Submitted by बोकलत on 11 September, 2019 - 05:47
तो हुशार होता. शाळेत पहिला यायचा. मास्तर त्याच्या बुद्धिमतेवर एव्हडे खुश असायचे कि रोज एक पारले चॉकलेट न विसरता द्यायचे. मोठा झाल्यावर तो एव्हडा हुशार झाला कि देशोदेशीचे शास्त्रज्ञ त्याचाशी चर्चा करायला उंबरठा झिजवायचे, पण आज विचार करून त्याचं डोकं तापलं होतं. कुकर डोक्यावर ठेवला असतात तर त्याचपण तीन शिट्या झाल्या असत्या. कितीतरी वेळ तो तसाच बसून अर्थ लावण्याचा असफल प्रयत्न करत होता. पोळ्या लाटायला येत नाही म्हणून बायको तुडवणार होती, पण घरी विराजमान झालेला बाप्पा आणि पाहुण्यांच्या वर्दळीमुळे वाचला.
विचार करून तो शेवटी थकला. मोबाईल बाजूला सारून स्वतःशीच पुटपुटला
' नाय समजली, जाऊ दे हाबचा प्रतिसाद आल्यावरच काय ते कळेल.'
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
very true
very true
सही
सही
Pages