सॅटीन ज्वेलरी DIY

Submitted by मनिम्याऊ on 14 October, 2019 - 13:27

यंदा लेकीच्या तिसर्‍या वाढदिवसासाठी नव्या फ्रॉकची खरेदी झाली. आवडता रंग ब्ल्यूऊऊऊ. पण matching jewellary च काय? बाईसाहेबांना आतापासूनच सगळं कसं परफेक्ट लागतं. अनेक दुकाने पालथी घालूनपण हवं तसं काही मिळत नसल्याने मग आपणच काही करावं असं ठरवलं.
गूगल बाबाला शरण जाऊन 'सॅटीन रिबन ज्वेलरी' असा सर्च दिला आणि समोर आल्या आपल्या मायबोलीकर टीना आणि मनीमोहोर यांच्या अप्रतिम कलाकृती.
त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेले हे काही DIY
टिआरा
IMG_20191013_133528.JPG

कानातले
IMG_20191013_133551.JPG

चोकर नेकलेस
IMG_20191013_133737.JPG
ब्रेसलेट
IMG_20191013_134619.JPG

अंगठी
IMG_20191014_221628.JPG

नाकातली चमकी (तिला नथीचं फार म्हणजे फारच आकर्षण आहे)
IMG_20191013_134347.JPG
.
IMG_20191013_134513.JPG

सँडल्स
IMG_20191014_195251.JPG

Combo
IMG_20191013_134011.JPG

मायबोलीकर टीना व मनीमोहोर यांचे खूप खूप आभार. You made my baby happy.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

रच्याकने, मला adopt कराल का तुमची मुलगी म्हणून, Proud छान छान jewellary मिळेल. Happy
Submitted by किल्ली on 15 October,>>
Most welcome.. Happy

लेकीचा सगळ्या अस्सेसरीज घालून फोटो टाकाल का?
नवीन Submitted by रेणु on 15 October, 2019>>

लेकीचा फोटो टाकणे माबोच्या नियमात बसेल का?? खरच विचारते आहे

खूप च मस्त केलं आहे.

मायबोलीकर टीना व मनीमोहोर यांचे खूप खूप आभार. You made my baby happy. >> आमच्या धाग्याचा एवढा छान उपयोग केलात म्हणून खरं तर मीच आभारी आहे.

आमच्या धाग्याचा एवढा छान उपयोग केलात म्हणून खरं तर मीच आभारी आहे.
Submitted by मनीमोहोर on 15 October, 2019 - >>>

_/\_ _/\_ _/\_

खूपच सुंदर,!! लेकीचा सगळ्या अस्सेसरीज घालून फोटो टाकाल का?
Submitted by रेणु on 15 October, 2019 - 21:48>>

बालक दिनानिमित्त फँसी ड्रेस काँपिटिशनला आम्ही या accessories घालून मिस वर्ल्ड बनलो होतो.

IMG_20191114_101353.JPG

किती किती आभार मानू तुम्हा सर्वान्चे..!

माझ्या छोट्याश्या विश्वाची छोटीशी विश्वसुंदरी आहे ती.
Feeling Proud

Pages

Back to top