या पसाऱ्याचं काय करावं?

Submitted by स्वप्नील ७७७ on 27 September, 2019 - 05:03

मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली.
दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत. भंगारात द्यायला मन होत नाही. मोबाईल हॅण्डसेट दहा-बारा पडले आहेत, कपडे बेडशीट तर साचतच जात आहेत. जुन्या कापसाच्या गाद्या जागा अडवून बसल्या आहेत. खूर्ची टेबलं अडगळीच्या खोलीत धुळखात पडली आहेत.
गरज नसताना वेगवेगळ्या पकडी, पाने, करवती, स्क्रू ड्रायव्हर, हातोड्या, ड्रील मशीन, ब्लोअर, व्हॅक्यूम क्लीनर, बागकामाची हत्यारं याची हजारो रुपयांची खरेदी करून ठेवली आहे.
दिवसातून एकदा तरी या साईटवर भेट देतोच, मेलबॉक्स सुध्दा याच साईटींच्या मेलनी भरलेला असतो. नवीन गॅजेट्स पाहिली की मन कंट्रोल होत नाही. हेडसेट, हेडफोन्स, ब्लूटुथ स्पिकर, प्रिंटर अशा अनेक गोष्टी आधी विकत घेतल्या आहेत तरी परत परत घ्याव्या वाटतात. शूज अक्षरशः न वापरता फेकून दिले आहेत. तरीही वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शूज खुणावत असतात.
मनावर कितीही ताबा ठेवला तरी ब्रेक सैल केला की खरेदीची गाडी परत सुसाट धावत सुटते.
घरच्यांनी आता समजावणं सोडून दुर्लक्ष करण्याची सवय करून घेतली आहे.
एवढा पसारा करुन ठेवला पण जुन्या वस्तू टाकवत नाहीत व कोणाला सेकंडहॅंड द्यायलाही मन होत नाही. पाश्चात्त्य देशांत गराज सेल तरी असतो. पण आपल्याकडे असं नाही. ओएलेक्स, क्विकर फार डोकेखाऊ प्रकरण आहे. त्याच्या नादाला लागणं मला तरी शक्य नाही.
मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

बँक अकाउंट दुसऱ्याच्या ताब्यात द्या व सगळी क्रेडिट कार्डे फाडून टाका. ह्या रोगाचे कारण खिशात असलेला अतिरिक्त पैसा हे आहे. खिशावर सर्जिकल स्ट्राईक किंवा किमो करून खिशाचा पूर्ण नायनाट हाच एकमेव उपाय आहे. एकदा स्ट्राईक किंवा किमो केला तरी उत्पन्नाचे गब्बर साधन असेल तर खिशाच्या सेल्स परत विस्तारु शकतात. तेव्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा किमो उत्पन्नाच्या साधनावरही करा.

ऑल द बेस्ट.

धन्यवाद साधना जी. एकदा क्रेडीट कार्ड कापून टाकले होते. पण परत एसबीआयचे प्लॅटिनम घेतलं आहे. बऱ्याचदा हाच विचार मनात येतो की पुर्ण पैसा घरच्यांच्या ताब्यात द्यावा.

स्वप्नील, तुम्ही सेन्सेटीव्ही असाल तर एखाद्या अनाथआश्रमात एक दिवस काढून या. त्यांची आबाळ पाहिली ना की आपलं काही घ्यायचं मन होत नाही. किंवा खरेदी कारायचीच असेल तर त्या लोकांसाठेव करा म्हणजे तुम्ही पण खूष आणि ते पण.

बाय द वे एवढे पैसे असे खर्च करायला हातात असणं हे खूप सुखाचं लक्षण आहे ( यावरून घरात आजारपणावर पैसा जात नाहीये, खाण्या पिण्याचे वांदे नाहीयेत, राहायला चांगलं घर आहे, कुटुंब सुखी आहे , बँकेत भविष्यापुरते पैसे सेव आहेत या सगळ्या गोष्टी जाणवतात). टच वूड ही परिस्थिती अशीच राहो

धन्यवाद रीया जी. मी लहाणपणापासूनच डबल चीनचा माणूस आहे. गरिबांना मदत सढळ हाताने करतो.

डबल चीन चं काही कळालं नाही.

गरिबांना वाटून पण पैसे शिल्लक राहत असतील तर नवीन घर घ्या मोठं आणि त्यात भरपूर नोकर चाकर ठेवा.
वस्तू ठेवायला पण जागा मिळेल आणि नंतर त्या नोकरांना पण देता येतील

डबल चीन म्हणजे डबल हनुवटी असणारा. खात्यापित्या घरच्या, सुखवस्तू माणसाला बहुतेक डबल हनुवटी असते असं म्हणतात, मला आहे.

धन्यवाद साधना जी. एकदा क्रेडीट कार्ड कापून टाकले होते. पण परत एसबीआयचे प्लॅटिनम घेतलं आहे. बऱ्याचदा हाच विचार मनात येतो की पुर्ण पैसा घरच्यांच्या ताब्यात द्यावा.>>>>

क्रेडिट कार्ड कापून टाकले तरी नंतर परत घेतलेत, पैसे घरच्यांना द्यायचा नुसता विचार मनात येतोय, प्रत्यक्ष कृती जमत नाहीये म्हणजे हा रोग हाडीमासी खिळलाय, रोगमुक्ती अशक्य आहे.

आता पैसे आहेतच तर भिवंडी वगैरे परिसरात दोन गोडाऊन विकत घ्या. घरातील सगळा माल तिकडे टाकून द्या म्हणजे नवा घेतलेला माल ठेवायला घरात जागा होईल व आनंद मिळेल. माल वापरण्यातला आनंद वगैरे काहीही नसून केवळ विकत घ्यायचा आनंद हवा असेल तर दोन्ही गोडाऊनमध्ये एकेक माणूस कामाला ठेवा, सगळ्या नव्या मालाची डिलिव्हरी गोडाऊन पत्त्यावर मागवा व माणसांना सांगा नीट लावून ठेवायला. ही गोडावन भरली की नवी घेता येतील.

ऑल द बेस्ट. काय केलेत ते कळवा.

पुस्तके लायब्ररी ला द्या किंवा स्वतः सुरू करा. नवीन मोठं घर घ्या emi मध्ये कसा पैसा जाईल कळणार नाही। मोठं घर घेऊन वस्तू तिकडे ठेऊन भाड्याने द्या.

धन्यवाद साधना जी. भिवंडी फार लांब की वो पडेल मला. रोही धन्यवाद. आधीच बापजाद्यांची मोठी इस्टेट आहे. नवीन खरेदी करून भाडेकरू ठेवून डोक्याला ताप होईल बघा.

एक पक्ष स्थापन करा आणि प्रत्येक निवडणूक हरण्यासाठी पैसे वाटप करा
किंवा एक बैंक सुरु करून कस्टमर्सना ०% व्याजदर आणि कर्मचाऱ्यांना दरमहा १०% बोनस + विविध सवलती मोफत असे काहीसे उपक्रम राबवून पहा

म्हणजे आवक जावक समतोल बऱ्यापैकी सांभाळला जाईल .. आणि आपोआप पसाराही Wink

अज्ञानी भाऊ मी अनेक लोकांना मदत केली पण माझे उसने घेतलेले पैसे परत दिलेच नाही. वरुन अॅटिट्यूड दाखवतात. लोक गृहित धरून वागायले म्हणताना मी हात आखडता घेतला आहे. मी शेतीच्या पुस्तकांचं पदरमोड करून वाचनालय चालू केले. लोकांनी पुस्तकं परत केलीच नाहीत. कार सुध्दा डिझेलवारी मागायचे. गरजवंताला खूप मदत कराविशी वाटते पण काही अनुभव वाईट येतात. बिनव्याजी पैसे एकाला दिले . दर हप्त्याला थोडे थोडे परत करतो म्हणाला. दोन महिने झाल्यानंतर टाळाटाळ करायला लागला. अनेकदा उसने पैसे देऊन फसलो आहे. आता दान म्हणून देतो. परतीची अपेक्षा ठेवत नाही.

स्वप्नील उद्यापासून फक्त २ गोष्टी करायच्या -
(१) जर परदेशात असाल तर 'आय आर ए' म्हणजे इन्डिविड्युअल रिटायरमेन्ट अकाउंट उघडायचे. त्यात सर्वच्या सर्व अतिरिक्त पैसे टाकायचे. ती असते एक पिगी बँक. पिगी बँक कशी उघडता येत नाही. फोडुनच पैसे काढावे लागतात. तसे IRA मधून पैसे तेव्हाच काढता येतात जेव्हा १०% फाइन बसतो. ......................... भारतात KVP घ्या . पूर्वी तर असाल तर, KVP आणि एक काहीतरी सर्टिफिकेटस होती. त्यात गुंतवला पैसा की एकदम ६ वर्षांनीच दुप्पट पैसा मिळत असे.

(२) एखादी वस्तू घ्यायचा मोह झाला ना की त्या दिवशी अज्जिबात घ्यायची नाही. दुसर्‍या दिवशी घ्यायची. तोपर्यंत हा उन्माद मावळलेला असतो. बघा करुन.

दुसरा पर्याय बऱ्याचदा करून पाहिला. पण मन इतकं उसळ्या मारतं की डोकं दुखायला लागते. हा काहीतरी स्वभावदोष असणार. पैसे मिळवण्यापेक्षा खर्च करण्याची घाई होते.

मला दत्तक घ्या. माझे हट्ट पुरवा. लहानपणी घरच्या परीस्थितीमुळे बरेच मन मारून जगलोय. आज थोडाफार पैसा खुळखुळतोय हातात. पण स्वत:चा पैसा असा उडवायला भिती वाटते. उडवला आणि पुन्हा तसे दिवस आले तर माझ्या पोरांचेही बालपण तसेच जईल अशी भिती वाटते. पण तेच तुमचे पैसे असतील तर उडवायला आवडतील.म्हणून प्लीज. मला दत्तक घ्या. माझे हट्ट पुरवा. लहानपणी घरच्या परीस्थितीमुळे बरेच मन मारून जगलोय. आज थोडाफार पैसा खुळखुळतोय हातात. पण स्वत:चा पैसा असा उडवायला भिती वाटते. उडवला आणि पुन्हा तसे दिवस आले तर माझ्या पोरांचेही बालपण तसेच जईल अशी भिती वाटते. पण तेच तुमचे पैसे असतील तर उडवायला आवडतील.म्हणून प्लीज. मला दत्तक घ्या. माझे हट्ट पुरवा. लहानपणी घरच्या परीस्थितीमुळे बरेच मन मारून जगलोय. आज थोडाफार पैसा खुळखुळतोय हातात. पण स्वत:चा पैसा असा उडवायला भिती वाटते. उडवला आणि पुन्हा तसे दिवस आले तर माझ्या पोरांचेही बालपण तसेच जईल अशी भिती वाटते. पण तेच तुमचे पैसे असतील तर उडवायला आवडतील.म्हणून प्लीज. .........

Swapnil भाऊ, तुम्ही AliExpress.com पाहिलीय का? नक्की पहा रोज, पण आधी परदेशी वस्तू खरेदी करण्यास परवानगी नसलेले क्रेडिट डेबिट कार्ड बाळगा. ना संपणारा वस्तूंचा खजिना पाहून पण त्यातले काहीही खरेदी करता येत नसल्याने तुमचा मानसिक रोग काही दिवसांत आपोआप नाहीसा होईल.

ऋन्मेष हरकत नाही पण परत एखादा भेटला तर तिकडे दत्तक जाल. आमच्या कडे दत्तक बापाचं नाव, आडनाव लावावे लागते, तुम्हाला चालेल काय?

आमच्या कडे दत्तक बापाचं नाव, आडनाव लावावे लागते, तुम्हाला चालेल काय?
>>>>>
अर्थात न चालायला काय झाले. जो आपल्यावर खर्चा करतो तोच आपला बाप. आणि मी तुम्हाला खात्री देतो माझे भावी बाबा की तुम्हाला माझा ईतका लळा लावेन की तुम्ही स्वत:वर एकही पैसा खर्च न करता माझे लाड करण्यातच आनंद मानाल Happy

अस्सं कस्सं चालेल?
जांदो लेकीन तुम्हारीही औलाद पैसे के लिये बाप बदलेनोको गलत बतायेंगी.‌ तुम्हारा धिक्कार करेगी.

<<मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा. धन्यवाद.>>

-------- स्वकष्टाने कमावलेला पैसा असेल तर असा प्रश्न पडणार नाही. Happy

कुठलेही कष्ट न करता पैसा आला असेल तर पाण्यासारखा खर्च करत रहाणे उत्तम... त्याने अनेकांना रोजगार मिळतो आणि भांडवल बाजारात खेळते रहाते.

असलेला पैसा संपवल्यावर.... कुठलेही प्रयास न करता खरेदी आपोआप थांबेल.

बरोबर आहे उदय. स्वकष्टानं नाही तर भाग्यवान असल्यानं पैसा आला आहे माझ्या कडे. आणि येतच राहतोय. अर्थात दोन नंबर, पाप कमाईचा नाहीय.

लेकीन तुम्हारीही औलाद पैसे के लिये बाप बदलेनोको गलत बतायेंगी.‌ तुम्हारा धिक्कार करेगी.
>>>

तुम्ही माझी चिंता करू नका बाबा. आमच्याकडे घरातल्या प्रत्येकाला त्याचे आयुष्य त्याला हवे तसे जगायची मुभा आहे. आणि बाकी उर्वरीत जगाच्या धिक्काराची ईथे कोणाला पर्वा आहे.
तुमची समस्या पैसे स्वतावर कमी खर्च कसे करावेत ही आहे तर माझी समस्या स्वत:वर खर्चायला पैसे नाहीत ही आहे. आपण दोघे एकमेकांचे सहाय्य करून आपापली समस्या दूर करूया.. तरी आणखी काही अटी असतील तर जरूर कळवा Happy

कंपल्सरी बायिंग डिसऑर्डर ही एक सामाजिक मानसशास्त्रात नोंद असलेली पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. ऒनलाईन शॉपिंग मुळे ती फक्त तुम्हा आम्हाला दिसायला लागली आहे एवढच. विकिपिडियावर याची विस्तृत नोंद आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Compulsive_buying_disorder

Pages