Submitted by सूलू_८२ on 15 October, 2019 - 08:53
सु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व प्रतिसादकान्चे मनापासून
सर्व प्रतिसादकान्चे मनापासून आभार .
मला हलकी फुलकी पुस्तके आवडतात. मग ती गुढ कथा असो किव्वा प्रेमकथा असो किव्वा काहीही. हा, शेवट वाचकान्ना इण्टरप्रिट करता येईल अशी पुस्तके सुद्दा आवडतात. पण डोक्याला स्ट्रेस, ताप देणार्या पुस्तकान्पासून दुर राहते. ग्रन्थ बिन्थ बोअर करतात.
इंटरेस्टिंग वाटतेय म्हणून 'हमशकल्स' नावाचा चित्रपट थेटरात बघितला होता.
रेस्ट इज हिस्ट्री! >>>>>>> अज्ञा, धन्य आहात तुम्ही.
पुस्तकं वाचणं, चांगली पुस्तकं वाचणं हा मोठा आनंद आहे.त्यासाठी कोणालाही गळ घालून, विनंत्या करून मोटिव्हेट करण्यात अर्थ नाही.ज्यांना नाही वाचायचं त्यांची मुळात इच्छा नाही म्हणून वाचत नाही म्हणावं, कॉपी आहे का, किंमत इतकी पानं इतकी वगैरे कारणं देऊ नयेत असं वाटतं.>>>>>>>> अगदी अगदी
तरीही दिलखुलास, रसिक माणसांना आवडुही शकतील, सांगता येत नाही. >>>>>>> सहमत
कुठल्या पुस्तकात आहेत? नाव
कुठल्या पुस्तकात आहेत? नाव सांगालं का? >>> नावं नाही आठवत. खूप वर्ष झाली वाचून. काही कंटेंट आठवतो, तश्या प्रत्येक पुस्तकात कॉमन असायच्या काही गोष्टी. पण फार मजा यायची वाचायला त्यावेळी, कॉलेजात असताना वाचली आहेत.
त्यांचे खूप लेखन साधारण सातवी ते बारावी ह्या पिरेडमध्ये वाचलं एवढं आठवतं. सोबत पु ल, अजून वेगवेगळ्या पुस्तकांशी मैत्री झालेली. त्यापैकी पु. ल. अजूनही तोच आनंद देतात. सु शि खूप वर्षात वाचले नाहीयेत.
पण तेव्हा दारा आणि व्हाम्पायर पुस्तकांनी आनंद दिलाय. जास्त लक्षात राहिले ते मात्र तुकडा तुकडा चंद्र, ते वेगळं कौटुंबिक आहे. पण ते जास्त आठवतंय अजूनही. पण ते जरा उशिरा वाचलं बहुतेक कॉलेज संपल्यावर. आता आवडेल की नाही माहिती नाही.
अज्ञा, धन्य आहात तुम्ही.
अज्ञा, धन्य आहात तुम्ही.
>>>
इथले प्रतिसाद वाचून असं जाणवतंय की जसा भयकथा हा धारपांचा USP होता, तसं सुशिंच नव्हत. त्यांची अनेक विभागात लेखने होते.
सुशि यांच्या vampire वर आधारित पुस्तकाचं नाव कुणी सांगेल का? मला एक तुलनात्मक रिव्ह्यू करून बघायचंय लुचाई सोबत!
कुणी लुचाई आणि लटकंती यांचा
कुणी लुचाई आणि लटकंती यांचा comparative review देऊ शकेल??? >> लुचाई धारपांचे आहे नि लटकंती सुशी. पहिली गूढकथा तर दुसरे विनोदी आहे. लुचाई बर्यापैकी कुठल्या ही हॉलीवूड व्हँपायर बेस्ड सिनेमासारखे आहे. सुशींच्या ह्या टाईपच्या प्उस्तकामधे मातम किंवा माध्यम होते का ? मला नावे नीट आठवत नाही पण धारपांनी हा जॉनर ज्या हुशारीने सहजतेने हाटळला आहे तेव्हढा सुशींना जमलेला नाही. ओमेन नि सब्रिना द विच सारखा फरक आहे हातळणी मधे.
माध्यम मध्ये पोटी जन्मलेला
माध्यम मध्ये पोटी जन्मलेला राक्षस मुलगा आहे
मातम मध्ये बहुधा व्हॅमपायर.
सनसनाटी मध्ये पिरॅमिड घोस्ट
अंमल मध्ये सर जेम्स चा आत्मा
सन्नाटा मध्ये बहुधा खंडाळ्याचा बंगला आणि घोस्ट
सुशि यांच्या vampire वर
सुशि यांच्या vampire वर आधारित पुस्तकाचं नाव कुणी सांगेल का? >>> 'मातम', 'माध्यम','जाणीव', कदाचित 'मंत्रजागर'.
खंडाळ्यात घडणारी गोष्ट आहे.
खंडाळ्यात घडणारी गोष्ट आहे. एकाला संजीवनी औषध मिळालेलं असतं. प्रयोग म्हणून तो ते एका माकडाला देतो आणि माकड जिवंत होऊन त्याच्यात भयानक राक्षसी ताकद येते अशी काही तरी गोष्ट आहे. या पुस्तकाचं नाव कुणाला माहिती असेल तर सांगा. मला आठवत नाही. तेव्हा आवडलं होतं. अजून त्यात कुठला तरी खटला आणि ज्यूरी अशीही भानगड होती. >>> 'प्राक्तन'.
स्वाहा संपवून मातम चालू करतो.
स्वाहा संपवून मातम चालू करतो.
थँक्स असामी, मी अनु, विजिगीषु
कसलं आठवतंय सर्वांना, हॅट्स
कसलं आठवतंय सर्वांना, हॅट्स ऑफ. मातम गाजली होती, वाचली पण होती, नाव मात्र अजिबात आठवत नव्हतं.
दोन चुका का तीन चुका माफ असायच्या व्हॅपायर जगात, मग मात्र नाही माफी, ते दात रुतवणे, ते वेगळे डोळे आणि दात ही वर्णनं आठवतायेत. दोन तीन पुस्तकात सेम, अर्थात बरोबर आहे म्हणा.
मीही वरची सगळी वाचलीत व
मीही वरची सगळी वाचलीत व आवडलीही होती पण आता आठवत नाहीत म्हणुन सगळी विकत घ्यायचीत.
- आजन्म फॅन.
सगळी पुस्तके नव्याने छापली
सगळी पुस्तके नव्याने छापली गेली आहेत, जात आहेत असे खात्रीशीर कळले आहे
माहिती बद्दल धन्यवाद विजिगिषू
माहिती बद्दल धन्यवाद विजिगिषू.
मला व्हॅमपायर कथा खूप आवडतात.
त्यांचीच एक खंडाळा चा बंगला
त्यांचीच एक खंडाळा चा बंगला वाली कथा आहे ती थोडी दुःखी आहे.लहान मुलगी मरते.>>>>>>>mi_anu , ती कथा म्हणजे "काळंबेरं".
सुशिंची पुस्तके कंटेंट पेक्षा
सुशिंची पुस्तके कंटेंट पेक्षा लेखनशैलीसाठीच आवडतात. त्यांची लेखनशैली खरंच भन्नाट होती. मला त्यांच्या अमरकथा आणि काही हॉरर कथा आवडतात. आणि "बरसात चांदण्यांची" ऑलटाईम फेवरीट आहे.
मला त्यांची चैलेंज नावाची अमर कथा हवी आहे. त्यांची बरीच पुस्तकं आलियेत मार्केटमधे. पण हे नाहिये.
ह्या धाग्यावरचे आणि
ह्या धाग्यावरचे आणि धारपांच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचून कळतंय, की मराठी साहित्यात किती अफाट वाचक आहेत ते.
जी ए कुलकर्णी यांच्यावरही एखादा धागा निघायला हवा. त्यांवही सगळ्यात जास्त पुस्तके वाचलीत मी.
जी ए कुलकर्णींवर अशोक पाटील
जी ए कुलकर्णींवर अशोक पाटील यांचा एक धागा आहे
शोधावा लागेल
अरे वा! मी अनु नक्की लिंक
अरे वा! मी अनु नक्की लिंक द्या!
सगळी पुस्तके नव्याने छापली
सगळी पुस्तके नव्याने छापली गेली आहेत, जात आहेत असे खात्रीशीर कळले आहे >>>>>>>> अरे वा मस्त! धन्स वरदा
मला हॉररपेक्षा गुढकथा, रहस्यकथा, कौटुम्बिक, सायन्स फिक्शन आणि प्रेमकथा वाचायला आवडतील सु. शि च्या.
सुचवाल का कुणी या प्रकारातील चान्गल्या कथा/ कान्दबर्या?
क्षणोक्षणीची नक्की कथा काय आहे?
पीजे मार मोड ऑन:
पीजे मार मोड ऑन:
मला वाटलं तान्ह्या मुलांच्या संगोपनाचा धागा आहे.
:पीजे मार मोड ऑफ
मी सुहास शिरवळकरांचे एकही पुस्तक वाचले नाही.
दुनियादारी, ESG ची कॉपी वगैरे प्रतिसाद बघून वाचेन असे वाटत नाही.
आता नकाच वाचू. वय १६-१८ या
आता नकाच वाचू. वय १६-१८ या वयात सुशि फॅन होते मी. फार तर २०. प्रौढ वयात नाही अपील होणार, वाचवणार नाहीत.
वाचुन पहा. नाही आवडली तर
वाचुन पहा. नाही आवडली तर सोडुन द्या. पण आवडणारच नाहीत असे म्हणुन नाही वाचलीत आणि समजा आवडण्यासारखी निघाली तर.. असेही होऊ शकते.
लोकहो, कोणाला वाचुन पहायचे असेल तर मागे खेचु नका. हवा तर इशारा द्या, ‘कदाचीत आवडणार नाहीत’ असा. इथे बहुतेकांनी शैली मस्त आहे, काही खुप आवडल्याचेच लिहीले आहे. त्यामुळे सांगता येत नाही.
मानव झूम वाचा.
मानव झूम वाचा.
सनसनाटी माझी खूप आवडती
सनसनाटी माझी खूप आवडती कादंबरी आहे .. शाळेत असताना लायब्ररीतून अनेकदा आणून पारायणं केली .. आणि काही वर्षांपूर्वी बुकगंगावर दिसल्यावर खरेदी केली .. वॅम्पायरचं "जाणीव" मला अजिबात आवडलं नाही , सैतानघर सुद्धा नाही .. बरसात चांदण्यांची , दुनियादारी ऑल टाईम फेव्हरेट .. दारा बुलंद / राजस्थानचं वाळवंट , खेडी वगैरे वर्णन असलेल्या कादंबऱ्या पूर्वी खूप आवडायच्या , आता थोड्या कमी आवडतात .. बाकी त्यांची बहुतेक पुस्तकं क्षणिक मनोरंजन म्हणून चांगली आहेत , सुशि आवडते लेखक असं अभिमानाने सांगता यावं अशी नाहीत ... जरी त्यांची बरीचशी पुस्तकं आवडली असली तरीसुद्धा ... हॉरर सुशि चांगलं लिहू शकले असते पण नको तिथे विनोदी किंवा अश्लीलतेचा विनाकारण वापर / अतिरेक होऊन हॉरर / गूढ लिखाणाच्या वाटेवरून ढळायचे असं वाटतं वाचताना .. त्यांच्या विनोदी कथा / कादंबरीतला एखादा प्रसंग वाचताना हसून हसून डोळ्यात पाणी येतं .. दुनियादारी मध्ये मारामारी चालू असताना श्रेयस मनातल्या मनात हिंदी संवादांचं मराठी भाषांतर करून पाहतो तेव्हा - खेळी करतोस भ्याडा चल आव्हान दे थिएटर मध्ये शिरीन आणि तिच्या भावाशी इंग्रजीत बोलू पाहणारा दिग्या .. नॉट माय ब्रदर कमिंग .. आणि अंधारात कपाळावर हात मारून घेणारा श्रेयस .. शेड्स कथासंग्रहात " स्वप्नात टांग त्याच्या " म्हणून एक कथा आहे , तीही फार विनोदी आहे .. आणखीही विनोदी कथा आहेत .. नियंत्रक नावाची गूढकथा ग्रेट आहे ... ती वाचूनच वाटतं ठरवलं असतं तर सुशि खूप चांगलं हॉरर - गूढ लिहू शकले असते पण त्यांनी वेगळी शैली स्वीकारली ..
मला हॉररपेक्षा गुढकथा,
मला हॉररपेक्षा गुढकथा, रहस्यकथा, कौटुम्बिक, सायन्स फिक्शन आणि प्रेमकथा वाचायला आवडतील सु. शि च्या.
सुचवाल का कुणी या प्रकारातील चान्गल्या कथा/ कान्दबर्या?>>>>>>>> मास्टर माईंड वाचा.
सकाळपासून या धाग्याची वाट बघत
सकाळपासून या धाग्याची वाट बघत होतो.
रात्री काजळमाया वाचल्यावर आता यावर काही नको, म्हणून सकाळी सुशिंच 'गाफील' वाचून बघितलं.
बहुतेक सिरीज मधील पुस्तक असावं. कारण म्हणजे मुख्य कॅरेक्टर फिरोज यांच्याबरोबर काही पूर्वीचेही कथानक येतात.
वन वर्ड रिव्ह्यू, 'ओके'
पोजिटिव्ह पॉईंट्स
१. पुस्तकाला वेग भरपूर आहे, इतका की काही वेळा काही ओळी पुन्हा वाचाव्या लागतात.
२. कथानकसुद्धा उत्कंठा वाढवते.
३. मध्येच विनोदाची पेरणीसुद्धा मस्त वाटते.
४.कॅरेक्टरसुद्धा वेल डेव्हलपड आहेत.
५. संवाद आणि प्रसंगवर्णन खुसखुशीत आहे.
निगेटिव्ह पॉईंट्स
१. पुस्तक सुरूवातीपासूनच उथळ वाटत. ते फिरोजने नाकावर मारू नये, म्हणून एका गुंडाने नाकावर मारून घेणं कायच्या काही वाटतं. (साऊथच्या मुविसारख)
२. फिरोज स्वतः क्वचितच सुटतो, बाकी सगळी मुकेश आणि विमलची मेहरबानी. आणि हा इतक्या गोष्टीत अटकून शेवटी त्याचा सोमनाथशी सामना रंगतच नाही.
३. उत्कंठावर्धक असलं, तरी श्वास रोखून धारण्याइतका थरार नाही. शेवटी थरारही पुचाट निघतो.
४. अतिशयोक्ती... कोणतीही बाई तुमच्यासारखाच हॅन्डसम वगैरे म्हणून कौतुक करत वर्णन सांगणार नाही. फिरोजच्या कर्तृत्वाचे दाखले देणं, कमिशनरला गेट आउट म्हणणं, हेसुद्धा!
मी एन्जॉय केलं पुस्तक? - काही प्रमाणात. पण हे सुरेंद्र मोहन पाठक यांच्या पॉकेटबुकच्याक लेवलला. किंबहुना कमी.
फायनल वर्दीक्ट - ★★1/2
वाचक मंडळी गायबलीत का?
वाचक मंडळी गायबलीत का?
@ मानव
@ मानव
@मधुरा धन्स
अज्ञा, छान परिक्षण
सकाळपासून या धाग्याची वाट बघत होतो. >>>>>> जस्ट चिल. धागा जागेवरच आहे. कुठे पळून गेलेला नाहीये.
बालसुलभ उत्सुकता! कवा नवीन
बालसुलभ उत्सुकता! कवा नवीन पुस्तक वाचलं असं सांगतो ते.
(No subject)
सुशींची पुस्तके किंडल वर नाही
सुशींची पुस्तके किंडल वर नाही मिळत का??मला पुस्तक पेपर प्रिंट मध्ये नकोय,कुठे मिळू शकेल का?
Pages