Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
टॉमॅटो TOmETo
टॉमॅटो TOmETo असं
टोमॅटो -
टोमॅटो - TomETo
अर्धचंद्र देण्यासाठी E आणि O चा वापर करतात.
डॉक्टर- DOkTara
टोमॅटो = TomETo
टोमॅटो = TomETo
LOL! एका
LOL! एका हाकेला तीन जणं तत्परतेने हजर!
अरे वा
अरे वा किती कर्तव्यतत्पर, मदतोत्सुक मायबोलीकर
अग सीमा मी
अग सीमा मी एका कुंडी मधे २ २ अशी लावली आहेत. मग एक केज पुरेल का दोन्ही रोपांना मिळऊन?
LOL . thanks रुनि,
LOL . thanks रुनि, साशल , उपास.

रचना अग टोमॅटोला जागा भरपुर लागते. मिडियम ते लार्ज साईज चा पॉट असेल तर एकच झाड बास त्यात. त्यामुळे एका झाडाला एक केज बास. फोटो मिळाला तर टाकते. मागच्या वर्षी खुप टोमॅटो लागलेले. त्यातले काही
wow सहीच ग.
wow सहीच ग. मस्तच दिसतायत टोमॅटो.
कर्तव्यतत्पर, मदतोत्सुक मायबोलीकर -> आणि समज पोस्ट delete करायच असेल तर कस करायच?
सगळं पोस्ट
सगळं पोस्ट खोडून रिकामं करायचं हा एकच उपाय माहित आहे मला ..
हे असे झाड
हे असे झाड कोणाकडे आहे का? असल्या अनुभव अॅकायला आवडतील..
http://www.thingsyouneverknew.com/product/asseenontv/topsy+turvy&trade-+...
माझ्याकडे
माझ्याकडे पोकळा उगवतच नाहिये
मेथी दमट
मेथी दमट हवेच्या ठिकाणी येणारच नाही का? ईथे पाऊस चान्गला पडतो पण खूप गरम आणी दमट हवा आहे......मी खूप वेळा मेथी लावून बघीतली पण ऊगवतच नाही. सावलीत ठेवून पण बघीतली. काही ऊपाय कूणी सूचवेल का?
मेथीला कडक
मेथीला कडक उन नको. कोरडी थंड हवा हवी. घरातच भरपूर उजेड येइल अशा ठिकाणी ठेवुन बघ.
मिनोती,
मिनोती, आपल्याकडचा पोकळा, आलम दुनियेत कुठ्ठे कुठ्ठे होत नाही.
टोमॅटो = TomETo
टोमॅटो = TomETo
-------------------------------------------------------------------------------
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
आमच्याकडे कढिलिंब चांगला
आमच्याकडे कढिलिंब चांगला वाढला आहे पण तो फक्त ऊंच वाढत आहे. नव्या डहाळ्या खुडल्याने बुंध्यापाशी फांद्या फुटतात असे ऐकले आहे ते बरोबर आहे का? धन्यवाद.
ग्रूप वर पण आणि बागकामात पण
ग्रूप वर पण आणि बागकामात पण नवीन आहे मी.
१)मेथी दाण्यांपासून मेथी लावताना त्याना आधी भिजवून मोड आणावे लागतात असे ऐकले होते.खरे आहे का?का कुंडी मधे थेट लावले तरी येतात्?पाणी किती वेळा घालायचे?
२)माझ्या कडे बेसिल अजिबात टिकत नाही.काय कारण असावे.घरा मधे, बाहेर सगळी कडे ठेवून पाहिले पण साधारण १०-१२ दिवसांमधे मरून जाते झाड..का बरे?
मेथी लावायला मोड काढावे लागत
मेथी लावायला मोड काढावे लागत नाहीत. दाणे नुसतेच पेरले तरी मस्त उगवते मेथी. वाळू मिश्रित, पाण्याचा निचरा होणारी माती जास्त चांगली मेथीला .
बेसिल खरंतर कुंडीत चांगला वाढत नाही. मी उन्हाळ्यात अंगणातच लावते. चांगलं उन येईल अशा जागी लावल्यास मस्त जोमाने वाढतो.
शक्य तितक्या मोठ्या कुंडीत, मातीमधे कॉम्पोस्ट मिसळून बेसिल लावून भरपूर उन्हाच्या जागी लावून पहा. घरातल्या झाडांना हीटर अन एसीच्या व्हेंट पासून शक्य तितके दूर ठेवावे.
कढीलींबाच्या वरच्या डहाळ्या
कढीलींबाच्या वरच्या डहाळ्या खुडत राहिल्या कि ते झाड जोमदार वाढते. त्या झाडाच्या मूळापासून आपोआप छोटी रोपे उगवतात, ती उपटून दूसरीकडे लावता येतात. झाड नीट वाढले कि त्याला फुलोरा येतो आणि करवंदासारखी फळे पण लागतात. त्यातल्या बिया मात्र रुजवायला त्रास होतो.
धन्यवाद दिनेशजी. हा प्रयोग
धन्यवाद दिनेशजी. हा प्रयोग करून पाहते.
मी मिरच्यांच्या बिया टाकल्या.
मी मिरच्यांच्या बिया टाकल्या. आता त्या रुजल्यात (जवळपास महिना लागला रुजायला)
ती छोटी रोपं खायला पक्षी (बुलबुल) येतोय. पक्ष्यांना रोखायला काही उपाय आहे का? घरात उचलून आणली तर ऊन कसं मिळणार म्हणून आणत नाही.
सायुरी हे बघ कदाचित तुझ्या
सायुरी
हे बघ कदाचित तुझ्या उपयोगी पडेल.
इथे तुळशीचं बी पेरून तुळस
इथे तुळशीचं बी पेरून तुळस चांगली येते का? कोणी वापरली असल्यास सांगणार का?
मी दरवर्षी लावते. फार खोल
मी दरवर्षी लावते. फार खोल नाही टाकायचं बी आणि अगदी मातीत गाडुन नाही टाकायचं. १५-२० रोपं एकदम उतरतात. हिवाळ्यातही घरात रहातात चांगली.
आर्च तुळशीचे बी जुने झाले कि
आर्च तुळशीचे बी जुने झाले कि रुजत नाही. त्यापेक्षा कुणाकडे तुळस असली तर तिच्या मंजिर्या खुडून आणल्या वा रोपच आणले तर ते रुजते. एकदा रुजले कि परत परत रोपे तयार होत राहतात. जर जास्त वाढायला हवी असेल तर मंजिर्या खुडत रहायच्या. माझ्या घरी संपुर्ण कुंपण मी तुळशीचे केले आहे.
किती जुने ? मी २ वर्षांपुर्वी
किती जुने ? मी २ वर्षांपुर्वी आणलेल्या मंजिर्या ह्यावर्षी उधळल्या एका कुंडीत तर ७-८ रोपं उतरली होती.
बाजारात मिळते ते बी फार जूने
बाजारात मिळते ते बी फार जूने असते , फालुद्यासाठी उत्तम. रुजवायला ताजेच हवे.
तुळशीच्या पांढरी, काळी, जांभळी, कापूर अश्या अनेक जाती आहेत.
थँक्स. नवरा गेलाय भारतात.
थँक्स. नवरा गेलाय भारतात. त्याला आणायला सांगते. आणेलच असा भरवसा नाही. पण सांगायची चिकाटी सोडणार नाही.
आर्च, मी दरवर्षी तुळशीचं बी
आर्च, मी दरवर्षी तुळशीचं बी च पेरते. थंडीमधे आत बाहेर करताना काहीतरी दरवेळी चुकतं आणि मग ती तुळस जाते. पण समर मधे मात्र मस्त तुळस येते.
व्वा छानच आहे माहिती. आरवी
व्वा छानच आहे माहिती.
आरवी म्हणजे अळकुडीच ना? लावून पहातो.
मेथी छान अली आहे माझ्याकडे.
Pages