"बाबु जेवली की नाही अजुन?" - दिवसातून हा प्रश्न सलोनीला २ दा विचारुन खात्री केल्याशिवाय, नंदिनी च्या घशाखाली दोन घास जात नसत?
बाबू आणि सलोनी? कोड्यात पडलात ना? मग तुमच निरीक्षण नक्कीच कमी पडतय. अहो मुलाला, मुलींच्या बाळनावानी आणि मुलींना मुलांच्या बाळनावाने हाक मारण्याचे लाड कोणती आई करत नाही? मुलीला, बाबू, बिट्टू, राजा आणि मुलाला माझी छबडी, शोना, पिल्लूडी - म्हणणे हा जणू आई होण्यामधील अलिखित करारच असतो.
आणि नंदिनीसारख्या हेलिकॉप्टर मॉमस कमी का असतील, ज्यांच्याकरता, कॉलेजला गेलेली मुलगीदेखील लहानच असते. अर्थातच आपलं मूल कितीही मोठं झालं तरी आई वडीलांकरता ते मूलच असतं नाही का! पण याच अगदी याच वयात मुलांना मात्र शिंग काय चांगले अँटलर्स फुटलेले असतात. बाहेरच्या जगाचा प्रभाव वाढलेला असतो. पिल्लू भरारी घ्यायला उत्सुक असतं. आई-बाबा अँक्शिअस.
अगदी हाच सीन नंदिनीच्या घरात रंगत होता.
सलोनी दूरच्या राज्यात ,३ मैत्रिणींबरोबर रुम शेअर करत, डॉर्मवर रहात होती. चायनीज मैत्रिणींबरोबर तिचे दिवस अगदी भुर्र्कन छान जात. त्यातून सोशलायझिंग-अभ्यास - स्वयंपाक - लाँड्री या सर्वातून सलोनीला श्वास घ्यायची उसंत नव्हती आणि इकडे नंदिनी मात्र उगाच काळजी करत होती. सलू जेवली असेल का-चौरस आहार घेत असेल कॅल्शिअम च्या गोळ्या घेते का वेळेवर? नॉर्थ अमेरीकेत सूर्यप्रकाशाची कमतरता असते म्हणे, ड जिवनसत्व सप्लिमेंटसमधूनच घ्यावं लागतं. दूध पित असेल का? - दहा चिंतांनी तिचं डोकं भणाणुन जात असे.
त्यात या बेसिक चिंतांव्यतिरिक्त अन्य काळज्यादेखिल होत्याच की. तिला मित्र असेल का? असेल तर तो बरा असेल का? पार्टीमध्ये का?बया ड्रि़ंक घेत असेल का? एक ना दोन काळज्या!
तरी बरं विवेक, नंदिनीला कल्पनांच्या जगातून, चिंतेच्या वावटळीतून जमिनीवर आणत असे. "नंदू, सलोनी लहान आहे का? २० वर्षांची आहे आता. तिलाही कळते तिची जबाबदारी. आपण जितके गुंतू तितका आपल्याला त्रास आणि त्रासापेक्षाही सलू तितकी दूर जाणार. तिला तिचं आयुष्य आहे, सर्कल आहे,"नंदिनीला कळतच नसे , विवेक इतका अलिप्त कसा राहू शकतो? किती शांत आणि संयत वागतो तो. नाहीतर आपण सलूला, जरा सर्दी झाली, ताप आला की आपली तब्येत तोळामासा झालीच म्हणून समजा.
खूपदा नंदिनी , सलूच्या बालपणीच्या आठवणींत रमून जात असे. प्रेग्नंट असताना नंदिनीला शंका होती - आपलं बाळ आपल्याला आवडलच नाही तर? आपल्याला पान्हा फुटलाच नाही तर, .... " एक ना दोन. पण एका शुभ दिवशी, प्रसन्न सकाळी सलू जन्माला आली काय आणि या सगळ्या सगळ्या शंका खरं तर कुशंका पार कुठच्या कुठे पळून गेल्या. सलूच्या बाळमुठीत , नंदिनीचं हृदय पकडले गेले ते कायमचेच. इवल्या तान्ह्या पिल्लाला नंदिनीने छातीशी धरलं काय, she fell in love Forever & a day more. मग बाळाचं ते कुशीवर होणं, उपड पडणं, बसणं, रांगणं सारं एक अप्रूपच की. मात्र प्रत्येक आनंदाची किंमत मोजावी लागती, नंदिनीने जॉब सोडला. पूर्ण वेळ बाळाच्या सरबराईत, पालनपोषणात इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय मुख्यत्वाने तिने घेतला, विवेकने पाठींबा दिला. सलूला शाळेत वेळेवर सोडणे, आणणे, तिला ड्राइव्ह करुन विविध क्लासीसना घालणे, तिच्याबरोबर गप्पा मारणे, पत्ते खेळणे, आई आपल्या मुलाकरता जे जे करते ते ते सलूने केले. दोघींच्या प्रेमाची विण घट्ट होत
गेली. उत्तम संस्कार आणि निर्णयक्षमता, आत्मविश्वास यांनी परिपूर्ण अशी सलू कधी टीनेजर मधुन तारुण्यात प्रवेश करती झाली ते नंदिनीला कळलेच नाही.
नंदिनी क्वचित विचार करायची आपण जॉब केला असता तर किती कमावले असते - पैसेच नाही तर बाहेरच्या जगात आत्मसन्मान, आत्मविश्वास, अरे ला कारे करण्याची धमक, वेळेचे नियोजन साधण्याची कला, टापटिपपणा आणि ऑप्टिमायझेशन ऑफ टाईम/ वेळेचा पूर्ण उपयोग. आणि तिला वाटून जायचं की तिने कमावले तसेच गमावलेदेखील भरपूर. पण मग तो विचार झटकून टाकून ती परत कामाला लागायची.
पण सलू डॉर्मवरती गेल्यापासून तिला आताशा भकास वाटू लागलेले होते खरे. पेरिमेनापॉझ- मेनापॉझ , एकंदर विषण्णता, अचानक आपली स्वतःची युटीलिटी कमी झाल्यासारखी वाटणे, घराला आपली तितकीशी गरज नसल्याचे अंगावर येणे - एक ना दोन. विवेकही क्वचित तिला सुचवायचा "नंदू एखादा छंद घे, महाराष्ट्र मंडळात जा, कुठे व्हॉलंटिअर काम शोध" थोडक्यात मला एकटं सोड, मला काम करु देत. गो फिगर इट
आउट योरसेल्फ. आणि नंदिनीच्या डोळ्यात टच्च्कन पाणी यायचं. यावर विवेक अजुनच गोंधळात पडायचा की नंदूला होतय काय आताशा?
नंदिनीला मैत्रिणी नव्हत्या असे नाही बर्याच मैत्रिणी होत्या. एक तर सिंधी मैत्रिण लव्ही तिच्या खास जवळची होती, जीवाभावाची होती.
लव्ही नंदिनीहूती ५ वर्षांनी मोठी होती. ती मेनापॉझमधून ऑलरेडी गेलेली होती. तिला नंदिनीच्या किंचितशा सैरभैर मनस्थितीची कल्पना होती. लव्ही नंदिनी ला नीट समजू शकत होती. दोघी आठवड्यातून निदान २ ते ३ वेळा भेटत. लव्ही नंदिनीला कोणा ना कोणाबद्दल किंचित दु:खद स्पिन असलेल्या गोष्टी सांगे ज्यायोगे नंदिनीला स्वतःचे दु:ख हलके वाटे, लव्ही शी बोलून नंदिनी ताजीतवानी, तरतरीत होत असे. अगदी खरे सांगायचे झाले तर लव्हि , नंदिनीची मिडलाईफमधील थेरपिस्ट होती. तिच्याशी बोलून नंदिनीच्या मनाला उभारी येत असे.
.
***************कुठेतरी पॅअरलल युनिव्हर्समध्ये****************************
नंदिनीने बाळ होउनही जॉब चालू ठेवण्याचा ठाम निर्णय घेतलेला होता. वि वेकचा अर्थातच कोणत्याही निर्णयाला पाठिंबा होता. ५ महीन्यात नंदिनीने नवा जॉब शोधला व बाळाला पाळणाघरात ठेउन ती नोकरीवरती जॉइन झाली. पहील्या दिवशी सलूला पाळणाघ रात सोडताना, नंदिनीच्या जीवाची घलमेल होत होती. तिने कडेवरच्या ५ माहीन्यांच्या पिल्लाला, अम्माच्या कुशीत दिले, टच्च्कन डोळ्यात आलेले पाणी नि कराने परतवत नंदिनी वळुन नोक रीवर निघाली.त्तिच्या मनात आले .....आपला वेळ विकला गेलेला आहे, आता सलूला माझी गरज आहे. हे मी जे करते आह ते ऑप्टिमल आहे का? योग्य अयोग्य काही नसतं .... आयदर तुमची कृती त्या त्या वेळी, त्या त्या प्रसंगात फिट्ट बसते अथवा बसत नाही दॅटस ऑल. रोज संध्याकाळी नंदिनी ऑफिसातून आली की सलू तिच्याकडे झेप घ्यायची. नंदिनी सलूचे मनसोक्त लाड करत तिला खेळवत घरी आणायची. तिचा थकवा कुठच्या कुठे पळून गेलेला असायचा. मग रोज सलूला मंमं भरवण्याचा एक मोठ्ठा कार्यक्रम व्हायचा. रात्री सलूला कुशीत घेत गोष्ट सांगत छान जोजो करवायचा दुसरा कार्यक्रम. पण किती समाधान होतं त्यात. केवढं सुख असतं आपल्या बाळाशी खे ळण्यात त्याच्याशी बोलण्यात. रोज सकाळी नंदिनी रिचार्ज्ड होउन परत कामवर हजर. दिवस जात होते.
सलू चा अभ्यास रोज घेणं शक्य नसायचं. पण सलू स्वतःचा स्वतः गृहपाठ करायला शिकली होती. आईला उशीर झाला यायला तर हाफ-फ्राय करुन घेण्याइतकी, वरण-भात लावण्याइतकी स्वतंत्रही झाली होती.हळूहळू सलू चे एक स्वतंत्र व्यक्तीमत्व बनत गेले, ती लवकरच आत्मविश्वासाने, स्वतःचे निर्णय स्वतः घेउ लागली. नंदिनीने तिला एक बाळघुटी नक्की पाजली होती ती म्हणजे - क्वचित एखादा निर्णय चुकतोमाकतो पण म्हणुन स्वतःच निर्णय स्वतः घेणं सोडायचे नाही. स्वतंत्र विचारांनी सतत प्रगतीच्या दिशेने प्रवास करायचा. रोप कसं जमिनीला घट्ट धरुन ठेवतं पण झेपावतं मात्र सुर्याकडे.
सलू डॉर्ममध्ये गेली. नंदिनी ची नोकरी चालूच होती. रिटायर कधी व्हायचं ते नक्कीही नव्हतं आणि त्याकरता, नंदिनी इतक्यात राजीही नव्हती. मात्र पेरिमेनापॉझमध्ये तिचे अंग आताशा दु खू लागलेले होते. फार काळ दबलेले उदास विचार डोके वर काढू लागलेले होते. व्यवसायक्षेत्रात, तर फारशी मैत्री होउ शकत नव्हती. व्यस्त जिवनशैलीमुळे, नंदिनीला मित्र-मत्रिणी अशा नव्हत्याच. नगण्यच होते. जे होते त्यांच्याबरोबर वरवरची मैत्री होती. उदासपणा , सतावणारे प्रश्न शेअर करायला देखिल एक रॅपो लागतो. अचानक आपली सुख-दु:ख भडाभडा कोणासमोर बोलता येत नाहीत. आणि एके दिवशी नंदिनीने थेरपिस्टच्या क्लिनिकमध्ये पाय टाकला.
छान होत्या डॉक्टर जल्पा मुळीक. मध्यमवयीन होत्या. मूळात गुजराथी पण लग्नाने महाराष्ट्रिअन. बराच अनुभव होता. त्यांनी नंदिनीला मदत केली. " आपण आदर्श आई नाही होउ शकलो, सलूला तिच्या वाढत्या वयात वेळ नाही देउ शकलो" ही एक मोठी खंत जी नंदिनी पाठिवरील एखाद्या सुळासारखी वहात होती. जल्पा सांगत होत्या.
बरेचदा परफेक्ट परफेक्ट, सुपरमॉम होण्याच्या नादात आपण इतके स्वताडन करु लागतो की स्वताडन हाच आपल्या जगण्याचा नॉर्म होउन जातो. तू जर एएखाद्या,सुंदर चित्रावर काळा ठिपका पहात बसलीस, तर कसे होइल तसे झाले आहे तुझे. आता एक करायचं - प्लस पॉइन्टस मोजायला सुरुवात करायची, आतापर्यंत आपल्या आयुष्यात काय काय उत्तम घडले, चांगले घडले, त्याचा बारकातला बारीक चांगला मुद्दा लिहून काढायचा. हे असं कमीत कमी एक आठवडा कर. बघ किती मुद्दे सापडतील जे आजवर तुझ्या लक्षातही आले नव्हते. दुसर्या आठवड्या व्यवसाय क्षेत्रात तुला भेटलेली प्रत्येक चांगली व्यक्ती , त्यांची यादी बनव. कोणात काय आवडले ते मनमोकळं सविस्तर लिहून काढ. मुलीकरता तू केलेला प्रत्येक यशस्वी प्रयत्न ती एक यादी बनव ...... " बराच काळ सेशन चाललं. सेशनच्या शेवटी नंदिनी ताजीतवानी, तरतरीत झालेली होती. तिच्या मनात एक नवीन उभारी आली होती. ३ महीन्यांनंतरची पुनर्भेट ठरवून ती हलक्या मनाने घरी निघाली होती.
तिने सलूला विचार केला फोन लाववावा का सलूला विचारण्याकरीता- "बाबु जेवली की नाही अजुन?" ................... पण मग तो विचार रद्दबातल करुन ती एक कॉफीशॉपमध्ये शिरली.
व्वा सामो!
व्वा सामो!
धन्यवाद नौट़की परंतु तितकीशी
धन्यवाद नौट़की परंतु तितकीशी जमली नाहीये. पण एक आहे लेखनातून स्वतःची ओळख होते, तशीच थेरपीदेखील होत असावी. मुळीक यांनी सांगीतलेले उपाय, खरं तर प्रत्येकाला (मला) करुन पहायला हवेत. मी तर एक डायरीच ठेवेन म्हणते.
मी ते नौटंकी तितकीशी जमली
मी ते नौटंकी तितकीशी जमली नाही असे वाचले. एम्टि नेस्ट सिंड्रोम वर आहे कथा. पण आता तसे काही राहिले नाही. मुलांना त्यांच्या मार्गावर सोडून आपण मस्त जगू शकतोच की. गिल्ट फिल्ट वाटून घेण्यावर आहे. हेलिकॉप्टर पेरेंटिं ग बद्दल तुम्हास काय वाटते ?
अमा आत्ता मी सकाळी सकाळी
अमा आत्ता मी सकाळी सकाळी बागेत आले आहे. किती प्रसन्न आहे. मुक्त पक्ष्यासारखी. बरोबर घरट्यातून पिलु उडाले आहे. मग लिहीते घरी गेल्यावर. मला ‘तू’ म्हण. तुम्हाला 'तू' म्हटलं तर चालेल का?
_______
तुझं अगदी बरोबर आहे, आयुष्य समरसून भोगण्याचा हाच काळ असतो जेव्हा मुलांच्या जबाबदार्या ऑलमोस्ट संपत आलेल्या असतात. एक प्रकारे स्वतंत्र, मुक्तच वाटतं. क्वचित मुलगी आजारी पडली/ ताप वगैरे तर काळजी वाटते पण तेवढीच.
_________
हेलिकॉप्टर मॉमस असतात. जरी कितीही म्हटलं की आई किती लक्ष घालते, याचे प्रमाण ठरवणारे आपण कोण, तरी अति अति लक्ष घालणार्या आया पाहील्या आहेत. मी देखील मुलीकरता, बरीच अॅनॉयिंग झाले होते काही काळ. आमचे मग खटके उडत. हळूहळू मी तिच्या वैयक्तिक बाबींतली अनावश्यक ढवळाढवळ काढून घेतली.
सामो, जमली नाही असं का वाटतं?
सामो, जमली नाही असं का वाटतं? तुझी नायिका (एकेरी संबोधनासाठी सॉरी) पॅरॅलल युनिव्हर्समध्ये वेगवेगळ्या निर्णयांचे वेगवेगळे परिणाम अनुभवते. मी एकाच आयुष्यात खूप कमी काळात हे सगळंच पाहिले. लग्नानंतर दुर्दैवाने नको त्या घटना आयुष्यात घडल्या. तेव्हा नवरा, सासू आणि बाकी सगळ्यांनी सपोर्ट करूनही मी तीव्र नैराश्यात गेले. थेरपीचा सुद्धा काहीच उपयोग झाला नाही. नंतर ६ वर्षांनी स्थिती १८०° ने बदलली. पण अजूनही मनातला सल गेला नाही जाणारही नाही. पण मी घराबाहेर पडले. करीअरची विस्कटलेली घडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हो, पण नशिबाने माझा स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे आणि घराला चिकटूनच ऑफिस असल्याकारणाने ४ वर्षाच्या मुलाला अगदी पाहिजे तसा वेळ देऊ शकते. अगदी माझं काम करत असताना त्याचा अभ्यास, खाऊ, मस्ती सगळं एन्जॉय करते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राहिला प्रश्न हॅलिकॉप्टर
राहिला प्रश्न हॅलिकॉप्टर मॉम्सचा तर त्याचा पुढे जाऊन आई आणि मुलं दोघांनाही त्रास होतो. विशेषतः आईला.
फार मस्त जमली आहे कथा सामो.
फार मस्त जमली आहे कथा सामो. मला खुप आवडली. आयुष्यात ☺️100% चुक किंवा बरोबर असे निर्णय क्वचितच असतात आपण घेत असलेले बहुतांश निर्णय हे ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी येतात. आपल्या त्या त्या वेळी असलेल्या परिस्थिती आणि समजुती नुसार आपण.निर्णय घेत असतो. पण घेतलेल्या निर्णयातील त्रुटींवर लक्ष केंद्रित करणे हा मानवी स्वभाव च आहे. तुमच्या कथेत हे अगदी पर्फेक्ट आलेल आहे.
ही कथा जमली नाही अस तुम्हाला का वाटल? माझ्या कडून तुमच्या लिखाणाला A+
पर्णीका आपले आभार. या कथेत
पर्णीका आपले आभार. या कथेत उत्कट असे काही नाही म्हणून जमली नाही असे वाटत होते. पण सर्वच लेखन तथाकथित उत्कट्/उन्मादक/तरल/ काव्यमय होउ शकत नाही
हे सत्य आहे आणि तसेच बरोबर आहे.
आपल्याला कथा आवडली आणि कळली आहे.
तरी मुलगी आहे म्हणुन नशीब !
तरी मुलगी आहे म्हणुन नशीब ! जर मुलगा असता तर नंतर त्याच्या लग्नानंतर या अति काळजीमुळे प्राॅब्लेम्स वाढू लागतात आणि परिणाम पण वाईट होतात ! (सासूसुने चे वाॅर्स तर भयानक)
तरी मुलगी आहे म्हणुन नशीब !
तरी मुलगी आहे म्हणुन नशीब ! जर मुलगा असता तर नंतर त्याच्या लग्नानंतर या अति काळजीमुळे प्राॅब्लेम्स वाढू लागतात आणि परिणाम पण वाईट होतात ! (सासूसुने चे वाॅर्स तर भयानक)
नेहा, सून येणार याची
नेहा, सून येणार याची अँटिसिपेशनमुळे येणारी, एक प्रकारची कोणाला बोलून न दाखवता येणारी भिती नक्की वाटू शकते. सहमत आहे.
सामो, नक्कीच जमली आहे. अगदी
सामो, नक्कीच जमली आहे. अगदी साध्या भाषेत खूप काही सांगून जाणारी कथा. मी स्वतः वर्किंग मॉम आहे आणि खूप काही मिस होता असा नेहमी वाटून जातं. मला तरी खूप रिलेट झाली. I must say, तुमचा लिखाण खूप मॅच्युअर्ड असता. प्लिज लिहीत राहा.
उर्मिला धन्यवाद.
उर्मिला धन्यवाद.
लेक बाहेर पडते आहे आता
लेक बाहेर पडते आहे आता कॉलेजसाठी, त्यामुळे हा लेख पुन्हा वाचला. जरा स्फूर्ती मिळावी म्हणूनच..
सामो,
सामो,
चांगली जमलीय की. लिहीत रहा.
मी helicopter मॉम आहे असं माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना वाटायचं. मुलगा इथे असतांना माझा त्याच्या सर्वच गोष्टीत सहभाग असायचा.
तो घराबाहेर पडला ते थेट परदेशीच गेला पण गंम्मत म्हणजे मी अगदी सहजपणे माझं रोजच आयुष्य जगायला लागले.
हळूहळू त्याच्या फोन ची frequency ही कमी झाली तर तेही नकळतपणे स्विकारल्या गेलं.
काळजी तर वाटतेच पण तो आणि त्याचं आयुष्य म्हणत फार नं गुंतता राहता येतं.
त्याचं कारण कदाचित तो मुलगा हेही असावं. कारण काळजीने विचारलेला कुठलाही प्रश्न, ' ए बास गं..../ बोअर नको करुस...: म्हणून उडवला जातो.