ती, एक कॉर्पोरेट वुमन अन तो व्यवसाय करणारा. ऑफीस, तिथेले कामकाज, तिथली चॅलेंजेस काय असतात, याची कदाचित त्याला काहिच माहिती नसावी, अन माहित करुन घ्यायची ईच्छा सुद्धा. नविन नविन प्रेमात तो तिची खुप तारीफ करायचा, तिच्यावर कविता करायचा. सोशल मिडीयावर ती ईतकीशी अॅक्टीव्ह नव्हती, पण तो त्यात मास्टर होता. गोड गोड लिहुन ईतरांवर भुरळ पाडणे चांगलेच जमायचे त्याला. स्त्रियांवर होणार्या अन्यायाविरुद्ध हि खुप काही लिहायचा. या सगळ्यामुळे तर ती अजुनच प्रेमात होती त्याच्या.
हळुहळु, नवे ताजे प्रेम शिळे होऊ लागले, थोडे थोडे मतभेद, वाद होत होते, पण प्रेम त्याच्यावरचढ होते, सो कधी ती, कधी तो असे दोघेही अॅडजस्ट करत होते, तशी दोघांनाही कल्पना होतीच की रागात एकही कमी नाहीये. दिवस असेच जात होते, रुसणे - मनावने, ब्लॉक- अनब्लॉक चालुच होते, त्यातच एक दिवस परत एकदा दोघांचे कडाक्याचे भांडण झाले, पण हल्ली तीच्या लक्षात येऊ लागले होते की रागात त्याची भाषा खुप विचीत्र अन खालच्या दर्जाची असते, एरवी स्वत:ला सज्जन म्हणुन दाखविणार्या त्याची ती अपमानास्पद भाषा खुप टोकाची असते, मग काय आयुष्यात परत कधीच एकमेकांची थोबाडे न बघण्याचे ठरवुन दोघांनी एकमेकांना ब्लॉक केले.
अजुन काही दिवस गेले, दोघेही सगळे विसरुन आपापले आयुष्य जगत होते, त्याने तीला अनब्लॉक केले होते, पण तीला त्याची शिव्या देण्याची व्रुत्ती खुप खटकत होती, सो तीने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरविले, पण शेवटी तीने त्याच्यावर मनापासुन प्रेम केले होते त्यामुळे ते तीतके सोपेही नव्हते. अशात एक दिवस तीच्या ऑफीसमध्ये प्रमोशनस डिक्लेअर झाली अन तीलाही प्रमोशन मिळाले, ति खुप खुश होती, अखेर तीच्या मेहनतीला फळ मिळाले होते. अन आनंदाच्या भरात तिच्याही नकळत तीने ही बातमी त्याला सांगीतली. खरतरं चुकलेच तीचे पण म्हणतात न दिल पे किसी का जोर नही. असो, तर, तोही तिच्या आनंदात सामील झाला, आपल्या आधीच्या क्रुत्याबद्दल माफी मागीतली, हीनेही नात्याला एक संधी द्यावी म्हणुन त्याला माफदेखिल केले.
असेच अजुन काही दिवस गेले , परत एकदा, येरे माझ्या मागल्या म्हणत, रुसवे फुगवे, भांडणे चालू. पण यावेळी एक फरक होता, त्याला शिवीगाळ करायची सवय होतीच पण यावेळी त्याने तिच्या चारित्र्याविषयी अपशब्द वापरले. त्याच्या मते बायकांना ऑफीसात प्रगती करायची असेल, प्रमोशन हवे असेल तर रंगरलीया कराव्या लागतात अन तेव्हाच त्यांना प्रमोशन मिळते. तिच्यासाठी त्याचे हे असले विचार खुप धक्कादायक होते. ती मानी होतीच, चांगल्या घरची, संस्कारी अन स्वावलंबी देखील होती, त्यामुळे हे सगळे पचवायला कठीण गेले तीला. सोबत त्याच्या विचारधारेची किवही आली. अन काहीही झाले तरी अश्या व्यक्ती बरोबर ती तीचे आयुष्य जगुच शकली नसती. प्रेमासाठी केली असती अॅडजस्टमेंट गरज पडल्यास, पण हे असे चारित्र्यावर शिंतोडे शिंपडणे तीच्या सहनशक्तीबाहेरचे होते, यापेक्षा अख्ख आयुष्य एकटीने काढने चालले असते तीला, तसेही स्त्रियांना, खासकरुन आर्थिक द्रूष्ट्या स्वावलंबी स्त्रियांना, पुरुष नावाच्या कुबड्यांची गरज नसते असे तीचे ठाम मत होते. तीने तीचा निर्णय घेतला त्याला तिच्या आयुष्यातुन हाकलुन लावायचा कायमसाठी . तसेही एका खोट्या, सज्जन बुरख्या मागे असलेल्या खर्या मानसाला, स्त्रियांचा फक्त तोंडदेखिल मान राखणार्या पण प्रत्यक्ष त्यांच्याविषयी ईतके घाणेरडे विचार असणार्या व्यक्तीला तिच्या आयुष्यात स्थान नव्हतेच. त्याने नंतर बर्याचदा तीची माफि मागीतली, अजुन एक संधी देखिल मागीतली पण....
तिचा निर्णय झाला होता, स्वाभिमानाने जगण्याचा
राजेशभाऊ फक्त कुठेही कमेंट
राजेशभाऊ फक्त कुठेही कमेंट करण्यापेक्षा काही लिहीत का नाही? आपल्या अगाध, अनमोल ज्ञानकणांचा वर्षाव धागा काढून माबोकरांवर करावा ही विनंती.
छान लिहलयं...
छान लिहलयं...
ती' चा द्रुष्टीकोण आणि
ती' चा द्रुष्टीकोण आणि निर्णयावर ठामपणा आवडला.
- आधुनीक स्त्रिचे प्रतिनीधीत्व करणारी ती, नक्कीच मनाला भावली.
मस्त
मस्त...छान लिहिलयं...
काही वर्षांपूर्वी मी रोज
काही वर्षांपूर्वी मी रोज पहाटे चालायला सुरुवात केली होती. रोज जाताना आणि येताना गावातील बरेच ओळखीचे, माझ्यासारखेच चालायला आलेले लोक दिसायचे. तेव्हा मी अतिशय घळघळीत टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालायचे. काही दिवसांनी एक त्याच भागातली अनोळखी मुलगी सामोरी आली. मला बोलली, ताई मी रोज तुला बघतीये, तू ओढणी का नाही घेत? मी स्तब्धच. काहीच बोलले नाही. घरी येऊन परत परत आरशात पाहिलं. अजिबात व्हल्गर दिसत नव्हते. पण असं वाटायला लागलं की जर एखादी मुलगी असे बोलतीये तर पुरुष लोक काय विचार करत असतील. तेव्हापासून सकाळी त्या रोडवर फिरायला जायचं धाडसच नाही झाले.
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल तर पहिले एका बाईने दुसरया बाई बद्दल वाईट बोलणे सोडावे ! पण वास्तुस्थिती तर अशी आहे की जर दोन बायका एकत्र जमल्या तर तिसरया बाईबद्दल काॅमेन्ट्स पास करत बसतात !
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल तर पहिले एका बाईने दुसरया बाई बद्दल वाईट बोलणे सोडावे ! पण वास्तुस्थिती तर अशी आहे की जर दोन बायका एकत्र जमल्या तर तिसरया बाईबद्दल काॅमेन्ट्स पास करत बसतात ! >> खरं आहे
योग्य निर्णय. छान लिहिले आहे.
योग्य निर्णय. छान लिहिले आहे.
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल तर पहिले एका बाईने दुसरया बाई बद्दल वाईट बोलणे सोडावे ! पण वास्तुस्थिती तर अशी आहे की जर दोन बायका एकत्र जमल्या तर तिसरया बाईबद्दल काॅमेन्ट्स पास करत बसतात !
Submitted by नेहा विलास यशवंतराव on 1 October, 2019 - 06:38
>>
मग यात चुकीचं काय ? केलं तर केलं गॉसिप, त्याचा आपल्या मनावर, वागण्यावर का परिणाम व्हावा ? हाथी चले बझार, कुत्ते भौक हजार. दोन बायांच्या
घालून पाडून बोलण्यानं तिसऱ्या शिकल्या सावरल्या बाईच्या ठीकठाक वागणुकीतही बदल होत असेल, तर आग लागो अशा महिला सबलीकरणाला. महिला सबलीकरण म्हणजे फक्त शिक्षण आणि पैशाचं स्वातंत्र्य नव्हे, त्यात तुमच्या आचार विचारांचं स्वातंत्र्य पण येतच की. दुसर्यांच्या बोलण्यावरून तुम्ही, इनफॅक्ट कुणीही आपल्या आचारावर बंधनं का आणावी?
जर या गोष्टीवर तोडगा हवा असेल तर पहिले एका बाईने दुसरया बाई बद्दल वाईट बोलणे सोडावे ! पण वास्तुस्थिती तर अशी आहे की जर दोन बायका एकत्र जमल्या तर तिसरया बाईबद्दल काॅमेन्ट्स पास करत बसतात ! >> खरं आहे
Submitted by नौटंकी on 1 October, 2019 - 06:55
>>
आजकाल काही वेळा फेमिनिझम ची व्याख्या 'फक्त आमच्या मर्जीनुसार वागा' अशीच घेतली जाते. मग ऑफिसमध्ये चुकीच्या कामाबद्दल मॅनेजरने झापलं, तरी तो महिलांचा दुस्वास करणारा सैतान भासायला लागतो. विरोधातला एकही सूर जणू आपल्या अस्तित्वावर फिरवलेला वरवंटा आहे, अशा थाटात एकमेकांची उणीदुणी काढली जातात. दुसर्यांनी आम्हाला हवं ते बोलावं, आम्हाला हवं तसं वागावं तरच ते फेमिनिस्ट आणि बाकीचे सगळे जुलमी अशी काहीशी मानसिकता काही वेळेला डोकं वर काढतेय का काय असं वाटायला लागलंय. अशा सगळ्याच जणी नाहीत, पण ज्या आहेत त्याही थोडक्या नाहीत.
आज जर स्त्री पुरुषाच्या बरोबरीनं खांदा लावून उभी असेल, तर तिला पुरुषांसारख्या शिव्या पडणारच. त्यात परत कधी कधी लोकांच्या मनात थोडी जुनाट विचारांची जळमटं असतात, तेव्हा टीका, शिव्या, कुजबुज ही स्त्रियांबाबत आणखी जास्ती चालायचीच. आज तुम्ही दोन तोंडं बंद केलीत, उद्या चार उघडतील, आणि त्यातून कदाचित कौतुकाचा एक शब्दही निघणार नाही हे पक्कं जाणून असा. आता तुम्ही गळपटून दुसऱ्याच्या बोलण्यावर चालणार की निर्भयपणे स्वतःच्या विचारांवर, ते तुम्ही ठरवा. आयुष्यात निर्णय घेताना दुसऱ्यांच्या परवानगीची गरज कमजोरांना लागते, बलवान माणसं आपल्या मर्जीनं चालतात.
नुसत्या दुसऱ्यांच्या शिव्याशापानं बंद पडेल, ते कसलं घंट्याच सबलीकरण? असल्या गॉसिप्सना भीक घातली असती, तर सावित्री आज शिक्षिका नसती, अन आनंदी डॉक्टर नसती.
मी हेच त्या अन्न, स्त्रीवाद
मी हेच त्या अन्न, स्त्रीवाद धाग्यावर सांगू इच्छित होतो की स्त्रीला चूल आणि मूल यात स्रियांनीच अडकवले आहे. स्त्रियांनी ठरवलं तरच यातून सुटका होईल.
विलभ तुमचा प्रतिसाद आवडला.
विलभ तुमचा प्रतिसाद आवडला.
एखादी बाई बोलली.तरी तिचं बोलण किती मनावर घ्यायचं हे पुर्णतः आपल्याच हातात असतं. मग ते बोलण कुठल्याही बाबतीत का असेना.
विलभ, स्वप्नील, मन्या तुमचं
विलभ, स्वप्नील, मन्या तुमचं अगदी बरोबर आहे. पण जेव्हा कोणत्याही स्त्रीला तिच्या चारित्र्यावर बोट ठेवले की प्रचंड त्रास होतोच (मग त्या गॉसिप करणार्या बायका असू दे अथवा पुरुष असू देत). आणि नेमक्या ह्याच वर्मावर घाव घालून तिचं खच्चीकरण केले जाते. अर्थात ती कणखर असेल तर प्रश्नच नाही.
राहिला मुद्दा गॉसिपिंगचा तर बाईचं जर बाई बद्दल खराब बोलत असेल, तर पुरुषांकडून चांगले बोलण्याची अपेक्षा कशी करायची.
सासु हीच सुनेची सर्वात मोठी
सासु हीच सुनेची सर्वात मोठी शत्रू असते असे पूर्वी खूपदा बोललं जाई. आता काळ बदलला आहे. स्त्रीचा स्वभाव पुरुषापेक्षा जास्त संशयी असतो व तिला नैसर्गिक सेन्सर असतात इतरांचे नेचर जज करण्यासाठी. असे माझं एकट्याचे मत आहे.
विलभ या विषयावर आपण डिबेट
विलभ या विषयावर आपण डिबेट
करू शकतो !
चांगले लिहीले आहे पण हे
चांगले लिहीले आहे पण हे रामायण तर अनेक वर्ष जुने आहे. नवीन काय? आता फक्त धरणी दुभंगून पोटात घेत नाही म्हणून बाई उरलेलं आयुष्य जसं जमेल तसं जगते.
>>>>>> पण हे रामायण तर अनेक
>>>>>> पण हे रामायण तर अनेक वर्ष जुने आहे. नवीन काय? आता फक्त धरणी दुभंगून पोटात घेत नाही म्हणून बाई उरलेलं आयुष्य जसं जमेल तसं जगते.>>>>> सुसरबाई तुझी पाठ मऊ
करत करत . प्रत्येकजण आपल्या भवतालाशी तडजोड करत जगतच असतो. प्रत्येकाचे तडजोडीचे प्रमाण कमी जास्त. स्त्रियाच फक्त तडजोड करतात, पुरुष करत नाहीत असे नाही म्हणायचे मला. पण त्या दोन प्रकारांची तुलनाच नाही. 
तडजोड वेगळी. पदोपदी सोशल "टोल
तडजोड वेगळी. पदोपदी सोशल "टोल" भरावा लागणे वेगळे. तुला इथून पुढे जायचे असेल तर आधी हे पूर्ण कर, ते सिध्द कर, अमुक घडलं पाहिजे नि तमुक बिघडलं पाहिजे अशा सोशल टोल्सना (ट्रोल नाही, टोल! कर - औरंगजेबाच्या जिझीया करासारखा बळजबरी वसूल केलेला कर) घाबरून सीता भूमिगत झाली असणार ;). नाहीतर तिने "आई, पोटात घे" म्हणल्यावर आई पोटात घेणारी असती तर अशोकवनातच नसतं म्हणलं काय तिने
(No subject)
जगात विविध प्रकारे विचार
जगात विविध प्रकारे विचार करणारी लोक असतात.
कोणत्याही प्रसंग कडे विविध लोक विविध नजरेने बघतात आणि तसा त्या प्रसंगाचा अर्थ लावतात .
त्या मुळे आपल्या मनासारखे सर्व वागतील हा विचार पहिला मनातून काढून टाकणे गरजेचं आहे .
उलट स्वतःच्या वागण्याताच लवचिक पना हवा प्रसंग नुसार बदलता आले पाहिजे.
जिथे जाल तेथील वातावरणात जुळवून घेणे खूप महत्त्वाचे .
शहरी व्यक्ती जेव्हा खेडेगावात जाते तेव्हा तिथे शहरी वागणूक गरजेची नाही .
नाही वेगळे पडण्या चीच शक्यता जास्त ( हे कॉमन उदाहरणं,)
आई, पोटात घे" म्हणल्यावर आई
आई, पोटात घे" म्हणल्यावर आई पोटात घेणारी असती तर अशोकवनातच नसतं म्हणलं काय तिने>>>>
माझं थोड वेगळं मत आहे इथे,अशोक वनात सीतेला विश्वास होता राम मला घेऊन जाईल इथून पण जेंव्हा रामानेच तिच्यावर विश्वास दाखवला नाही तेव्हा मात्र तिने आत्महत्या(माझ्या मते ती आत्महत्या असावी) केली असावी,
शेवटी आपण कुणाला तरी हवे आहोत ही सुद्धा जाण्यासाठीची एक आशा असतेच न,पण त्याच वेळी आपण नकोय कुणाला,आपल्याबद्दल टोकाचा विचार आपला तोच सखा लोकांचे ऐकून करत आहे जो आपले सर्वस्व आहे अशी प्रबळ भावना जगण्यासाठीचे पाश तोडत असेल,
अर्थात हे माझे मत आहे
रच्याकने सीता हनुमान सोबत का गेली नाही याचे उत्तर काही मला मिळाले नाही आणि अजून एक अवांतर म्हणजे गर्भार पत्नीला सोडणाऱ्या रामापेक्षा दुसऱ्याच्या पत्नीवर जबरदस्ती न करणारा रावण मला जास्त विचारी वाटतो
असो माझी मते आहेत ही आणि तसही प्रतिसाद जरा अवांतर झालाय
सीता हनुमानासोबत गेली नाही,
सीता हनुमानासोबत गेली नाही, कारण तिला रामाने रावणाला हरवूनच मला न्यावे, असे वाटत होते
कारण तिला रामाने रावणाला
कारण तिला रामाने रावणाला हरवूनच मला न्यावे, असे वाटत होते>>>>हा हे ऐकून माहिती आहे पण त्या प्रसंगातून/कैदेतून लवकरात लवकर बाहेर पडावे असे कोणालाही वाटणे स्वाभाविक असणार अशा वेळी पण उगाचच नवरा आल्याशिवाय मी नाहीच येणार हा हट्ट मला अगदीच बाळबोध वाटतो,
रामायण ,महाभारत,
रामायण ,महाभारत,
ह्या मधील प्रसंग इथे गैर लागू आहे .
तेव्हा चा समाज ,आदर्श विचारसरणी,नित्तीमत्ता आता औषधाला तरी आहे का .
मूळ पोस्ट आणि कमेंट ह्यांचा संबंध तुटत चाललं आहे
खरं आहे राजेश.
खरं आहे राजेश.
तसही प्रतिसाद जरा अवांतर
तसही प्रतिसाद जरा अवांतर झालाय>>>हो कबुल केलंय मी तसं, आता नाही होणार परत अवांतर
शेवटी आपण कुणाला तरी हवे आहोत ही सुद्धा जाण्यासाठीची एक आशा असतेच न,पण त्याच वेळी आपण नकोय कुणाला,आपल्याबद्दल टोकाचा विचार आपला तोच सखा लोकांचे ऐकून करत आहे जो आपले सर्वस्व आहे अशी प्रबळ भावना जगण्यासाठीचे पाश तोडत असेल,>>>पण माझ्या मते हे कुठल्याही युगात लागू पडेलच
बरोबर आहे, खरा मुद्दा ,
बरोबर आहे, खरा मुद्दा , स्वतःची प्रगती करू इच्छिणाऱ्या आणि व्यक्ती स्वातंत्र्य अनूभवू इच्छिणाऱ्या स्त्रिया (बेताल वागणार्या नाही) आणि ते सहन न होऊन त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे पुरुष (सगळेच नाही) हा आहे.
शहरी व्यक्ती जेव्हा खेडेगावात
शहरी व्यक्ती जेव्हा खेडेगावात जाते तेव्हा तिथे शहरी वागणूक गरजेची नाही . >> मान्य आहे.
>>>>> गर्भार पत्नीला
>>>>> गर्भार पत्नीला सोडणाऱ्या रामापेक्षा दुसऱ्याच्या पत्नीवर जबरदस्ती न करणारा रावण मला जास्त विचारी वाटतो>>>> रावणकी मजबूरी थी वोह! त्याला कोण्या एका गंधर्व स्त्री कडून शाप होता की परस्त्रीच्या अंगास तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला तर त्याची १०० शकले होतील का तत्सम काहीतरी.
राम मानव होता तेव्हा चूका या होणारच. त्याने देखील आनंदाने तसे केलेले नव्हते. त्यालाही शरयू नदीत आत्महत्याच करावी लागली. पत्नीला सोडण्याचे समर्थन तर नाही होउ शकत पण ..........
>>>>>> गर्भार पत्नीला सोडणाऱ्या राम>>>>>>
त्याला कोण्या एका गंधर्व
त्याला कोण्या एका गंधर्व स्त्री कडून शाप होता की परस्त्रीच्या अंगास तिच्या परवानगीशिवाय स्पर्श केला तर त्याची १०० शकले होतील का तत्सम काहीतरी.
>>> मग kidnap केले तेन्वा स्पर्श न करता उचलली होती का ?
मग kidnap केले तेन्वा स्पर्श
मग kidnap केले तेन्वा स्पर्श न करता उचलली होती का?
काम भावनेने स्पर्श केला तर अस पूर्ण वाक्य आहे ते
Pages