Submitted by स्वाती_आंबोळे on 24 September, 2019 - 10:04
ही माझी टीपापातली पोस्टः
>>>
अॅमींना राशोमानबद्दल सांगावं की नाही अशा विचारात आहे.
राशोमान माहीत नसणार्यांना गॉन गर्लचा फॉर्म 'ओरिजनल' वाटतो आणि ती सहा शब्दांची कथा प्रसिद्ध असून 'लॉन्ड्री लिस्ट'ची कल्पना ओरिजनल असल्याचा दावा करणारेही निपजतात! सगळीच मजा!
बाय द वे, ती कथा स्पर्धेतून बादच समजायची होती ना? मग 'ओ अॅन एक्स्प्लेनेशन, बक्षिस परत करण्याची अप्रत्यक्ष सूचना वगैरे काय! काहीही!
<<<
या माझ्या टीपापातील पोस्टवरील संभाव्य चर्चा गणेशोत्सवाच्या समारोपाच्या धाग्यावर अप्रस्तुत असल्यामुळे हा वेगळा धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
ही पूर्वपीठिका:
ही पूर्वपीठिका:
राशोमनबद्दल माहित आहे मला स्वाती.
गॉन गर्लचा (किंवा लॉंड्री लिस्टचा) फॉर्म ओरिजनल आहे असेही माझे म्हणणे नाही. फक्त ते त्या त्या काळात (/क्षेत्रात) ट्रेंड सेटर आहेत म्हणलं.
तुमचं काय म्हणणं आहे?
गॉन गर्लला 'नेक्स्ट राशोमन' च म्हणले पाहिजे?
नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून जी पुस्तकं गेल्या ७ वर्षात आली आहेत त्या सगळ्यांच्या कल्पना त्या त्या लेखकांच्या डोक्यात २०१२ सालच्या आधीपासूनच होत्या? आणि त्या राशोमन बघूनच सुचलेल्या?
Submitted by ॲमी on 24 September, 2019 - 09:40
>>>
राशोमनबद्दल माहित आहे मला स्वाती.
गॉन गर्लचा (किंवा लॉंड्री लिस्टचा) फॉर्म ओरिजनल आहे असेही माझे म्हणणे नाही.
<<<
गुड, थँक यू. मला तितकंच म्हणायचं होतं.
Submitted by स्वाती_आंबोळे on 24 September, 2019 - 09:42
संपादन (4 hours left)
I wanted to be sure. My past experiences do not allow me to trust you or anyone associated with you.
तर... माझ्या कथेच्या अनुषंगाने तुम्हाला माझ्या चांगल्या वा वाईट निपजण्याबद्दल टीपापापेक्षा ह्या बर्याच मोठी सार्वजनिक फोरमवर काही मजेशीर सांगायचे आहे का?
Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2019 - 09:46
नाही.
Submitted by स्वाती_आंबोळे on 24 September, 2019 - 09:45
संपादन (4 hours left)
मी उत्तर दिल्यानंतरही तू प्रश्न बदलत राहणार का? makes it difficult for me to entrust you with my answer.
असो, मजेशीर नाही, गंभीर आही, त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे त्यापेक्षा अधिक काहीही नाही.
Submitted by स्वाती_आंबोळे on 24 September, 2019 - 09:48
संपादन (4 hours left)
का बरे?
तुम्हाला एखाद्याने लिहिलेल्या १०० शब्दांवरून त्याच्या कुटुंबातून तो कसा निपजला ह्याची जी माहिती झाली आहे.. जसे तुम्ही टीपापामधील तुमच्या मित्रांना संगितले आहे त्यातली मजा ईथे सगळ्यांना का सांगावी वाटू नये?
Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2019 - 09:49
प्रश्न बदललेला नाही त्यात तुमचे "मजा आहे" ह्यावरून सांगायचे आहे ह्यापुढे "मजेशीर" हे एवढेच विशेषण अॅड केले आहे.
मलाही माझ्या निपजण्याबाबत काय मजेशीर आहे ते जाणून घ्यायचे आहे.
Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2019 - 09:54
>>> मजेशीर नाही, गंभीर आनाही, त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे त्यापेक्षा अधिक काहीही नाही.
तुला धागा येनकेन प्रकारेण नांदताजागता ठेवायचा असावा, नाहीतर या वाक्यात न कळण्यासारखं काही नाही. तुझे निष्कर्ष काढायला, त्यात तुझं कुटुंब गोवायला इ. इ. अर्थातच तू मोकळा आहेसच.
Submitted by स्वाती_आंबोळे on 24 September, 2019 - 09:56
संपादन (4 hours left)
> गुड, थँक यू. मला तितकंच म्हणायचं होतं. > ठीक आहे. मग
गॉन गर्लला (किंवा लॉंड्री लिस्टला) ट्रेंड सेटर म्हणलं आणि त्यानंतर आलेल्या कथांना नेक्स्ट गॉन गर्ल (किंवा नेक्स्ट लॉंड्री लिस्ट) म्हणलं तर तुमची हरकत आहे का?
या 'नेक्स्ट' कथांच्या कल्पना 'ट्रेंड सेटर' वरून सुचल्या असण्याची 'शक्यता' भरपूर आहे अस म्हणलं तर तुमची हरकत आहे का?
Submitted by ॲमी on 24 September, 2019 - 09:58
धाग्याचा सबंध नाही... हे माझ्याबद्दल "वैयक्तिक" आहे.
ठीक आहे तुम्ही वापरलेल्या "निपजणे" ह्या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हीच समजावून सांगा.
Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2019 - 09:58
बोर्न ट्रेन्ड सेटर ऐवजी
बोर्न ट्रेन्ड सेटर ऐवजी ट्रेन्ड बोन सेटर असता तर तुम्हाला 'हाड' म्हणता नसतं आलं सहजासहजी. (हा प्रतिसाद बिनबुडाचा वाटल्यास भेटा अथवा लिहा - समारोपाचा धागा.)
१०० शब्दांच्या मी लिहिलेल्या
१०० शब्दांच्या मी लिहिलेल्या कथेचा माझ्या निपजण्याशी तुम्ही लावलेला संबंध त्यात तुम्हाला दिसलेली मजा आणि त्यावरून तुम्हाला काय विनोद विभगात काय विनोद अपेक्षित आहेत ते कृपया समजाऊन सांगणार का?
>>>
>>>
गॉन गर्लला (किंवा लॉंड्री लिस्टला) ट्रेंड सेटर म्हणलं आणि त्यानंतर आलेल्या कथांना नेक्स्ट गॉन गर्ल (किंवा नेक्स्ट लॉंड्री लिस्ट) म्हणलं तर तुमची हरकत आहे का?
या 'नेक्स्ट' कथांच्या कल्पना 'ट्रेंड सेटर' वरून सुचल्या असण्याची 'शक्यता' भरपूर आहे अस म्हणलं तर तुमची हरकत आहे का?
<<<
नाही, माझी हरकत नाही. पण ते मला मान्य नसण्याला तुमचीही हरकत नसावी.
>>>
धाग्याचा सबंध नाही... हे माझ्याबद्दल "वैयक्तिक" आहे.
ठीक आहे तुम्ही वापरलेल्या "निपजणे" ह्या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हीच समजावून सांगा.
<<<
तुझ्या आधीच्या पोस्टमध्ये 'कथेच्या अनुषंगाने' असे शब्द होते - 'निपजणे'च्या सोबत ते आले की पूर्ण अर्थ खरंतर स्पष्ट होतो. पण let me humor you this time.
एका प्रसिद्ध सहा शब्दांच्या कथेशी उघड साम्य असताना आपली कथाकल्पना ओरिजनल आहे आणि दुसर्या कोणाची कथाकल्पना आपल्याच कथेवर 'बेतलेली' आहे असं म्हणणारा कथाकार तुझ्यातून (इरेपोटी वा अन्य कुठल्या कारणाने) निपजला ही बाब मजेशीर आहे. माझ्या मते मजेशीर आहे असं म्हणू.
तुझ्या आधीच्या पोस्टमध्ये
तुझ्या आधीच्या पोस्टमध्ये 'कथेच्या अनुषंगाने' असे शब्द होते - 'निपजणे'च्या सोबत ते आले की पूर्ण अर्थ खरंतर स्पष्ट होतो. >>> लॉजिक शोधून काढल्याबद्दल अभिनंदन.
कथेसारख्या फॉर्म नसलेल्या गोष्टीवरून एखाद्याचे निपजणे कसे जोखता येते हा प्रश्न मला पडलेला. अच्छा तुम्हाला माझ्यातला कथाकार वाईट वा अजून काही तरी वाईट अर्थाने निपजला असे म्हणायचे होते का. आले लक्षात
त्यायला विनोदही आता ऊलगडून सांगितल्यावर कळाला.
एका प्रसिद्ध सहा शब्दांच्या कथेशी उघड साम्य असताना >> कसे आणि कुठले साम्य ते सुद्धा कृपया समजाऊन सांगणार का. ज्यांना माहित नाही त्यांना सोयीचे होईल. आणि थोडे विनोदी अंगाने सांगा... हा विनोदी विभाग आहे.
१. दोन्ही कथा डिलीव्हरीतली
१. दोन्ही कथा जन्माला येणारं बाळ दगावलं असावं असं सूचित करतात.
२. 'ओरिजनल' कथेत विकायला काढलेल्या वस्तूंची 'लिस्ट' होती, ज्या आता काही कारणाने निरुपयोगी आहेत - तुझ्या कथेतही आता निरुपयोगी झालेल्या वस्तूंची लिस्ट आहे, फक्त विकायला काढल्याचा उल्लेख नाही. काही वस्तू चॅरिटीला जाणार असा उल्लेख आहेच तरी.
हो हो, आता एकच वस्तू असल्यामुळे ती लिस्ट म्हणता येणार नाही असा तांत्रिक मुद्दा काढता येऊ शकतोच, पण त्या लेखकाला सहा शब्दांचं बंधन होतं, तुझ्याकडे ९४ जागा अधिक होत्या त्यामुळे तुला मोठी लिस्ट करायला वाव होता.
तेव्हा डिलीव्हरीतलं मिसहॅप हा कन्टेन्ट आणि केवळ लिस्टच्या आधारे काय घडलं असावं हे ओळखण्याचा भाग वाचकावर सोडून देणारा फॉर्म या दोन्ही बाबतीत तुझ्या कथेचं सहा शब्दांच्या कथेशी अनडिनायेबल साम्य आहे.
> नाही, माझी हरकत नाही. पण ते
> नाही, माझी हरकत नाही. पण ते मला मान्य नसण्याला तुमचीही हरकत नसावी. > ठीक आभार. हरकत नाही. पण कारण जाणून घ्यायला आवडेल. कदाचित नवा दृष्टिकोन मिळेल, ग्यान वाढेल....
वरच्या पोस्टमध्ये न लिहिलेला
वरच्या पोस्टमध्ये न लिहिलेला भाग विनोदी आहे हे सांगायला हवं.
'डिलीव्हरीतली कॉम्प्लिकेशन्स' एवढा एकच भाग वगळला तर तुझ्या आणि सनवच्या कथेत काहीही साम्य नव्हतं. फॉर्ममध्ये नव्हतं, कन्क्लूजनमध्ये नव्हतं आणि देवाचा संदर्भ ज्या अर्थाने आला होता त्यात तर नव्हतंच नव्हतं. तरीही तिच्याकडून एक्स्प्लेनेशन डिमान्ड केलं गेलं आणि तिने बक्षीस परत करावं असंही 'मी तुमच्या जागी असतो तर' अशा अप्रत्यक्ष रीतीने सुचवलंही गेलं. नंतर 'मी तुम्हाला तसं सुचवलं नाही, मी काय केलं असतं ते सांगतो आहे' अशी पल्टीही मारली गेली.
ही सगळी मजाच आहे.
एक आवरा कॅटेगरी तली ओळ
एक आवरा कॅटेगरी तली ओळ सुचल्ये
लक्ष्य कुठे अन् कुठे टिपापा
हाबला द्यावा का ईशारा
ईबा अवांतराबद्दल क्षमस्व
"आयला, नया भिडु और नया राज?"
"आयला, नया भिडु और नया राज?"
माझी ओरिजिनल सिक्सपॅक. (
नो पन इंटेंडेड)...कथा दिली असती तर बरे झाले
कथा दिली असती तर बरे झाले असते... हरकत नाही मी देतो.
For sale: Baby Shoes. Never Worn.
१. दोन्ही कथा डिलीव्हरीतली कॉम्प्लिकेशन्स आणि जन्माला येणारं बाळ दगावलं असावं असं सूचित करतात. >> माझ्या मते ही कथा डिलीव्हरीतली कॉम्प्लिकेशन्स आणि जन्माला येणारं बाळ दगावलं असावं शकलेल्या बाळाबद्दल नसून "पैशांसाठी अगदी लहान बाळाचे बुट" ही विकाव्या लागणार्या माणसावर काय परिस्थिती ओढवली आहे त्याबद्दल आहे. ह्यात बाळ जगले नाही असा अँगल मला तरी दिसला नाही, बाळ न जगणे आणि बूट विकावे लागणे ह्याचा सबंध मला जोडता येत नाही. (माबुदोस)
२. माझी कथा "एक किलो पोहे द्या, कडीपत्ता, कांदा आणि शेंगदाणे द्या" असे दुकानदाराकडे मागायला आलेल्या मुलाला दुकानदार "काय आज ताईला बघायला पुन्हा पाहुणे येणार का?" ह्या लॉजिकवर बेस्ड आहे. पण हरकत नाही.
चॅरिटीचा रेफरंस ह्यासाठी की कारसीट वगैरे सारख्या मटेरिअल ज्यात त्याच्या भावना अडकल्या नाहीत त्यांचे घरी नेऊन काय करणार? म्हणून त्या चॅरिटीला दिल्या.
देवाच्या रेफरंसचा कथेत आलेला भाग तुमच्या प्रतिसादात आलेला नाही पण ठीक आहे माझ्यातल्या वाईट निपजलेल्या कथाकाराने तो चुकून अॅड केला असेल. ह्याची सहा अक्षरी कथेशी पटेलशी लिंक तुम्ही शोधून काढालच.
तेव्हा डिलीव्हरीतली कॉम्प्लिकेशन्स हा कन्टेन्ट आणि केवळ लिस्टच्या आधारे काय घडलं असावं हे ओळखण्याचा भाग वाचकावर सोडून देणारा फॉर्म या दोन्ही बाबतीत तुझ्या कथेचं सहा शब्दांच्या कथेशी अनडिनायेबल साम्य आहे >> माझ्या "पत्ते" ह्या कथेतही "रहस्य" काय ऊलगडायचे आहे ते वाचकांवर सोडलेले आहे. त्याचीही लिंक सहा अक्षरी कथेशी लवता येते का ते बघणार का?
मुद्दे पटले नाही म्हणून आक्षेप डोळ्याआड करून कसे चालेल. तर आक्षेप बिनाशर्त मान्य आहे आणि त्यानुषंगाने त्या कथेतल्या अनडिनाएबल साम्यस्थळाची जबाबदारी घेणे मला भागच आहे आणि तसे करण्यास मी आनंदाने तयार आहे.
पण ह्यात विनोद कुठे आहे? विनोद विभागात विनोदी लिहायचे आहे ना?
सहज मजा म्हणून -
सहज मजा म्हणून -
https://quoteinvestigator.com/2013/01/28/baby-shoes/
https://www.thedailybeast.com/cheats/2013/01/30/hemingway-didn-t-write-b...
>>> Submitted by हायझेनबर्ग
>>> Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2019 - 11:08
या पोस्टचा गोषवारा सहा शब्दांची कथा आणि 'लॉन्ड्री लिस्ट' यातली साम्यस्थळं मला अनडिनायेबल वाटतात आणि तुला डिनायेबल वाटतात असाच आहे ना? ठीक आहे, इतकी मतभिन्नता असायचीच.
तशीच मतभिन्नता हा धागा आणि त्यावरच्या पोस्ट्स विनोदी आहेत की नाही याबद्दलही आहे. त्यालाही माझी हरकत नाही.
आता माझं स्पष्टीकरण तुला मान्य झाल्यावर मी या चर्चेत तुझ्या कुटुंबाला गोवायचा प्रयत्न केला असं सूचित केल्याबद्दल तू दिलगिरी व्यक्त करशील अशी मी आशा करते. नुसतं 'I stand corrected' असं म्हटलंस तरी चालेल. काहींना ती दिलगिरीच वाटते.
आता माझं स्पष्टीकरण तुला
आता माझं स्पष्टीकरण तुला मान्य झाल्यावर मी या चर्चेत तुझ्या कुटुंबाला गोवायचा प्रयत्न केला असं सूचित केल्याबद्दल तू दिलगिरी व्यक्त करशील अशी मी आशा करते. नुसतं 'I stand corrected' असं म्हटलंस तरी चालेल. काहींना ती दिलगिरीच वाटते. >> नाही नाही. मनाअप्स्सून दिलगीर आहे. अकंडिशनल अपॉलॉजी म्हणातत तीच मागतो.
तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल ही अपेक्षा करतो.
Ok, no worries. Let's move on
Ok, no worries. Let's move on.
Thanks for understanding.
Thanks for understanding.
माझी स्पर्धेतली दुसरी कथा डोळ्याखालून घालणार का?
नेमक्या ह्या गोष्टीसाठीच मी तज्ञ परिक्षकांचा आग्रह धरत होतो. मी कथा स्पर्धेत ऊतरवली असती आणि ती चुकून विजेती झाली असती तर दुसर्या कथांवर अन्याय झाल्यासारखे झाले असते. संयोजन मंडळाला आता तरी माझा मुद्दा कळेल.
> नुसतं 'I stand corrected'
> नुसतं 'I stand corrected' असं म्हटलंस तरी चालेल. काहींना ती दिलगिरीच वाटत > हे आणि इतरही सगळं त्या धाग्यावरच बोललेलं बरं पडलं असतं.
अॅमींना अनुमोदन. एवीतेवी
अॅमींना अनुमोदन. एवीतेवी सगळंच गणेशोत्सोव स्पर्धेशी आणि त्यातल्या कथांशी निगडीत आहे.
एनिवे,
एनिवे,
या धाग्यावर मला काही नवीन-रोचक शिकायला मिळत नाहीय, चर्चा करून आनंद मिळत नाहीय, विनोद असतीलच तर हसुदेखील येत नाहीय. त्यामुळे आपली कल्टी. टाटा.
हाबनेदेखील इथे वेळ घालवू नये असे वाटते. पण त्यांचे निर्णय घेण्यास ते समर्थ आहेत.
खूप दिवसानी आम्बोळे यांचा
खूप दिवसानी आम्बोळे यांचा धागा पाहिला, वाटले काहितरी इंतरेस्तिंग असेल - इथेही तेच दळण दळने चालु आहे.
अरे हो विसरलोच होतो
अरे हो विसरलोच होतो
https://www.maayboli.com/node/71396 स्वप्ना राज ह्यांच्या स्पर्धेतल्या धाग्यावर मी स्वतःच ह्या वरच्या सहा अक्षरी कथेबद्दल सगळ्यांना कळण्यासाठी सविस्तर लिहिण्याबद्दल ऊत्सुक आहे असे म्हंटले होते.
अरर्र्र... आता तर हे अजूनच ठळक स्पष्ट होते आहे की मी अगदी हीच कथा रेफरंसला घेऊन माझी कथा लिहिली.
माय सिन्सिअर अपोलॉजिज अगेन.
"फॉर सेल: बेबी डायपर्स,
"फॉर सेल: बेबी डायपर्स, नेव्हर वोर्न" अशी गोष्ट असती तर वाचकाला "थँक्यूच फॉर एक्सप्लेनिंग!" असं झालं असतं. एकूणातच बाळाच्या बूट-मोज्याबद्दल हळवेपणा असतो. अभिमान सिनेमात जया भादुरीचे बाळ गेल्यावर तिला बाळाचे मोजे दाखवून दाखवून रडवायचे प्रकार चालू असतात...
अरेरे दुर्दैवी आहे हे सगळे.
अरेरे दुर्दैवी आहे हे सगळे.
वर प्रतिसादात आलेल्या दोन्ही वेबसाईट वाचल्या. डिलीवरीचा ऊल्लेख कुठे दिसला नाही.
येणार्या बाळासाठी लोकरीचे मोजे वगैरे विणतो आपण पण साधारणतः वर्षभरानंतर लागणारे शूज डिलिवरीच्या आधी विकत घेतो का असा प्रश्न पडला.
आता खुसपटं नका काढू बरं कोणी.
आता खुसपटं नका काढू बरं कोणी. एकदा verdict आले ना, झाले तर मग. निदान माझ्यासाठी तरी ते पुरेसे आहे.
वाटल्यास मीच उलगडून सांगतो सगळी साम्यस्थळे म्हणजे कोणाला पुन्हा पुन्हा प्रश्न नकोत पडायला. प्रश्न पडणे हेच सगळ्या वादाचे मूळ असते.
1. बेबी - दोन्ही कथा (खरी ओरिजिनल आणि डुप्लिकेट, म्हणजे सहा अक्षरी आणि लाँड्री लिस्ट ) बेबी अर्थात लहान बाळावर आधारलेल्या आहेत.
आता बेबी म्हणजे stillborn, newborn, infant, toddler असे 0 ते 4 वयोगटातील सगळेच येते. ओरिजिनल कथेत कुठला बेबी लिहिले नाही पण आपण stillborn असेच पक्के समजायचे.
2. जाहिरात = करावयाच्या गोष्टींची यादी.
ओरिजिनल कथेत पेपरात आलेली जाहिरात आणि माझ्या कथेत खिशात ठेवतो ती यादी. ह्यात काय साम्यस्थळ आहे? अहो दोन्ही कागदावरच तर लिहिलेल्या असतात. जाहिरात माणसाने दिली की thrift store ने असा तांत्रिक मुद्दा नका डोक्यात आणू. माणसानेच आणि ते सुद्धा दुर्दैवी वडीलपण अनुभवलेल्या माणसानेच.
तर original कथेमधील जाहिरात देणारा माणूस = लिस्ट मधला नवरा.
3. एक = अनेक
ओरिजिनल कथेत जाहिरातीत एकच आयटम विक्रीला ठेवलेला आहे आणि माझ्या कथेतील लिस्ट मध्ये अनेक आयटम्स आहेत.
जाहिरात = यादी हे तर आपण पाहिलेच. तर अनेक गोष्टींची यादी कशी बनते... एक + अजून एक + अजून एक असे. समीकरणच मांडायचे झाले तर एक = अनेक - (अनेक - 1) आले लक्षात?
(एक एक एक पकडके हो गये तारे अनेक...हां.. अब आई बात समझ मे मीना दिदी )
मग लिस्ट मधला एक सोयीस्कर सामायिक आयटम कुठला? तर सोपे आहे. मोजे
शूज ~~ मोजे. हे पॅरलल तर किती सोपे आहे समजायला. लिस्ट मधल्या perfume, honeymoon pic, reading glasses, आईचा अंगारा वगैरे तांत्रिक आणि बिनकामाच्या गोष्टीत अडकून पडू नका बर आता तुम्ही... पुढे चला.
तर
जाहिरात(यादी) - Checked (ह्यातच sale = charity असेही Checked करून टाका)
शूज(मोजे) - Checked
बेबी(stillborn) - Checked
गणपती च्या फोटोचं काय ? त्याचं काय? तो discard करायचा.
बघा पटले की नाही तुम्हाला पण. आता कोणी खुसपटं काढू नका बरं.
सीमंतिनी
सीमंतिनी
पण ह्यापेक्षा मोठ्ठा विनोद झाला तो अजून कुणाला कळलाच नाही .
एक लेखक दुसर्या लेखकाची कथा कशी ओरिजिनल नाही सांगायला गेले आणि असे कळले की दुसर्या लेखकाची कथा ओरिजिनल होती आणि ह्या लेखक महाशयांचीच नव्हती.
>> पण साधारणतः वर्षभरानंतर
>> पण साधारणतः वर्षभरानंतर लागणारे शूज डिलिवरीच्या आधी विकत घेतो का असा प्रश्न पडला.<<
इथे संदर्भात आलेले शूज चालण्याकरता नाहि, शोभेकरता असतात - विणलेल्या मोज्यांसारखे...
हो हो! ते एक राहिलेच.
हो हो! ते एक राहिलेच.
ओरिजिनल कथेतले शूज शोभेचे समजायचे बरं का. काही अॅबसर्ड लोक अशा न्यूबॉर्न साठी लागणार्या शूज ना बुटी म्हणतात पण ते काही खरे नसेल. राज ह्यांचे लिंग्विस्टिक जियॉग्रफि प्रमाणे व्यक्ती आणि वस्तूंची नावे घेण्याबद्दचा आग्रह आणि कौशल्य वादातीत आहे. ते बरोबर सांगत आहेत. धन्यवाद राज. (पण तुम्ही माझ्यासारखे थोडे विनोदी लिहायला हवे होते )
अजून विचार करू जाता थंडी हे सुद्धा कारण असू शकेल. म्हणजे ईकडे थंडी खूप असल्याने आपण ओरिजिनल कथेतला बेबी थंडीत जन्मला होता असेही गृहीत धरून टाकले की मग ते शूज म्हणणे सहाजिकच आहे.
राशोमान बद्दल माहिती नव्हती,
राशोमान बद्दल माहिती नव्हती, गुगल केली. फॉरमॅट गॉन गर्ल शी सिमीलर आहे. पण मुळात गॉन गर्ल ७०-८० टक्के laci Peterson केसवरून घेतलाय. पिटर्सन केसबद्दल डॉक्युमेंटरी बघितल्यावर लक्षात येईल फ्लिन काकूनी कसं कॉपी पेस्ट मारलंय.
David fincher जो गॉन गर्ल चा डायरेक्टर आहे त्याने तर ben afleck चं कास्टिंग करताना 'तो स्कॉट पिटर्सन सारखा दिसतो' हे कारण दिलं होतं. So-
गॉन गर्ल म्हणजे ७० टक्के पिटर्सन केस प्लस ३० टक्के राशोमान असं काहीतरी असावं.
अहो ईथे विनोदी लिहायचे आहे.हे
अहो ईथे विनोदी लिहायचे आहे.
हे पहा असे
RASHOMON IS BASED ON TWO SHORT STORIES.
ITS VISUAL STYLE WAS INSPIRED BY SILENT FILMS.
आता आपण सगळे मिळून कुरोसावाच्या निपजण्याचा ऊगम शोधूया मग तो शोधून झाला की त्या शॉर्ट स्टोरी लिहिणार्या लेखकांकडे वळू.
हे काय प्रकरण आहे? कोणी
हे काय प्रकरण आहे? कोणी सांगेल का?
हायझेनबर्ग लिहायचे बंद झालेत का माबोवर?
या धाग्याची लिंक त्यांच्याच प्रोफाईलमधून मिळाली आहे.