सु. शि. : एक अनुभव

Submitted by सूलू_८२ on 15 October, 2019 - 08:53

सु. शि अर्थात सुहास शिरवळकर ह्यान्च्या साहित्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी दुनियादारी वाचली. नाही पटली/आवडली..... फिरोज कथा ही आवडल्या नाहीत. मंदारही नाही.
मग अमर कथा वाचल्या. छान आहेत. आवडल्या.

मास्टर माईंड मस्त आहे.
आवर्जून वाचा.

समथिंग -ही पण मस्त आहे,जुळ्या भावापैकीं एक जण मरतो पण त्या भावाची मेलेली बायको त्या जिवंत दुसऱ्या ला आपला नवरा समजते,त्याची कथा आहे,खूप भयानक होती इतकेच आठवते,
मुक्ती पण छान होती, एक उशिरा पूर्ण झालेली प्रेमकथा
निमित्तमात्र -हे तीन कथांची एक पुस्तक होतं,१)शुभमंगल सावधान -ही लई भारी कथा,२)जन पळभर म्हणतील-यात मेलेल्या बाबाचे प्रेत सांभाळणे हे मस्त कथाबीज होतं, तिसरी बहुतेक 2 मित्रांची स्टोरी पण छान होती पण समजली नव्हती

अखेर
झूम
येता जाता
बरसात चांदण्यांची
ही पुस्तकं नक्की वाचाच.एकदम निर्भेळ करमणूक पुस्तकं आहेत.

मला मन्दार आणि अमर कथा आवडतातच! पण त्यान्च्या प्रेमकथाही तितक्याच आवडल्या. बरसात चांदण्यांची खूप आवडते.

जन पळभर कथा काहीही होती पण मनोरंजक.
निमित्तमात्र ही युगंधर आणि श्रीरुप साधले या 2 मित्रांची गोष्ट फार आवडली नाही.
निमित्तमात्र मधली पहिली सैराट स्टाईल गोष्ट अंतर्मुख करणारी आहे.शेवटचं वाक्य वाचून घाबरायला होतं.
समथींग खूप क्रिपी गोष्ट आहे.आणि सनसनाटी पण.त्यांचीच एक खंडाळा चा बंगला वाली कथा आहे ती थोडी दुःखी आहे.लहान मुलगी मरते.
त्यांचीच एक अंधाधून सारख्या थीम ची गोष्ट आहे.ती पण जबरदस्त. त्यात हिरो आणि भावाचं आडनाव देवलोक असतं.

छान धागा!
सुशिंच एकही पुस्तक मी वाचलेलं नाहीये, पण या धाग्यावर जी चांगली पुस्तके येतील,ती वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन!

मी सु शि हे नाव दुनियादारी चित्रपटाच्या संदर्भात मायबोलीवर ऐकलं, ते पहिल्यांदा. त्यांचं एकही पुस्तक वाचलेलं नाही, वाचणारी नाही. Happy

सु.शिंं.चं एकच पुस्तक वाचलंय.
खंडाळ्यात घडणारी गोष्ट आहे. एकाला संजीवनी औषध मिळालेलं असतं. प्रयोग म्हणून तो ते एका माकडाला देतो आणि माकड जिवंत होऊन त्याच्यात भयानक राक्षसी ताकद येते अशी काही तरी गोष्ट आहे. या पुस्तकाचं नाव कुणाला माहिती असेल तर सांगा. मला आठवत नाही. तेव्हा आवडलं होतं. अजून त्यात कुठला तरी खटला आणि ज्यूरी अशीही भानगड होती.

बरसात चांदण्यांची खूप आवडते.
नवीन Submitted by अथेना on 15 October, 2019 - 19:4
अथेना, सेम पिंच. मलाही खूप आवडलेली कादंबरी. तसेच जाता येता ही आवडते.

सुशिंचे एकही पुस्तक वाचलेलं नाही,किंबहुना वाचावं असं वाटले नाही. दुनियादारी सिनेमामुळे जास्त झोतात आले असावेत.

अज्ञातवासी, नाही वाचलं तरी काहीही नुकसान झालेलं नाही. एका ठराविक वयात करमणूक होते इतपतच लेखन आहे.
देवकी आणि भरत, शाब्बास Proud

मी एका वयात लायब्ररीतुन तीन पुस्तकांपैकी एक सु.शी. आणायचेच. पण काही वर्षे गेल्यावर कथानकातील तोच तो पणा, ठराविक संवाद, तेच तेच विनोद वाचून कंटाळा आला. आता तर मी सुशी वाचायचे हे एखाद्या चोखंदळ वाचकाला सांगणारही नाही. इथे दुसऱ्या कोणत्या धाग्यावर सुशींचे एवढे फॅन्स पाहिल्यावर थोडं आश्चर्य वाटलं होतं, कारण माबोकरांचं सरासरी वय (अंदाजच आहे ) पहाता सुशी आवडण्याचं वय आता टळून गेलं आहे असं वाटलं होतं.

सु.शीं.ची पुस्तके मैलाचा दगड नाहीत किंवा त्यांचे साहित्य जी.ए. कुलकर्णींसारखे अजरामर या श्रेणीत येत नाही. त्यांची बहुतेक पुस्तके सर्वसाधारण जनतेला पटकन वाचुन हातावेगळी करता येतील, त्यातली मजा घेता सहज वाचता येतील अशी आहेत. त्यांची लेखन शैली फार सहज होती. अगदी समोर बसुन कोणीतरी आपल्याला सांगतंय अशी, त्यामुळे मेंदुत फटाफट शिरायचे व मजा यायची. काहीकाही गंभीर पण आहेत ती पण सहज शैलीतच लिहिलेली आहेत. तरुणपणी १६-१७ नंतर वयात वाचली तर एकदम आवडु शकतील व नंतरही आवडतील. पण कोवळ्या वयात न वाचता प्रौढपणी वाचली तर आवडतीलच असे नाही कारण तुमचे स्वप्नाळु वय निघुन गेलेल असे. तरीही दिलखुलास, रसिक माणसांना आवडुही शकतील, सांगता येत नाही.
अज्ञातवासी, वाचुन पहा.

शाळेत असताना दारा आवडायचा, सलोनी नाव एकदम वेगळं आणि छान वाटायचं. कॉलेजात व्हाम्पायरवर लिहिलेल्या जास्त आवडायच्या. दुनियादारी मी वाचली नव्हती आणि पिक्चर अजिबात आवडला नाही. वाचलंय बरेच पण लक्षात फार राहिलं नाहीये. एक तुकडा तुकडा चंद्र वाचलेली, ती कधी ते आठवत नाही पण त्यावेळी खूप आवडलेली, अतिशय ओघवती वाटलेली. झुल्यावरची दुनिया कॉलेजात असताना वाचलेली बहुतेक फार आठवत नाहीये. दुसऱ्या कोणाचीतरी नुसती झुला त्याआधी वाचलेली, तीच जास्त आठवतेय.

बाकी तेव्हा सु शि fan अनेक मैत्रिणी होत्या, त्या खूप चर्चा करायच्या, जीव ओवाळून टाकायच्या तितकी सु शि प्रेमी मी नव्हते. वाचत होते त्यांचे त्या मैत्रिणी भेटण्याआधीपासूनच. जे आवडलं ते वर लिहिलंय.

शाळेत असताना मी आणि माझी बालमैत्रीण मात्र दारा पुस्तकावर करायचो चर्चा, हे वाचलं का वगैरे. साधारण सातवी आठवीपासून दारा वाचायला लागले.

सुशींचे बेस्ट पुस्तक माझ्यासाठी तरी लटकंती आहे. भूते माणसांसाठी प्लँचेट करतात नि त्यातून होणारे घोटाळे असा भन्नाट प्रकार आहे.

मंदार, दारा बुलंद, फिरोज वाचायला तेंव्हा तरी मजा आली होती. आता त्यातली अतिशोयक्ती खटकते पण शैली तेव्हढीच प्रभावी वाटते. त्यांच्या गूढ कथांमधे फारसा दम नाही असे मला तेंव्हाही वाटलेले नि अजूनही तसेच वाटते. दुनियादारीसारख्या कथा मजा घेत वाचण्याजोग्या नक्कीच आहेत. त्यातही काही कथांमधले concept इतर कौटूंबिक कथा-कादंबर्‍यांपेक्षा वेगळेच आहेत. उदाहरणार्थ मला नाव आठवत नाही पण एका तरुण कॉलेजमधे जाणार्‍या मुलाचे वडिल जातात नि त्यांचा सगळा धंदा त्याच्या डोक्यावर पडतो, जो असतो पिवळी पुस्तके छापणे. त्यातून होणार्‍या भानगदी तो कशा निस्तरतो वगैरे.

ते पिवळं पुस्तक वालं कळप.,त्यात वेगळे विचार आहेत.
लटकंती आवडलं पण त्यात काही उल्लेख (पी,पू,म्यूकस) जरा अति वाटले
मला सुशि आजही आवडतं. पण हॉरर आणि जनरीक कथा.

मंदार, अमर वाचल्यात पण जास्त नाही.

व्हँपायरवरच्या स्टोरीज असतीलना कॉपी केलेल्या, पण तेव्हा मी त्यांची कल्पनाशक्ती समजून वाचायचे. मला आवडायच्या.

ओह पेरी मॅसन!
हो व्हॅम्पायरदेखील कॉपी केलेला असणार...

इथले सगळे प्रतिसाद वाचून सुहास शिरवळकर वाचावेत की नाही, या संभ्रमात पडलोय. Lol
प्रेमकथा वगैरे मला आवडत नाहीत. जास्तीत जास्त कल गूढ वाचनाकडेच असतो.
नारायण धारपांची पुस्तके वाचून झाल्यावर या धाग्यावरचे प्रतिसाद मात्र नक्कीच कामात येतील.
लटकंती, जुळ्या भावाची आणि माकडाची कथा इंटरेस्टिंग कन्सेप्ट वाटतायेत.
कुणी लुचाई आणि लटकंती यांचा comparative review देऊ शकेल???

इथले सगळे प्रतिसाद वाचून सुहास शिरवळकर वाचावेत की नाही, या संभ्रमात पडलोय. Lol>>तसंही वाचनाचा चॉईस प्रत्येकाचा वेगळाच असतो की,स्वतः वाचून ठरवा

व्हँपायरवरच्या स्टोरीज>>>>>>>> कुठल्या पुस्तकात आहेत? नाव सांगालं का? सुशींचा व्हॅंम्पायर वाचायचा आहे अजून! Happy

अज्ञातवासी, वाच काही पुस्तकं त्यांची.

कथा नाही पण लिखाणशैली करता नक्की वाच.
सायलेन्स प्लिज, डेडशॉट..... वगैरे!

तसंही वाचनाचा चॉईस प्रत्येकाचा वेगळाच असतो की,स्वतः वाचून ठरवा.
>>>>
हे तर आहेच, पण एखादी कादंबरी वाचणं म्हणजे पैसा आणि मुख्य म्हणजे वेळ यांची प्रचंड इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे जाणकारांचं मत घेतलं तर दोन्ही वाचतात, न वाचल्यामुळे Happy
सोदाहरण स्पष्ट करायचं झालंच, तर सगळे 'नाही, नाही, नाही, जाऊ नकोस' असे आर्त स्वरात ओरडत असतांना मी फक्त कन्सेप्ट इंटरेस्टिंग वाटतेय म्हणून 'हमशकल्स' नावाचा चित्रपट थेटरात बघितला होता.
रेस्ट इज हिस्ट्री!

प्लिज वाचा रे
रिव्ह्यू वाचून, कॉपी आहे वाचून निर्णय घेऊ नकात.
सेव्हन सामुराई न बघता शोले आवडीने पाहिलातच ना?तसंच हे पण.
पुस्तकं वाचणं, चांगली पुस्तकं वाचणं हा मोठा आनंद आहे.त्यासाठी कोणालाही गळ घालून, विनंत्या करून मोटिव्हेट करण्यात अर्थ नाही.ज्यांना नाही वाचायचं त्यांची मुळात इच्छा नाही म्हणून वाचत नाही म्हणावं, कॉपी आहे का, किंमत इतकी पानं इतकी वगैरे कारणं देऊ नयेत असं वाटतं.

अनुशी हजार टक्के सहमत.

काहीही असो, मी सुशी पंखा आहे. सुशीने कोणाचे ढापो, ट्रान्सलेट करो, काय बी असो. आजही मी त्याच त्याच फिरोझ, अमर कथा सारख्या वाचते. सुशीची लिखाण शैली छान आहे. जसे अमिताभचे काही जुने सिनेमे परत परत बघावेसे वाटतात, अज्याबात कंटाळा येत नाही तसेच सुशीचे आहे.

नाही वाचलं तरी काहीही नुकसान झालेलं नाही. एका ठराविक वयात करमणूक होते >>> +१
पण ती शैली इतकी भन्नाट होती की पंखा होण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

Pages

Back to top