पार्क फेमस फॉर व्हाईट टायगर..>> याना अग्रक्रम.
झाशीकडून येणार असाल तर प्रथम
झाशीकडून येणार असाल तर प्रथम ओर्छा (१८ किमी) .
रेव्यु , तुम्हाला
रेव्यु , तुम्हाला समदडिया(रसूल चौक एरिया) किंवा कृष्णा (रानी दुर्गावती म्युझियम , नेपिअर टाऊन एरिया)ही हॉटेल्स तुम्हाला सोईची पडतील राहायला... चेक रेट्स ऑन मेक माय ट्रिप्.कॉम
२३ ला सकाळी तुम्हाला अर्ध्या,पाऊण दिवसात भेडाघाट (मार्बल रॉक्स), धुंवाधार आणी चौसष्ट योगिनी पाहता येतील.
कान्हाकिसली नॅशनल ला २४ ला सकाळी जाऊन त्याच दिवशी परतायचे असल्यास तीन तास जाणे आणी तीन तास येणे एव्हढा वेळ प्रवासाला द्यावा लागेल (सेम डे परतणे -नॉट अॅडवाईसेबल). राहायचे असल्यास तिकडे पुष्कळ रिझॉर्ट्स आहेत आणी जबलपूर हून पुष्कळ टूर्स आहेत , ऑन लाईन टूर बुक करता येईल.. २४ ला सकाळी निघून २५ ला संध्याकाळी परत येणे जास्त सोईचे पडेल पूर्ण कान्हा सफारी नीट पाहता येईल.
गूगल कान्हा टूर्स फ्रॉम जबलपुर, खूप इन्फर्नेशन मिळेल..
२६ ला बाजार पालथे करू शकता.. फवारा इ. मेन सिटीत आहे .. आता बाजारात काय मिळते नो आयडिया..
जबलपुर मधे आता आमचे कोणीच नाही.. अगदी औषधाला सुद्धा.. जबलपुर हून बांधवगढ खूप लांब आहे .. कटनी पासून जवळ आहे.. तुम्हाला सतना हून जायला सोपं पडेल..
मनःपूर्वक धन्यवाद खूप
मनःपूर्वक धन्यवाद
खूप उपयोगी पडणारी माहिती दिलीत वर्षू जी
जबलपूरच्या जवळ भीमबेटका नक्की
जबलपूरच्या जवळ भीमबेटका नक्की बघा.. अप्रतिम जागा आहे.. आणि एक जैन मंदिर पण आहे... त्याचे नाव आत्ता आठवत नाहीये.. तिथे साधारण तीनएकशे पायर्या चढून वर जावं लागतं.. पण वरती गेल्यावर सुंदर मंदिर आहे. बेडाघाट तर अजिबातच सोडू नका..
जबलपूरच्या जवळ भीमबेटका नक्की
जबलपूरच्या जवळ भीमबेटका नक्की बघा.. अप्रतिम जागा आहे.. आणि एक जैन मंदिर पण आहे... त्याचे नाव आत्ता आठवत नाहीये.. तिथे साधारण तीनएकशे पायर्या चढून वर जावं लागतं.. पण वरती गेल्यावर सुंदर मंदिर आहे. >>>>
हिमस्कूल, मुक्तागिरी मन्दिर काय ते? तेच असेल तर अहाहा! जबरी दिसते ते, जवळच मस्त धबधबा वगैरे. नाम काफी है.:स्मित: तिथे कोजागिरी साजरी करा, त्यात लेण्यान्मध्ये काहीतरी २६ का २७ नम्बरचे लेणे आहे ना, तिथे खूप काहीतरी महत्वाचे आहे, नेट वरुन माहिती काढा.
,'जबलपूरच्या जवळ भीमबेटका '..
,'जबलपूरच्या जवळ भीमबेटका '.. हिम्सकूल , हे भोपाळ हून जास्त जवळ पडेल..
रेव्युजीं फक्त ३.५ दिवस आहेत जबलपुर मधे.. त्यामुळे भीमबेटका सजेस्ट केले नाही..
बाकी माय एम पी रॉक्स!!!
ते MP गजब है बघा youtube वर
ते MP गजब है बघा youtube वर
माझी fav ad film.
जाऊन आल्यावर थोडेतरी लिहाच.
जाऊन आल्यावर थोडेतरी लिहाच.
सगळे चौरागड विसरलेले
सगळे चौरागड विसरलेले दिसताय.पंचमढीला जा नी रहाच २/३ दिवस. लै भारी.
माझा परतीचा प्रवास जबलपूरहून
माझा परतीचा प्रवास जबलपूरहून आहे . त्यामुळे जबलपूरला परत येणे आवशय्क आहे.
२३ , २४, २५ व २६ अर्धा दिवस आहे.
या साडेतीन दिवसात काय काय करायचे हे ठर्वायचे आहे.
२३ भेडाघाट
२४- २५ दुपारपर्ञंत कान्हा असा सध्या ' घाट' आहे.
काय वाटते?
रेव्यु, ट्रीपबद्दल माहिती
रेव्यु, ट्रीपबद्दल माहिती द्या ...
इतकी वर्षे नागपुरात राहतोय पण पंचमढी, जबलपूर भेडाघाट खजिराहो पाहिलं नाहीये...असो तरी आता जायचं ठरवतोय आठ दिवस आहेत हातात ... काय काय पहावं, कुठे कुठे राहावं?
मंजूताई, जबलपूरला १
मंजूताई, जबलपूरला १ संध्याकाळ - ग्वारीघाटावरची नर्मदा आरती नक्की बघाच.
त्या दिवशी सकाळी बॅलन्स रॉक, दुर्गावतीचा किल्ला, कचनार गार्डन असं बघत वेळ काढावा लागेल.
दुसर्या दिवशी भेडाघाट (कार्तिक पौर्णिमेला गेलात तर रात्रीच्या बोट राईड्ने मार्बल रॉक बघाच) , धुआंधार धबधबा, बर्गी धरण आणि चोसट योगिनी मंदिर. यातले एक जागा पहिल्या दिवशीही करता येइल पण मग उगाच जास्त प्रवास आणि पैसे जातील.
माधवजी, धन्यवाद! २५ नो.
माधवजी, धन्यवाद! २५ नो. जबलपूरचं रे. तिकीट काढलंय... परतीचं ठरल्यावर काढू किंवा बसने येता येईल नागपूर ओवरनाईट जर्नी आहे.
नर्मदाकिनारी दोन तीन दिवस
नर्मदाकिनारी दोन तीन दिवस राहायला आवडेल ... अशीही काही ठिकाणं सूचवा
मागच्या वर्षीच कटनीला गेलो
मागच्या वर्षीच कटनीला गेलो होतो, आणि जबलपूरजवळची थोडीफार ठिकाणे बघता आली.

१. कटनीजवळ मोहासच हनुमान मंदिर बघितलं. इथे तुटलेली, निखळलेले सांधे जुळतात अशी श्रद्धा आहे.शनिवारी आणि मंगळवारी इथे तौबा गर्दी असते.
२. जबलपूरजवळ जाताना एकाच रस्त्यावर चौसष्ठ योगिनी मंदिर, धुवाधार फॉल्स, आणि भेडाघाट लागतात.
अ. चौसष्ठ योगिनी मंदिरात खूप पायऱ्या चढाव्या लागतात, मात्र वर गेल्यावर अक्षरशः मन भरून जातं. इथे खरोखर चौसष्ठ योगिनींच्या मूर्ती आहेत, पण बऱ्याचशा भग्नावस्थेत आहेत. मध्येच शिव - सतीचं मंदिर असून, त्यांच्या विवाहाच्या वेळी या योगिनी जमा झाल्या होत्या, अशी श्रद्धा आहे.
ब. धुवाधार फॉल्स - इथे जितकं पाणी खाली पडतं, तितकंच वर उसळत आणि जवळ गेल्यावर अक्षरशः पावसाचा भास होतो. फेसळता जलप्रपात ज्या वेगाने पडतो, त्याला तोड नाही. इथे रोपवेची राईड आहे, अवश्य घ्या. (इथेच मी मासाहेबांसाठी छोटी संगमरवरी खलबत्ता मुसळी घेतली
क. भेडाघाट - नर्मदे हर हर! शांत संथ पाणी, आजूबाजूला संगमरवरी डोंगर, त्यातून जाणारी नाव, अरुंद कपारीतून जाताना होणारा काळजाचा थरकाप. हे डोंगर उन्हात सोन्याने मढवल्याचा दृष्टिभ्रम होतो. बोट राईड मस्ट!!!!
फोटो शोधून डकवतो!
कटनीत अजून एक ठिकाण आहे, पण तिथे सहसा परवानगीशिवाय जाता येणार नाही. पण इट वॉज बेस्ट ऑफ इट्स काईंड
अ, छान माहिती! धन्यवाद!
अ, छान माहिती! धन्यवाद!
कटनी जवळचं ठीकाण नक्की सांगा
कचनार सिटी मधली शंकराची
कचनार सिटी मधली शंकराची मूर्ती

धुआंधार धबधबा


मार्बल रॉक

चोसट योगिनी मंदीर

धुवाधार फॉल्स अवश्य पाहणे.
धुवाधार फॉल्स अवश्य पाहणे.
पण हा धुवाधार फॉल्स डिसेंबर
पण हा धुवाधार फॉल्स डिसेंबर ,फेब्रुवारीपर्यंत वाहतो का?
पण हा धुवाधार फॉल्स डिसेंबर
पण हा धुवाधार फॉल्स डिसेंबर ,फेब्रुवारीपर्यंत वाहतो का? >>> १२ महिने
फोटो दिसत नाही
फोटो दिसत नाही
प्रसिध्द ठिकाणं बघणारच आहोत
प्रसिध्द ठिकाणं बघणारच आहोत पण कुछ हटके ठिकाणं शोधतेय...
@मंजुताई - संध्याकाळी त्या
@मंजुताई - संध्याकाळी त्या जागेविषयी लिहितो
अ, सवडीने लिहा ...
अ, सवडीने लिहा ...
हा धागाच सापडत नव्हता.
हा धागाच सापडत नव्हता.
कटनीजवळची, इंफॅक्ट कटनीमधीलच जागा म्हणजे CALDERYS INDIA REFRACTORIES LTD.
हो, ही एक फॅक्टरीच आहे, पण तब्बल १०८ वर्षे जुनी, इंग्रजांच्या काळात बांधलेली. CALDERYS चा आवार म्हणजे एक टाऊनशिपच आहे. याच्या गेटमधून आत गेलं, तर मस्त दगडी टुमदार बंगले लागतात. यांच्या प्लांट हेडसाठीही जबरदस्त मोठा बंगला आहे.
फॅक्टरीच सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे, तिचं गेस्ट हाऊस. या गेस्ट हाऊस मध्ये राहणं म्हणजे एक वेगळीच फिलिंग आहे,अतिशय जुने प्रचंड मोठे रूम्स, त्याच्याएवढीच मोठी बाल्कनी, आजूबाजूला गोड पेरूची झाडे. या गेस्ट हाऊसचा दरवाजाच पितळी चावीने उघडावा लागतो. दरवाजा प्रचंड भव्य आहे, आणि त्यावरचा जुना कॉट एकावेळी पाच माणसे झोपतील इतका मोठा आहे. अशा जुन्या बांधकामात राहणं म्हणजे एक पर्वणीच, आणि तुमच्या दिमतीला खास एक नोकर.
गेस्ट हाऊसच जेवण म्हणजे अप्रतिम. छोले पुरी, किंवा रोटी खाऊनच मन भरून जातं. नाश्त्याला अप्रतिम बटाटे पोहे...
फॅक्टरीविषयी पुढच्या प्रतिसादात...
Pages