जिभेचे चोचले

Submitted by Yogita Maayboli on 3 October, 2019 - 08:48

जिभेचे चोचले तर सर्वच पुरवतात. पण काही लोकांना विचित्र गोष्टी खाण्याची सवय असते . हा धागा त्यांच्यासाठी

विचित्र गोष्टी यासाठी कि त्यातील सर्वच गोष्टी खाण्याजोगी नसतात. पण त्यांना खाण्याचे जणूकाही डोहाळे लागले असतात.

अशा काही गोष्टी खालीलप्रमाणे
१) पाटीवरची पेन्सिल
२) खडू
३) तांदूळ
४) धान्यातले मातीचे खडे
५) गुलाबी मिसरी
६) धना डाळ
७) काळी माती
८) मुलतानी माती

हे लिहीत असताना नकळतच तोंडाला पाणी आले

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

List continued....
९) पैसा ( विविध घोटाळे आणि ई डी )
१०)

मी लहानपणी माती खायचो म्हणून घरच्यांनी चहा पावडर खायची सवय लावली. मग चहा होताच पावडर माझ्या हवाली केली जात असे.

मला पाटीवरच्या पेन्सिली खायची सवय होती. एकदा माझ्या मित्राकडून राजाकडून पेन्सिल मागितली, ती तोंडात घालताच खारट लागली. शिंच्यानं ती पेन्सिल नाकात घातली होती. Sad पेन्सिली खायची सवय सुटलीच तेव्हा पासून.

अगदी लहानपणी म्हणजे पहिली ते तिसरीत असताना मला पाटीवर लिहायच्या मातीच्या पेन्सिली खायची सवय लागली होती. तेव्हा माझ्या शाळेत फक्त पाटीच वापरात असल्याने पेन्सिलिंचा अजिबात तुटवडा नसायचा. पाटीवर रेघा आखायला काळ्या रंगाच्या दगडी पेन्सिली मिळत, त्या खाणे कठीण होते. नंतर मुंबईला आल्यावर कच्चा तांदूळ खायची सवय जडली. आता आठवून अंगावर काटा येतो पण तेव्हा तो रेशनिंगचा जाडजूड, वास येणारा तांदूळ मी मुठी भरभरून खायचे. पोटात दगड होणार वगैरे सांगून आई घाबरवायची पण मी नाद सोडला नाही. नंतर कधी नाद सुटला ते आठवतही नाही. रेशनचा तांदूळ आणणे बंद झाल्यावर सुटला असावा. कारण माझ्या आठवणीत तो रेशनचाच तांदूळ आहे, इंद्रायणी, आंबेमोहोर किंवा बासमती कच्चा खाल्ल्याचे आठवणीत नाही Happy Happy

ह्या असल्या इच्छा होणे ही अंगात व्हिटॅमिन्सची कमी असल्याचे दर्शवतात असे कुठेसे वाचलेय.

हा हा. एकदम नॉस्टॅल्जिक धागा आहे‌. मी पाटीवरची पेन्सिल अन् मुलतानी माती खायचे. आता वाटतं बरं झालं सवय सुटली. दळून आणलेले गरम कणीक पीठ पण आवडायचे. और तो और पॅराशूट तेल पण एक दोन बोटे चोखायला. Lol

रेशनचा तांदूळ माझा आवडीचा..... मी लहानपणी हे खूप खायची.... पण आई कडक असल्याने सवय सुटली.... आता लग्नानंतर पुन्हा सवय लागली.... म्हणून हा लेख लिहावासा वाटला

पाटीवरच्या दगडी पेन्सिली, विटेचा तुकडा, प्युमिस स्टोन, साबण, भिंतीचे पोपडे, खडू, कच्चे तांदूळ, कधीमधी गहूसुद्धा खाल्लेला आठवतोय

योकु तुम्ही साबण खायचा Uhoh पाटीची पेन्सिल शाळेत असताना आवडायची. आता अधून मधून मिल्क पावडर खाते नुसती, विशेषतः हॉटेल रूम मध्ये असतात ते सॅचे.

लिंबाच्या पिकलेल्या लिंबोळ्या.
झेंडूच्या फुलातील पांढरा भाग, ज्याला आम्ही खोबरं म्हणत असू.
कर्दळीच्या फुलातील तळाला असलेला मकरंद.

मी भरपूर पाटी पेन्सिली खायचे.आणि लाल डोंगरी तांदूळ धुवून भिजवून तो खायचे.याचे परिणाम पोटात दगड वगैरे ने झाले नसले तरी माझ्या आयर्न लेव्हल आणि दातांवर नक्की झाले.
डिलिव्हरी नंतर चालू केलेल्या अनेक व्हिटामिन पैकी कुठल्या तरी ने ही सवय सुटली.मध्ये एकदा परत पेन्सिली खात होते.एखाद्या सरावलेल्या गुंडाप्रमाणे मी त्या वेगवेगळ्या दुकानांमधून घेत असे(बाई पेन्सिली खाते दुकानदाराला कळू नये म्हणून).
बी12 आणि आयर्न नीट केल्याने सध्या नो तांदूळ नो पेन्सिल.एकंदर हा डेफिशियनसी चा परिणाम आहे हे पक्के सिद्ध झाले.

एकदा भाताबरोबर एक गव्हाचा दाणा शिजवला गेला होता, तो खाल्ल्यापासून मला मूठभर गहू शिजवून खाण्याची इच्छा होते आहे.
बाकी कोणतही अतरंगी खाणं खाल्लं नाही आणि इच्छाही झाली नाही, पण कोवळं गवत उपटल की त्यातली आतली कोवळी काडी (स्टेम) बाहेर येत ते दाताने चावलं की त्यातलं ज्यूस मात्र मस्त असतं, हे अनुभवलं आहे. पण OCD असणाऱ्या माणसांना असे जिभेचे चोचले कमीच असतात (असावेत)

चणेवाल्याकडे मिळणारी भाजकी माती.
ही खायची सवय एका मैत्रीणीमुळे लागली.
आयर्न लेव्हल नीट करण्यासाठी औषध घ्यावी लागली आणि ती सवय सुटली. क्रेविंग्स पण गेले.
एकंदर हा डेफिशियनसी चा परिणाम आहे हे पक्के सिद्ध झाले.>>>+ १

मूठभर गहू शिजवून खाण्याची इच्छा होते>>

कुकरला शिजवून खाण्यापेक्षा
गहू १ रात्र भिजत घालून नंतर १ दिवस मोड आणून त्याची खीर छान लागते

अज्ञानी, हे मस्त सुचवलत. पौष्टिक आणि चविष्ट ! शिवाय एकदा खाल्लं की शिजलेला गहू खाण्याची खुमखुमी जाईल.
बाय द वे, तुमचा दुसऱ्या कोणत्या तरी धाग्यावरचा प्रतिसाद आवडला होता. तेव्हा 1.30 मिनिटाच्या मोठ्या सिग्नलला पोस्ट वाचली, पण प्रतिसाद देण्याइतका वेळ नव्हता. कोणता धागा आणि काय प्रतिसाद ते आठवत नाही, पण डोक्यात आलं होतं की हा प्रतिसाद टाईप करणाऱ्या माणसाचा आयडी अज्ञानी कसा असू शकतो? एकदा सुचवायला हवं. पण मग ड्राइव्ह करून ऑफिसमध्ये शिरलं की बाकी सगळं विसरायला होतं. आता परत आठवलं म्हणून इथेच या धाग्यावरच लिहिते.

पण कोवळं गवत उपटल की त्यातली आतली कोवळी काडी (स्टेम) बाहेर येत ते दाताने चावलं की त्यातलं ज्यूस मात्र मस्त असतं>>> मी पण अनेकदा असं करतो...
आणि गहू, आईसोबत तांदुळ घ्यायला जायचो तेंव्हा तांदुळ खूप खायचो (मला वाटायचं तांदुळ खाल्ल्याने दात मजबूत होतील...), बाजरी, ज्वारी, मका हे पण खूप खाल्लंय. कच्ची कोबी, फुलकोबी, बटाटे घरात जास्त दिवस टिकतच नाहीत...
लहानपणी पाटिवरची पेन्सिल खायची सवय होती पण लवकरच सुटली... आमच्या दुकानात बियाणं म्हणून ठेवलेले धणे आणि मेथीदाणे खूप खायचो... मला मीठ खारलाही खूप आवडायचं... अजूनही खूप काही काही खायचो. आठवेल तसं लिहितो...

हां पप्पा ज्येष्ठमध आणायचे त्यांची औषधी म्हणून, मीच ते अनेकवेळा संपवल्याचं आठवतंय..

पूर्वी एक हिरव्या रंगाचे खोडरबर मिळायचे . मी शाळेत होते तेव्हा खूप खायची ते...
फार आवडायचं मला ते खायला ....अजूनही आवडेल पण आता तसं खोडरबर मिळत नाही...

उन्हाळ्याच्या दिवसात मला रानात हिंडून बाभळीचा डिंक खायला खूप आवडायचं. वरचे आणि खालचे दात एकमेकांना चिकटले की आ करायला जबडा दुखेपर्यंत ताकद लावावी लागे. पण तरीही डिंक खायला मजा यायची.
साबरीची बोंडं पण खूप टेस्टी लागत.

>>>> बाकी कोणतही अतरंगी खाणं खाल्लं नाही आणि इच्छाही झाली नाही, पण कोवळं गवत उपटल की त्यातली आतली कोवळी काडी (स्टेम) बाहेर येत ते दाताने चावलं की त्यातलं ज्यूस मात्र मस्त असतं, हे अनुभवलं आहे.>>>> +१
________________
>>>>>>>>>>> लिंबाच्या पिकलेल्या लिंबोळ्या.
झेंडूच्या फुलातील पांढरा भाग, ज्याला आम्ही खोबरं म्हणत असू.
कर्दळीच्या फुलातील तळाला असलेला मकरंद.>>>>>>>>>> +१०००१ आम्ही घाणेरीच्या फुलातील मध पीत असू.

Pages