हा धागा विरंगुळा प्रकारात आहे. मनावर घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवायचं.
तर लोकहो, या ठिकाणी, आजवर ट्रोलिंग चे एक सो एक प्रकार सादर झालेले आहेत. (माहिती नसतील, नविन असालं, तर एकदा फेर फटका मारून या सर्व धाग्यांवर आरामात आणि हो, हातात पॉपकॉर्न घेऊन बसा कारण काही अत्यंत मनोरंजक वाचावयास मिळणार आहे तुम्हाला.)
जर तुम्हीही ट्रोल झाला असालं तर अभिनंदन. कारण ट्रोल केवळ त्याच व्यक्तींना करता येत ज्यांची स्वतःची विशिष्ट अशी स्टाईल असते, शैली असते, जे लोकप्रिय असतात आणि ज्यांना हायलाईट करता येईल किंवा करावं वाटेल इतपत महत्त्व प्राप्त झालेलं असतं.
काही जण (खासकरून नविन सदस्य/राजकारण न जमणारे/ संवेदनशील वगैरे) मात्र ट्रोलिंगला कंटाळून उगाच डिप्रेस होतात. त्यांच्या करता हा धागा.
सोशल मिडियाला सिरियसली घेऊ नये अजिबात. - कोणीतरी लिहिलं होतं. आणि माझ्याकडून त्या वाक्याला +११११
तरीही काही उपाय आहेत त्यांच्याकरता, ज्यांना त्यांचे इथले अस्तित्व आणि प्रतिष्ठा महत्वाची वाटते.
तर, उपाय अगदी साधा आणि सोप्पा आहे. दुर्लक्ष!
हे जमलं नाही, अवघड वाटलं तर खालचा अभ्यासपुर्ण लेख वाचा! अनुभव आणि अभ्यास यांची सांगड वगैरे घातलेला.........
ट्रोलिंगची सुरुवात कशी ओळखायची?
आपल्या धाग्यावर चित्र-विचित्र, आगाऊ, संबंध नसलेले प्रश्न विचारले जातात किंवा काही त्रासदायक प्रतिसाद लिहिले जातात. ट्रोलर्स भाषा अशी वापरतात की उलट उत्तर रागीट पद्धतीने वाईट शब्दात देण्यास प्रवृत्त होतो आपण.
पण थांबा. टाईप करणाऱ्या हातांना आवर घाला. कदाचित तुम्हाला लिहायचे आहेत ते शब्द तुमच्याच विरूध्द उभे केले जाऊ शकतात.
उत्तरे देण्याआधी विचार करा की हा प्रश्न का विचारला आहे. उद्देश नीट कळला नाही किंवा अयोग्य/अतार्किक वाटला तर उत्तर देणे टाळाच.
जे ट्रोल करतात ते मूळ मुद्दा सोडून एकच शब्द/वाक्य घेऊन त्यावर हैदोस घालतात. काहीही लिहित सुटतात. आशय समजून न घेता शब्दखेळ खेळत तुमच्या लिखाणाचा विपर्यास करतात.
अश्यावेळी काय करायच?
मौन व्रत! कारण त्यावर तुमचे मौन त्यांना अपेक्षित नसते. आणि तुम्ही तेच धारण केले म्हणल्यावर ट्रोलरचा उद्देश असफल होतो. सफशेल फसतो.
पण तुमच्या त्या धाग्यावर जाणे तुम्ही बंद करायचे नाही हं. त्यावरच जर दुसरा कोणी काही साधा प्रतिसाद दिला असेल तर त्यावर नक्की प्रतिसाद लिहा अगदी मुद्दामून आणि त्यात ट्रोलरचा उल्लेख (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेसुद्धा) पूर्णत: टाळा. अनुल्लेखाने मारणे म्हणतात याला. आणि याचा खूप त्रास होतो ट्रोलर्सना. फार घातक अस्त्र आहे हे! तडफडतात ट्रोलर्स अक्षरश:!!
अजून एक, इथले काहीच मनावर घेऊ नका; कारण ट्रोलिंग करणारे डुआयडीच असतात साधारणत: आणि त्या ट्रोलिंगला सपोर्ट करणारे आणि हसणारेही त्याच डुआयडीचे आणखी खोटे आयडीज् असण्याची घनदाट शक्यता असते. कंपुही असू शकतो एखादा.
त्यामुळे शांत रहा. तुम्हाला अस्वस्थ करण्याचा आणि चिडवण्याचा त्यांचा हेतू कधीच सफल होऊ न देणे हे तुमच्याच हातात आहे.
हे प्रकार बऱ्याच सोशल साईटस् वर चालतात.
त्यामुळे निघून जाणे, साईट सोडून देणे, लिखाण बंद करणे टाळा. कारण हाच हेतू असतो ट्रोलर्सचा!
ट्रोलिंग सेलिब्रिटीज् चे व्हायचे आधी. आता वाटतंय 'हम भी सेलिब्रिटिज् से कम कहॉ है!'
ट्रोलर्स ना भरपूर मोकळा वेळ असतो आणि त्यांना खऱ्या आयुष्यात किंमत नसते म्हणून ते आपल्या मानगुटीवर येऊन बसतात वेताळासारखे.
ट्रोलर्स E-समाजसेवाकरण्याकरता जो त्यांचा अमुल्य (काहीच किंमत नसल्याने खरतरं 'विनामूल्य', 'पडिक') वेळ देतात त्याबद्दलची माहिती धाग्यावरील प्रतिसादात मिळेल.
टीप: ट्रोलर्स ना दुखावण्याचा हेतू होता, असे वाटले असेल, तर बरोबर ओळखले आहेत तुम्ही. दुखावले गेले असालं तर मस्तच! नाही तर अजूनच मस्त! कारण तुमच्यामुळेच आम्हाला न ओळखणारेही आम्हाला ओळखू लागले. जाम प्रसिद्ध करून सोडलंत आम्हाला! काम सुरु ठेवालंच ही खात्री आहे. पण बंद करावं वाटलंच तर करू शकता, हरकत नाही.
आजवर भरपुर कष्ट उपसून केलेल्या आमच्या प्रसिद्धीकरता धन्यवाद! इतकी मेहेनत तर कोणी पेड प्रोमोटर सुद्धा करत नाही नेत्याची, जितकी तुम्ही फुकटात आणि वर चार शिव्या खाऊन आमची प्रसिद्धी केलीत. याबद्दलची कृतघ्नता दाखवण्याकरता हा धागा.
मी कोणाचेही नाव लिहित नाही. कारण ज्यांचे राहिलं त्यांच्यावर अन्याय असेल तो. त्यामुळे सर्व ट्रोलर्सने स्वतःच समाधान मानून घ्या की त्यांच्या कष्टांना आम्ही मायबोलीकर जाणतो. (या धाग्यावर तुम्ही यालंच. त्यामुळे सर्वांना आम्ही ट्रोलर्सची नावे कळवायची गरज भासणार नाही. सुज्ञास सांगणे न लागे!)
- स्वघोषित प्रतिनिधी of ट्रोल्ड मायबोलीकर्स!
मला लिंक कशी देतात हे माहीत
मला लिंक कशी देतात हे माहीत नाही म्हणून इथेच कॉपी पेस्ट करतेय,हा माझाच प्रतिसाद आहे ,भारंभार बिनकामाचे धागे वरचा,एप्रिल मधला,
*भारंभार प्रतिसाद नावाचा धागा मिळाला नाही म्हणून इथेच टाकतेय,
कोणीही चिडून वैतागून प्रतिसाद दिला नाही तर आसुरी आनंद मिळवणारे हे id आपोआप धागाकाम बंद करतील आणि हाच मंत्र धागा शब्दा ऐवजी प्रतिसाद वापरून वापरू शकतो
So पण असे लोकं परत नवीन रूप घेऊन येतात ,हे 100टक्के खरे असले तरी इग्नोरास्त्र आपल्या हातात आहेच हे लक्षात ठेवून यांचा समूळ नायनाट करता येईल*
माझेही हेच म्हणणे आहे,कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा दुर्लक्षच करणे बेटर असते,
बाकी,लेखातील आम्हाला प्रसिद्धी मिळाली वगैरे वगैरेशी आजिबात सहमत नाही,तुमचे व तुमच्यासोबत ट्रोल होणाऱ्या आयडींचे बरेच लिखाण आवडत नाही,किंवा अगदी थोडंफारच आवडते,
पण या पद्धतीने ट्रोल करणे,मुद्दाम आयडींची नावे वापरणे हे अतिशय चुकीचे वाटले म्हणून लिहिले आहे,बाकी अडमीन वेमा कारवाई करायला समर्थ आहेतच
आदु, उपहासाने लिहिले आहे ग ते
लेखातील आम्हाला प्रसिद्धी मिळाली वगैरे वगैरेशी आजिबात सहमत नाही>>>>>>>>> आदु, उपरोधाने लिहिले आहे ग ते!
समझा करो!
एखाद्याचा टोकाचा काय
एखाद्याचा टोकाचा काय थोडासुद्धा तिरस्कार करणे म्हणजे स्वतःचे नाक कापून शेजार्याला अपशकुन करणे असते. घरात उंदीर निघाला तर स्वतःचे घर जाळणे = द्वेष करणे, तिरस्कार करणे.
सोशल मिडियावर लोक अनेक हेतूंनी येतात -
कोणी नवीन मैत्री जोडायला येतात
कोणाला एम्प्टी नेस्टमुळे वेळ मिळालेला असतो ते काहीतरी विधायक मनोरंजन/छंद शोधत असतात.
कोणाला लेखनातून स्वतःला शोधायचे असते
कोणाचा अजेंडा असतो - पर्यावरण किंवा राजकारण , अंधश्रद्धानिर्मूलन अथवा स्त्रीमुक्ती म्हणा
या विविध हेतूंमधील एखादा हेतू कोणाला तरी विनाकारण अथवा सकारण छळणे हादेखील असू शकतो. तामसिक अथवा आसुरी आनंदही मिळत असेल काहींना.
सिव्हीअर ट्रोलिंगचा अनुभव आहे. मला. घाबरायला होते, त्रास होतो, झोप जाते. पण मग अनुभवांतून शिकायला मिळाले, सगळीकडे आपण वेलकम नसणारच. जाईच्या नवलकहाणीतील हे सारे स्वप्नामधील (आभासी) पत्ते असतात. या आभासी पत्त्यांकरता, आपली वास्तवातील झोप जाउ देण यात आपली चूक असते.
सहसा न्युट्रल आय डी या गटारगंगेला घाबरतात. न जाणो आपल्याकडे वळायची. असो. मधुरा यांनी लिहील्याप्रमाणे, जिथे लक्षात येईल, तिथे मौन स्वीकारणे हाच एक उपाय दिसतो.
अवांतर - या काही दिवसात, सर्व वयोगटाचे लोक माबोवर दिसले. मग लक्षात आले, अरे आपण इथे अॅडल्ट कंटेंट टाकायला नको. लैंगिकता/ कामुकता आणणे अशिष्ट आहे. सर्वांचे मत माझ्या मतासारखे असेलच असे नाही हेदेखील मान्य आहे. असो.
सामो प्रतिसाद>>>> +११११
सामो प्रतिसाद>>>> +११११
जे ट्रोल करतात ते निराश वादी
जे ट्रोल करतात ते निराश वादी लोक असतात.खऱ्या आयुष्यात ह्या लोक कडे समाज दुर्लक्ष्य करत असतो .
त्यांना समाजात काही किँमत नसते .
मग समाजा विषयी जो आत मध्ये द्वेष असती तो सोशल मीडिया वर बाहेर निघतो .
खऱ्या आयुष्यात ह्यांना कोण्ही विचारत नाही .
Trol करणारी लोक म्हणजे विकृत बुध्दीची लोक.
फक्त myboli किंवा बाकी संकेत स्थळ विषयी हे माझे मत आहे .
खरं आहे राजेश! कदाचित म्हणूनच
खरं आहे राजेश! कदाचित म्हणूनच काही जण स्वतःचा वेळ खर्ची घालून ट्रोलिंग करत बसतात कारण त्यांच्या वेळेला खरचं काही किंमतच नसते.
बाकी ट्रोलिंग विरूध्द आपण बोललो तर आम्ही ट्रोल करत नाहीये, प्रश्नच तर विचारतो आहे.... मत मांडतो आहे करत काहीतरी भंपक मुद्दे मांडायचे आणि पुन्हा उत्तराची अपेक्षा ठेवायची!
कसले असतात ना बालिश ट्रोलर्स!!
हा धागा मी वीबीला ट्रोल केल
.
धागा समस्त त्रस्त ट्रोल्ड
धागा समस्त त्रस्त ट्रोल्ड माबोकर्स च्या वतीने आहे. कोणाला लागू होतो हे ज्याचे त्याने ठरवायचे.
वोके. मी माबोवर आता पर्यत
वोके. मी माबोवर आता पर्यत कोणालाच त्रास दिला नाहीये.
अन दिला असेल तर तो निव्वळ तुमच्या मनाचा भास समजावा.
मायबोलीवरच्या सेलेब्रिटी
मायबोलीवरच्या सेलेब्रिटी यादीमध्ये मधुरा यांचे अभिनंदन! ज्यांच्यासाठी एक पूर्ण धागा डेडिकेट केला गेला...
ट्रोलिंग करणरे मानसिक आजाराने
ट्रोलिंग करणरे मानसिक आजाराने त्रस्त असतात, खर्या आयुश्यात त्यांचे कोणी फार ऐकुन घेत नसल्याने ऑनलाइन लै मळंमळ करत बसतात!
रॉनी प्रतिसाद>>>>>>प्लस वन!
रॉनी प्रतिसाद>>>>>>प्लस वन!
बाकी vbच माहिती नाही पण समाधी तर स्वतः ट्रोल करते अनेकांना.
अज्ञातवासी
अक्कु, तुला वाटतंय का तू कोणाला ट्रोल केले आहेस असे? असेल तर ते थांबव, पुन्हा करू नकोस आणि नसशील तर चांगलेच आहे
अज्ञातवासी +१११११
अज्ञातवासी +१११११
मधुरा अभिनंदन! खूप कमी वयात खूप मोठी अचिवमेंट!!!!!
उपरोधाने लिहिले आहे ग ते! Lol
उपरोधाने लिहिले आहे ग ते! Lol
समझा करो!>>>असेल मात्र मला तसे वाटत नाही,
इग्नोर करा करा म्हणायचे आणि परत परत त्याच तश्याच पोस्ट टाकत बसायचे,कुणीतरी एकाने तरी शांत बसावे न ते ही नाही,
मागेही मी कुठेतरी प्रतिसाद दिला होता की हम भी कम नही हे दाखवण्याच्या नादात दोन्ही पार्टी खूप खालच्या लेव्हल ला उतरत आहेत,
असो,मी फक्त वाचनमात्र असते इथे आणि खुप प्रतिसाद किंवा नवीन धागा दिसल्यावर दिवसभराच्या दगदगीवर आराम म्हणून हौसेने ते उघडून बघते तर हल्ली वाद,ट्रोलिंग आणि असेच काही दिसत राहते,याने मनाला प्रसन्न वाटेल का कोणाच्याही??
क्रमशः
नाही सुधारणार तुम्ही लोक
मधुरा, तुमच्या धाग्यावर तुमच्या लेखनाबाबत मी काही नकारात्मक प्रतिसाद दिले, जे तुम्हाला रुचले नाही, त्यावर थोडे वाददेखिल झाले, पण त्यानंतर मी तुमच्या कुठल्याच धाग्यावर काही प्रतिसाद दिल्याचे निदान मला आठवत नाही, तरी सुद्धा अक्कु३२० ने, मी एक जोक टाकला विनोदाच्या धाग्यावर त्यात मला जाणुनबुजुन ट्रोल केला, खोटा आरोपही केला अन नंतर तो आरोप मी टाईमपास साठी केला अशी कबुली देखिल केली. जे थोडेफार मला आठवते त्यानुसार माझा अक्कुशी फक्त तुमच्या धाग्यावर वाद झाला होता कारण तुमच्या विरोधात लिहीलेले त्याला आवडले नाही , अन म्हणुन मला वाटले की तो तुमचा सपोर्टर असल्याने असा वागला असेल, पण तो खुप चिप वागला हे नक्की. एकीकडे तुमच्या कंपुतील स्त्रि आयडी ट्रोल होताहेत म्हणुन अॅडमीन कडे धाव घ्यायची अन दुसरीकडे काहिही कारण नसताना दुसर्या स्ती आयडीला ट्रोल करायचे, अन त्याला सपोर्ट करायला ईतर स्त्री आयडी होत्याच ही कसली दुटप्पीगिरी ?? मी तीथे जे लिहीले होते तेच ईथेहि सांगते थोडक्यात. अक्कु हा माणुस माझ्यामते विक्रुत आहे . तो त्याच्या टीपी साठी किंवा त्याच्या सो कॉल्ड महिला आयडी मैत्रीणींना इम्प्रेस करण्यासाठी काहिही करु शकतो असे मला वाटते. मी माझ्यापुरते त्याला ईग्नोर करायचे ठरविले आहे, जसे यापुर्वी तुम्हालाही केले होते, पुढेही करेन . तुमचे बाकीचे लेखन मी वाचत नाही, हा धागा ट्रोलींग साठी आहे म्हणुन वाचला तर माझे नाव दिसले , अर्थात आश्चर्य वाटले नाही.
अक्कु ३२० ह्या आयडीची तेव्हाची भाषा आठवली की त्याच्याशी वाद न घालणेच बरे असे वाटते, मग कोणी काहिही म्हणो. मी माझ्या प्रतिसादात त्या धाग्यावर पण हेच लिहीले होते, की घाणीत दगड फेकला की थोडी घाण आपल्यावर पण येते अन ती येऊ नये म्हणुन मी त्याला माबोवर कुठेच प्रतिसाद देणार नाहीये. पण एक विचार करता अक्कुचा वावर बघता तो स्वत:च समाधी असण्याची शक्यता देखिल नाकारता येणार नाही, काय माहीत दुसर्याला इम्प्रेस करायला स्वत: स्वतःच्या दोन आयडींशी बोलत असेल, अन त्या स्त्रि आयडींना सांगत असेल, बघा मी बोललो होतो न तुमहाला 
राहिली गोष्ट मी समाधी असण्याचा, तर त्यावर निदान मलातरी कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, कारण सत्य मला माहित आहे, जे मला ओळखतात अन माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना स्पष्टीकरणाची गरज नाही, त्यातील काहिंनी आधिच मला ईकडे दुर्लक्ष करायचा सल्ला देखिल दिलाय. अन जे स्वत: एक ट्रोल आहेत त्यांना कुठलाच खुलासा द्यायची मला गरज वाटत नाही. त्यांना मी कोणीही वाटो मला फरक पडत नाही
आता, याऊपर मला ईकडे काही लिहायची देखिल गरज नाही, तरी शेवटी जाता जाता, या धाग्यावर लिहिलेच आहे तर अजुन थोडे लिहीतेच.
सध्या ईकडे ट्रोलींग वाढलेय, कुठलाही धागा ऊघडा, तेच तेच वाद , भांडणे. . शाली अन अज्ञातवासी बाबत जे झाले ते चुकीचेच होते, पण तेव्हा पासुन कदाचित नकळत असावेत, पण त्यांचे सपोर्टर ईतरांना ट्रोल करताहेत, सगळेच नाही पण बरेचसे. काही आम्ही ट्रोल होतोय म्हणुन रडताहेत ते पण स्वत: तेच करत आहेत. असो हे माझे निरीक्षण आहे, माझे मत आहे, ते पटले तर ठिक नाही तर सोडुन द्या .
बाकी <<< ट्रोलर्स ना भरपूर मोकळा वेळ असतो आणि त्यांना खऱ्या आयुष्यात किंमत नसते म्हणून ते आपल्या मानगुटीवर येऊन बसतात वेताळासारखे. >>> +११११११११ विनोदाच्या धाग्यावर याची प्रचिती आलीये
VB, पण मी अक्कुशी वाद असणारा
VB, पण मी अक्कुशी वाद असणारा अजून एक आयडी म्हणून लिहिलं समाधी बद्दल. तो तुमचाच अजून एक आयडी आहे असे मी तरी स्वतःहून कुठे लिहिले नाही.
आणि तुम्ही दिलेला प्रतिसाद (नकारात्मक असं ज्याला तुम्ही म्हणालात) तो मुख्यत: माझा लेखनाबद्दल नव्हताच तर माझ्या प्रतिसादात मांडलेल्या एका मुद्द्याबद्दल होता जो तुम्हाला आवडला नाही. तुम्ही क्रमश: वाले लिखाण वाचत नाही असे स्पष्ट लिहिले होतेत, मला आठवते आहे. त्यामुळे लिखाण न वाचताच तो प्रतिसाद लिहिलेला होतात आणि त्यामुळे मी तो फार मनावर घेतला नाहीये. मी विसरूनही गेले होते की आपल्यात वादही झाला होता त्या नंतर.
आणि हो, अक्कुला संबोधून लिहिताना मी लिहिलेले आहे की जर ट्रोल केले असशील तर थांबव आणि पुढे करू नकोस. यात प्रोत्साहन कुठे दिसले तुम्हाला????
मी स्वतः ट्रोलिंग च्या विरोधात आहे आणि तुम्हाला अक्कुने ट्रोल केले असेल तर ते चुकीचेच आहे, हे मी इथे स्पष्टपणे लिहिते आहे.
स्त्री चा उचित सन्मान ठेवला गेला पाहिजे आणि त्यांनी स्वतःही इतर आयडींना उगाच वादात ओढले नाही पाहिजे या मतावर मी ठाम आहे.
मी विनोदाच्या धाग्यावर जास्त येत नाही. प्रत्येक जण प्रत्येक धागा उघडून बघतोच असे नाहीये ना? त्यामुळे विनोद धाग्यावरील ट्रोलिंगची कल्पना मला असण्याची शक्यता आहे का याचा विचार तुम्ही दुटप्पीपणाचा आरोप करण्याआधी करायला हवा होतात.
असो. बाकी आम्ही admin ला काय लिहितो आणि का लिहितो हे तुम्हाला माहिती होते तर तिथे तर तुम्ही आमच्या बाजूने काहीच लिहिले नाहीत. मग त्यामुळे जर आम्ही तुम्हाला ट्रोलर्सचे सपोर्टर मानत नाही तर आम्ही अक्कुला काही बोललो नाही म्हणून आम्ही त्याला ट्रोलिंग मध्ये सपोर्ट केला असे तुम्ही कसे म्हणू शकता????
महाश्वेता
महाश्वेता
मधुरा, कुठेतरी गल्लत होतेय,
मधुरा, कुठेतरी गल्लत होतेय, कदचित मला निट मांडता आले नाही, पण त्याला प्रोत्साहित करणार्या तुम्ही नाहि आहात, किमान माझ्या माहितीत तरी, ते मी दुसर्या आयडी बद्द्ल बोललेय, जे त्या धाग्यावर होते, कंपुमधील ईतर आयडींपैकी एक . अन मी खरेच क्रमश: कथा वाचत नाही. आपल्यात वाद झाला होता तुमच्या धाग्यावर अन तीथेच अक्कुशी देखिल वाद झाला होता ईतकेच आठवतेय अन म्हणुन मला वाटले की त्याने तो राग आता काढला असावा. जरी एकदा वाद झाल्यावर पुढे होऊ नये म्हणुन तुमचे लेखन वाचने मी सोडुन दिले असले तरी .
मी हे सगळे ईकडे लिहीले नसते जर तुम्ही माझे नाव तुमच्या प्रतिसादात लिहीले नसते, ते मला तुमच्या प्रतिसादात दिसले, त्याच्या नाही. त्यामुळे मला वाटले की तुम्हाला सगळे माहित आहे नाहीतर तो विषय ईकडे काढण्यामागे काय प्रयोजन होते?
मला कुणाकडुन काही ऐकुनच घ्यायचे नाहीये आता, कारण माझ्यामते सगळी सारवासारव असेल, कारण कुणाला जर खरेच काही वाटत असते न तर त्या विक्रुत माणसाला त्याच्या भाषेबद्दल त्याला तेव्हाच समज दिली गेली असती.
VB तुमचे प्रतिसाद आताच वाचले.
VB तुमचे प्रतिसाद आताच वाचले.
धाग्याची लिंक देऊ शकाल???
>>>>>>तुम्ही क्रमश: वाले
>>>>>>तुम्ही क्रमश: वाले लिखाण वाचत नाही असे स्पष्ट लिहिले होतेत, मला आठवते आहे.>>>>>
पुढच्यावेळी स्क्रीन शॉट घेऊन ठेवा, पुराव्याने शाबीत करायला कामाला येतो
>>>>, ते मी दुसर्या आयडी बद्द्ल बोललेय, जे त्या धाग्यावर होते, कंपुमधील ईतर आयडींपैकी एक .>>>>
इकडून बोलणे झाले, तिकडून येणे झाले ...असं नाही करायचं बाबा,
राडा करायचा असेल तर पाहिल्या प्रतिसादापासून सुरू करा ना, तसेही अजून 1 फारतर 2 प्रतिसाद नंतर ज्याने लिहिले तो id उडी मारेलच वादात, मग 2 3 प्रतिसाद सस्पेन्स कशाला ठेवताय
आम्हाला बॅकग्राउंड माहीत नसते, then we feel lost, करमणुकीचा आनंद पूर्ण घेऊ शकत नाही
वाहता धागा होता, अन
वाहता धागा होता, अन स्क्रिनशॉट घ्यायची माझी सवय नाही,
माझ्यासाठी तो विषय मी कालच संपवला होता, मधुराच्या प्रतिसादात माझे नाव नसते तर मी ईकडे लिहीलेही नसते. त्या विक्रुताने मुद्दाम नुसते टिंब टाकुन स्वत:चे प्रतिसाद वाहुन जाऊ दिले अन नंतर दुसर्या एकीला हाताशी घेऊन माझ्यावरच ड्यु आयडी असल्याचा आरोप केला
https://www.maayboli.com/node/1567
अन मी खरेच क्रमश: कथा वाचत
अन मी खरेच क्रमश: कथा वाचत नाही. आपल्यात वाद झाला होता तुमच्या धाग्यावर अन तीथेच अक्कुशी देखिल वाद झाला होता ईतकेच आठवतेय अन म्हणुन मला वाटले की त्याने तो राग आता काढला असावा. जरी एकदा वाद झाल्यावर पुढे होऊ नये म्हणुन तुमचे लेखन वाचने मी सोडुन दिले असले तरी .>>>>>>>>>>>>> तुम्ही माझे लेखन वाचणे बंद केलेत? म्हणजे तुम्ही वाचत होतात का आधी? कारण मी लिहिते ते युगांतर क्रमशःच आहे. आणि बाकी ५-६ कथा कवितांचे धागे सोडल्यास बाकी जास्त क्रमश: नसलेलं माझं लिखाण मायबोलीवर नाहीये. असो.
वाद लेखन वाचल्यामुळे होतात असे वाटतं नाही मला. आणि मी याला चर्चा समजते आहे, वाद नाही. वैचारिक देवाण-घेवाण करण्याकरता आपण आपले मुद्दे मांडतो. जोवर उद्देश समोरच्याला दुखावण्याचा किंवा आगाऊ अक्कल शिकवायचा नाही तोवर तो संवाद असतो, वाद नाही. त्यामुळे आपल्यात जी चर्चा- विचर्चा झाली, ज्याला तुम्ही वाद म्हणलात, ती मनावर किती घ्यायची हे तुम्ही ठरवा, कारण मी ते मनावर घेतले नाहीये. अति झाल्याशिवाय कोणाच्या साहित्याकडे पाठ फिरवून काय सिद्ध होणार आहे? अर्थात तुम्ही वाचा माझे लेखन अथवा नका वाचू, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आणि निर्णय आहे. पण वाद झाला हे आता विसरून जा. मला स्वतःला वाद लक्षात ठेवायला आवडत नाहीत आणि त्यामुळे तुम्ही स्वतःहून वाद लक्षात ठेवून एखाद्या आयडी बद्दल मन कलुषित करून घेऊ नका. एकाच वेबसाईट वर आहोत म्हणल्यावर शब्दाला शब्द लागायचेच.
मी हे सगळे ईकडे लिहीले नसते जर तुम्ही माझे नाव तुमच्या प्रतिसादात लिहीले नसते, ते मला तुमच्या प्रतिसादात दिसले, त्याच्या नाही. त्यामुळे मला वाटले की तुम्हाला सगळे माहित आहे नाहीतर तो विषय ईकडे काढण्यामागे काय प्रयोजन होते?>>>>>>>>>> अक्कुने सर्वप्रथम तुमचे नाव लिहिले होते प्रतिसादात जे त्याने संपादित केले. बाकी मी स्वतःहून तुमचे नाव का घेईन? मी उलट विषय वळवण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरून. असो.
गैरसमज टाळा.
राजा भिकारी! माझी टोपी चोरली!
राजा भिकारी! माझी टोपी चोरली!
राजा घाबरला! माझी टोपी दिली!
सिम्बा , नक्की कसला आंनद
सिम्बा , नक्की कसला आंनद घ्यायचाय?? की कसे एक विक्रुत काहिही शब्द वापरतो दुसर्याला, अन यात तुम्हाला आंनद मिळतो , धन्य आहात
Good one madhura...
Good one madhura...
हो मी आधी वाचायची तुमच्या
हो मी आधी वाचायची तुमच्या कथा, एक वँपायरवरची होती, तीथे ही दोघींना एकमेकींचे पटले नव्हते सो, आपले विचार जुळत नाहीत अन जर पटणारच नसेल तर वाद तरी कशाला हवेत , या मताची मी आहे अन म्हणुन मी तुमचे लेखन , त्यावरचे प्रतिसाद काहीच वाचत नाही.
अक्कुने सर्वप्रथम तुमचे नाव लिहिले होते प्रतिसादात जे त्याने संपादित केले. बाकी मी स्वतःहून तुमचे नाव का घेईन? मी उलट विषय वळवण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरून. असो. >>> ओह्ह, असे असेल तर मला त्याचा प्रतिसाद दिसला नाही , फक्त तुमचा दिसल्याने तुम्हाला सगळे माहीत असुन तुम्ही हे मुद्दाम केले असे वाटले
नक्की कसला आंनद घ्यायचाय?? की
नक्की कसला आंनद घ्यायचाय?? की कसे एक विक्रुत काहिही शब्द वापरतो दुसर्याला, अन यात तुम्हाला आंनद मिळतो , धन्य आहात>>>>>>
Aho , चित्रपटात नाही का एक दुसऱ्याला हारामजादे म्हणतो, दुसरा त्याला कुत्ते कमीने म्हणतो, तिसरी कोणीतरी काचांवर नाचते, चवथी विधवा होते सगळ्याचा आनंद आपण घेतो की नाही? तिथे निदान ती 4 पात्र वेगळी आहेत हे तरी नक्की माहीत असते,
इकडे ती पण खात्री नाही, उद्या उठून कळेल हे 3 ही id चा मालक एकच आहे
मग या बिन चेहऱ्याच्या, बिन व्यक्तिमत्वाच्या idच्या भांडणाला (वाद, चर्चा, वैचारिक आदानप्रदान काय हवे ते म्हणा) करमणूक म्हणून का बघायचे नाही?
तुमचे भांडण खरे असेलही , पण ज्या पद्धतीने तुम्ही 3 4 id सगळीकडे धुणी धुवत असता त्या पद्धतीने केवळ मनोरंजन होतेय, मी बोलून दाखवतोय (होपिंग काही फरक पडेल) बाकीचे गप्प बसून मजा पहात असतील(होपिंग करमणूक थांबणार नाही)
असो... एन्जॉय,
पण स्क्रीन शॉट चे दोन्ही पार्टी लक्षात ठेवा हो... मोबाईल वरून घ्यायला 3 sec पुरतात,
हो मी आधी वाचायची तुमच्या कथा
मताची मी आहे अन म्हणुन मी तुमचे लेखन , त्यावरचे प्रतिसाद काहीच वाचत नाही.>>>>>>>>>>>>>>>> हे सत्य आहे का? कारण हा धागा मीच काढलाय आणि प्रतिसादही माझाच आहे, जो वाचून तुम्ही प्रतिसाद दिलात. असो. लिखाण पटत नसेल तर तुम्ही नका वाचू. मी केवळ वाद विसरून जा इतकेच सांगते आहे. माझ्या मनात तुमच्या विषयी काही वैर नाही. आणि व्हॅमपायर ची कथा तुम्ही वाचलीत आणि त्यावर प्रतिसादही दिलात हे ही विसरले होते मी. मूव ऑन म्हणत पूर्वीच सोडून द्यायला शिकले आहे. नाहीतर त्याचा बाऊ होतो उगाच! त्यामुळे निश्चिंत रहा. तुम्हाला त्रास द्यायला मी काहीही लिहित नाहीये.
आणि तुमचे ट्रोलिंग झाले असेल तर आम्हीही त्याचा निषेध करतो. याने खरचं फरक पडत नाही की ट्रोल करणाऱ्या आयडीचे आमच्याशी वैर आहे कि नाही.
<<
<<
हे सत्य आहे का खरेच?
त्यामुळे निश्चिंत रहा.
त्याचा निषेध करतो आहे
>> ही वाक्ये वाचुन हसु आवरले नाही , कारण मला ती वेड पांघरुन पेडगावला जाणे प्रकारातील वाटताहेत,
चालु द्या, मी या धाग्याची रजा घेते, मला सिम्बाच्या करमणुकित भर घालायची नाही
मग काय करू शकतो आम्ही vb? I
मग काय करू शकतो आम्ही vb? I mean, I am not admin. इथे दोनच गोष्टी करता येतात दुर्लक्ष नाहीतर निषेध!
आणि तुम्हाला हसू आले निषेधाचे म्हणजे तो तुम्हाला ट्रोल करत नव्हता. करत असता तर तुम्हाला हसू का येईल??
तसं तुमचे एकंदर प्रतिसाद पाहता, ट्रोलिंग तुम्ही करूच शकता यावर कोणी शिक्कामोर्तब केली तर आम्ही त्याचा निषेध नक्कीच करणार नाही.
आणि खरे असेल की तुम्ही माझे लिखाण आणि प्रतिसाद वाचत नाही तर माझ्या आयडी ने लिहिलेला धागा म्हणल्यावर तुम्ही ही लिंक ओपन करणेच अपेक्षितच नव्हते. मग प्रतिसाद वाचायची वेळ आलीच कुठून? ज्या व्यक्तीचे लिखाण आपण वाचत नाही असा दावा आपण करतो आहोत तो दावा निदान त्याच्याच धाग्यावर त्याच्याच प्रतिसाद वाचून करू नये. ते तुम्ही केलेत. या तुमच्या कृतीला काय म्हणाल? हे हास्यास्पद नाही का जास्त?
Pages